Login

भाग दोन अडचण नाही आधार

माहेरून सीमा आली ती गोड बातमी घेऊनच
संसारात नणंदे ची भूमिका भाग दोन
अडचण नाही, आधार

ताई सीमाला घरखर्चा वरुन बोलल्या
सीमाला हा आपला अपमान झाल्यासारखं वाटले श्री कामावर गेल्यावर ती बडबड करू लागली “प्रत्येक गोष्टीत कशाला नाक खूपसायचं आता हा माझा संसार आहे मला माझ्या मनाप्रमाणे काहीही करायचा अधिकार नाही कां?
मग मग तर ताईंनी बोलणं बंद केलं त्यामुळे सीमाला आणखीनच फावलं.

सीमा काही दिवसांकरिता माहेरी गेली तिथेही तिने ताई कशा कंजूस आहे आणि आपल्यामनाची किती कुचंबणा होते ह्याचे रसभरीत वर्णन आपल्या बहिणीला सांगितले.

त्यावर आशा म्हणाली या नणंदा म्हणजे एक डोकेदुखीच असते, माझ्याकडे पहा ना दर उन्हाळ्यात आधी त्या येणार मग मला माहेरी येता येतं”!
“अगं हो पण तरी तुझं बरं आहे कधीतरी त्या येणार “! इथे कायमची डोक्यावर.”
त्यावर आई म्हणाली “तुझं बरं आहे सीमा तुला इथे आल्यावर तिकडची काळजी नाही.”
“ त्यात कसलं बरं आहे सतत डोक्यावर टांगती तलवार असते ,

माहेरून सीमा आली ती डोक्यात बरंच काही ठेवूनच. आल्यावर चार दिवसांनी म्हणाली “अशोक भाऊजींचे खाण्यापिण्याचे हाल होत असतील तेव्हा ताई नी तिकडे जावे. एकूणच सीमाचा राग रंग पाहून ताई ही अशोक कडे जायला तयार झाल्या. म्हणजे सीमाने जवळपास त्यांची हकालपट्टी च केली.

माहेरुन सीमा आली ती गोड बातमी घेऊनच पण तिने घरात कोणाला ही पत्ता लागू दिला नाही एवढ्या गोष्टीवरून ताई नाही गेल्या तर ?

ताई अशोक कडे जाऊन आठ दिवस झाले. सीमाला सकाळी सकाळी मळमळ व्हायची काही करावेसे वाटत नसे, तिने श्रीकांत ला सांगितले . तिला काहिही करावेसे वाटत नसे.आता तिला ताई असताना त्या किती काम सहजपणे पार पाडत याचीपहिल्यांदा जाणीव झाली.
दोन एक महिने झाले असतील, एक दिवस आंघोळ आटपून सीमा घाईघाईने बाहेर येत होती तोच तिचा पाय घसरला, पडण्यापासून स्वतःला सावरत असताना पण पडली, पाय जोरात मुरगळला होता, सीमाचं नशीब श्रीकांत घरातच होता. त्यांनी तिला धरून बिछान्यात झोपवले. पोटात तर दुखत नाही तिचा हात प्रेमाने धरत विचारलें ? त्या क्षणी सीमा घाबरली तिने पोटावरून हात फिरून पाहिलं काही त्रास होत नव्हता, पण पाय भयंकर ठणकत होता. उभे राहता येत नव्हतं. श्रीने फोन करून सीमाच्या बहिणीला आशाला बोलावून घेतलं व दोघांनी सीमाला दवाखान्यात नेल.एक्स-रे मध्ये समजलं की पायाच्या घोट्याजवळ च हाड मोडलं होतं प्लास्टर घालून घरीआणल.
क्रमशः
—---------------------------------------------
आता सीमा ला कोणाचा आधार