Login

अडचण नाही आधार भाग तीन

अशी रडली तर येणार बाळही रडत होईल

संसारात नणंदे ची भूमिका

भाग तीन अडचण नाही आधार

जवळजवळ एक महिना लागेल त्यानंतर परत एक्स-रे काढूया तेव्हा समजेल हाड जुळलं की नाही असे डॉक्टरांनी सांगितले आशाताई एक दोन दिवस सीमा सोबत राहिली पण तिलाही तिचं घर संसार होताच. सीमा चे आईबाबा तीर्थ यात्रेला गेलेले.
,शेवटी श्रीकांत ने अशोक ला फोन करून कळवले, श्री ने एक दोन दिवस सुट्टी घेतली होती पण फार दिवस रजा घेतली की पगार कापला जाईल ची भीती तेव्हा आज तोही कामावर गेला सीमाला खूप एकटेपण वाटत होतं बाथरूम पर्यंत जाणं ही कठीण होत होतं एकदा कशी तरी जाऊन आली पण तेवढ्या कष्टाने पण तिला फार थकायला झाले.
संध्याकाळच्या बसने ताई आल्या त्यांनी सीमाच्या जवळ बसून डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत विचारलं’ खूप दुखतय का ग’ त्यांच्या नुसतं एवढं विचारण्याने सीमाचे डोळे भरून आले ती हंमसाहमशी रडू लागली.
“ए वेडाबाई अशी रडली तर येणार बाळ ही रडक होईल हं”असे म्हणताच सीमाला खुदकन हसू आलं.
ताईंनी घरदार सर्वांची जबाबदारी घेतली सीमालाही त्या आल्याने हायसं झालं. ताई तिला बसल्या जागी खायला प्यायला देत तिला हात धरून मोरी पर्यंत नेत आण,
आपण इतकं वाईट वागलो यांच्याशी तरी त्याचा राग न धरता त्या मदतीला धावून आल्या याचं तिला आश्चर्य वाटलं मग स्वतः च्या वागण्याचा पश्चात्ताप वाटू लागला. आपण ह्यांचा किती रागराग केला नणंद म्हणजे वाईट असतें असे मानले. पण वेळ आली तेव्हा त्यांनीच आधार दिला.
पूर्ण महिनाभर ताईंनी तिची उत्तम बडदास्त ठेवली, वेळेवर खाणं पिणं आराम यांनी लवकरच सीमा बरी झाली .प्लास्टर निघून आठ दिवस झाले तशी ताई म्हणाल्या मी संध्याकाळच्या गाडीने निघावं म्हणते मी अशोक कडे.
तशी सीमा घाईघाईने पुढे येत म्हणाली कां बरे अशोक भाऊजी चा फोन होता कां?त्यांना म्हणावं सीमा आणखी हे येणार पाहुण सोडत नाही ये.
“पहा बरं माझ्या धाकात रहावे लागेल “ताई हसतसीमाला म्हणाल्या”
, “ हो आवडेल तो प्रेमळ धाक” सीमा हसत म्हणाली व त्यांची बॅग आपल्या हातात घेत सीमा ने” हे घर तुमचं नाही का आम्ही तुमचे कोणी नाही? ताई ? “
सीमाने कृतकोपाने म्हणताच सर्वांच्या मनावरचा ताण हलका झाला व सर्व हसायला लागले.

—-------------------------------------------------समाप्त

एकूणच काय तर सर्व नणंदा वाईट नसतात बरेचदा त्या आधार ही देतात.