आई खूप काही करते

It's A Story Of Mom

 कर्तव्यवान तू ..कृतज्ञ तू


रोज प्रमाणे ती लवकर उठली सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि आम्ही सगळे उठायच्या आत माझ्या घरातील हे फुलपाखरू त्याच्या कर्तव्यासाठी बाहेरील दुनियेत भुर्रकन उडून गेले... या उलट आम्ही दोघी आई सारखे गुण आमच्या अंगात येयला आम्हला अजून7 जन्म तरी घ्यावे लागतील....

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे मी आणि माझी बहिण घरीच असतो... घरातील थोडीफार आवराआवर केली की दोघी निवांत होतो आणि mobile सारख्या गुबगुबीत खेळण्यासोबत खेळत बसतो... evening time ला आम्ही दोघी मस्त रोज फक्कड कॉफी पितो आणि गॅलरी मध्ये मस्त गप्पा मारत बसतो... पण त्या दिवशी आई जरा लवकर घरी आली एरवी नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवून टवटवीत फुलासारखे सगळ्या घरभर सुगंध दरवळत ठेवणारी ती आज कोमेजून गेल्यागत भासत होती...घरात कुठल्याच कामात तिचे लक्ष लागत नव्हते... एकदम शून्यात विचार करत बसलेली तिला पाहून मला नाही राहवलं आणि मी तिला विचारलं.. "मम्मी आज का एवढी शांत शांत".. ती "काहिनाही " असं बोलली... मला तिच्या बोलण्याच्या कोरडेपणा मुळे लक्षात आलं की मम्मी हळवी झालेली आहे आज बहुतेक....

तिला खूपदा विचारल्यावर शेवटी तिचा इतका वेळचा मनात डांबून ठेवलेला बांध फुटला.. ती खूप रडू लागली मम्मी अशी रडताना कधी आम्ही कधी पहिलीच नाही... आम्हाला नेहमी धीर देणारी , आम्हला सांभाळून घेणारी.. आमची आई आज खूप गहिवरून गेली... पप्पा आणि माझी छोटी बहीण दोघेही चिंतेत होते की, का आज मम्मी अशी हतबल झाल्यागत रडतीये... पप्पानी खूप वेळा विचारल्यावर मम्मीने सांगितले....
-----------------
मी आज रोजच्या प्रमाणे माझ्या ड्युटीवर गेलेली... नेहमी प्रमाणे patients ला xray काढण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होते.. आज जेव्हा मी patient ला पाहिले तर ते आपलेच नातेवाईक निघाले.... आजोबा वयस्कर होते.. मी त्यांना गाडीत बसवून हॉस्पिटल कडे रवाना झाले.. पण हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर त्यांना अचानक खूप त्रास होयला लागला, छातीत जळजळ होयला लागली...त्यांना तिथेच मळमळ झाली ..मी लगेच त्यांना पुन्हा स्वच्छ केले तर मग त्यानां खूप तहान लागली... "मला पाणी हवंय एक घोट , मला पाणी हवंय एक घोट " असं बोलू लागले... मी बोलले की , "आजोबा थांबा डॉक्टर आता येतील मग तुम्ही त्यांना विचारून पाणी घ्या".. पण त्यांना खूपच तहान लागलेली, मी धावत पळत जाऊन पाणी आणलं.. पण पाणी पाजायला गेले तर त्यांनी तिथेच चेअर वर मान टाकून दिली.. त्यांची ती अवस्था पाहून माझ्याही हातातील ग्लास खाली पडला... मी जिवाच्या आकांताने xray काढणाऱ्या डॉक्टरांना आवाज दिला... डॉक्टर ओळखीतले होते म्ह्णून त्यांनी जास्त वेळ न लावता, जास्तवेळ icu मध्ये न घालवता मला सांगितलं की तुमचा patient गेला... मला तिथेच थोडं गरगरल्या सारखं झाले.. मी खूप रडले ...अरे आत्ता काही वेळा पूर्वी जिवंत असलेला माणूस मला लेकीप्रमाने हक्काने पाणी मागत होता पण नियती बघा ना ..एका क्षणात होत्याचं नव्हते करते.. सगळे नर्स डॉक्टर ने मला समजावलं की जाणारा जातोच त्याची ती वेळ आली होती... "तुम्ही प्रयत्न केला काळाचा घाला परतून लावायचा, पण नशिबात जे लिहलय त्या पुढे नाहीना कोणी जाऊ शकत "... त्यामुळं राहून राहून आज सगळं झालेलं माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं .....बास आता खूप रडले , अशीच रडत बसले तर बाकीच्या माझ्या patients ला या कोरोना सारख्या महामारीतून जगण्याचा सकारात्मक मार्ग कोण दाखवणार ?....


तर अशी ही आमची मम्मी... तिच्या कर्तव्याला नेहमी जाणते.. आणि आम्ही दोघी बोलायचो "आई कुठे काय करते ?"... पण आजपासून आम्ही बोलू ..." असं काहीच नाही की जे आई करू शकत नाही... आई खूप काही करते"....?


तुमची आई सुद्धा असं वेगळं काहीतरी करून तुम्हाला अभिमान वाटावं असं काही करत असेल तर नक्की कंमेंट मध्ये सांगा ?