आई आणि तिचं जग...भाग 2

AAich dhyey

आई आणि तिचं जग...भाग 2

पराग आणि सायलीने पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं.
तारीख आणि वेळेप्रमाणे ते घरातून बाहेर पडले आणि त्यांनी मंदिरात लग्न केलं.

परागला कंपनी कडून फ्लॅट मिळालेला होता. लग्नानंतर पराग सायलीला फ्लॅट वरच घेऊन गेला.
सायली आणि परागचा संसार सुरू झाला.
एक महिना दोघांनी खुप मजा केली.
हनिमून झालं, फिरणं झालं. नवलाईचे नऊ दिवस संपले, परागच्या  सुट्ट्या संपल्या.
तो पुन्हा जॉईन झाला.


पराग दिवसभर ऑफिस मध्ये असायचा, त्यामुळे सायली दिवस भर  घरी एकटीच असायची.
दिवस कसाबसा निघुन जायचा, संध्याकाळ झाली की ती परागची वाट बघत बसायची.

पराग कधी कधी खुप उशिरा यायचा. ही वाट बघुन झोपी जायची.

दिवसा मागून दिवस निघत गेले.

एक दिवस सायली सर्व कामे आटपून टिव्ही बघत बसली होती. तिला अचानक मळमळ वाटायला लागली, उलट्या झाल्या.

पराग ऑफिस मध्ये असल्या कारणाने सायली एकटीच जवळच्या हॉस्पिटल मध्ये गेली. डॉक्टरने चेकअप केलं आणि टेस्ट केली आणि सायलीला गुड न्यूज दिली.

सायलीला खुप आनंद झाला, तिचा आनंद गगनात मावेना झाला होता. घरी जाऊन ती छान तयार होऊन परागची वाट पाहत बसली होती. अगदी स्वत:च्या धुंदीत, खुप आनंदात होती.

डोअर बेल वाजली.
तिची धडधड सुरू झाली, तिने हळूच दार उघडलं.
ती काही बोलणार तेवढ्यात पराग गलडंला.

सायलीला हे बघून धक्काच बसला, पराग चक्क दारु पिउन घरी आला होता.
बिचारी सायली आनंदाची बातमी देणार होती.

पण ते तर राहिलंच होतं.
सायलीने त्याला कसंतरी उठवून  बेडरूम पर्यंत घेऊन गेली आणि त्याला झोपवलं.
सायली काही वेळाने बिना जेवल्यानेच झोपून गेली.

दिवस उजाडला, सायली सकाळी उठून तिच्या कामाला लागली.

पराग थोडा ऊशिराच उठला, सायली छान गरम गरम चहा घेऊन बेडरूम मध्ये गेली आणि परागला चहा दिला.

पराग निशब्द होता तो एकही शब्द बोलला नव्हता.

क्रमशः

🎭 Series Post

View all