Feb 23, 2024
नारीवादी

आग्नेय: The Son Of Fire ? A Hectic Love Story

Read Later
आग्नेय: The Son Of Fire ? A Hectic Love Story


आग्नेय : The son of fire ? Part 1"मिस देवाक्षी  तुमची आणि आमदार साहेबांच्या मुलाची ओळख अगोदर पासून होती का?"...... वकील साहेबांनी तिला प्रश्न विचारला.

ती मात्र कोर्टाच्या कटघऱ्यात आपली मान खाली घालून गप्प होती. त्यांच्या या प्रश्नाने तिच्या अंगावर काटे उभे राहिले . कोणालाही नजर मिळवण्याचं धाडस तिच्यात नव्हतं.

आणि तिला शांत बसलेले बघून.अजून एकदा तिथे बसलेल्या त्याच्या हातापायाची आग मस्तकात गेली. तिचं गप्प बसणे नेहमीच झालेलं त्याला म्हणा. पण इथेही ती भेदरलेल्या मांजरीसारख पुन्हा शांतच उभी होती. निदान इथेतरी तो तोंड उचकटेल असं वाटलं त्याला. पण पालत्या घड्यावर पाणी. असेच झालेलं. शेवटी त्याने नाही मध्ये मान हलवली.

"मिस देवाक्षी...तुम्ही शांत आहात याच उत्तर नक्की काय समजायचं?".....त्याच वकिलाने तिला पुन्हा प्रश्न केला.

तिने फक्त नाही म्हणून मान डोलावली.

"मिस देवाक्षी  मला समजल पण बाकीच्यांना पण तुमचं उत्तर ऐकायचे आहे.....तोंडाने बोला".....वकील

"नाही"...... ती फक्त एवढंच बोलली. तिचं तो आवाज पण एकदम मांजरी सारखा आला.

"मला ऐकू नाही आलं पुन्हा बोला"......वकील कान पुढे करत म्हणाला.

"नाही"......ती थोडंसं आवाज वाढवत म्हणाली.

"मग हा खूनाचा खटला तुमच्यावर का चालू आहे? समजू शकेल?"...... वकील.

ती काही बोलण्याचा प्रयत्न करनार तेवढ्यात तिला चक्कर आली. आणि धाडकन जमीनीवर पडली. सकाळपासून अशक्त होती. एक अन्नाचा कणही तीच्या शरीरात गेला नव्हता.


तसे जज ने या केसची पुढची कारवाई नंतर होईल असे बोलून संपवली.

तिला तिथल्या महिला पोलिसांनी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले.

ईकडे माञ तो तीच्या शांत बसण्याने पुरता वैतागला होता. कॉफी शॉप मध्ये बसून तो आपल्या तीच्यावरच्या रागाला शांत करत होता.


"त्याला मध्येच तीची पहिली भेट आठवली. तेव्हाही ही अशीच होती मंद आणि घुमी...... आणि आताही अशीच आहे.  देवाने फक्त सुंदरता भरभरून दिली आहे तिला. अक्कल नाही. कदाचित देव सुंदरता वाटत होता तेव्हा पोते घेऊन गेली असेल; आणि जेव्हा आक्कल वाटत होतं तेव्हा वाटी!!".......  असाही विचार त्याच्या मनात आला.

त्याच्या डोळ्यांसमोरून पुन्हा ती भेटल्या पासुनचे दिवस भरभर आठवू लागले.


****************************

FLASHBACK : : :


       ती एका शॉप कडे काहीतरी  भेटल्यात सारखं पाहत होती. ते शॉप पाहून तिच्या गुलाबी ओठांवर सुंदर हसू पसरले. तसे तिच्या ओटा खालचा  तीळ दिसला .जो तिच्या नितळ गोऱ्यापान रंगावर  तिच्या ओठांची शोभा वाढवत होता. तिचे लांबसडक केस  वाऱ्यामुळे चेहऱ्यावर उडत होते.  तिने हळूच आपल्या हाताच्या नाजूक बोटांनी चेहऱ्यावर आलेले केस कानामागे घेतले.


       तिची नाजुक पावले त्या शॉप कडे जाऊ लागली.  तिने हळूच ईकडे तिकडे बघत रस्ता क्रॉस केला.


"काका".....तिने तिथे असलेल्या एका वयस्कर व्यक्तीला हाक मारली. तिचा आवाज खूपच शांत आणि मधुर वाटला त्या काकांना.


" देवाक्षी " .... काय हवंय तुला?....त्या काकांनी तिला विचारले. बहुदा ते ओळखत असावेत तिला.

"इथे बाल श्री गणेशा ची एक छोटीशी मूर्ती भेटेल का?".... तिने शांतपणे विचारले.


"हो....भेटेल की"....थांब मी माधवला  सांगतो. तो तुला दाखवेल.

"माधव .... ए.....माधव".... काकांनी हाक मारली.

"साहेब बोलवलंत"...माधव.

"तिला गणेशची मूर्ती दाखव"..... काका.

"साहेब... आपल्या दुकानातील गणेशच्या मूर्ती गेल्या आहेत. आता असतील की नाही माहित नाही".....माधव.

"बरं.....तरी पण बघ एकदा या मॅडम ना हवी आहे"....काका.


  "मॅडम मी तुम्हाला दुसरे काही घ्यायचे असेल तर दाखवतो. शॉप मध्ये बऱ्याच शोपीसच्या वस्तू आहेत. त्यासुद्धा तुम्हाला आवडतील".....माधव तिच्याकडे बघत दिलगिरी व्यक्त करत म्हणाला....तसे तिचा चेहरा पडला.


"नो.... इट्स ओके.... मला गणेश मूर्तीच हवी होती. बघते मी दुसरीकडे"....असे बोलून ती तेथून निघून गेली.


तिला जे हवे  होते ते भेटले नाही म्हणून तिचा चेहरा पडला. चेहरा बारीक करूनच ती शाॅपबाहेर पडली.

थोडे पुढे चालत आली तोपर्यंत ती कोणातरी व्यक्तीला येऊन धडकली. यात तिचीच चूक होती कारण तिचे विचार करता करता लक्षच नव्हते. आणि चालत समोरच्या व्यक्तीला धडकून खाली पडली.

"सॉरी मिस"....तो असे बोलून घाईतच पुढे निघून गेला.

तिने समोर त्याच्याकडे बघितले. तोपर्यंत पुढे निघून गेला होता.

थोडावेळ उभे राहून ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसली.

त्याने फेंट येलो कलरचा शर्ट विथ ब्लॅक जीन्स घातली होती.

त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून तो सावळा असावा बहुतेक... असे वाटले तिला....ती तो विचार झटकून. पुढे जाऊ लागली.

"मॅडम"..... मागून आवाज आला तिला. तसे तिने मागे पहिले.

"मॅडम तुम्हाला हवी होती तशी एक मूर्ती सापडली आहे. चला तुम्हाला दाखवतो.... प्लिज या ना!"....माधव तिला विनवणी करत म्हणाला. तसे तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले.

ती माधवसोबत त्या शॉपमध्ये पुन्हा परतली. तिने समोर बघितले तर मघाशी तिला धडकलेली व्यक्ती समोर दिसली. त्याच्या हातात तिने गणेशजींची मूर्ती बघितली.


"थॅन्क्यू यू सो मच!".... ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"व्हाय?".....त्याने आश्चर्यचकित होऊन तिला विचारले. त्याने एकवार तिच्याकडे निरखून पाहिले.

दुधासारखा गोरा गोमटा रंग.... घारे पाणीदार समुद्रसारखे डोळे.... लांबसडक कमरेपर्यंत रुळणारे मोकळे केस.... गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ. भरीस भर म्हणून ओठाखाली असणारा तीळ. आणि तिने घातलेला व्हाईट कलरचा लांब बाही असणारा एका परीप्रमाने  तो सिल्की गाऊन. त्याच्यासमोर सौंदर्याची खाणच उभी होती जणू!..... तो तिला पाहून थोडे ओशाळला कारण तिचा रंग त्याच्या रंगाच्या अगदी विरुद्ध होता.

तो सावळा होता... पण एखादा हिरो असतो ना! तसाच होता अगदी पर्सनॅलिटीने. त्याच्या चेहऱ्यावर त्याला सुट होणारी मिशी.आणि  सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने जिममध्ये घाम गळून बनवलेली बॉडी. फिट होता अगदी सगळ्याच बाबतीत.

त्याने तिच्यावर स्थिरावलेली आपली नजर लगेच दुसरीकडे वळवली. 

"सुंदर".....ती त्याच्याकडे पाहत म्हणाली...तसे त्याने चमकून तिच्याकडे बघितले. तो पर गोंधळून गेला तिच्या या बोलण्यावर.

"एस्क्युज मी!.... मी ओळखले नाही तुम्हांला!... प्लिज टेल युअर मोटिव टू टॉक मी".....तो म्हणाला.


"मूर्ती.....मूर्ती...खूप छान आहे... आणि थँक्यू यासाठी की तुम्ही ही गणेश मूर्ती शोधली! आता प्लीज मला ही मूर्ती द्या...मी पे करून घेऊन जाते"...... ती म्हणाली.

"सॉरी मिस....तुमचा काही मिस अंडरस्टँड होत आहे. आता ही मुर्ती मी  विकत घेणार आहे. त्यासाठीच तर मी हातात घेतली आहे"...... तो म्हणाला.


"पहिलं मी बुक केली होती.....सो आता ही माझी झाली"..... ती त्याच्या हातातून घेत म्हणाली.

"व्हॉट द हेल..... तु असा कसा फालतूपणा करू शकते?तुला काही मॅनर्स आहेत की नाहीत. ब्लडी गर्ल!"....तो तिच्याकडे बघत रागात पाहत म्हणाला.

तसे ती एकदम दचकली. त्याचा तो रौद्र अवतार बघून तिची वाचा गेली. त्याचे डोळे रागाने लाल आणि मोठे झाले होते. नाकाच्या पुड्या फुगल्या. त्यात त्याच्या हाताच्या नसा सुद्धा फुगीर झाल्या.

"फॉर युअर काईंड इन्फॉर्मेशन आय एम डी.एस.पी 'आग्नेय सबनीस' जर तु ही मूर्ती घेऊन इथून पळून जाण्याचा विचारात असशील तर मलाही पळता येते एवढे लक्षात ठेव. चॅम्पियन आहे मी पळण्यात.".....आग्नेय तिच्याकडे आपली धारदार नजर रोखत म्हणाला.

बिचारी देवाक्षी! त्याचा असा अवतार बघून घाबरली. ती त्याच्याकडे भित्र्या नजरेने बघू लागली.

"ईकडे आण ती मूर्ती!"..... तो तिच्या समोर हात पुढे करत म्हणाला.

तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. ती त्याला असे चिडलेले पाहून थरथर कापत होती.

"आय एम सॉरी"..... तिच्या डोळ्यांत पाणी आले.

"इकडे आण ती मूर्ती.... नाऊ थीस इज माइन!!".....तो तिच्या डोळ्यांत आरपार बघत म्हणाला.

त्याच्या करारी आवाजामुळे तिने घाबरून ती मूर्ती त्याच्या हातात दिली.
त्याने ती मूर्ती घेतली आणि काऊंटर वर गेला... पाखी त्याला बघत स्तब्ध उभी राहिली.

"मला माफ करा सर पण ही गणेश मूर्ती अगोदर त्या मुलीसाठीच  काढून ठेवली होती. पण तुम्हालाही तिच आवडली. या शॉप मध्ये अजून बऱ्याच छान वस्तू आहेत.  तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. पण ही मुर्ती सोडून....मला तिचं मन मोडणे नाही जमणार .... मी तुमची विनंती करतो".......काका.


त्याने मागे वळून बघितले. तर ती कुठेच नव्हती. बहुदा गेली असावी.


"मला वाटतं की तुम्हाला तुमच्या वस्तु विकण्याशी मतलब असावा. असंही मी घेतली काय आणि तिने घेतली काय किंमत तर एकच भेटणार आहे ना तुम्हाला?".....त्याने आपल्या कपाळावर अंगठा रब करत विचारले.
आणि असंही आता ती गेली आहे. सो त्याचा काही फायदा नाही होणार. तो पुढे बोलला.

तसे त्या काकांनी नाईलाजाने त्याला ती मूर्ती दिली. त्याने ती मूर्ती घेतली. पे करुन तेथून निघून गेला.******************************

      देवाक्षी   पडलेल्या चेहऱ्याने घरी आली. तिला खूप वाईट वाटत होते. की आपल्या आईने आपल्याला काहीतरी आणायला सांगितलं. आणि आपण ते आनु शकलो नाही.

खरे तर तिने आणि तिच्या आईने  दोघींनी मिळून स्व:कमाईतून एक गुंठा जागा घेतली होती. आणि तिथे आपल्या स्वप्नातील घर साकार केले होते. त्याचीच आज वास्तुशांती होती. ते घर अगदीच छोटे होते. एक छोटा किचन, छोटासा हॉल आणि दोघींसाठी एक बेडरूम. पण ते घर खूप छान प्रकारे सजवले गेले होते.

पूजेसाठी त्यांना एक गणपतीची मूर्ती लागणार होती. खरे तर पाखीला देवावर विश्वास नव्हता. कारण तिला असे वाटायचे की देव जर या जगात असतो तर त्याने तिच्या आईच्या म्हणजेच कुमुदिनीच्या अडचणी वेळी मदत करायला हवी होती. जर असे म्हणतात की देव सर्वव्यापी आहे तर त्याने तिच्या आईने भोगलेल्या यातना कमी करायला पाहिजे होत्या. पण त्याने तसे केले नाही. त्यामुळे तिला देवावर विश्वास नव्हता.

तिच्या आईचा म्हणजे कुमुदिनीचा देवावर विश्वास होता. कारण त्यांना कुठे ना कुठे माहित होत माझी झी परिस्थिती आहे. किंवा मी जे भोगलं आहे. ते  फक्त आणि फक्त माझ्याच चुकीमुळे. हे त्यांना माहीत होत. आणि आत्तापर्यंत जे काही क्षण त्यांनी सुखाने घालवले आहेत. त्यासाठी त्या देवाला नेहमी आभारी मनायच्या.

देवाक्षीचा देवावर विश्वास नव्हता. पण तिच्या आईच्या विश्वसमुळे तिचा नाईलाज होता. ती नाईलाजाने का होईना आज आईसाठी गणेशची मूर्ती शोधत होती. पण तिला कुठेही तिला हवी तशी लहान मूर्ती नाही भेटली. एका शॉप मध्ये भेटली.  पण दुसरीच कोणी व्यक्ती  घेऊन गेली.


"देवाक्षी काय झालं भेटली का मूर्ती?"......आईने किचनमधून बाहेर  येत विचारले.

तिची आई तिच्यासारखी दिसायला सुंदर होती. रेखीव डोळे ,नाक. गोरा रंग, आणि तिच्याच सारखा कमनीय बांधा. तिच्या आईचीच सुंदरता तिला वारस हक्काने मिळाली होती.


"नाही आई.....एक भेटलेली पण ती पण हातातून गेली"....असे बोलून तिने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला.

"आई आता पूजेचं काय करायचं?"..... तिने आईकडे चेहरा बारीक करत विचारले.

"काहीही झाले तरी मी या पूजेत खंड पडू देणार नाही. तू चल माझ्याबरोबर बाहेर".....आई असे म्हणाली आणि तिला बाहेर अंगणात घेऊन गेली.


तिथे समोर एक तुळस होती.त्यांनी त्या तुळशीतील माती घेतली. आणि त्या मातीने एक छोटीशी बाप्पाची मूर्ती बनवली.


बाप्पाची मातीची मुर्ती घेऊन त्यांनी आपल्या वास्तूची शांती केली. गुरुजींनी त्यांना प्रसाद वाटायला सांगितला. आणि तेथून निघून गेले.


"आता सगळी कामे झाली आहेत तर तुझ्या रुममध्ये जाऊन बस. आणि हो खोली आतून लॉक कर.शेजारी येतील आता थोड्या वेळात"..... आई म्हणाली.

"आई वाटते ना मी प्रसाद"..... देवाक्षी

"तुला जितके बोललंय तितकं कर".....आई तिच्याकडे धारदार नजरेने बघत म्हणाली.

आईच्या अश्या बोलण्यामुळे ती गप्प अपल्या खोलीत जाऊन बसली.


"बाई....बाई.....खूपच छान आहे की गं घर".... मीरा म्हणजेच त्या दोघी अगोदर ज्या चाळीत रहायच्या त्यांच्या शेजारची बाई बोलली.

"हो ना"........ रीहान म्हणजेच मिराचा मुलगा म्हणाला.


"आमचं कधी व्हायचं काय माहीत असं घर?".......सारिका म्हणजेच त्यांची अजून एक शेजारीण.

"हो की....आपल्या अख्ख्या चाळीत तुझ्या एकटीच असं घर झालंय कुमे. तसं म्हणा तुझी अगोदरची सेविंग होती. त्यात तुझी मुलगी तीपण कमवायला लागली. मग काय मजाच की तुमची?".....मीरा म्हणाली.

"आमचं तर काय हा रीहान अजून इंजिनिअरिंग होऊन कमवत नाही"..... मीरा म्हणाली तसे रीहान ने तिला डोळ्यांनीच गप्प बस असे सांगितले.

"बाकी जाऊदे पण देवाक्षी नक्की काय करते ?  म्हणजे कधी दिसली नाही मला कुठे बाहेर कामाला जाताना....म्हणून म्हणाली बाकी काही नाही"...... मीराने हसत विचारले.


"ती एका पेपरसाठी लेख लिहिते. आणि तो लॅपटॉप वरूनच पाठवते. त्यातूनच तिला पैसे मिळतात. शिवाय ती लहान मुलांसाठी जादूच्या गोष्टी लिहीत असते.... खूप प्रसिद्ध होतात तिच्या गोष्टी"... कुमुदिनी थोड्या तोऱ्यातच म्हणाली.

"आ..... होय ना....आणि बरे झाले तू तिला बाहेर पडू देत नाहीस....नहितर आत्ताच्या मुलींचं माहित आहे ना बाहेर पडल्या की लफडी चालू होतात....त्यात देवाक्षी अशी सुंदर" ......ती बोलतच होती की कुमुदिनीने तिच्याकडे रागाने बघितले.

"नाही.... म्हणजे असं बोलायचं होतं की.... अ.....बाकीच्या लोकांच्या नजरा पण नसतात ना चांगल्या .... मग ते पण बरोबर नाही ना....एवढी तरणी ताठी पोर...म्हणून म्हणाले".....मीरा आपला हेतू बदलत म्हणाली.

त्यावर कुमुदिनीने हीच काही होऊ शकत नाही अश्या आविर्भावात मान हलवली.

"मी काय म्हणते"......मीरा अजून काही बोलणार तर रीहान ने तिला डोळ्यांनीच थांबवले. पण त्याच्याकडे ही दूर्लक्ष करून ती पुढे बोलू लागली.

"उशीर झाला बघतेय ही देवाक्षी कुठे दिसत नाहीये"....मीरा ईकडे तिकडे बघत म्हणाली.

"झोपली आहे ती. कामामुळे बरीच दगदग झाली तिची".... कुमुदिनी.

"हो का ! पण भेटली असती आम्हा सगळ्यांना"....मीरा विशेषत रीहान कडे बघत म्हणाली.

"हो पण आता ती झोपलीय नंतर कधीतरी भेटेल तुम्हाला"....कुमुदिनी.

"हो का ? ठीक आहे मग"....मीराने तोंड वाकडे केले.

"आता  देवाक्षीचं लग्नाचं वय झालेलं आहे तर रिहानला पण एका नोकरी साठी फोन आला आहे..... म्हणजे तुला कसं वाटेल? की आपण जर दोघी  विहीनबाई झालो तर?".... मिरान पुन्हा आपला तोंडाचा पट्टा चालू केला .

आता रिहानला पण उत्सुकता लागली होती की कुमुदिनी काय म्हणतेय याची. त्याने आपले कान अवर्जून टवकारले.

"मीरे....अजून तिचं वय वीस आहे आणि तू कुठं तिच्या लग्नाच्या मागे लागलीस? आणि तुझा रीहान बत्तीस वर्षाचा वय बसत तरी आहे का? तिचं लग्न ठरले ना की तुलाच पहिली पत्रिका वाटेन"......कुमुदिनी म्हणाली.

रीहानला वाईट वाटलं की त्यांच्या मनात त्या दोघांचं लग्न लाऊन नाही द्यायचे म्हणून. मनाला कुठेतरी कुमुदिनी. चा राग आला.

"बरं.....असुदे.... चल जातो आम्ही....येऊ परत कधीतरी".....सारिका म्हणाली. आणि मीराला जबरदस्तीने घेऊन गेली. त्यांच्या पाठोपाठ रीहानचे बाबा आणि बाकीचे लोकही निघून गेले.

सगळे गेल्यावर कुमुदिनीने सुटकेचा श्वास सोडला.

रात्री दोघींनीही जेवण केले.आणि रुममध्ये गप्पा मारत बसल्या.

"मला वाटतं त्या मीराला तर ना काही अक्कलच नाही. असं कसं ती सरळ सरळ  तिच्या मुलासाठी तुझा हात मागू शकते?तिच्या त्या मुलाला अगोदर कमवायची तरी अक्कल येऊदे. नुसतं शिक्षण झालं म्हणजे झालं का? याला नोकरी तरी कोणी देईल का? म्हणे तर विहीन.बाई होऊ आपण हुं".......आई तिच्या डोक्याला वाटिका टेल लावत बडबड करत होती.

"आई जाऊदे ना कशाला डोक्याला त्रास करून घेते. काकु म्हणाल्या आणि झाले का लग्न लगेच आमचं?"..... देवाक्षी आईला समजावत म्हणाली.

"नाही हा.... देवाक्षी तु त्याचं आणि तुझं नाव कधीच चुकूनही एकत्र घ्यायचं नाहीस.... मला तो मुलगा माझा जावई म्हणून कधीच चालणार नाही. मला ना तुझ्यासाठी एखादा राजकुमार बघायचा आहे. जो तुला खूप जपेल".....आई स्वप्न बघत म्हणाली.

तसे देवाक्षी तोंडाला हात दाबून हसू लागली.....

"हसायला काय झालं तुला?"....आईने तिचे केस ओढत विचारलं.

"आई.....आता या जगात राजकुमार कुठे भेटेल मला? एकवेळ हा असला विचार मी केला होता तर ठीक होत. पण मी करण्याऐवजी तूच हा विचार करत आहेस.म्हणून हसू आले मला बाकी काही नाही"....देवाक्षी

"बघ भेटेल तुला.... असेलच ना तुझ्यासाठी कोणीतरी... परी आहेस तू माझी आणि तुझ्यासाठी तो एका जगाच्या कोपऱ्यात तुझीच आस लाऊन बसला असेल"......आई म्हणाली.

"हो ना कुठेतरी दारू पिऊन पडला असेल माझी आस लावत".....ती तोंडातच पुटपुटली.

"काय म्हणालीस का आता?".....आईने भुवया वर करत विचारले.

"काही नाही....लाव पटकन तेल मला आता झोप आलीय".....ती जांभई देण्याची नाटक करत म्हणाली.


"आज बाहेर केस मोकळे सोडून गेलीस. पण उद्यापासून एक वेणी घातल्याशिवाय कुठेही जायचं नाहीस समजलं?".....आई

"हो आई.....आज आपल्या घराची वास्तू शांती होती.म्हणूनच मी केस मोकळे सोडले होते. उद्यापासून नाही सोडणार बस्स".....ती एवढे बोलून बेडवर जाऊन झोपली.


"बाळा....मला माफ कर मी तुला बाकीच्या मुली सारखे नाही जगू देत. पण तु पण तर नाहीस ना त्यांच्यासारखी! तुझं अस्तित्व हे माझ्याशी जोडलेलं आहे. आणि माझा काळा भूतकाळ अजूनही माझ्याशी जोडलेला आहे. भीती वाटते तुला गमवन्याची. जितकी कोमल आहेस ना तू तितकंच कोमल तुझं मन आहे. भीती.....वाटते मला कोणीतरी येऊन तुझंही आयुष्य माझ्यासारखं उध्वस्त करेल. मला तुला सुखात बघायचं आहे. माझा काळा भूतकाळ मी तुझं भविष्य नाही बनू देणार. आणि असं झालं तर मी कधीच स्वतःला माफ नाही करू शकणार.... कोणाचीही घाणेरडी नजर तुझ्यावर पडली नाही पाहिजे. माझ्यासारखं मी तुला कलंकित नाही होऊ देणार....कधीच नाही"....आई तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिच्या शेजारी झोपली.....

✨✨Stay tuned✨✨✨


************************

पहिलाच पार्ट आहे तर अपेक्षा आहे की तुम्हाला सुरुवात आवडली असेल. कथा थोडी सस्पेन्स ने भरलेली असणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी हळू हळू उलगडत जातील. आणि प्लीज....समीक्षा देत जा. तुमच्या समिक्षानी लिहायला इंटरेस्ट येतो. नाहीतर काही समीक्षा नसली की कथा लिहू वाटत नाही....आणि त्यामुळे कथा काय आहे आणि कोणत्या वळणावर आहे हे सुद्धा मी विसरते.,,? सो प्लीज.... पास युअर कमेंट्स इन कमेंट सेक्शन?
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Prakruti

//