Feb 24, 2024
कविता

AAI cha dev

Read Later
AAI cha dev

    देव

      आई तू सारखं देव देव करते

      सांग ना तुझा देव कुठे ग राहते?

     बाळा माझा देव नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही

  भक्ती नसेल तर देवाचं अस्तित्वच जाणवत नाही

        देव असतो कचरा उचलणाऱ्या हातात

        देव वसतो डॉक्टरच्या उपचारात

        देव नांदतो रस्त्यावरच्या पोलीस बंदोबस्तात

       देव रमतो मास्क शिकवणाऱ्या च्या बोटात

        देव हसतो परिचारिकेच्या समर्पणात

 

        परमेश्वराचं अस्तित्व कधीच जाणवत नाही

     हवेला पकडू म्हटलं तर ते कधीच साधत नाही

    देव आहे सीमेवरच्या सैनिकाच्या शास्त्रात अन्

पी पी इ किट नावाचं वस्त्र घालून अहोरात्र झटणाऱ्या सेवा भावात

     देव आहे किराणा सामान अन भाजी विकणाऱ्या

       सर्व सामान्य माणसात

     देव शोधू म्हणता सापडणार नाही

     विलगीकरणात असताना

      आईनं कधी काही कमी पडू दिलं नाही मायेना हात फिरवणारी, सोबतच मनोबल उंचावणारी

सखी, मैत्रीण की सोबतीण

हे कोड कधीच उलगडणार नाही

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//