Login

आई आणि तिचं जग...भाग 1

AAich dhyey
आई आणि तिचं जग...भाग 1


ती सुंदर, सोज्वळ, हुशार.
सायली.

शाळेपासुन ते कॉलेज पर्यत नेहमी पहिली यायची. तिला अभिनय करायला खूप आवडायचं. कॉलेजच्या  शेवटच्या वर्षाला असताना, कॉलेज मध्ये एक नाटकं सादर करण्याचं ठरलं.

नाटकांमध्ये सायलीनेही भाग घेतला होता. नाटकाच्या सरावाला तिची भेट परागशी झाली.

पराग उंच, गोरा, धडधाकट, हॅन्डसम, चिल, ऑल वे मस्त  होता.

नाटका दरम्यान दोघांची रोज भेट व्हायला लागली.
हळूहळू बोलणं सुरू झालं, आधी फक्त नाटका निमित्त भेटायचे, मग वरचेवर भेटणं सुरू झालं.

मैत्री झाली, मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्याचंही त्यांना कळलं नाही.

कॉलेजच शेवटच वर्ष पूर्ण झालं.

सायलीच्या बाबांची बदली झाली आणि ते दुस-या शहरात गेले.
आता सायली आणि परागचं फक्त फोन वर बोलणं व्हायच. दोघेही तासनतास गप्पा मारायचे. दरम्यान परागला नोकरी मिळाली.
पांच - सहा  वर्ष असंच सुरु राहिल.


एकमेकांपासुन दूर असल्या मुळे फक्त फोन वर बोलणं व्हायच. पण दोघांनी मनातल्या मनात ठरवलं होतं की लग्न करायचं.

सायलीने घरी आई बाबांना पराग बद्दल सगळं सांगितलं पण आई बाबांनी लग्नाला थेट नकार दिला.
सायलीने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. आई तयार झाली, पण बाबा हट्टाला पेटले होते, नाही म्हणजे नाही हीच भूमिका होती त्यांची.


पराग आणि सायलीने पळून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं.
तारीख आणि वेळेप्रमाणे ते घरातून बाहेर पडले आणि त्यांनी मंदिरात लग्न केलं.

🎭 Series Post

View all