आहे मी बायकोचा गुलाम (भाग २)

Love matter most

गेल्या भागात आपण पाहिले की सोयासायटीत नवीन राहायला आलेलं जोडपं चर्चेचा विषय झाला होता ..महेश आपल्या बायकोला प्रत्येक कामात मदत करत असे..त्यांनी घरात पूजा ठेवली तेव्हा खालच्या मजल्यावरील आजोबा आले आणि एक प्रसंग असा घडला की,आजोबाची  विचार करण्याची पद्धत महेशला कळली..बायकांनी त्यांची काम करायची आणि  नवरा म्हणेल ती पूर्वदिशा ,नवऱ्याने घरातली कामं करू नये अश्या विचाराचे आजोबा  ..त्याच्या घरी पाहुणे म्हणून आलेल्या आजोबांचा अपमान नको म्हणून महेश गप्प बसला..काही तरी नक्कीच भूतकाळात घडले होते त्यामुळे महेश भावुक झाला आणि रडू लागला.....त्याच कारण जाणून घेण्यासाठी कथा वाचत राहा.....


थोड्या दिवसाने कोरोना नावाच्या राक्षसाचे आगमन झाले..आजोबा फार घाबरले कारण म्हणे हा आजार वयोवृद्धांना जास्त होतो म्हणे..त्यात घरी मुलगाही न्हवता आणि सूनही ते दोघेही त्यावेळी गावी गेले होते .इथे येउसुद्धा शकत न्हवते..आजोबा निराश राहू लागले..कमल आजीला दुःख बघवेना..त्यांनी भरपूर धीर दिला..मात्र जीवाला घाबरनारे आजोबाना कोरोनाची लागन झालीच..त्यांना घरातच एका रूममध्ये ठेवण्यात आले..आजी त्यांना वेळेवर सर्व खाणंपिणं देत असे ,कुठे काढा करून दे तर कुठे हळदीचे दूध लहान बाळाची काळजी घेतो तशी आजीने सर्व काळजी घेतली.भरपूर सेवा केली आणि आजोबा बरे झाले.. महेशसुद्धा आस्थेने चौकशीसाठी फोन करत राहायचा.. त्या काळात महेशने आजीला भरपूर मदत केली..फळं ,भाज्या,किराणा सर्व काही महेश आणून देत असे..आजोबांना महेश स्वतःच्या मुलाप्रमाणे वाटू लागला..


थोडे दिवस सरत नाही तोपर्यंत महेशच्या बायकोला आणि कमल आजीला पण कोरोना झाला..आजोबा तर डोक्यावर हात मारून बसले.. कसे व्हायचे आता.??.आजोबांना ग्लासभर पाणी घ्यायची सवय न्हवती..करावे तर लागणारच होते.. महेशला आजोबांची उलघाल समजत होती.एकतर मधुसुद्धा पोसिटीव्ही आली होती तिलाही बघणं महत्वाचे होते..

महेशने आजोबांना फोन लावला आणि म्हणाला "आजोबा तुम्ही कसलीही काळजी करू नका,मी आहे..मी बनवून देतो जेवन तुम्हाला
..

आजोबा:"तुला येतं जेवन बनवायला महेश??"..

महेश:"हो आजोबा सर्व स्वयंपाक येतो"..मी  तुमच्यासाठीही बनवतो आहे जेवन.तासाभरात आणतो..  

एक तास झाला आणि महेशने जेवनाचा डबा आजोबांना दिला..थर्मासमध्ये त्याने हळदीचे दूध  दिले अजून एक थर्मास होते त्याच्यात काढा दिला होता..महेशला पाहिले तसे आजोबांचे डोळे भरून आले.आजारी कमल आजी होती पण त्यांच्यापेक्षा जास्त त्रास आजोबांना झाला...महेशने धीर दिला...म्हणाला आजोबा जेवण झालं ना  की मला फोन करा मी येतो डबे घ्यायला....आजोबांनी मान हलवली..

आजोबा हळुहळु किचनमध्ये गेले..जेवन ताटातच द्यावे लागणार..आजोबांची दहा मिनिटे तर अगदी ताट, वाटी,चमचा ,ग्लास शोधण्यात गेली...आजोबांनी डबा उघडला.वरण, भात, भाजी,चपाती ,कोशिंबीर असे सर्व दिले होते.. आजोबांनी भाजी वाढली..ताटात चपाती ठेवली..आजोबा वाटीत वरण ओतत असताना त्यांच्या हाताला वाफ लागली आणि अर्ध वरण जमिनीवर पडले.. अगदी त्यांच्या कपड्यावरसुद्धा ..पांढरा शर्ट पूर्ण पिवळा पिवळा झाला..आजोबांनी कसंबसं ताट वाढलं आणि आजीला दिले..आजोबाच्या कपड्यावर डाग पाहून आजी म्हणली"कसं काय पडलं वरण अंगावर ??भाजलं नाही ना तुम्हाला??आजोबा म्हणाले." मला भाजलं नाही ,तू घे जेवून .गोळ्या खायच्या आहेत ना तुला"आजोबांनी फरशीवर पडलेलं वरण पुसलं.. गिळगीळीत वाटत होते पण ते काम काय आजीला सांगू शकत न्हवते..

आजोबा बाहेर आले आणि सोफ्यावर बसले...तेसुद्धा जेवू लागले.. पहिला घास तोंडात घालणार तोच त्यांना काही तरी आठवलं... फार वर्षांपूर्वी जेव्हा आजोबा कामाला जायचे तेव्हा आजी आजोबांना टिफिनमध्ये चपाती,भाजी,वरण ,भात देत असे...एक दिवस आजी टिफिन बनवत  असताना वरणाचा  टोप चिमट्याने पकडला तेव्हा अचाकन टोप निसटला आणि वरण किचनच्या ओट्यावर आणि आजीच्या पोटावर पडलं आजीला पोटावर फोडसुद्धा आला होता..त्या दिवशी आजोबाला आजीने वरण दिले न्हवते ..ऑफिसवरून आल्यावर आजोबा खूप भडकले होते..आजीने सकाळी घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा म्हणाले "नीट लक्ष देऊन कामं करायला येत नाही का तुला???
आजी काहीच बोलली नाही.आजीला रडू आले ..डोळ्याला पदर लावला आणि किचनमध्ये काम करायला निघून गेली...आजीच्या पोटावरची  जखम थोड्या दिवसात भरली पण मनाला जी जखम झाली ती कधीच भरली नाही...  आजोबा लहान पोरागत रडू लागले.."माझ्या शर्टावर डाग पाहून कमलने मला भाजलं तर नाही ना?? विचारले आणि मी एक कधी तिच्याकडून काम करत असताना चूक झाली तिला  त्रास झाला तर तिला विचरायचे  सोडून"कामं नीट करता येत नाही का  असेच रागाने बोलायचो.. किती वाईट वाटलं असेल तिला पण कधी एका शब्दाने मला काही बोलली नाही...नेहमीच माझी काळजी घेत राहिली...
आजोबांना जेवन जाता जाईना..आजोबांनी  ताट झाकून ठेवून दिले..त्यांनी मोर्चा बाथरूममध्ये वळवला शर्टला वरण लागलं होतं..गेले आणि जोर लावून शर्ट धुत होते पण काही त्याचा डाग जाता जाईना...चांगलं पंधरा वीस मिनिट ब्रशने घासल्यावर शर्ट स्वच्छ निघाले.. आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदाच कपडे धुतली होती..घामाघूम झाले होते..त्यांना फार समाधान वाटले  काम फत्ते झाल्याचा आनंद ओसंडून वाहू लागला.. उठले आणि बाथरूमधून बाहेर येऊ लागले तोच फिसलले त्यांनी लगेच भिंतीचा आधार घेतला नाही तर आजोबा पडलेच असते ..घाबरत घाबरत बाथरूमधून हळूच बाहेर आले  .दार बंद केले ..शर्ट उनात वाळवण्यासाठी बाहेर रश्शीवर घालतच होते .. तोच बाहेरून छोटा मुलगा त्यांना पाहून म्हणाला "आजोबा कपडे धुतात आजोबा कपडे धुतात" आजोबांनी पटकन शर्ट दोरीवर घातले आणि घरात येऊन बसले..

आजोबा अंग मेहनतीने फार थकले होते.. त्यांना प्रचंड भूक लागली होती..त्यांनी ताट घेतले आणि जेवन करू लागले.. थंड जेवन काही बरोबर लागत न्हवते.. त्यांनी विचार केला गरम करावं जेवन पण पुन्हा काही सांडलं तर त्यापेक्षा आपलं थंड तर थंड खाऊया..आणि असाही त्यांना उठायचा कंटाळा आला होता. कमल आजीसुद्धा आजोबांचं जेवन झाल्यावरच जेवत असे..गरम गरम जेवन कोणाला आवडत नाही ??पण आजोबांचं जेवन झाल्यावर.. त्यांचं ताट उचलून खरकाटं आवरूनच त्या जेवायला बसत..
आजोबा विचार करू लागले"एक दिवस मला थंड जेवन जात नाही आणि कमल कशी बरं रोज रोज जेवत असेल??? कधी न्हवे ते आजोबा इतका विचार करू लागले कारण आज ते कमल आजीच्या ठिकाणी होते.. आज त्यांना कमल आजीची काळजी घ्यायची होती..
महेशने आणलेले डबे खरकाटे होते.. आता त्याने जेवन बनवून दिलंय म्हंटल्यावर डबे तर कमीत कमी धुवून द्यायचा विचार केला..

आजोबा किचनमध्ये आले..एक एक डबे अलगद धुवू लागले..साबणाचा हात असल्याने एक डबा खाली जमिनीवर जोरात आदळला..आजीने आजोबांना आवाज दिला"काही पडलं का हो??आजोबा म्हणाले":नाही नाही काही नाही...तू आराम कर झोप"....
आजी जेव्हा भांडी घसायच्या आणि त्यांच्या हातातुन जर काही पडले तर आजोबा मात्र खूप ओरडत"काय गं किती आवाज कमल???किती ती आदळाआपट??आजोबांना तेसुद्धा आठवलं...आजीच्या झालेल्या चुकांवर  ज्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या होत्या त्याचा राग येत होता ..स्वतःवर रागावले होते ते...

भाजीचा डबा काही निघत न्हवता..तर आजोबांनी तो दोन वेळा चांगला घासून चकचकीत केला..आयुष्यात  भांडीसुद्धा पहिल्यांदाच घासली  होती ..भांडी घासून झाल्यावर.. निवांत पडले.त्यांना लक्षात आले आजीला दूध द्यायचे आहे ..पुन्हा उठले .थर्मास मधलं दूध ग्लासमध्ये ओतलं आणि आजीला दिले..

पुन्हा  सोफ्यावर जाऊन बसले ...त्यांच्या लक्षात आले आपण तर शर्टला चिमटा लावलाच नाही.वाऱ्याने उडून तर गेले नाही ना??पुन्हा उठले गेलॅरीत  गेले पाहतात तर काय स्वच्छ धुतलेला शर्ट हवेमुळे जमिनीवर पडला होता .जमिनीचा डाग पुन्हा शर्टवरती लागला..आजोबांनी कपाळाला हात लावला..सर्व मेहनत वाया गेली होती ..पुन्हा बाथरूमध्ये गेले ह्यावेळी मात्र त्यांनी पाय हळूच ठेवला ..पुन्हा शर्ट धुतला आणि वाळत घातला.... आजोबांची पंचाईत झाली होती आज...हो पण एक मात्र होते आजोबांनी पहिल्यांदा जरी सर्व कामं केली होती त्याचे समाधान त्यांना झाले होते..त्याचबरोबर कमल आजीचे महत्वसुद्धा चांगल्या पद्धतीने कळले होते..

बायकांची काम पुरुषांनी का करायची?? म्हणणारे आजोबा आज  परिस्थितीपुढे हतबल  झाले होते.. कामं तशीच ठेवून चालणार न्हवते.. कमल आजीही पहिल्यांदाच घरात असून निवांत बसली होती तिला आजोबांचे फार कौतुक वाटत होते..

क्रमश:

कासा वाटला भाग नक्की प्रतिक्रिया द्या...पुढील भाग वाचण्यासाठी मला नक्की फॉलो करा..

लेख आवडल्यास लाईक, शेअर ,कंमेंट जरूर करा...
©®अश्विनी पाखरे ओगले.

🎭 Series Post

View all