Oct 20, 2020
स्पर्धा

आहोंची अबोल प्रीत प्रेमकथा

Read Later
आहोंची अबोल प्रीत प्रेमकथा

आहो ची अबोल प्रीत....प्रेमकथा

यश आणि प्राप्ती चे नुकतेच लग्न झालेले,घरी सर्व पाहुणे मंडळी,लग्नाच्या वातावरणात सर्व घर कसं भरभरून उठलं,यश हा घरात सर्वात मोठा मुलगा त्यामुळे घरात पहिलं लग्न म्हणून लग्न मोठ्या थाटा मट्यात साजरे झाले,पण,,का कुणास ठाऊक लग्नात काही तरी कमी होते असे सारखे भासत होते...

लग्नात कमतरता म्हणजेच नवरी अजिबात च हसत नव्हती,खूप दुखी वाटत होती,तोच नवरदेव खूप खुश होता,....आणि का बरं नवरदेव खुश नसणार,त्याला मनासारखी बायको मिळाली होती,अगदी जसी त्याला हवी होती तशीच...

यश हा दिसायला काळा सावळा पण स्वभावाने खूप चांगला आणि प्राप्ती दिसायला खूप सुंदर त्यामुळे तिची अपेक्षा होती की तिचा नवरा देखील सुंदर च असावा....पण यश ला बघताच तिला तो अजिबात च आवडला नव्हता,परंतु घरच्यांच्या म्हणण्यानुसार तिला शेवटी यश ला होकार द्यावाच लागला...

आणि म्हणूनच कदाचित ती लग्नात खूप काही आनंदी नव्हती,प्राप्तीच्या सर्व मैत्रिणी त्यांच्या पतींसोबत आल्या होत्या,सर्वांचे पती दिसायला जवळपास देखणे त्यांच्या तुलनेने यश खूप च कमी होता,त्यामुळे ती लग्नात नर्वस होती...सर्व मैत्रिणी तिला मनापासून शुभेच्छा देत होत्या पण तिच्या मनात काही वेगळेच त्यामुळे तिला वाटले की माझ्या पतीकडे पाहून मुद्दाम च शुभेच्या देत आहे...

प्राप्ती चे आई वडील मात्र वेळोवेळी तिला सांगत होते की तू खूप नशीबवान आहेस तुला खूप चांगला नवरा मिळाला....खूप समजूतदार आहेस यश,पण प्राप्ती ला फक्त त्याचा काळा रंग च दिसत होता...

लग्न झाल्यावर प्राप्ती यश सोबत अजिबात चांगली वागत नव्हती,का तर म्हणे तिला यश आवडाचं नाही,यश मात्र याउलट प्राप्ती सोबत खूप चांगला वागायचा,तिला कशातच अजिबात दुखवाचं नाही,जसी ती वागेल तसच तिला वागू द्यायचा,परंतु तो कितीही चांगला वागला तरी देखील प्रप्तीला काहीच फरक पडत नव्हता,ती जसी आहे तशी च वागायची..

.................................................................

आता मात्र यश च्या मनात नाना विचार येत होते,की प्राप्ती ने जबरदस्ती ने तर आपल्यासोबत लग्न नाही केले ना,आणि म्हणूनच त्याने प्राप्ती अशी का वागते?याचा शोध घेण्याचे ठरविले,आधी यश ने प्राप्ती ला सांगितले की आपण फक्त मित्र 
आहोत,नवरा बायको वैगरे बघता येईल नंतर...या गोष्टी साठी प्राप्ती ने देखील होकार दिला,तिने मनोमन ठरविले की मित्र बनून राहायला काहीच हरकत नाही....

यश ला देखील थोडे बरे वाटले,आता यश मित्र असल्यामुळे प्राप्ती यश सोबत नीट राहायला लागली,येवढेच काय तर त्याची काळजी सुध्धा घेत होती,म्हणजेच त्याची संपूर्ण कामे करत होती,त्याच्या प्रत्येक गोष्टीत रस घेत होती,त्याला काय हव काय नाही हे बघत होती,दिवसेंदिवस तिची गोडी यश मध्ये खूप वाढत चालली होती...

एक दिवस यश ला घरी यायला खूप उशीर झाला होता,त्यादिवशी ती खूप अस्वस्थ झाली होती,येवढेच काय तर तिने जवळपास सर्वांना फोन लावले होते,आणि जेव्हा यश घरी आला तेव्हा तिने यश ला घट्ट मिठी मारली व म्हणाली कुठे होतात तुम्ही?एक फोन तरी करायचा,घरी आपली बायको वाट पाहत असेल याची तरी काळजी घ्यावी माणसाने....आणि लगेच तिला रडू आले....

त्या दिवशी यश ला खूप आनंद झाला होता,त्याला पहिल्यांदा आपल्या बायको ने काळजी पोटी का असेना पण मिठी घेतली ,यातच खूप आनंद झाला,असेच दिवसामागून दिवस जात होते अन् दोघांची जवळीक वाढत होती,आता मात्र प्राप्ती ने यश च आपला जोडीदार आहे,या पेक्षा चांगला नवरा मिळणे शक्य च नाही,यश येवढं समजूतदार नवरा मिळाला खूप भाग्य लागतं हे प्राप्ती ला समजले होते...

यश चे जेवढे जास्त प्रेम प्राप्ती वर होते,त्यापेक्षा जास्त प्रेम आता प्राप्ती यश वर करत होती,यश ला समजून घेण्यात ती कुठेच चुकत नव्हती,आणि यश देखील सुरवातीपासून च प्राप्ती ला खूप जीव लावायचा,,असा यश आणि प्राप्ती चा संसार सुखाचा झाला,आणि संसारात एक कळी उमलली म्हणजेच दोघांना मुलगी झाली,व आनंदाने सर्व राहत होते...

लग्ना नंतरच्या प्रेमात काही वेगळीच मजा असते हे लग्ना नंतर झालेल्या प्रेमातून च माणसाला कळते,जसे की यश आणि प्राप्ती ला कळले,आणि ते प्रेम पण खूप निरागस असते ,मग त्या प्रेमात अनन्य साधारण गोष्टी महत्वाच्या नसतात,जसे की रंग,श्रीमंती,.............सारख्या गोष्टी,महत्वाचे असते ते फक्त एकमेकांना समजून घेत एकमेकांचा आदर करणे व एकमेकांवर अतूट विश्वास ठेवणे,मग प्रत्येक च नाते मजबूत होते.....


Ashwini Galwe Pund...

 

Circle Image

Ashwini Galwe Pund

Teacher

I am simple living women