आधारवड भाग एक

थोरली सूनच असते कुटुंबाची आधारवड


एक होते आईबाबा.अतिशय सुस्वभावी,जोडपे.त्यांच्याकडे बघून लोक त्यांना " लक्ष्मी नारायन " ची जोडी म्हणायचे.
आईबाबाला पहिलेच अपत्य ,म्हणजे दोन जुळे मुलगे झाले होते.अनिल आणि सुनील.
पण आईला मुलीची भारीच आवड होती.आपल्याला लग्नानंतर एक मुलगा व एक मुलगी असावी,असे आईचे लग्नाआधी पासूनचे स्वप्न होते.
पण पहिलेच अपत्य दोन जुळी मुले झाल्याने ,आता पुढे आणखी कुटुंब वाढवावे की नाही ,या विचारात आई कधी कधी नाराज असल्यासारखी वागायची.ही आईची विवंचना बाबांनाही कळत होती.म्हणून दोघांनी अजून एका अपत्याला जन्म द्यावा,असे ठरवले.आईला हे होणारे बाळ मुलगीच पाहिजे होती,तेवढ्या साठी ती रोज देवाजवळ प्रार्थना करायची.
आणि देवाने तिची विनवणी मान्य केली.मुलीचे स्वप्न पूर्ण झाल्याने,आई खरोखर खूपच आनंदली होती.आईने बाळाचे नाव ठेवले " सुलू."

दिवसामागून दिवस गेले,आणि अनिल,सुनील आणि सुलू मोठे झाले....!
आईबाबांनी या सुखी,प्रेमळ कुटुंबासाठी जवळच दिड दोन गुंठे जागा विकत घेतली होती.आणि छान सुंदर,टुमदार बंगलेवजा घर बांधून घेतले होते.

अनिल,सूनीलची शिक्षणे पूर्ण झाली आणि दोघे भाऊ त्यांच्या आवडी प्रमाणे जॉब करू लागले.
सुलू,सगळ्यात धाकटी असल्याने,तिचे अजून शिक्षण चालू होते. सुलू,जसजशी मोठी होत गेली, तसतसे तिचे सौंदर्य अजूनच बहरू लागले होते. नाके डोळे रेखीव,सडपातळ नाजूक शरीरयष्टी,आणि गोरागोरा शुभ्र दुधाळी रंग.....
अगदी कोमल फुलाप्रमाणे जपायचे आई बाबा सुलूला....!
अनिल सुनील तर जुळे असल्यामुळे त्यांची प्रतेक गोष्टच एकसारखी असायची.काही कमी,काही जास्त करण्याचा प्रश्नच येत नव्हता.दोघांचे लाड,शिक्षण, हिंडणे,फिरणे,हौस मजा,सगळे कसे एकत्रच असायचे.

दोघे भाऊ जेव्हा लग्नाच्या वयाचे झाले,लगेच आईबाबांनी त्यांचे लग्न लावून देण्याचे ठरवले.पण सुनीलला इतक्यात लग्नाच्या बेड्या नको होत्या.म्हणून अनिल साठी छान शोभेल अशी सुंदर सालस,मुलगी बघून अगदी थाटामाटात अनीलचे लग्न लावून दिले होते.

अनिलच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यातल्या एका नव्या अध्यायाला सुरवात झाली होती....

आईबाबा,सुनील आणि सुलू सगळे अगदी दिमाखात मस्त एन्जॉय करत होते. सुलूचे तर काही विचारायलाच नको,एक तर आईबाबांची लाडकी लेक,दोन भावांची छोटी ताई,आणि लग्नाच्या सरबऱ्यातील सगळ्यात छानशी करवली,म्हणून मिरवत होती....!
लग्न मंडपातल्या सगळ्या पाहुण्यांचे लक्ष आपोआपच तिच्यावर रोखले जात होते.....!

आईबाबा ,आता अनिल ,सुनील,आणि सुलुचे ,आईबाबाच न राहता" अश्विनी" चे सासू सासरेही झाले होते.....

नवीन व्यक्ती अश्विनी म्हणजे " थोरली सून" घरात आल्यानंतर आईबाबांच्या कुटुंबात काही बदल होतात का.हे वाचा पुढच्या भाग_२ मध्ये....
©® Sush.

🎭 Series Post

View all