अ यूथ प्रोजेक्ट भाग ३

A story of five young people who get caught in some situations.

दोन्ही खोल्या खुप मोठ्या आणि शोभेच्या सुंदर वस्तुंनी सजलेल्या होत्या.  गोपाळ काकांनी त्यांच्या करता दोन खोल्या तैय्यार करून ठेवलेल्या होत्या.एक मुलांसाठी आणि एक मुलींच्या साठी. खोल्यांमध्ये मोठाले पलंग होते.त्यांच्यावर स्वच्छ पांढरर्या शुभ्र चादरी आणि मखमली पांघरूणं ठेवली होती. भिंतींवर सुंदर तैलचित्र, खोल्यांच्या मधे मधे उभ्या लाकडी खांबांवर केलेलं नक्षीकाम, उंची कारपेट आणि मोठाल्या कोनाड्यांत ठेवलेले पितळी दिवे, सगळं सगळं अगदी अप्रतिम होतं.
               आपण इथे येऊन खुप छान केलय असं सगळ्यांनाच वाटून गेलं. सीमाला पण आता आपण चांगला निर्णय घेतला ह्याची खात्री पटली.
                 "मी तुमच्या चहा पाण्याची सोय बघतो तोवर तुम्ही तैय्यार होउन या सगळे हॉल मध्ये." पुन्हा एकदा गोपाळ काकांच्या आवाजाने त्यांना भानावर आणलं.
        " हो काका, आम्ही येतोय तुम्ही व्हा पुढे, आणि हो सगळी व्यवस्था अगदी सांगितल्या प्रमाणेच केली आहे न, हे सगळे माझे अगदी जवळचे मित्र आहे, कोणालाच काही त्रास नको व्हायला ". रचना काकांना म्हणाली.

"हो हो बाई साहेब, अगदी उत्तम व्यवस्था केलेली आहे तुम्हा सगळ्यांची बघा. काही बी त्रास नाही होणार कोणालाच. गोपाळ काका अगदी नम्र पणे म्हणाले.
       सगळ्यांनाच रचना चं आणि त्यांचं बोलणं ऐकून थोडं वेगळं वाटलं. वयानं त्यांच्या पेक्षा इतकी लहान असताना ही रचना त्यांच्या सोबत हुकुमी स्वरात बोलत होती आणि त्यांच्या ही चेहर्यावर वाईट वाटल्याचे काहीच भाव न्हवते. कदाचित मोठ्या घराण्यांमध्ये असंच बोलण्याची पद्धत असणार हा विचार सगळ्यांच्या मनात येऊन गेला.
          
        बरोबर आर्ध्या तासाने ते सगळे फ्रेश होऊन बाहेर आले तर संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली होती. आज पाऊस न्हवता. आकाश सुंदर सुंदर लाल केशरी रंगांनी भरुन गेलं होतं. घरट्यांना परतणार्या पक्ष्यांचा  किलबिलाट जणू एखाद्या सुंदर गीताची रचना करत होतं. तुळशी वृंदावन, त्यावर लावलेला दिवा मंदिरातून येणाऱ्या अगरबत्ती आणि कापूरचा सुवास सगळं कसं वातावरणाला पवित्र करत होते. सगळे हे मनोरम दृश्य पाहून भारावून गेले.
              आता त्यांची नजर मंदीराकडे वळली आणि ते लोक मंदीरात नमस्कार करायला गेले. उत्तम कलाकारांनी अगदी आपले प्राण ओतून काम केल्याचा श्रेष्ठ नमूना होतं ते मंदिर. मंदीरात देवीची मोठी आणि अप्रतिम प्रतिमा स्थापित केली होती. मोठ्या समयीच्या उजेडात तिचा चेहरा आणखीनच तेजस्वी वाटत होता.
नमस्कार करुन ती मंडळी कौतुक करत बाहेर आली तर रचना म्हणाली,
" खुप छान मूर्ती आहे ना देवीची, पण आपण आत गेलो ना तेंव्हा मला ती खूप प्रसन्न वाटली आणि बाहेर निघताना मात्र उदास जाणवली. तुम्हांलाही असं वाटलं होतं का?"
    सगळ्यांनीच असहमती दाखवत मान हलवली,कारण कोणालाच असा काही अनुभव नव्हता आला.
      "तुला भास झाला असेल रचना, आम्हाला असं काही नाही वाटलं. बरं आता चहा घेऊया आपण, मला चहाची फार तल्लब लागली आहे." रुपाली तिला ओढत म्हणाली.

आतला  हॉल पाहुन तर सगळ्यांचे डोळेच दिपले. सगळी कडे अगदी वैभव आणि संपन्नता पसरलेली होती.
     ते सगळं डोळे भरून पाहत असताना, एक बाई आतुन आली आणि त्यांची विचारपूस करायला लागली. काही आणखी हवंय का, रात्रीच्या जेवणात काय खाणार वगेरे अशी सगळी चौकशी करत होती. ती लुगडं नेसलेली,साठ एक वर्ष वयाची,पण उत्तम काठीची बाई होती. ती गोपाळ काकांची बायको रुकमा बाई होती.
            त्यांना सगळं समजावून रचना पण सोफ्यावर पसरली. सगळेजण हॉल मध्ये ज्याला जी जागा आवडली तिथेच आडवे झाले. तेवढ्यात चहा आला आणि त्या सोबतच कोथिंबिरीच्या खमंग वड्या सुद्धा.  चहा आणि वड्यांच्या सुगंधामुळे सगळे उठून बसले आणि त्यावर तुटुनच पडले.
            "तर मंडळी, कसं वाटतय इथे. सुंदर आहे ना वाडा. खरं सांगू ना तर मी सुद्धा कल्पना नव्हती केली की हा इतका सुरेख वाडा असेल. पण इथे आल्यावर तर माझे डोळेच दीपले. माझ्या कल्पनेत तर काही अजुनच होतं." रचना म्हणाली
      "हो गं, अगदी खरं आहे हं तुझं, आम्ही सगळे पण खुप चकीत झालों आहोत हं वाड्याला पाहुन, आणि मंदिर तर काय सुरेख आहे गं बाई, मी तर उद्या खुप सारे फोटो काढून घेणार आहे." सीमा उत्साहाच्या भरात म्हणाली.
           सगळ्यांनी मग आपल्या परीने वाड्याच तोंडभरून कौतुक केलं.
           " ए तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, मी जवळ जवळ साठ  वर्षांनंतर आमच्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे. आणि माझ्या आधीही फक्त एकच मुलगी होती आमच्या कुटुंबात,ती म्हणजे माझ्या पणजोबांच्या लहान भावाची मुलगी. ती सुद्धा जन्मानंतर एकाच दिवसात मरण पावली. मला माझ्या आजीने एवढंच बस सांगितले ते ही खूप विचारल्या नंतर. आता मला ह्या चार दिवसातच सगळं काही शोधून काढायचं आहे."
                " तसं इंटरेस्टिंग तर आहे,पण विचित्र नाही आहे हं अगदी शोधून बिधून काढण्या सारखं, नसतातच एखाद्या घरात मुली, केंव्हा कमी असतात त्यात काय एवढं." जय म्हणाला.
             "बाई साहेब, पानं घेऊ का वाढायला, इथे लाइट सारखी जाते, तुम्ही जेवण लवकर उरकून घेतले तर बरे होइल."

रुकमा बाई आल्या होत्या बोलवायला. गप्पा मारत कधी एक तास गेला कळालच नाही.
" हो हो काकू, घ्या तुम्ही पानं, आम्ही येतोच हात पाय धुवून. रचनाच्या काही सूचना देण्या आधीच राहुल म्हणाला.
             स्वयंपाक घरात तीन बायका होत्या,एक तर रुकमा बाई,दुसरी त्यांची सून गंगा बाई आणि तीसरी म्हणजे त्यांची नात सून सरला बाई. तिघींनी मिळून खुप छान स्वयंपाक करून त्यांना तेवढ्याच प्रेमाने खाऊ घातला.
             जेवण झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. रचना ला गोपाळ काकांना खुप काही विचारायचं होतं पण आता खूप रात्रं झाली होती आणि तिला माहित होतं की काकांना सकाळी लवकर उठायचं असतं, आधीच फार उशीर झाला होता,तर तिने सकाळी त्यांच्याशी बोलायचं ठरवलं.
                मूलं त्यांच्या खोलीत झोपायला गेले आणि मूली आपल्या खोलीत.  आता आभाळ खुप भरुन आलं होतं, आणि कधीही कोसळण्याच्या तैयारीत होते.
      थोड्याच वेळाने दार वाजलं आणि रचना धावतच दार उघडायला गेली जणू तिला माहीतच होतं की कोण आलं असणार. आणि तिचा अनुमानही बरोबर ठरला.
क्रमशः

             

🎭 Series Post

View all