आई बोल माझ्याशी

AAi Bol
आज सकाळी सहज मनात आले काय भाव असतील त्या वयात आलेल्या पण घरी एकट्या राहणाऱ्या त्या मुलाचे जो खूप अबोल तर आहे ,त्याला मित्र ही नाहीत पण त्याला मैत्रीण हवी, ती मैत्रीण म्हणजे त्याची आई हवी ,तिच्यासोबत काही गुजगोष्टी करायच्या आहेत ,संवाद साधायचा आहे तिच्याकडून त्याच्या आवडत्या dish करून लाड पुरवून घ्यायचे आहे, तिला ही काय आवडते हे जाणून घ्यायचे आहे, तिच्यासोबत गप्पा मारता मारता एक दिवस घालवायचा आहे पण तिला तर खप कामे आहेत, तिला घर ,ऑफिस, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी घराच्या बाहेर पडल्याशिवाय उपाय नाही, एकटी आई कुठे कुठे पुरती पडणार आहे.

तिच्या ही मनात आपल्या ह्या मुलासाठी खूप काही करायचे आहे, म्हणूनच ती दिवस रात्र एक करत आहे.

त्यात त्याला आईकडून त्याच्या भविष्यासाठी काही जरी नाही मिळाले तरी चालेल पण आईची सोबत हवी आहे, त्याला आईच्या ह्या कष्टाची जाणीव आहे ,पण आईसोबत एक संवादासाठी तो आसुसलेला आहे.....

,एक लहान मुलगी ऑफिस ला जाणाऱ्या आईला विचारते आई तू कधी ऑफिस मधून घरी येशील .....आली तर माझ्याशी बोलायला कधी मोकळी होशील .....मला खूप काही सांगायचे तुला .....एकदा तरी सगळा तुझा वेळ हवा आहे... तो वेळ मला कधी देशील..... मी शहाणा आहे आणि मी शहाणा राहील ....जसे तू म्हणशील तसे मी करील.... पण तू सांग मला तुझा पूर्ण दिवस कधी देशील... मी तुला कामात मदत ही करेल तुझ्या.... भोवती भोवती जरी मला घुटमळायला का असेना मला कधी वेळ देशील..... आई एकदा तरी माझ्या मनातले जाणून घेशील... एकदा जरा माझ्याशी सगळे व्याप सावरून ...तुझ्या ही मनातले बोलशील...... मला तर संवाद साधायचा आहे ....तू मला एकदा तरी असा माझा वेळ देशील...... तू खूप दगदग करतेस रोजच एकदा तरी तू माझ्या कुशीत आराम करशील....तुझ्या डोक्यावरून जशी आई तुझी हात फिरवायची ....डोकं दुखत असेल तेव्हा मालिश करायची.... तशी एकदा तरी माझी काळजी घेशील..... आई मला एकदा तरी मन भरून बघशील...
मी मोठा झाल्यावर लांब गेल्यावर माझी आठवण करशील .....निदान त्या आठवणीसाठी तरी एक दिवस मला देशील...... खूप गप्पा मारू ....tv बघत बघत मला एखाद्या गोष्टी वर टाळी देशील .....एकदा तरी मला तुझा best friend होण्याची अशी संधी देशील का ,आई माझ्या साठी एकदा तरी लवकर घरी येशील का......

आई मी आता मोठा झालो आहे मग मला ही जरा काळजी करू दे तुझी..... आता एकदा तरी म्हण मला तुझ्या हातचा एक कप गरमागरम चहा दे.. पण त्यासाठी मला तुझा एक दिवस दे

आईला किती ही काम असले तरी तिने दिवसातून एकदा तरी मुलांशी संवाद साधणे आजकाल खूप गरजेचे आहे.
अजून एक सांगायचे आहे, आपण म्हणतो मुली हळव्या असतात,त्यांनाच आईची माया असते, पण खरे तर मुलं ही तितकीच हळवी असतात फक्त ते  मनमोकळं करू शकत नसतात.?