आत्महत्या कि प्रेम कि आई - वडील - भाग -2

aaee, vadil


आत्महत्या कि प्रेम कि आई – वडिल ( भाग – २ )

आनंद मानावा की चिंता हेच अस्मिता ला कळेना तिचेही प्रेम होते पण ही ती वेळ नाही आणि नव्हतीच निदान तिच्यासाठी तरी. आता हा एक होकार दिला तर सगळे बदलणार होते हे तिला माहीत होते. तिचे स्वप्नं, आई वडिलांची अपेक्षा या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्या समोर उभ्या राहिल्या आणि आजवर रितेश वर केलेले प्रेम तिला परके वाटले.

या सगळया विचारांच्या कल्पनेत असताना तिने पटकन नाही सांगितले आणि “ रितेश तु हे काय बोलत आहेस आपण तर छान मित्र आहोत ना. मग हे मध्ये प्रेम कुठून आले. आणि तसेही मला माझे करियर करायचे आहे. आई बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी माझा वेळ प्रेमात नाही वाया घालवू शकत. मला ते नाही जमणार माझ सगळीकडे दुर्लक्ष होईल.” अशी बरीच टोचणारी वाक्य मुद्दाम बोलून तिने त्याला पुरतं हदरावून टाकले.


रितेश तिला समजावत होता की सगळे पाहिल्यासारखेच असेल मी फक्त प्रेमाची कबुली देत आहे. पण अस्मिता ला ते नको होते आता तरी, कारण प्रेमात लगेच अपेक्षा वाढतील मग नाही पूर्ण झाल्या की चिडचिड होईल असं तीच म्हणणं होत .

तिने ठरवले होते स्वतःहून काही करियर करायचं आणि मग रितेश ला प्रेमाची कबुली देयची. पण रितेश ने आधीच विचारून सगळे होत्याचे नव्हते केले होते. रितेश ने तिला खूप समजवले पण तिने ऐकले नाही आणि आपल्याच मतावर ठाम राहिली. त्याला काहीच सुचत नव्हते आपला अंदाज कसा काय चुकला या विचाराने तो वेडापिसा झाला होता.

ऑफिस मध्ये कामात लक्ष लागत नव्हते. आधीच मितभाषी असलेला रितेश कोणाला काहीच सांगू शकला नाही . कारण आईला त्याला पडलेला चेहरा लगेच कळेल हे त्याला माहीत होते. रितेश ने स्वतः ला या विचारांतून बाहेर पडायचे ठरवले, पण काहीच केल्या तॊ ह्या सर्वातून बाहेर पडत नव्हता.

त्याला एकाच गोष्टीचे जास्त दुःख झाले होते की नजरेची भाषा, काळजी, आपुलकी, आकर्षण या सगळ्या गोष्टी मिळून जे प्रेम जन्माला येते हे तेच होते आमच्यात पण मग तिने अश्या पद्धतीने का नकार दिला.

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत कि – रितेश काय निर्णय घेतो ते....)

🎭 Series Post

View all