आधार...#लघुकथा स्पर्धा -प्रेरणादायी कथा

Nehala aaj ofice madhun nighayla jara ushir zala

नेहाला आज ऑफिस मधून निघायला जरा उशीर झाला..

राघव आणि प्रीत तिची वाट बघत बसले असतील या विचाराने तिनी गाडी सुसाट काढली..


खर तर तिला या कॉन्फरन्सला जायचं नव्हतं.... नेहा आणि राघवची तिसरी वेडिंग अंनिव्हर्सरी होती...तिला पूर्ण वेळ त्या दोघांसोबत घालवायचा होता पण बॉसचा फोन आला आणि तिला जाव लागलं....


रात्रीची वेळ, रस्ते अगदी निर्मनुष्य झाले होते...

वाऱ्यानेही वेग पकडला होता..सगळीकडे शांतता पसरली होती, पक्ष्यांच्या किलबिलाट तेवढा कानावरून जात होता... नेहानी गाडीचा वेग वाढवला... गाण्याचा आवाज वाढवला.. गाडीनीही वेग पकडला..


काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक नेहाची गाडी बंद पडली..
नेहाने आजूबाजूला बघितलं तर दूर दूर पर्यंत कुणीच दिसत नव्हतं...

ती बराच वेळ गाडीत बसून होती, थोड्या वेळाने तिला समोरून एक माणूस येताना दिसला... नेहा घाबरली तिनी काचा वरती करून विन्डो आणि  डोअर लॉक करून घेतले... 
तो माणूस जसा जसा समोर येत होता तशी तशी नेहाला धडकी भरत होती...


अखेर तो माणूस गाडीच्या जवळ आला, काच खाली करण्यासाठी इशारे करू लागला..चेहऱ्यावरून भला माणूस वाटतं होता पण तरी नेहाची हिम्मत होत नव्हती...
दीर्घ श्वास घेत नेहाने काचा खाली केल्या.. 


तसच त्या माणसाने बोलायला सुरुवात केली
“काय झालं ताई?...”


नेहा अगदी हळू आवाजात


“गाडी बंद पडली आहे..”


“मी बघू का, मला थोडं कळत त्यातलं”
“हम्मम..."


“ताई घाबरू नका.... तुम्ही एकट्या असलात तरी सुरक्षित आहात.. बसा निवांत..”


त्या माणसाचं बोलणं ऐकून नेहाला थोडं रिलॅक्स वाटलं, ती गाडीतून उतरली...मोकळा श्वास घेतला आणि तिथल्या तिथे फेरफटका मारायला लागली...


“ताई मी पाणी घेऊन येतो...”


तो पाणी आणायला गेला तशीच नेहा पटकन गाडीच्या आत जाऊन बसली..
पाच-दहा मिनिटात तो आला आणि त्याने गाडी दुरुस्त केली..
“ताई सुरू करून बघा..”


नेहाने गाडी सुरू केली.. व्यवस्थित सुरू झाली..
नेहा गाडीच्या बाहेर आली तिनी त्याला नाव विचारलं..
“दादा नाव काय तुमचं?..”


“राजाराम..”
नेहाने पर्स मधून काही पैसे काढले आणि
“हम्मम हे घ्या..”


“अहो नाही ताई..  हा माझा व्यवसाय नाही..तुम्हाला मदत म्हणून मी हे सगळं केलं..आणि तुम्हाला जर मला काही द्यायचच असेल तर एक वचन द्या, ज्याप्रकारे मी तुम्हाला मदत केली त्याप्रमाणे तुम्ही पण एखादया गरजूला मदत कराल...”


नेहाने स्मितहास्य केलं..आणि होकारार्थी मान हलवली...


नेहा तिथून निघाली तो माणूसही त्याच्या रस्त्याने गेला..


काही अंतरावर नेहाला एक रेस्टॉरंट दिसलं तिनी विचार केला रात्र खुप झाली आहे थोडंस खाऊन घ्यावं, घरी पोहोचायला अजून बराच वेळ लागणार होता...


रेस्टॉरंट जवळ येऊन गाडी थांबली...


नेहा उतरून आत गेली.
टेबल वर जाऊन बसली, वेटर आला आणि ऑर्डर घेऊन गेला, नेहा इतरत्र नजर फिरवत होती अचानक तिची नजर एका स्त्री वर गेली...


त्या स्त्रीकडे बघून नेहाला आश्चर्य वाटलं....
ती स्त्री सात महिन्यांची गर्भवती होती, सात महिन्यांची गर्भवती असून सुद्धा ती खूप मेहनतीने आणि कस्टमरच्या काळजीने सगळं करत होती.... कस्टमरची अगदी आपुलकीने विचारपूस करत होती...

नेहाला ती अगदी प्रामाणिक वाटली... नेहाला तिची खूप काळजी वाटली नेहा तिच्याकडे बघत राहिली... तिच्या चेहऱ्यावर थोडासा ही थकवा जाणवत नव्हता, चेहऱ्याने अगदी प्रसन्नमुख होती ...


नेहाचे विचारचक्र सुरू होते तितक्यात वेटर ऑर्डर घेऊन आला..


“ मॅडम तुमची ऑर्डर....”


“ थँक्यू...”


 नेहाने जेवण केलं, तीच पूर्णवेळ लक्ष त्या बाईकडेच होत...
 नेहा जेवण करून उठली आणि त्या बाईकडे गेली, तिने त्या बाईला एक पॅकेट दिला..

“ हे काय आहे मॅडम...?”
“ खूप वेळ झाला मी तुम्हाला बघत आहे, तुम्ही सात महिन्यांची गर्भवती असून सुद्धा इतक्या मेहनतीने इतक्या काळजीने सगळ्यांशी वागताय ,सगळ करताय... मला हे बघून खूप आश्चर्य वाटलं.. तुम्हाला पैशाची गरज आहे म्हणूनच अशा अवस्थेत तुम्ही काम करताय..हो ना.. हे थोडे पैसे ठेऊन घ्या..”

“ मॅडम खरच मला याची गरज नाही, मला काम करायला आवडतं म्हणून मी करते...

“ बरोबर आहे तुमची गोष्ट पण समोर जाऊन तुम्हाला याची गरज पडेल प्लीज ठेवून घ्या ..”

असं म्हणत नेहा तिथून निघाली..
 ती बाई रात्री घरी गेली तिचा नवरा काळजी करत बसलेला दिसला.
“ अहो काय काळजी करताय ?”


“काही नाही ग विचार करतोय आता तुझे दिवस भरत आलेत कधी काय होईल सांगता येत नाही, आपल्याकडे तेवढा पैसा ही नाही काय करायच आता आपण..”

“ अहो काळजी करू नका.. हे घ्या, बघा तर काय आहे..”
 त्याने पॅकेट उघडलं तर त्या पॅकेटमध्ये दहा हजार रुपये होते, आणि एक चिठ्ठी होती...


त्याने ती चिठ्ठी वाचली


“आज मला अनपेक्षितपणे एका माणसाने मदत केली आणि सांगितलं की तुम्हीही एखादया गरजू व्यक्तीची मदत करा, ही मदतीची साखळी तुटायला नको..मला पहिली व्यक्ती तुम्हीच भेटलात म्हणून माझ्याकडून तुम्हाला छोटीशी मदत...”


चिठ्ठी वाचून त्याचे डोळे भरून आले..

 त्या बाईने तिच्या नवऱ्याला सगळी गोष्ट सांगितली तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून राजाराम होता....

 राजारामने त्याच्या पत्नीला त्या बाईचे वर्णन विचारले आणि तिनी जे सांगितलं त्यावर विश्वास बसेना,


“ कमला ही तीच बाई आहे जीची संध्याकाळी मी मदत केली, बघ तिने पण आपल्याला मदत केली आणि एक आधार बनून आली...


दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं..दोघांनीही एकमेकांना कवेत घेतलं...


 बरीच रात्र झाली होती आता नेहाने स्पीड वाढवला आणि एखाद तासात घरी पोहोचली..


रूममध्ये गेली, बघितलं तर राघव आणि प्रीत झोपले होते..
ती राघव जवळ जाऊन बसली त्याच्या माथ्यावरून हात फिरवत


“ सॉरी राघव मला यायला उशीर झाला, एक्स्ट्रीमली सॉरी ..
मला माहिती आहे तुम्ही दोघं माझी वाट बघत बघत झोपलात.. सॉरी राघव...


 नेहा चेहरा हिरमसून उठली, समोर पाऊल टाकणार राघवने तिचा हात पकडला..


“ नेहा आम्ही झोपलेलो नाही आहोत, तुझी वाट बघत होतो....
“ आई.... म्हणत प्रीत नेहाला बिलगला...
राघवने त्या दोघांना जवळ घेतलं
 
“तू वाईट वाटून घेऊ नकोस, तू तुझ्या कामाला गेली होतीस आणि तू प्रामाणिकपणे जे काय करतेस ना तेच मला प्रचंड आवडतं.. चल आपण केक कट करूया....


“मी झोपतोय बाबा तुम्हाला काय करायचं ते करा..गुडनाईट...”
प्रीत झोपायला गेला..


 दोघांनी मिळून सेलिब्रेशन केलं, त्यानंतर नेहाने प्रवासात घडलेली सगळी घटना राघवला सांगितली...


 दुसऱ्या दिवशी राघव, प्रित आणि नेहा तिघेही पुन्हा त्याच रेस्टॉरंट मध्ये गेले, तिथे त्या बाईला भेटले आणि तिला घरचा पत्ता विचारून तिला घरी घेऊन गेले...

 घरी राजाराम बसलेला होता, नेहाला बघून

 “ताई.. तुम्ही.. तुम्ही इथे कसे काय?.. आणि कमला तू यांच्यासोबत कशी काय आलीस ग?..”

 मॅडम आल्या होत्या रेस्टॉरंटमध्ये त्याच मला इकडे घेऊन आल्यात.. राजारामने बसण्याची व्यवस्था करून त्यांना बसायला सांगितले,
 “ ताई.. सर.. बसा ना.. बस बाळा बस.. बसा बसा मी पाणी आणतो.. कमला बोलली 
“मॅडम आता पहिल्यांदा माझ्या घरी आलात ना तर काहीतरी खाऊन जावा”


कमला आम्ही इथे बसायला किंवा काय खायला आलेलो नाही आहोत, आम्ही तुम्हा दोघांना न्यायला आलोत..”


“म्हणजे?... राजाराम विचारले


 म्हणजे.. म्हणजे आता तुम्ही दोघे आमच्या घरी आमच्या सोबत येणार आहात, आणि तुम्ही दोघांनी तिथेच राहायचं आमच्यासोबत मी काळजी घेईल कमलाची, आता तिला जास्त काम करण्याची गरज नाही, तिला आरामाची गरज आहे उगाच दिवसभर रेस्टॉरंटमध्ये ती उभी असते दिवसभर चालत असते आता हे सगळ करण्याची गरज नाही, तुम्ही दोघं तिथे चला..”

“ असं कसं चलायचं “?..


“असंच नाही, राजाराम तुम्ही तिथे काम करायचं, आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ.. तुमच्या जेवणाची, कपड्याची, राहण्याची सगळी सोय आम्ही करू पण आता तुम्ही आमच्यासोबत चला...


  खूप प्रयत्न केल्यानंतर ते तयार झाले , राघव आणि नेहाने दोघांनाही त्यांच्या घरी नेलं...


 राजाराम तिथली छोटी-मोठी कामे करायचा, कमला प्रीतला सांभाळायची ,त्या बदल्यात त्यांना पगार मिळत असे, बाकीचा सर्व खर्च नेहा आणि राघव करायचे... 

काही दिवसातच कमलानी एका गोंडस बाळाला जन्म दिला...
आणि ते गोंडस बाळ म्हणजे लक्ष्मी होती.... घरात लक्ष्मी आली ,प्रीतला बहीण मिळाली म्हणून प्रीतही खूप आनंदीत होता....


 सगळीकडे आनंदी आनंद झाला...


 समाप्त

 राजाराम आणि नेहाने ज्याप्रकारे मदतीची साखळी समोर नेली तसंच आपणही इतरांना मदत करून ते साखळी कंटिन्यू केली तर किती छान होईल, कुणाकडून काहीही अपेक्षा न ठेवता मदत केली तर त्याच्याही आयुष्यात चांगलंच घडणार.. म्हणून सदैव मदतीला तत्पर असलं पाहिजे...
तुम्ही कुणाचा आधार बना, उद्या जाऊन कुणीतरी तुम्हाला आधार देईल...


धन्यवाद