आई आणि तिचं जग...भाग 3 अंतिम
पराग निशब्द होता तो एकही शब्द बोलला नव्हता.
मग सायलीनीच बोलायला सुरुवात केली आणि सायलीने सांगितलं की,
मग सायलीनीच बोलायला सुरुवात केली आणि सायलीने सांगितलं की,
"पराग तु बाबा होणार आहेस."
सायलीला वाटलं परागला खुप आनंद होईल पण तसं काहीच झाल नव्हतं. परागला हे मुल नको होतं.
सायलीला वाटलं परागला खुप आनंद होईल पण तसं काहीच झाल नव्हतं. परागला हे मुल नको होतं.
साध बोलणं झालं, वादविवाद करुन झाला, सगळं बोलुन झालं पण पराग काही बोलायला तयार नव्हता.
खुप विनवण्या केल्यानंतर पराग बोलला, बोलला काय? त्यानी तर बॉम्बच फोडला.
पराग जे काही बोलत होता, ते एक एक शब्द सायलीच्या हृदयाला चिरुन जात होते.
दोन वर्षांपूर्वी परागचं लग्न झालेलं होतं. त्याच्याच कंपनीत काम करणा- या पुर्वा सोबत.
पुर्वाच प्रमोशन होऊन पुर्वा दुस-या शहरात स्थायिक झाली होती आणि दोघांना एक वर्षाची मुलगी होती. पुर्वा आणि मुलगी दोघेही परागच्या आई बाबांसोबत फ्लॅट मध्ये राहायचे.
पराग आणि पुर्वाच लग्न आई बाबांच्या मर्जीने झाले होते. त्यावेळी तो लग्नाला तयार नव्हता पण नंतर तो पुर्वावर प्रेम करायला लागला.
आता राहिला प्रश्न सायलीचा, पराग सायलीशी अस का वागला.
पुर्वा दुर असल्यामुळे परागला नेहमी एकट वाटायचं. त्याला कोणाची तरी सोबत हवी होती आणि सायली तर त्याच्या वर प्रेम करायचीच आणि म्हणुन परागने सायलीशी लग्न केलं आणि तिची फसवणूक केली.
सायली निशब्द होऊन खाली बसली, आता सायलीला हळूहळू उलगडा व्हायला लागला. जेव्हा जेव्हा सायली त्याच्या आई बाबां बद्दल विचारायची तो काही तरी कारण सांगुन टाळायचा. कधी फोन वर पण बोलु देत नव्हता. सायलीला वाटायचं की सगळं ठिक आहे कारण परागने तसं कधी जाणवू दिलं नव्हतं. सायली निशब्द पडुन होती.
दुस-या दिवशी सायलीने बॅग पॅक केली आणि निघाली. परागने थांबवण्याचा खुप प्रयत्न केला पण सायली काही थांबली नाही.
माहेर तुटलं होतं, पोटच्या गोळयाला घेऊन जायचं कुठे? हा मोठा प्रश्न सायली समोर होता.
मग तिने खुप विचार केला आणि माहेरी गेली. आई बाबांना सर्व सांगीतलं.
मुलीने कितीही चुका केल्या तरी आई वडिलांचं मन मुलींसाठी झुरतचं, त्यांनी तिला जवळ केलं आणि ती तिथेच राहु लागली.
मुलीने कितीही चुका केल्या तरी आई वडिलांचं मन मुलींसाठी झुरतचं, त्यांनी तिला जवळ केलं आणि ती तिथेच राहु लागली.
नऊ महिने पुर्ण झाले, सायलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
वर्ष उलटलं, आता सायलीने स्वता:चा विचार करायला सुरुवात केली. तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचं होतं. सायली शिक्षीत असल्यामुळे तिला नोकरी मिळाली.
आई- बाबा , सायली आणि तिची मुलगी रीया असा प्रवास सुरू झाला.

प्रवास खर तर खुप खडतर होता पण सायलीने हिंमत हारली नव्हती आणि हताश ही झाली नव्हती. ती स्वताः ही जगली आणि रीयाला ही जगवलं.
सायलीची मुलगी रीया पंधरा वर्षांची झाली, पंधरा वर्षांचा काळ काही कमी नसतो. पण दोघीही छान आनंदाने जगल्या. तिची आई तिच्या साठी प्रेरणा होती कारण सायलीने खुप छान संस्कार दिले होते तिला.
सायली तिची प्रत्येक इच्छा पुर्ण करत होती, आई वडिलांचं दोघांच प्रेम दिलं. तिला कधी वडिलांची कमी पडू दिली नव्हती.
रीयाच्या पालन पोषण मध्ये कधी कमी पडू दिलं नव्हती. रीया अभ्यासात हुशार होती, रीयाला तिच्या आईच्या कर्तुत्वाची जाण होती. रीया समोर सायली एक आदर्श होती कारण ती तीची आई होती.
सायलीचं एक ध्येय होतं रीयाला चांगलं शिक्षण देऊन स्वता:च्या पायावर उभे करणे.
आजच्या काळात स्त्री समोर हे खुप मोठ आव्हान असतं.
मुलीचं आयुष्य घडवणं हे फक्त आईच्या हातात असतं आणि ते करायला आई समर्थ असते, सक्षम असते.
मुलीचं आयुष्य घडवणं हे फक्त आईच्या हातात असतं आणि ते करायला आई समर्थ असते, सक्षम असते.
कारण ती एक आई असतें.
आईच्या मायेत अपार शक्ती असते..
मायेने ती जग जिंकते
आणि नाती जपते...
आईच्या मायेत अपार शक्ती असते..
मायेने ती जग जिंकते
आणि नाती जपते...
समाप्त:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा