Jan 26, 2022
नारीवादी

आई काळाबरोबर चालणे गरजेचे...

Read Later
आई काळाबरोबर चालणे गरजेचे...शितल एक गृहिणी अतिशय छान सुरु होत तिचं, नवरा आकाश चांगल्या पोस्ट वर, एक मुलगी अनु समजूतदार, स्वतःच घर, कसलीही कमी नाही घरात,


मुलगी ही मोठी होती तिची, सकाळी आकाश ऑफिसला गेला की शितल तीचे ठरलेले काम उरकायची, वॉकला जाण, भाजी बाजार, सोसायटीत बर्‍याच मैत्रिणी होत्या तिच्या, त्यांच्या सोबत रमायची ती,


मुलगी अनु कॉलेजला जायची तयारी करत होती, तिकडे शीतलची गडबड सुरू होती, घाईने शूज घालणं सुरू होत तीच........


"आई अग उशीर झाला आज तुला वॉकला जायला" ,....... अनु


"हो ना ग",....... शीतल बोलली , माझ्या मैत्रिणी पुढे गेल्या


"एकटीच आहेस तर कश्याला फिरते गर्दीच्या ठिकाणी, किती गाड्या असतात रस्त्याने, सरळ सोसायटीच्या जिम मध्ये जा ना", ..... अनु बोलली,


"नको बाई, नाही समजत मला ते ट्रेडमिल कस वापरायच ते, मोकळ्या हवेत बरं वाटतं",....... शीतल


"ते ठीक आहे बागेत छानच वाटतं, पण मग तुला पावसाळ्यात वाॅकला जायला मिळत नाही, त्यापेक्षा जिमला जात जा ना ,ट्रेनर आहे तिथे, त्याच्याकडून समजून घे सगळ, म्हणजे कधी बागेत जायचं नसलं तर तुला सोसायटीच्या जिम मध्ये व्यायाम करता येईल",...... अनु


" हो", ... शितल


शितल हो बोलली खरी ती... पण जमेल का आपल्याला जिम मध्ये जायला? वेगवेगळे मशीन असतात तिथे सगळे लोक व्यवस्थित मशीन हाताळतात, आपल्याला काही जमलं नाही तर सगळे हसतील, शीतल विचार करत होती..... नको जायला तिकडे उगाच गडबड व्हायची


दुसर्‍या दिवशी अनु कॉलेज होऊन आली तशी रागात बोलली,...., "आई अग सारखी काय फोन करते, मी कॉलेजला जाताना सांगितलं होतं ना की मी करते तुला लंच ब्रेक मध्ये फोन, अर्जंट असेल तर मेसेज टाकून द्यायचा ना एक , उचलता येत नाही ग फोन दर वेळी, क्लासेस सुरू असतात, मग तुलाच टेंशन येतं, मी फोन उचलला नाही तर",.........


"मला नाही बाई समजत स्मार्ट फोन वापरायला, एखादं बटन दाबल गेल तर लागायचा कोणा दुसऱ्याला फोन ",........... इति शीतल...


" एकदा बघून घे ना मग तू नीट मोबाईल कसा वापरायचा ते",....... अनु


खाली सोसायटीत मेन्टेनन्स भरायचा राहून गेला म्हणून नोटिस बोर्ड वर तिला नाव दिसलं,


तशी मैत्रीण म्हटली,........ " ऑनलाईन भरून टाक ना मेन्टेनन्स",......


हो बोलून ती घरी आली, तिला कुठे येत होता ऑनलाईन बँकेचा व्यवहार, शेवटी अनु घरी आल्यावर तिने ट्रांजेक्शन पूर्ण केल


अनु कंटाळली होती आईच्या वागण्याला हे येत नाही ते येत नाही, खर तर किती हुशार आहे शीतल , सगळी कामे किती छान करते, काहीही एकदा सांगितलं की लक्षात राहत तिच्या, मग का अशी वागते, स्वतः मध्ये बदल करायला का घाबरते? काळाबरोबर स्वतःला बदलायला हवं तिने


शीतल एकदम सरळ आयुष्य जगायची, जे चाललय ते तसच चालू राहू दे अस सुरू होता तिच, काहीही नवीन टेक्नॉलॉजी शिकत नव्हती ती , सकाळी मुलगी कॉलेजला..... नवरा ऑफिसला गेले की आवरून मग एक दोन छंद होते तिचे ते जोपासायची ती, पण गॅझेट्सची भीती भरली होती तिच्या मनात ,अश्या या वागण्याचा त्रास व्हायचा मुलीला ,


अनुने ठरवलं आईला आता आपण सगळे व्यवहार शिकवून देवु , खूप झालं आता


"आई मी मदत करते, शिकवते तुला सगळे नवीन गॅझेट्स वापरायला , पर्यंत्न तर कर",......... अनु


घाबरतच शीतल हो बोलली, ........


ठरला तर मग, रोज ट्यूशन सुरू झाली त्यांची, आई आणी लेकीची जोडी जमली, रोज अर्धा तास अनु आईला मोबाईल लॅपटॉप कसा वापरायचा ते शिकवू लागली, होम वर्क द्यायल लागली, सगळे ऑनलाइन व्यवहार शिकून घेतले शीतलने, इंटरनेट कस वापरायच ते शिकून घेतल, त्याचे फायदे तोटे समजावून घेतले, एखाद्या दिवशी जर मालिका बघायची राहिली असेल तर आता शीतल इंटरनेट वर ती बघु लागली, एटीएम मशीन वापरायला शिकून घेतला, ऑनलाईन टॅक्सी रिक्षा बूक करायच यायला लागला तसं शीतलचा इंटरेस्ट अजून वाढू लागला


"किती वेगळ आहे ग हे जग..... वाटल होत अवघड असेल पण खूप लवकर जमल मला" ,....... शीतल


"हो आई तू आहेसच हुशार",...... अनु


मुलीकडून तिने आवडीने शिकून घेतलं सगळं, वाचण्यासारखं भरपूर साहित्य...... पुस्तकाचा खजिना सापडला होता शीतलला, त्यात ती रमू लागली, ऑनलाइन शाळेच्या मैत्रिणी भेटल्या, एक छान ग्रुप तयार झाला त्यांचा, कोण काय करतंय काय नाही कुठे राहतात शितल चॅटमध्ये रमू लागली, खूप आनंदी झाली होती ती, शाळेत असताना वर्गातल्या मुला मुलींशी ती बोलली नव्हती कधीच तेही आता बेस्ट फ्रेंड च्या लिस्ट मध्ये आले


आणि एक दिवस ऑनलाईन रेसिपी बघून दोन मजली ब्लॅक फॉरेस्ट केक तयार केला होता शीतलने..... तिच्या आवडत्या अनु टीचर साठी, सरप्राइज द्यायचं होतं तिला अनुला, खूप मोठा आनंदाचा ठेवा सापडून दिला होता अनुने तिला, संध्याकाळी अनु घरी आली जेवणाच्या आधी शीतल ने केक टेबलवर आणला


"Thank you अनु..... , माझी छोटीशी परी कधी एवढी मोठी झाली आणि हुशार ही झाली एवढी हे समजलच नाही मला , आधी मी तिचा अभ्यास घ्यायचे... आता तिने मला जीवनाचा महत्त्वाचा धडा शिकवून माझा काॅनफिडन्स परत मिळवून दिला" ,..... शीतल


"love you आई",..... अनु बोलली,


शीतल मुळातच हुशार होती, तिने नवीन गोष्टी लगेच आत्मसात केल्या, काळाबरोबर स्वतःला बदललं वेगळच तेज आल होतं तिच्या चेहर्‍यावर, आत्मविश्वास वाढला होता तिचा, तिच्यातील या बदलणे घरातील सगळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत होते, त्यांच्या प्रेमाने शितल भारावून गेली, आनंदाचा खजिना सापडला होता तिला, तिचा वेळ मस्त जात होता...........


काळाबरोबर चालणे आजची गरज आहे........ हो ना

©️®️शिल्पा सुतार
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now