आहे मी बायकोचा गुलाम (भाग १)

My wife my pride

नवीनच राहायला आलेलं बाजूचे जोडपे चर्चेचा विषय बनले होते..कारणही खास होतं.. मधू आणि महेश आणि त्यांना एक लहान मुलगा  सोहम.. महेश जेव्हा बघावं तेव्हा मधूला कामात मदत करत राहायचा..भाज्या आन, किराणा आन, कधी भांडी घास अशी कामं तो करत राहायचा..



बाकीच्या बायकांना ते काही बघवत न्हवतं.. कोणी खिल्ली उडवत तर कोणी कौतुक करत ..ही कुजबुज काही लपून राहणार नव्हती.महेशला काही फरक पडत न्हवता.कोणी मधूशी बोलायला आले की हमखास टोला मारला जात .बरं आहे गं बाई तुझा नवरा तुला कामात मदत करतो..नाही तर आमचे हे स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास काय घेतील.मधू फक्त एक हास्य देत.



एक दिवस मधू आणि महेशने सत्यनारणायनाची पूजा ठेवली होती ..सोसायटीतील माणसं आली..पूजा झाली ..जेवनाची व्यवस्था केली होती..महेशची धावपळ चालूच होती ...तितक्यात एका लहान मुलाने फरशीवर पाणी पाडलं.. महेशने फडकं घेतले आणि फरशी  पुसली.खालच्या मजल्यावर  आजोबा होते ते महेशला लगेच म्हणाले ."महेश तू कशाला पुसतोय फरशी? मधूला सांग ना"..असे बायकांची कामं पुरुषांनी केलेली बरी नाही वाटत....बाकीची माणसंही ऐकत होती.



महेशला त्या आजोबाच्या बोलण्यावर हसू आले .तो बोलू लागला "आजोबा  कामं ती कामं त्यात बायकांची आणि पुरुषाची कामं असा भेदभाव का करायचा??



आजोबा बोलू लागले"तुला माहीत आहे का लग्नाला साठ वर्ष झाली पण माझ्या बायकोने मला कधी साधा तांब्या उचलु दिला नाही.अगदी अंघोळीला गेलो तरी माझे कपडे,टॉवेल सर्व हातात देते.अगदी आजही...आजोबा फार फुशारकी मारून बोलत होते..त्यांची बायको म्हणजे कमल आजी बाजूलाच बसली होती..ती पण तर थकली होती ..तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भाव  दिसत होते ती थकली आहे...आजोबाच्या ताटातली भाजी संपली आणि त्यांनी अजिला उठवले जा गं भाजी आन माझ्या ताटात.आजीसुदधा जेवत होती ती जेवणाचे ताट बाजूला ठेवू लागली तेवढ्यात महेश म्हणाला आजी राहू द्या तुम्ही बसा...आजीला हायसे वाटले. महेशने आजोबाच्या हातातले ताट घेतले आणि त्यांना भाजी आणून दिली...



महेश आजोबाच्या बाजूला बसला आणि बोलू लागला..."आजोबा जे तुम्ही आता वागलात ते योग्य आहे का??



आजोबा:"काय वागलो चुकीचे मी???



महेश:आजोबा हेच तुमची भाजी संपली तर तुम्ही अजीला उठवत आहात...आजीही जेवणाच्या ताटावरच  आहेत की .त्यांना जेवू द्यायचे ना..



आजोबा:"त्यात काय एवढं ,हक्काने बोललो मी तिला माझी बायको आहे ती ..आणि ती करते सर्व माझं काम...



महेश:"आजोबा हे फार आवडलं मला तुम्ही हक्काने त्यांना काम सांगता".आजीला बायको म्हणून आपली मानतात..

पण एक विचारू का आजी तुम्हाला काही कामं सांगते का स्वतःची अशी वयक्तिक..



आजोबा:"छे तिची काय हिम्मत माझ्याकडून काम करून घेण्याची...आपल्यात चालत नाही ते असे बायकोने  कामं सांगावी आणि आपण ती करावी.. माझी आजी,आई,मावशी ,आत्या ह्या सर्व बायकांपासून चालत आले आहे ..बायकोने नवऱ्याचे ऐकायचे.बायकांचं काय ऐकायचे आपण ???बायकोने पुरुष म्हणतील तसे वागावे म्हणजे संसार सुखाचा होतो...



महेशला आजोबांचे विचार ऐकून वाईट वाटत होते त्यापेक्षा आजीचा उतरलेला चेहरा सांगत होता की, त्यांच्यावर वर्षानुवर्षे जी आजोबांची मक्तेदारी चालू आहे त्याने त्या नाखूष आहेत.



आजीच्या डोळ्यातले पानी महेशने टिपले.. महेशच्या तोंडावर खूप काही आले होते बोलावं ..पण आपल्या घरी अलेल्या पाहुण्याच्या अपमान नको म्हणून महेश गप्प बसला...



कार्यक्रम आटोपला.. सगळे पाहुणे निघून गेले..दोघांनी मिळून किचन आवरलं..मधूचा  पाच वर्षांचा लहान  मुलगा सोहम आई बाबांना मदत करत होता... सकाळी त्याने आजोबांचे बोलणे ऐकले तो आईला म्हणाला

.



आई त्या कमला आजीसारखं तू आपल्या बाबांना वस्तू का हातात देत  नाही?? उलट बाबाच तुला मदत करतात..मधूला काही ह्याच्यातलं माहीत नव्हतं.. महेश सोहमला म्हणाला"सोहम आपण एकमेकांना मदत केली तर कामं लवकर होतात ..मग आई सुदधा आपल्याबरोबर खेळू शकते .तुला गोष्टी सांगू शकते..आपल्याला वेळ देऊ शकते.. बरोबर ना??



सोहम:"हो बाबा अगदी बरोबर बोललात"





महेश मधूला बोलू लागला"किती लहानपणापासून  नकळत मुलांवर आजूबाजूच्या गोष्टीचा किती प्रभाव पडतो.. त्याच्या प्रश्नाचे समाधान योग्य प्रकारे झाले तरच त्यांचं भविष्य  सुरक्षित आहे..नाही का?



मधू:हो महेश बरोबर बोलतो आहेस....



महेशने सकाळी आजोबांचा संवाद तिला सांगितला...

लहानमुलाप्रमाणे रडू लागला...मधूने त्याला जवळ घेतले त्याला रडताना पाहून तिचेही  अश्रू अनावर झाले..



क्रमश:

काय होतं दोघांच्या  रडण्याचे कारण??काय दडलं होतं त्या  अश्रू पाठी ?पुढील भाग नक्की वाचा.





अश्विनी पाखरे ओगले.

लेख आवडल्यास लाईक,शेअर ,जरूर करा...पुढील भाग वाचण्यासाठी मला जरूर फॉलो करा.... खुश राहा,आनंदी राहा..




🎭 Series Post

View all