आत्महत्या कि प्रेम कि आई - वडील - भाग - 3 ( अंतिम भाग )

aaee, vadil
आत्महत्या कि प्रेम कि आई – वडिल ( भाग – ३ ) अंतिम भाग

इतकी वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो तर मला नाही का तिच्या मनातले कळणार. नाही का कळणार तिची स्वप्न तिच्या इच्छा, अपेक्षा, जबाबदाऱ्या मला. एखाद्या परक्या माणसाला उत्तर द्यावे असे तिने मला दिले होते. त्याला जग परके वाटू लागले होते. मग भावनांना आवर घालून नॉर्मल कसे राहू हे आणि अनेक प्रश्न त्याला पडू लागले होते.

लहानपणापासूनचे प्रेम आज तिच्या नकारामुळे एक दिवसात तिरस्कार आणि राग या भावनेत कधी बदलत गेले हे त्याला ही कळले नाही. आता त्याला अस्मिता कधीच समोर येऊ नये असेच वाटत होते, त्या दिवशी तो खूप रडला. आणि थोड्याच वेळात मनाचा ताबा सुटला आणि त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोळवू लागले.

आणि तॊ सरळ प्लॅटफॉर्म च्या दिशेने चालू लागला.. आता पुढची ट्रेन आली कि त्याखाली उडी मारू आणि जीवन संपवू हा एकच विचार तॊ करू लागला.

तसंच थोडा वेळ त्याचा इथे तिथे बघण्यात गेला आणि त्याला पाठून कोणीतरी दादा म्हंटल्या सारखे वाटले, आणि त्याने मागे बघितले तर त्याची छोटी बहीण कार्तिकी होती, आणि त्याचा आत्महतयेचा प्लॅन फेल गेला. आणि तॊ बहिणी बरोबर घरी निघून आला..

आणि मग घरातल हसत खेळत वातावरण बघून मनातल्या मनात म्हणाला कि आज जर मी आत्महत्या केली असती तर हे घर रडत राहिलं असतं, आणि त्याने मनात येणारे ते सर्व वाईट विचार झटकून टाकले.

आणि आपल्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग विसरून पुढे जाण्याचे ठरवले. आणि आपले आयुष्य मार्गी लावले. रितेश आता लंडन ला असतो तिथल्याच एका मुलीबरोबर लग्न करून तो तिथे सेटल झाला आहे..

अस्मिता ने तिच्या आई – वडिलांचं ऐकलं, खूप शिकली, खूप मोठ्या पदावर गेली आहे, तिने हि रितेश ला विसरून आई- वडिलांच्या संमतीने ठरवलेला मुलगा पसंत करून आज ती सुखाने संसार करत आहे . तिने हाच विचार केला कि आई – वडील आपल्या मुलाचं कधीच वाईट चिंतत नाहीत. ते माझं सर्व चांगलंच करणार आणि आज ती सुखी आहे...

हि माझ्या एका मैत्रिणीची सत्य कथा होती.

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख -रत्नागिरी )

🎭 Series Post

View all