आई - पहिली गुरू

Aai hi balachi pahili guru aste

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः।

आई ही बाळाची पहिली गुरू असते, बाळाचं शिक्षण हे घरातूनच सुरू होते, घरातल्या व्यक्तींचे अनुकरण करून बाळ शिकत असते.. घरातील वातावरण , बाहेरील वातावरण याचा बाळाच्या संगोपणावर परिणाम होत असतो म्हणून घरच वातावरण हे संस्कारित असायला हवे... घरातील वातावरण अगदी प्रसन्न असायला हवं...
आपले शब्द त्यांच्या कानावर जातात, आपण कधीच कुणाला अपशब्द बोलू नये...

मातृत्व म्हणजे बाईचा दुसरा जन्मच होय, ही लढाई जिंकली म्हणजे सर्वच जिंकली अस होत नाही... मूल जस जस मोठं होत तशी तशी आईची परीक्षा सुरू होते...

आपलं मुलं अगदी सुदृढ व्हावं हुशार व्हावं यासाठी आईची तळमळ सुरू असते, त्याला काय खायला द्यावं काय नको याकडे अगदी चातकाची नजर असते...

बाळ हळूहळू मोठं व्हायला लागत, आपल्या नकळत त्यांची उंची आपल्या पर्यंत येऊन पोहचते..
माझीही लेक आज माझ्या उंची पर्यंत आली आहे..

आज एक प्रसंग मला सांगावासा वाटतो...

साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी आणि माझी लेक आम्ही रस्त्याने चाललो होतो... आम्हाला रस्त्याच्या कडेला एक भिकारी बाई दिसली ( खरतर भिकारी म्हणायला नको ) तिच्या कुशीत छोटं बाळ होत आणि बाजूला तीन ते चार वर्षांची मुलगी बसली होती.. समोर कटोरा ठेवला होता आणि लोक त्यात पैसे घालत होते... माझी लेक तिथे उभी राहून खूप वेळ त्यांच्या कडे बघत राहिली...

"काय ग आता तुला तुझा मॅजिक बॉक्स घ्यायला उशीर होत नाही आहे, घरी तर खूप घाई करत होतीस..

चेहरा हिरमसून "ओके मम्मा..." जणू तिला तिथून जायचंच नव्हतं...

आम्ही दोघीही शॉप मध्ये गेलो, माझ्या लेकीने महागातला महाग मॅजिक बॉक्स सिलेक्ट केला...

काउंटर वर येऊन त्याची किंमत विचारली, समोरच्याने अडीच हजार सांगितले...

"मम्मा अडीच हजार दे मला..."
"बेटा तू ते पकड, मी बिल पेड करते...

"नो मम्मा, प्लीज गिव मी....

"ओके बाबा, हे घे.. तू काही ऐकणार नाही आहेस...

"दादा सॉरी, हे मला आता नकोय ,मी नेक्स्ट टाईम पक्का घेईल पण आता मला याची गरज नाही आहे..

"अग, पण तुला किती दिवसापासून हे हवं होतं ना... मग आता काय झालं, तुझ्याच आवडीचं सिलेक्ट केलं ना आपण...

"मम्मा पण मला आता हे नकोय, तू चल इथन, मला दुसऱ्या शॉप मध्ये जायचं आहे..

ती मला एका कपड्याच्या छोट्या दुकानात घेऊन गेली,

"दादा एक कागद आणि पेन द्या, मी लिस्ट बनवते त्यानुसार तुम्ही मला वस्तू काढून घ्या...

तिनी लिस्ट बनवली त्यात अमाउंट पण टाकली...
दुकानदारानी पटापट वस्तू काढून पॅक करून दिल...

ही काय करतीये मला काही कळेना...
माझा हात पकडला नी म्हणाली

"मम्मा, चल लवकर..

"अग इतकी घाई...?..
तिनी मला ओढत ओढत नेलं... आणि आम्ही थांबलो ते त्या बाई समोर.....

माझ्या लेकीने पटापट बॅग ओपन केली त्यातले कपडे काढले, आणि त्यांच्या समोर ठेऊन,

"हे बघा, मी तुमच्यासाठी काय आणलंय... ही तुमच्यासाठी साडी, बाळाचे कपडे, आणि ह्या पिल्लू साठी फ्रॉक आणला....

"ये पिल्ले, मी तुला घालून देते..


माझ्या लेकीने तिच्या अंगातला मळके, फाटके कपडे काढून तिला नवा कोरा फ्रॉक घालून दिला तिचे केस विंचरून तिला हेअर बेल्ट लावून दिला...

त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझे अश्रू अनावर झाले.... त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद, आतून झालेलं समाधान सगळं सगळं मी अनुभवत होते...

माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर तर गड जिंकल्याचा आनंद होता...त्यावेळी मला तिचा खूप अभिमान वाटला... आणि स्वतःवर गर्व... मी तिला घट्ट मिठी मारली... 

दुसऱ्यांना मदत करताना जो आनंद मिळतो ना तोच खरा आनंद असतो...

आज माझं  मातृत्व जिंकलं... मातृत्वाची वाट बरोबर दिशेने जात होती...
मी तिला पुन्हा त्या दुकानात नेलं आणि तिला हवं असलेलं मॅजिक बॉक्स घेऊन दिला, तिलाही खूप आनंद झाला...

समाप्त::