अ सिंगल मदर
भाग : १
भाग : १
"मम्माऽऽऽऽ मम्माऽऽऽऽ.ऐक ना! माझ्या बर्थडे ला ना मला एक न्यू फेरीटेल वाला ड्रेस हवा आहे. "छोटी मिष्टी तिच्या आईच्या मागे मागे करत तिला काय हवं आहे हे ओरडून सांगते.
"हो, घेऊ आपण पण आता नाही पुढच्या बर्थडे ला नक्की घेऊ प्रॉमिस. रुचिका मिष्टीची आई मिष्टीला खांद्याला धरून समजावून सांगते.
"नो! मम्मा, तु लास्ट इयर ला पण असचं बोलली होती, आता नाही. मला ह्यावेळी हवा आहे. प्लिज मम्मा. "मिष्टी डोळ्यात पाणी आणून थोडं इमोशनल होऊन बोलते..
"बाळा, पिल्लू असं काय करतेस, नको हट्ट करू. तुला घेणार आहे नवीन ड्रेस पण, मला पाण्याचं बिल, लाईट बिल, आणि घरातलं सामान पण भरायचं आहे ना आणि त्यात घराचं भाडं पण आहे. प्लिज समजून घे!
किती हुशार आहेस तू! माझी गुड गर्ल आहे ना, माझा राजा. प्लिज ह्या वेळेस ऐक ना बेबी.." रुचिका मिष्टीला जवळ घेऊन तिचा चेहरा हातात घेऊन तिचे पाणावलेले डोळे पुसत तिला समजावते..
"चल, छोड दिया तुझे इस बार!! बट नेक्स्ट टाइम इस की सजा मिलेगी बरा बर मिलेगी!! "मिष्टी रुचिका चे कान हळूच पकडून बोलून पळून जाते..
"वोह!! काय ग माझी मस्करी करतेस हं! तुऽऽऽऽ तुऽऽ थांब ग तुला ना आता. "असं बोलून रुचिका मिष्टीच्या मागे धावते."
मिष्टी सोफ्यावर उभी राहून बोलते, "मम्मा, मी फक्त तुझी गम्मत करत होते..हीऽऽऽऽ हीऽऽ हीऽऽ. मजा आली ना! आणि मम्मा मला माहित आहे ग तुला किती त्रास होतो ते.. पण तु काळजी नको करू मी आहे ना! मोठी झाल्यावर मी खुप खुप पैसे कमवेन आणि आपण खुप मजा करू.. ओके मम्मा.. नाऊ डोन्ट क्राय. तुझ्या डोळ्यात छान नाही दिसत पाणी.. ही ही ही.. "मिष्टी तिच्या लहान लहान हाताने रुचिकाच्या डोळ्यात आलेलं पानी हाताने पुसते.. आणि हसत सोफ्यावरून खाली उतरत तिला बोलते..
"हो का?? आजी बाई.. म्हणे माझ्या डोळ्यात पाणी छान नाही दिसत ते ही ही ही...
खुप मोठ्या माणसं सारखं बोलली आजी बाई आमची...
आणि मी नाही रडणार तु आहेस ना... माझं पिल्लू..." रुचिका मिष्टीला कुशीत घेऊन.. बोलते..
खुप मोठ्या माणसं सारखं बोलली आजी बाई आमची...
आणि मी नाही रडणार तु आहेस ना... माझं पिल्लू..." रुचिका मिष्टीला कुशीत घेऊन.. बोलते..
"चल आता तरी मला स्कूल मधे जाऊदे! की इथेच तुझे डोळे पुसत बसू मी.? शी बाबा! ह्या रडणाऱ्या बायका म्हणजे ना...
डोक्याला ताप आहे नुसता.. एवढं समजावून सांगितलं तरी रडतातच ह्या हुं.... "मिष्टी गाल फुगवून बोलते..
डोक्याला ताप आहे नुसता.. एवढं समजावून सांगितलं तरी रडतातच ह्या हुं.... "मिष्टी गाल फुगवून बोलते..
रुचिका ला काय बोलावं हे समजलंच नाही..
कारण मिष्टी एवढं बोलली... त्यावर हसावं की तिला बोलावं?? हाच प्रश्न पडला तिला..
कोणी काही बोललं नाही.. त्यांचं आवरलं तस त्या निघाल्या...
एक स्कूल मधे आणि एक ऑफिस ला..
कारण मिष्टी एवढं बोलली... त्यावर हसावं की तिला बोलावं?? हाच प्रश्न पडला तिला..
कोणी काही बोललं नाही.. त्यांचं आवरलं तस त्या निघाल्या...
एक स्कूल मधे आणि एक ऑफिस ला..
पात्रांची ओळख
रुचिका इनामदार : वय 30 वर्ष.
आणि तिची गोड, गोंडस, पिल्लू, तिची मुलगी मिष्टी उर्फ गार्गी रुचिका इनामदार :
वय 08 वर्ष.
**********************
स्थळ : ऑफिस
"अगं! काय हे, किती उशीर? आज पण ओरडा खाशील आता.
जा! तुला बोलावलं आहे.. "रुचिका ची कलीग नेहा तिला आत येताना पाहून म्हणाली."
जा! तुला बोलावलं आहे.. "रुचिका ची कलीग नेहा तिला आत येताना पाहून म्हणाली."
"अग, मिष्टीने सकाळी सकाळी गोंधळ घातला..
त्यामुळे तिची समजूत आणि बरच काही झालं..
बरं चल जाते मी..ह्या बॉस ला दुसरी कामं नसतं! माझ्या वर नजर ठेऊन असतो मेला( नाक मुरडत) मी कधी येते.. काय?? बर चल जाते मी.."रुचिका घाई घाई तिची पर्स टेबल वर ठेवत केबीन मधे जाता जाता म्हणाली.

"मे आय कम इन सर, "रुचिका केबिन च्या बाहेर उभ राहून दारावर नॉक करत बोलली."
"येस, मिसेस रुचिका, तुम्ही आज पण दहा मिनिटे उशिरा आला आहात.."देवांश अधिकारी. रुचिका चा बॉस."
"सॉरी सर ते मिष्टी ला स्कूल मधे सोडायला जाताना खुप ट्राफिक लागला म्हणुन उशीर झाला. "रुचिका खाली मान बोलली.
"हम्म, काय बोलणार आम्ही नेहमीच आहे हे!
जा कामाला लागा पण पुन्हा असा उशीर चालणार नाही आणि हे शेवटचं.! "शेवटचं ह्या शब्दावर जोर देत देवांश तिला बोलतो.
जा कामाला लागा पण पुन्हा असा उशीर चालणार नाही आणि हे शेवटचं.! "शेवटचं ह्या शब्दावर जोर देत देवांश तिला बोलतो.
"ओके सर, थँक यु! "असं बोलून रुचिका केबिन बाहेर पडते आणि तिच्या डेस्क वर येते.
ती बाहेर जाताच तो तिच्या कडे पाहतो आणि डोळे बंद करून एक श्वास घेतो..
"हुश्श!! "रुचिका
"काय ग काय बोलले सर, "नेहा.
"काही नाही ग उशीर का झाला म्हणुन बोलले. "रुचिका.
"रुचिका एक बोलू.."नेहा .
"नको, आता नको कामं करू देत नाही तर परत ओरडा बसेल. "रुचिका तिच्या समोरच्या फाईल आवरत बोलते..
*****************
स्कूल मधे
"हॅलो, गार्गी.."कोमल गार्गी ची मैत्रीण
"हाय, कोमल.."मिष्टी
"अग तू होमवर्क कंप्लिट केला का मॅथ चा? प्लिज मला दे.. नाहीतर मिस चा खुप ओरडा पडेल.."कोमल घाबरून मिष्टीला बोलते..
"हो केला कंप्लिट! हे घे.. आणि वेळेवर करायला काय होत ग तुला..? रोज तुझ काही न काही इनकप्लिट राहतच.."मिष्टी जरा वैतागूनच बोलते..
"तू आहे ना. हुशार! मग नको जास्त बोलू! दे आता.. मी पुर्ण करते. "कोमल.
मिष्टी आणि कोमल नर्सरी पासून एकत्र आणि एकाच शाळेत.. त्यामुळे दोघींचं बॉण्डिंग खुप छान जमायचं..
रिसेस मधे कोमल आणि मिष्टी जरा खेळायला वर्गातून बाहेर गेल्या..
दोघी खेळत होत्या की तिच्या पेक्षा एक मोठ्या मुलीला तिचा धक्का लागला..
ती मुलगी मिष्टीच्या चाळीतली होती.. तिचं नाव आरोही
दोघी खेळत होत्या की तिच्या पेक्षा एक मोठ्या मुलीला तिचा धक्का लागला..
ती मुलगी मिष्टीच्या चाळीतली होती.. तिचं नाव आरोही
"आह! आई ग " आरोही हाताला हात लावत कळवळत बोलली..
"डोळे फुटलेत का तुझे? तुला दिसत नही का ? "आरोही रागाने कोमल ला बोलली..
"सॉरी दीदी, चुकून धक्का लागला.. मी पाहिलं नाही सॉरी!" कोमल खाली तोंड करून तिची माफी मागते..
"नाही , असं नाही ऐकणार.. तुम्हा मुलांना सांगितलं ना ह्या हद्दीत खेळायचं नाही म्हणुन! तरी येता इथेच.. तू थांब मी तुला एक फटका देते.."आरोही रागात तिला बोलते..
कारण मोठ्या मुलांना जागा वेगळी होती आणि ती जागा पण मोठी होती म्हणुन मुलं पण तिकडे खेळायला जायची जरा वेळेचा तर प्रश्न पण तरीही ह्या मोठ्या मुलांना त्रास..
आरोही कोमल ला एक फटका ठेऊन देणार तर तोच कोणीतरी तिचा हात पकडला आणि जोरात तिच्या हाताला हिसका दिला..
आधीच धक्का लागल्यामुळे हात जरा हलका दुखत होता त्यात हाताला हिसका बसल्यामुळे आणखी दुखायला लागला..त्यामुळे ती तिच्या जागेवरून जरा मागे सरकली..
आरोही रागाने तिच्या कडे पाहत होती.. आणि ती मुलगी पण तिच्या कडे रागाने पाहत होती.
दोघीं एकमेकींना टशन देत होत्या.. आणि हे पाहायला बाकी मुलं पण एक एक करून गोळा होऊ लागली..
दोघीं एकमेकींना टशन देत होत्या.. आणि हे पाहायला बाकी मुलं पण एक एक करून गोळा होऊ लागली..
रागातच आरोही "गार्गीsssss आह्ह! तू काय केलं? माझा हात का धरलास?
"तू का माझ्या फ्रेंड ला मारत होतीस? ती सॉरी बोलली ना तुला.. आणि चुकून धक्का लागला.. हे पण समजत नाही का? "मिष्टी पण रागाने तिला बोलली..
"गार्गी जास्त बोलू नकोस नाहीतर खुप मार पडेल! समजलं..
आणि तू कोण ग? मला बोलणारी जिचे खायचे वांदे एकट्या आई सोबत राहते तिचं लक्ष तरी असतं का तुझ्या कडे.."आरोही रागात काहीही बडबड करत होती.. ती कोणाला बोलतेय आणि काय बोलतेय ह्याचा पण भान तिला नव्हतं..
आपल्या पेक्षा कितीतरी लहान आहे ती.. आणि आपण चौदा वर्ष्याच्या आहोत हे तिला काही समजतं नव्हतं..
तिचं बोलणे मिष्टीच्या जिव्हारी लागलं..

तिला खुप वाईट वाटलं ऐकून पण तिने पण रागात.
आरोही च्या कानाखाली मारली सगळे आश्चर्याने तिच्या कडे पाहत होते एवढीशी पोर ती आणि तिने मारलं.
आरोहीने पण तिला खाली ढकललं.. ह्या दोघींमध्ये आता महाभारत होणार, युद्ध होणार असचं मुलाना वाटलं..
काही मुले मज्जा घेत होते तर काही आरोहीला वाईट बोलत होते.. ह्या काही मुलांनी त्यांच्या क्लास टीचर कडे जाऊन तक्रार केली.

त्यामुळे पुढे होणार युद्ध तिथेच थांबलं.. मॅडम ने दोघींना दम दिला आणि आपापल्या वर्गात जायला सांगितलं..
मिष्टीला हाताला थोडं खरचटलं होत.. आरोही ने पाडलं तिला त्यामुळे तिला लागलं हाताला म्हणुन मॅडम तिला स्टाफरूम मधे घेऊन गेल्या..
"गार्गी.. काय हे बाळा! अग किती लागलंय मम्मा ला समजलं तर किती वाईट वाटेल तिला बिचारी किती करते तुझ्यासाठी..
किती कामं असतात तिला
तुला खुप मोठ्ठ करायच आहे तिला आणि तू अश्या मारिमारी करते शाळेत हे समजल्यावर काय वाटेल बिचारीला.!
"मॅडम तिची जख्म साफ करत तिला समजावत होत्या.
किती कामं असतात तिला
तुला खुप मोठ्ठ करायच आहे तिला आणि तू अश्या मारिमारी करते शाळेत हे समजल्यावर काय वाटेल बिचारीला.!
"मॅडम तिची जख्म साफ करत तिला समजावत होत्या.
"मी मुद्दाम नाही केलं मिस! ती माझ्या मम्मा ला काही पण बोलत होती आणि मम्मा ने शिकवलं आहे आपली चूक नसताना जर समोरचा आपल्याला काही ही बोलत असेल तर ऐकून घ्यायचं नाही आणि एक माझी मम्मा बिचारी नाहीये. ती स्ट्रॉंग आहे.!
"जखमेवर औषधं लावल्यामुळे तिला जरा दुखलं त्यामुळे डोळ्यात पानी आलं.. पण मॅडम च्या बिचारी बोलण्यामुळे ती मॅडम ला बोलली आणि रूम बाहेर निघून गेली डोळे पुसत.
"जखमेवर औषधं लावल्यामुळे तिला जरा दुखलं त्यामुळे डोळ्यात पानी आलं.. पण मॅडम च्या बिचारी बोलण्यामुळे ती मॅडम ला बोलली आणि रूम बाहेर निघून गेली डोळे पुसत.
क्रमश.
©тєʝα
©тєʝα