Nov 29, 2022
// rablogging.com_GGINT //
गोष्ट छोटी डोंगराएवढी

आदिमाया आदिशक्ती जगत जननी

Read Later
आदिमाया आदिशक्ती जगत जननी
आदिमाया आदिशक्ती जगतजनानि

आज इथे या शिळेवर बसून मला प्रश्न पडला आहे कोsहम? मी कोण?आदिमाया,आदिशक्ती,जगतजननी?गार्गी की मैत्री? सीता,अहिल्या,शबरी कि,द्रोपदी,कुंती,राधा,मीरा? खरंच मी कोण आहे? जिजामाता,राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर,ताराराणी,की इंदिरा गांधी,अरुणा असफअली,सरोजनी नायडू? पी. टी .उषा,सायना,पी. व्ही. सिंधू ,मीराबाई चानू , मेरीकोम,कर्णम मल्लेश्वरी,निर्भया,हैदराबादची जळीता,गर्भातच खुडली जाणारी कळी,की मंदिर मशिदीच्या पवित्र भूमीत होणाऱ्या अत्याचाराची बळी?एकेका नावासह एकेक प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रत्येक वेळा मला ती माझीच प्रतिरूप वाटते, आणि प्रत्येक वेळी ती प्रतिमा माझ्यातच विराम पावते. कारण ती प्रत्येक जण सर्वप्रथम एक स्त्री असते.


वैदिक काळात नवर्‍याशी उपनिषदांवर वाद करणारी गार्गी,जेव्हा मुक्ती आणि मोक्षप्राप्ती पेक्षा वर्तमानातच जगण्याला महत्व देते तेव्हा,ती एक स्त्री असते. पतीशी एकनिष्ठ राहणारी सीता, भिल्ल राजकुमारी असूनही वनवासचं व्रतस्थ जीवन जगणारी शबरी,पतीचा रोष शिरोधार्य मानून शिळा होणारी अहिल्या.... कितीही विविध माझी रूपे?


स्वतःच्या अस्मितेसाठी महाभारताच्या युद्धाला कारणीभूत ठरणारी---द्रोपदी,आसक्ती विरहित कृष्णावर निस्सीम प्रेम करणारी------राधा, त्या सावळ्या गिरिधराच्या एका क्षणाच्या दुर्लभ दर्शनासाठी विष प्राशन करणारी------मीरा. या साऱ्या माझ्याच सावल्या तर नाहीत ना!


लखुजी जाधवांची मुलगी जेव्हा बादशहाच्या दरबारात खून झालेल्या वडील आणि भावांचा स्वराज्य स्थापून वचपा काढते तेव्हा ती जिजामाता होते. अवघ्या एकविसाव्या वर्षी इंग्रजांना निक्षून सांगणारी "मेरी झांसी नही दुंगी म्हणणारी "रणरागिनी लक्ष्मीबाई" असते. शिवाजी महाराजांचे स्वराज्य शर्थीने टिकवणारी "ताराराणी" तीही कदाचित मीच असते.काळ बदलला आणि माझी भूमिकाही बदलली,कधी मी अरुणा असफअली होते, तर कधी सरोजनी नायडू झाले,कधी सावित्रीबाई फुले,तर कधी इंदिरा बनवून देशासाठी मोठे ,मोठे निर्णय घेतले आणि बांगलादेशाची निर्मिती केली,तर कधी प्रतिभाताई पाटील,द्रौपदी मुर्मू बनून देशसेवेला अर्पित झाली.

कधी मी सिंधू ताई सपकाळ होते,तर कधी मदर तेरेसा,कधी डॉ. राणी बंग तर कधी साधना ताई आमटे, कधी किरण बेदी तर कधी डॉ. मंदा आमटे,डॉ. स्मिता कोल्हे बनून मी माझ्या देश बांधवां साठी जीवन वेचले.आता तर मी भारत की बेटी म्हणून खेळाचे मैदानही गाजविले. पी.टी.उषा,कर्णम मल्लेश्वरी,मेरीकोम,सायना नेहवाल,सिंधू ,निखत झरीन,मीराबाई चानू प्रत्येकवेळी मीच होते का?


मुंशी प्रेमचंद म्हणतात-

"संसार मे जो कुछ सत्य है सुंदर है उसको में नारी मानता हूं"पण जर असे असेल तर माझ्यावर एवढे अत्याचार का होतात? कधी भर रस्त्यात,तर कधी चालत्या गाडीत,कधी ट्रेनमध्ये, तर कधी शाळेत,एवढेच नव्हे तर मंदिर मशिदीत ही मी का ओरबाडली जाते ?जाळली आणि मारली जाते? माझ्यावर अत्याचार होत नाही असा एकही दिवस नाही.वर्तमानपत्र, टी.व्ही.,रेडिओ प्रत्येक ठिकाणी माझ्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी दाखवली,सांगितली आणि ऐकली जाते.

म्हणूनच पुष्यमित्र उपाध्याय लिहितात
"छोडो मेहंदी खड्ग संभालो
खुदही अपना चीर बचालो
द्युत बिछाये बैठे शकुनी
मस्तक सभी बिक जायेंगे
सुनो द्रोपदी शस्त्र उठालो
अब गोविंद नाआयेंगे
किस रावण की कोंदु बाहे?
किस लंका को आग लगा ऊं?
घर घर रावण, पग पग लंका
इतने राम कहासे लाऊं?

तुम्ही पुरुष बनून, समाज बनून माझ्यावर एवढे अन्याय अत्याचार करता, पण कधी विचार केला आहे का,की माझ्याशिवाय तुमचे आयुष्य कसे वैराण वाळवंट होईल ते! मी आहे म्हणूनच तुमच्या मिळकतीच्या पैशाला "अर्थ" आहे. मी आहे म्हणूनच तुमचा निवारा "घर" बनतो. मी आहे म्हणूनच तुमच्या रसनेला सुग्रास जेवण मिळत आणि तुमची क्षुधा शांत होते. मी आहे म्हणूनच तुमच्या असण्याला \"बाप , पती,बंधू आणि पुत्र\" अशी विशेषणे लागतात. आणि तुम्ही गेल्यावर ही तुमच्या पाऊलखुणा उराशी बाळगून आम्ही जगत राहतो.


मी आहे म्हणूनच अंगणात तुळस आहे. मी आहे म्हणूनच सायंकाळी देवाजवळ दिवा तेवतो,मी आहे म्हणूनच पुरुषाचा वंश वाढतो , मला वजा करून,नागवून काहीही मिळणार नाही,उलट तुम्हीच कफल्लक व्हाल, माझ्यावरचे अत्याचार बघून एक कवी मन मला प्रेरणा देत आहे ........जगण्यासाठी आणि लढण्यासाठीनवी स्फूर्ती देत आहे...........


तू खुद की खोज मे निकल
तू किस लिये हताश है

तू चल........ तेरे वजूद की
समय को भी तलाश है

जब तुझसे लिपटी बेडियां,
समझना इनको वस्त्र तू

ये बेडिया पिघालके,
बनाले इनको वस्त्र तू


चरित्र जब पवित्र है,
तो क्यों है ये दशा तेरी

ये पापी ओके हक नही,
कि ले परीक्षा तेरी

जला के भस्म कर इसे,
जो क्रूरता का जाल है

तू आरती कि लौं नही,
तू क्रोध की मशाल है

चुनरी उठा के ध्वज बना,
गगन भी कप कपायेगा

अगर तेरी चुनरी गिरी ,
एक भुकंप आयेगा

तू खुद की खोज मे निकल,
तू किस लिये हताश है?

तू चल....... तेरे वजूद की
समय को भी तलाश है

त्यामुळेच आता हे सर्व थांबायलाच हवं! आता मला स्वतःलाच स्वतःची मदत करायची आहे, मी आई बनून माझ्या मुलांवर सुसंस्कार करेन, मी बहीण बनून माझ्या बंधूला स्त्रीत्वाचा आदर करायला शिकवेन. मी पत्नी बनून पतीच्या दुःखात त्याला साथ तर देईनच पण केवळ एवढेच करून थांबणार नाही तर,त्याला हेही सांगेन की, "मी पण तुझ्या सारखीच एक हाडामासाची माणूस आहे,मलाही भावना आहेत मन आहे". प्रसंगी त्याची सखी होईन,मी माता,मुलगी,सून म्हणून घराला घर पण देईन.

पण तरिही हे अन्याय थांबले नाहीत तर मग मात्र मी दुर्गा,चंडी,काली महिषासुर मर्दिनी बनेन. दुष्टंचा संहार करेन. पापी जनांना शिक्षा देईन. अधमांचे निर्दालन करेन.माझ्या असण्याला किती महत्त्व आहे हे, मी त्याला पदोपदी पटवून देईन.
माझ्यातल्या सुप्त शक्तीला कैफी आजमी यांनी अशीच एक सुंदर साद घातली आहे.

कद्र अब तक तेरी तारीख ने जानी ही नही

रोशनी भी तेरे आंखो मे है पानी ही नही

हार तुने कभी तकदीर से मानी ही नही

तू हकिकत भी है दिलचस्प कहानी ही नही

हर अदा तेरी कयामत है जवानी ही नही

अपनी तारीख का उनवा बदलना हे तुझे

उठ मेरी जान मेरे ही साथ चलना है तुझे


आणि आता हाच माझा जीवन संकल्प झालेला आहे.


लेखिका राखी भावसार भांडेकर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now