आधुनिक युगातील कावळा आणि चिमणी

आधुनिक युगातील कावळा आणि चिमणी ही कथा काल्पनिक तत्वावर आधारित आहे.

आधुनिक युगातील कावळा आणि चिमणी

      छोटी मयुरी आज बाबांजवळ हट्टच धरून बसली.
बाबा, बाबा ...रोज आईच गोष्ट सांगते, आईजवळ तर गोष्टींचा खजिनाच आहे, पण आज मला चिऊ-काऊ ची कथा ऐकायचीय... 
पण आज आईला खूप काम आहेत ऑफीसची म्हणून आई म्हणाली ," अग काऊ आणि चिऊची गोष्ट खूप सोपी आहे, बाबा सांगतील तुला आरामात....
ओके मम्मा म्हणतच मयुरी बाबाकडे म्हणजे सागर कडे आली. सागर पण आपला लॅपटॉप उघडून कामात व्यस्त होता, पण लाडकी लेक मयुरीचा आग्रह, आणि मयुरीची आई म्हणजे निता आपल्या ऑफिसच्या पेंडिंग कामात व्यस्त असल्यामुळे सागर ने आपला लॅपटॉप बाजूला ठेवून मयुरीला कथा सांगायला सुरुवात केली. .....
   एक होता कावळा, एक होती चिमणी....
कावळ्याचे घर होते शेणाचे, चिमणीचे घर होते मेणाचे...एकदा खूप धो धो पाऊस....
एवढ्यात मयुरी म्हणाली, "  अहो बाबा...
ती गोष्ट नाही हो....
आधुनिक चिऊ आणि काऊ ची गोष्ट ऐकायचीय मला....
      नीता ने काम करता करता हसून एक कटाक्ष सागरकडे टाकला, आणि नजरेतूनच त्याला सांगितलं ...घे रे बाबा आज लेकिसाठी एक नवीन च्यालेंज....आणि सांग की काऊ चिऊ ची नवीन कथा.
         सागर थोडा विचारात पडला...बापरे!
हे तर ऑफीसच्या कामापेक्षाही अवघड काम दिसतंय! ????
काय माहिती नीता कशी काय रोज नवीन कथा सांगते ती...
आजकाल ची नवीन पिढी काळानुरूप खूपच ऍडव्हान्स होत चाललीत. त्यांना रोज काहीतरी नवीन नवीन शिकायचं असत, ऐकायचं असत.  आणि ते खर सुद्धा आहे, त्यांच्या बालसुलभ मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेच.
हं....
तर मग सागर (बाबा) ने गोष्ट सांगायला सुरुवात केली.. 
     एक होते कावळोबा आणि एक होती चिमनाबाई
त्या दोघांना  'चिकू' नावाचं एक गोड बाळ होत. ते दोघे, चिकू आणि कावळोबाचे आई-बाबा असे सर्वजण सोबत राहायचे. 
कावळा रोज ऑफिसला जायचा, चिमनाबाई घरीच राहून घरची सारी काम, सासू-सासर्यांची सेवा, त्यांचं औषधपाणी, आणि छोटं बाळ चिकुकडे पूर्ण लक्ष द्यायची. 
कावळोबा खूप निश्चिन्त होता, महीना  भरला की तो काही पगार चिमनाबाईकडे द्यायचा, स्वतःच्या खर्चासाठी काही पैसे मात्र स्वतःकडे ठेवायचा ....चालव बाई तू या पैशात घरसंसार. 
      पण आता 'चिकू' थोडा मोठा झाला होता, त्याला चांगल्या शाळेत टाकायचं होतं. म्हणजे खूप मोठी फी भरावी लागणार होती. सोबत बसचा खर्च, आठवड्यातून लागणारे दोन ड्रेस...शनिवारचा वेगळा, बुधवारचा वेगळा...
बापरे!!! कित्ती त्या सूचना...
फक्त तीन वर्षांच बाळ, आणि खर्च मात्र लाखाचा..
जशी तशी चिकुची नर्सरीत ऍडमिशन झाली....
पण कावळोबाच्या  तुटपुंज्या पगारात घर चालवताना  चिमनाबाईची मात्र खूप कसरत होऊ लागली. 
पैसे परत नाहीत म्हणून चिमनाबाई कावळोबाला सांगायच्या तर कावेळोबा खूप चिडायचे...
कावळोबा- असे कसे नाही पुरत पैसे ??
आधी तर पुरायचे ना !
तेवढ्याच पैशात किती छान घर चालवायची तू!
मग...आताच हे असं का???
की तुझेच खर्च वाढलेत?
रोज रोज घरी भांडणं व्हायला लागली. 
     आता मात्र चिमनाबाईने निर्णय घेतला, मला घराबाहेर पडावचं लागेल....
काहीतरी कामधंदा, नोकरी शोधावीच लागेल. 
तिने मनाची पूर्ण तयारी करून कावळोबाच्या कानावर घातलं, " मी आता नोकरी करणार म्हणजे करणार". 
तिच्यातला आत्मविश्वास पाहून थोड्यावेळापुरता कावळोबा थक्क झाला.
कावळोबा-  "हे काय नवीन खूळ बसवून घेतलंय डोक्यात???
म्हणे मी नोकरी करणार...
हे बघ चिमणे, आपल्या घराण्यात आजपर्यंत कुण्या बाईनं नोकरी नाही केली...आणि ना कुणी  बाई अशी नोकरीसाठी फिरली...नोकऱ्या काय झाडावर टांगल्या आहेत का??? म्हणे मी नोकरी करणार??
हा....हा....हा......????????
कावळोबाच गडगडाटी हास्य पाहून चिमणी थोडी घाबरली, पण तरीही तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला , "अहो, तो काळ वेगळा होता, मुलांच्या शिक्षणाचा एवढा खर्च नव्हता."  साध्या एका शर्ट पँटवर मुलं वर्ष वर्ष काढायची. ना बूट ना मोजे...साधी स्लीपर पायात अडकवून शाळेत पळायची. डबा नाहीं नेला तरी गेटवर बसलेल्या आजिजवळून खारेदाने, बोरकुट, आंबट शिजवलेली बोरं खाऊन पोर तृप्त व्हायची. 
    पण आता काळ बदललाय हो. चांगल्या शाळेत टाकायचं तर तिथलं स्टॅंडर्ड मेंटेन करावं लागतं
 कावळोबाला तीचं मत पटायला लागलं.
मयुरी- "मग...काय झालं बाबा !!"
चिमनाबाई गेली का नौकरी करायला.. 
नीता मात्र ऑफिसची काम करता करता गालातल्या गालात गोष्ट ऐकून हसत होती. ????
सागर- हो रे बाळा....
करावीच लागली मग चिमनाबाईला नौकरी. कारण कावळोबाच्या एकट्याच्या पगारात भागतच नव्हतं.
      रोज सकाळीच लवकर उठून घरचं सगळं आवरून 'चिकू' ला तयार करून शाळेत पाठवायचं,  आपला डबा, कावळोबाचा डबा आणि सासू सासर्यांच आवरून ती सुद्धा ऑफिसला जायला लागली. ऑफिसमधून येता येता ती चिकुला आपल्या सोबत आणायची... मग त्याचा अभ्यास...
आणि घरकाम सार ती आवरायची. 
चिमनाबाई आता खूप स्वावलंबी झाली होती, तिच्यातला आत्मविश्वास वाढला होता...घराच्या चार भिंतीच्या आड राहणारी  "ती" आता घराबाहेर पडून स्वच्छंदी जगायला शिकली होती. 
बाहेरच जग, आणि त्यातून येणारे अनुभव यातून ती बरंच शिकत गेली ...कारण आपल्या चिकू ला तिला असंच स्वच्छंद जगणं शिकवायचं होत, तीला उच्चशिक्षित करून जगासमोर आणायचं होत...
 खूप मेहनत करायची रे ती.. आपल्या घरासाठी.
खूप थकून जायची ती..
मयुरी- मग!!
सागर- मग काय! कावेळोबाला खूप काळजी वाटायची तिची. आता तो सुद्धा खूप बदलला होता बरका...
कपभर चहा न बनवणारा "तो" आता तिच्या हातात आयता चहाचा कप देऊ लागला. 
कधी भाजी कापून देऊ लागला, तर कधी भांडी लावू लागला...कधी तिला ऑफिसमधून यायला उशीर झाला तर वरण-भाताचा कुकर लावायला शिकला. 
मयुरी- म्हणजे, "जशी तुम्ही मम्माला मदत करता , तशीच ना..."
सागर- हो रे बाळा ! अगदी तशीच...
मयुरी- मग ...पुढे काय झालं!
     एवढ्यात  निताच काम सुद्धा आटोपलं.  ती पण आता पुढची कथा सांगायला आली. 
नीता- आता दोघेही मिळून काम करू लागले, नोकरी करू लागले. आता त्यांनी मोठं घर बांधलं. सगळ्यांच्या वेगवेगळ्या खोल्या झाल्या.  घरी काम करायला नोकर-चाकर आलेत. घरासमोर गाडी उभी झाली... पण???
मयुरी- पण ...काय झालं ग पुढे.  
सांग ना..
नीता- आता त्यांच्याजवळ सर्व सुख सुविधा आहेत रे बाळा... पण चिमणी आणि कावळा पैसे कमविण्यासाठी बाहेर पडलेत, पण आता त्यांना आपल्या 'चिकू' साठी पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही रे..हीच खंत वाटतेय. 
नीताच्या डोळ्यांत पाणी आलं, तिने आपला हुंदका दाबून धरला...
मयुरी- अग मम्मा! मला माहितेय तू का रडतेस ते ... 
तुला पण वाटतं ना की तु घरी राहावं, माझ्यासोबत खेळावं म्हणून...
पण हे सारं तु माझ्यासाठीच तर करतेय ना!
चिमुकल्या मयुरीच्या तोंडून हे वाक्य ऐकून सागर आणि  नीता एकमेकांकडे बघायला लागले. आणि म्हणाले, " आधुनिक चिऊ-काऊच आधुनिक बाळ" 
नीता- बर...आता खूप रात्र झालीय, उद्या शनिवार सकाळची शाळा....लवकर उठायचं ना!
झोप आता...रविवारी आपण बाहेर नक्की फिरायला जाऊ...
Good night...म्हणत सगळे झोपले...तुम्ही पण झोपा..????????????

तर मित्र-मैत्रिणींनो कशी  वाटली माझी "आधुनिक युगातील कावळा-चिमणीची गोष्ट"....
तुम्हा आम्हा सर्वांची सारखीच ना!
मग विचार कसला करताय वाचा, आणि नक्की कळवा कथा कशी  वाटली ते...
©️चारुलता राठी
अर्जुनी/मोरगाव
जिल्हा-गोंदिया
साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे...
कथा शेअर करा पण माझ्या नावासह ही नम्र विनंती???????????? 
अन्यथा कारवाई करण्यात येईल.
कथेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार नाहीं.
 ©️right reserved