आहे मी बायकोचा गुलाम(भाग ६)

Time is best teacher

आजोबा स्वतःहुन येणार म्हणाले होते आणि अजून आले न्हवते... का बरं आजोबा आले न्हवते???.तितक्यात त्याला आजोबांचा फोन आला .आजोबा रडत होते... म्हणाले लवकर घरी ये कमलला त्रास होत आहे रे ..महेशने मधूला त्याबाबतीत कल्पना दिली आणि आजोबांकडे पळत सुटला...

महेश गेला त्याने पाहिले आजीला श्वास घ्यायला त्रास होत आहे..त्याने लगेच अंम्ब्युलन्स बोलावली आणि आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले...
आजीला जेव्हा घेऊन जाण्यात आले तेव्हा ती इतकंच  आजोबाला म्हणाली"काळजी घ्या तब्येतीची"...

बाहेर आजोबा आणि महेश दोघंही वाट पहात होते ..डॉक्टर आजीला  वाचवण्याचा पुरेपूर  प्रयत्न करत होते..महेशने आजोबांच्या खांद्यावर हात ठेवला तसे आजोबा लहान मुलागत रडु लागले...आजूबाजूची माणसं सुदधा त्यांना पाहू लागली...आजोबा रडताना पाहून सर्वांना दया येत होती..

आजोबा :" महेश माझ्या कमलला जर काही झाले तर मी काही जगू शकणार नाही"...

किती तिला माझी काळजी आहे बघ ना महेश इतक्या त्रासात पण मला म्हणाली "तब्येतीची काळजी घ्या"..तिच्याशिवाय आयुष्याची कल्पना नाही करवत महेश.माझ्या आई नंतर माझी आईसारखी काळजी घेतली आहे कमलने..आजोबांचे हातपाय थरथरायला लागले.. महेशने त्यांना पाणी आणून दिले..

महेश:"आजोबा शांत व्हा तुम्ही ,सर्व व्यवस्थीत होईल"......

आजोबा:"पहिल्यांदा आयुष्यात मला भीती वाटतेय महेश,माझी कमल तिकडे जगण्यासाठी धडपडते आहे मी इथे हतबल उभा आहे.मी काहीच करू शकत नाही ह्याविचाराने लाचार झाल्यासारखे वाटते आहे .खूप लाचार झालो आहे.माझं काळीज धडधडतय महेश,.माझ्या कमलला काही होणार तर नाही ना????

महेश:"आजोबा काही होणार नाही आजीला.. बघा थोड्या वेळाने बाहेर येतील ...

आजोबाने महेशच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मनोमन स्वामी समर्थाचा जप करू लागले...तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते.. 

महेश:"आजोबा स्वामींना मानता तुम्ही??

आजोबा:"मी नाही ,माझी कमल खूप मानते त्यांना.खूप श्रद्धा आहे तिची त्यांच्यावर ..तिची सकाळ स्वामींच्या जपाने सुरू होते..आज तिच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करतोय....मला आशा आहे स्वामी तिला ह्यातून सुखरूप बाहेर काढतील..

महेश:"आजोबा स्वामी सर्व ठीक करतील".....


दुपारचे दोन वाजले होते..आजोबांनी काहीच खाल्ले न्हवते....त्यांना चक्कर येऊ लागली..सतत तोल जात होता..

महेश त्यांना म्हणाला आजोबा जरा काहीतरी खाऊन घ्या तुम्ही....

आजोबा:"नको नको आधी कमलला बरं वाटू दे मगच मी खाणार"..ती पण उपाशीच आहे महेश. तीने काही खाल्याशिवाय माझ्या गळ्यातून घास उतरणार नाही बघ....नको मला काही ..माझी अजिबात  इच्छा नाही ..मला अन्न गोड लागणार नाही....

महेश:"आजोबा ,असं काय करताय तुम्ही??..आजी काय म्हणाली तुम्हाला तब्येतीची काळजी घ्या .तुम्हाला चक्कर येत आहे आजोबा ..आजोबा मी म्हणतो म्हणून नको पण कमीत कमी आजीसाठी तरी दोन घास खाऊन घ्या आजोबा .प्लिज आजोबा...आजीसाठी...

आजोबा आणि महेश  दोघंही केनटीनमध्ये गेले..तिथे भाजी चपाती घेतली आणि जेवले..आजोबा आता कुठे स्थिर झाले..पुन्हा waiting area मध्ये येऊन थांबले.आजोबांची अवस्था पाहून महेशला फार वाईट वाटत होते..आजोबाना त्याने खुर्चीवर बसवले... तो येरझऱ्या मारू लागला..

"मन चिंती ते वैरी ना चिंती"..असेच महेशच्या बाबतीत झाले.. मनात दळभद्री विचार आला"माझ्या मधूला काही होणार नाही ना???...

आजोबा ज्या ठिकाणी उभे आहे त्याठिकाणी त्याने स्वतःला दोन मीनीट उभं करून पाहिले तर त्याचही हृदय जोरजोरात धडधडू लागले... त्याने लगेच मधूला फोन लावला 

महेश:"हॅलो, मधू बरी आहेस ना तू??

मधू:"हो मी बरी आहे,आधी मला आजीची कंडिशन कशी  आहे ते सांग ??

महेश:"माहीत नाही,अजून डॉक्टर काही म्हणाले नाही.आम्ही बाहेरच उभे आहोत"

मधू:"बरं ,बरं.. आजोबांकडे लक्ष दे..काळजी घे..तुम्ही दोघं जेवले का??

महेश:"हो आताच जेवलो"..

तितक्यात डॉक्टर  महेशकडे आले..

महेश:"मधू चल फोन ठेवतो डॉक्टर आले आहेत"..

मधू:"बरं,बरं..... बाय..

डॉक्टर:"त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली आहे..आम्ही प्रयत्न करत आहोत"....

महेश:बरं डॉक्टर साहेब....

डॉक्टर ततातडीने निघून गेले..
आजोबा दूर बसले होते.हळुहळु आजोबा महेशपशी आले आणि  विचारले डॉक्टर काय म्हणाले?? ...

आजोबांना काय सांगावे  .??,आधीच ते रडत होते.घाबरले होते..उगाच त्यांना हे सांगितले तर अजून घाबरतील...त्यांना त्रास  होईल ..

महेशने आजोबांना सांगितले"आजोबा डॉक्टर म्हणाले सुधारणा आहे त्यांच्यामध्ये,होतील बऱ्या लवकरच"..

हे ऐकताच आजोबांनी हात जोडले."श्री स्वामी समर्थ"."बरं झालं बाबा माझी कमलच्या प्रकृतीत सुधारणा आहे,आज मानलं स्वामी  तुम्हाला.खरंच स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी आहात...आजोबांना आशेचा किरण दिसला होता.. आजोबा पुन्हा मनोभावे  स्वामींचा जप करू लागले..पुन्हा जाऊन  खुर्चीवर  जाऊन निवांत बसले ..आता त्यांना आशा होती कमल बरी  होणार.... महेशने खोटी आशा दाखवली होती..

महेशला अपराधिपणाची भावना होती.एकीकडे स्वतःच्या खोटं बोलण्यावर राग येत होता.. आणि एकिकडे निश्चितं झालेले आजोबांचा समाधानी चेहरा पाहून बरंही वाटत होतं...

तोसुद्धा आजीसाठी मनोमन प्रार्थना करत होता... त्याला फोन आला
..भावेशचा .भावेश म्हणजे आजोबांचा मुलगा..

भावेश:"महेश, कशी आहे तब्येत आता आईची??

त्यांच्या मुलाला खरं सांगणे भाग होते.... महेशने ऑक्सिजन कमी झाल्याचे सांगितले.... आणि हे सुद्धा सांगितले की "आजोबांना त्रास होईल म्हणून मी काही त्यांना ह्या बाबतीत सांगितले नाही"....
हे ऐकताच भावेश चिडून म्हणू लागला

"त्यांना कसला रे त्रास महेश..बाबा कधीच बदलणार नाही.स्वतःपुरता विचार करून जगतात ते.....

महेशला समजून चुकले होते ..भावेशच्या मनात वडीलांविषयी  खूप राग होता..

पुन्हा भावेश बोलू लागला
"नेहमीच राबवत आले तिला...तिच्या मनाचा विचार  केला का??कधी तिला प्रेम दिले का ?नुसतं  राबवलं आईला....मी म्हणेल ती पूर्व दिशा..

भावेशने स्वतःला सावरलं..... 

भावेश:"जाऊ दे ,मी लवकरच येण्याचा प्रयत्न करतो..तू प्लिज लक्ष दे हा..मला कळवत राहा..


भावेशने फोन ठेवला....


भावेश बोलून तर गेला .."ते कधीच बदलणार नाही.....भावेशला कसं पटवून द्यायचे की त्याच्या वडीलांमध्ये बदल झाला आहे..जर भावेश इथे असता तर त्याला कळलं असते की आजोबा आजीला कोरोना झाल्यापासून खुप बदलले आहे..

माणुस आपल्या पासून दूर जातो तेव्हाच त्याची खरी किंमत कळते.. आजी एका घरात असूनही क्वारंटाईन असल्यामुळे त्यांना भेटू शकत न्हवत्या,बोलू शकत न्हवत्या...त्याच्या नसण्याने आयुष्य किती वेगळे आहे हे आजोबांना जाणवत होते..त्यामुळेच तर त्यांच्यात फार जलद गतीने बदल झाला..एकटेपणा खूप काही शिकवून गेला..

अशी वेळ आजोबांवर पहिल्यांदा आली होती..एकटेपणाचे विकृत रूप कधीच अनुभवलं न्हवते.आजी, मुलगा, सून,नातवंड नेहमीच सगळे सोबतीला होते..त्यात सर्व परिवार गावी आणि ह्या लोकडाऊनमुळे सर्वच बंद होते.. भयानक परिस्थिती ओढवली होती..खूप भयानक...

महेश मात्र सर्व तटस्थ होऊन पहात होता.आजोबांची तडफड ,तगमग जाणवत होती..त्यापेक्षाही जास्त त्याला हे दिसून येत होते की त्या थोड्याच दिवसात आजीच्या  कष्टाची जाण आजोबांना कळून आली होती ...त्यांना व्यक्त तर व्हायचे होते  पण सध्या  त्यांचे सतत ओघळनारे अश्रू,प्रार्थनेसाठी सतत देवाला विनवणी करणारे थरथरते  हात आजीसाठी किती धडपडत आहे...काश इथे भावेश असता तर त्याला आज वडिलांचं बदललेलं रूप पाहता  आले असते..

आजोबा आज स्वतःच्या अर्धांगणीला सोबत करत होते.... 

वपूंनी म्हटलेच आहे

"अंधाऱ्या खोलीत 
लावलेलं निरंजन
जसं दाही दिशा
  उजळतं...
खरं प्रेम देखील 
तुमची अशीच
सोबत करतं....!

किती ह्या सुंदर ओळी... खरं प्रेम आजोबाचं आजीवर होतं... पूर्ण आयुष्य गेलं होतं त्यांनतर आजोबांना जाणीव झाली होती .देर आए दुरुस्त आए.. असंच काहीसं झालं होतं..

महेशच्या मनात एकच प्रश्न होता "भावेशच्या  मनात जी प्रतिमा स्वतःच्या वडीलांविषयी  झाली ती कधी बदलेलं ??किती तो राग किती तो द्वेष ..आजी तर बायको म्हणून तिने कोणत्याही गोष्टीला विरोध केला नाही पण  मुलगा म्हणून आईवर होणारा त्रास भावेशच्या खोलवर रुतून बसला होता.ओली जखम जणू राहिली होती,चिघळली होती.. ...आई मरणाच्या दारात असतानासुद्धा वडिलांवर त्रागा करत होता..ह्यावरून महेशला कळून चुकले होते नात्यामध्ये किती दुरावा आला होता,किती कटुता आली होती?? ..

बायकोच्या आजारपणात ढासळत चाललेला आजोबाचा चेहरा महेशला अजून त्रास देत होता..

 एकीकडे  फक्त रीत,पद्धत  म्हणून पाळणाऱ्या गोष्टीचा  नात्यावर किती वाईट परिणाम होतो ह्याचे उदाहरण म्हणजे आजोबा आणि त्यांचा मुलगा ह्याचे नाते..किती काय गमावलं होतं ..
आपल्या मुलाला आपल्याविषयी राग आहे हे कळत असून वर्षानुवर्षे तसाच स्वभाव ठेवणारे आजोबा ..किती विस्कटलं होतं सर्व.. पैसा, घरदार सर्व सुखसोयीच्या वस्तू असल्या तरी नात्यात ओलावा  नाही .. आला नाही तर पैसा, बंगला काहीच काहीच समाधान देऊ शकत नाही..आजीला आयुष्यभर समाधान लाभलं नाही..फक्त जगत राहिल्या त्या नवऱ्यासाठी ,मुलासाठी, नातवासाठी.. दुसऱ्याच्या आनंदासाठी..स्वतः नाखुश असताना इतरांना खुश कसं बरं ठेवता येतं??हे तर असे झाले दुसऱ्याची ओजळ सुखाने भरण्यासाठी आपल्या हातात काही नसताना काठोकाठ प्रयत्न करणे.. असमाधानी आयुष्यच ते ...ते दाखवायचं नाही.आपली दुःख फक्त आपल्या मनात साठवून ठेवायची... असंच झालं होतं .....नात्यातील विविध कंगोरे उलगडायचे बाकी होते...

आजीच्या प्राकृतीत सुधारणा होईल??
वडीलांविषयी वर्षानुवर्षे धगधगत असलेला राग भावेश बाहेर काढेल....नात्याची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थितपणे  बसेल..??विचार, स्वभाव न जुळल्यामुळे किती तरी जवळची नाती जवळ आऊनही दुरावतात ह्यापेक्षा आयुष्यात वाईट काहीच नाही.....

क्रमश:

कसा वाटला आजचा भाग ?नक्की प्रतिक्रिया द्या...

अश्विनी पाखरे ओगले..

🎭 Series Post

View all