अ यूथ प्रोजेक्ट भाग ७

A story of five young people who get caught in a abnormal situation.

हे सगळं, एका नाटका प्रमाणे सुरू होतं. नाटकात  जसं पडदा उठवल्या बरोबर एक कलाकार,स्वताचा सुद्धा राहत नाही, आणि आपलं खरं व्यक्तिमत्त्व विसरून,नुसता त्या पात्रात गुंतुन जातो.तो कोण आहे, काय आहे त्याला काहीही दिसत नाही मग. तसंच इथे ही सगळे जण आपापल्या केरेक्टर मध्ये होती. आणि आपला अभिनय करत होती.प्रत्येक जण पूर्वी घटलेल्या एका दुर्देवी घटने चे साक्षीदार होते किंवा अपराधी होते.सगळ्यांना त्या अनपेक्षित घटनेचं दुःख होतं आणि सगळ्यांचेच आपले कारणं आणि आपापल्या विवशता होत्या त्या वेळच्या.
नाटकाचा दुसरा भाग सुरु झाला.

रुपाली म्हणजे राधाबाई, खाली जमिनीवरच बसून होती.आणि डोळे वटारुन रचना कडे पाहत होती.

            रचना,म्हणजे पार्वती बाई सुद्धा इतक्या रागात होती की तिला जो कोणी समजवायला जाईल तोच मेला समजावं. जय आणि सीमा, म्हणजे पार्वती बाई चे मोठे दीर आणि जाऊ, शामराव आणि क्षमा होते. विनायक म्हणजे,ह्या वाड्यात काम करणारा मुलगा गोविंद होता,जो लहानपणापासून इथेच राहून मोठा झाला होता.

पार्वती बाई ह्या वाड्यात लग्नं करुन आल्या तेंव्हा त्या पंधरा वर्षांच्या होत्या.आणि त्यांची आपल्या पेक्षा एखाद वर्ष लहान असलेल्या गोविंद शी छान गट्टी जमली. त्या गोविंद ला आपल्या लहान भावा प्रमाणे प्रेम करत होत्या, आणि गोविंद सुद्धा एक भाऊ आणि सखा प्रमाणे त्यांच्या सोबत उभा असायचा.

         गोविंदचा स्वभाव खूप मस्तीखोर होता.तो इतका विश्वासपात्र होता कि घरातले सगळे त्याच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायचे. लहानपणापासून ह्या वाड्यातच राहून वाढल्यामुळे त्याला इथल्या प्रत्येक गोष्टीची बरोबर माहिती होती.

             पार्वती बाईंचं लग्नं दिनकर म्हणजे आताचा राहुल, ह्याच्या बरोबर झालं होतं जो कि एक नंबर चा अय्याश होता. अगदी रिकामटेकड्या सारखा इथे तिथे मित्रांसोबत हिंडत रहायचा आणि रात्रं कुठे तरी घालून यायचा.गावात आपल्या घराण्याचं इतकं नाव आहे, ह्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात न्हवता येत.उलट त्या नावाचाच गैरफायदा तो उचलत होता.घरात अमाप संपत्ती होती, पण दिनकर मुळे कोणालाच सुख न्हवतं.

            दिनकर लहान पणा पासून असाच होता, मनमौजी,आणि बेफिकीर. आई बाबा, बहिणी, भाऊ, वहिनी सगळ्यांनी त्याला सर्व प्रकार ने समजवुन पाहिलं,पण काहीही फरक पडला नाही.उलट दिवसेंदिवस तो अजुन बिगडत चालला होता. काही दिवसांनी शामराव आणि क्षमाला ह्यातच आपला पुढचा फायदा दिसायला लागला आणि त्यांनी त्याला त्याच्या हाल वर सोडलं.

            पण आई बाबांना तर काळजी होणारच ना, तर त्याच्या ह्या वागण्याला उपाय म्हणून त्याचं लग्न लावून द्यायचा विचार केला गेला,पण त्याचे असे रंगढंग पाहून कोणत्याही बरोबरीच्या  घराण्यातली मुलगी पाहण्याचा काहीच उपयोग न्हवता हे ही त्यांना माहीत होते.कारण दिनकर ची किर्ती सगळीकडेच पसरली होती.

            आता मुलगी पहायला सुरुवात झाली, पण दिनकर कुठे अजुनच अडकला होता. गावातल्याच एका फालतू बाईशी त्याचे अनैतिक संबंध होते. अश्या गोष्टी एका छोट्या गावात लपुन राहणार्या न्हवत्या तर ते घरातल्यांना सुद्धा माहित होते.पण त्यांनी डोळे झाकून ठेवले होते.

       ती बाई म्हणजे राधाबाई. ही बाई,दिसायला अगदी साधारण होती पण तिच्या व्यक्तित्वात  काही वेगळंच आकर्षण होतं. ती इतकी कुशल वक्ता होती, की कोणीही तिच्या बोलण्यात अगदी गुंतून जायचा. समोरच्या ला आपल्या शब्द जाळात कसं अडकवायचे ही कला तिला बरोबर जमत होती, आणि ती वेळोवेळी आपल्या ह्या कलेचा उपयोग करून घ्यायची.

            पार्वती बाई माहेरहुन खुप संपन्न तर नाही पण खाऊन पिऊन सुखी अश्या परिवारातील होत्या. त्या त्यांच्या वडिलांच्या फार लाडक्या होत्या.चार भावांची एकुलती एक बहीण होत्या त्या.

         सगळं अगदी सुरळीत सुरू असताना, एका आजारात त्यांच्या बाबांची मृत्यू झाली, आणि एकट्या आई आणि मोठ्या भावावर सगळी जबाबदारी आली. पार्वती बाई आता लग्ना योग्य झाली होती पण परिस्थिती मुळे कुठे जुळत न्हवतं. वय पण वाढत जात होतं.

              कोणी तरी मग दोघं घरांची विवशता लक्षात घेत वाड्यात पार्वती बाईंचं स्थळ सुचवलं आणि पार्वती बाई,वाड्यात आल्या.दिनकरला खुप विनवण्या करुन, रागावून आणि पैसे न देण्याची धमक देण्यात आली.मग राधाबाईनी त्याला काही तरी समजलं आणि तो लग्ना साठी तैय्यार झाला. राधा बाईला काळजी होती कि दिनकरला खरंच पैसे नाही मिळाले तर.

              सगळ्यांनी पार्वती बाईंना सुरवातीला वाड्यात भरपूर प्रेम दिलं, शिवाय दिनकरच्या. वयानी पण त्या लहान होत्या, आणि आयुष्यात पहिल्यांदाच इतकं वैभव पाहून अगदी भांबावून गेल्या होत्या.पण त्या हृया सुखात इतक्या गुंग झाल्या की त्यांनी दिनकर च्या अवगुणांकडे जास्तं लक्षच नाही दिलं. त्या आपल्या ह्या नवीन विश्वात रमून गेल्या होत्या.दिनकरसुद्धा आता अधिकच विचित्र वागत होता, त्याचा घरच्यांवर आणि पार्वती बाईंवर खूप राग होता.

                  वहिनी आणि भाऊ नी तर आधीच हात काढून घेतले होते.पार्वती बाईंच  पण लक्षं न्हवतं.त्या वाड्यातल्या सुख समृद्धि चा आस्वाद घेण्यातच दंग होत्या.
     दिनकर चे आई बाबा तर त्याला  बोलून थकले होते.आता पार्वती बाई पण  अपेक्षेविरुद्ध वागत असल्याचं त्यांना फार दुःख झाले. आणि दिनकरच्यात सुधारणा होण्याची शेवटची त्यांची ती आशा सुद्धा मावळली.सगळंच आणखी विचित्र होऊन बसलं होतं. पार्वतीचा मग त्यांना फार राग आला, आणि त्यांनी तिच्या शी अबोलाच धरला.

दिनकर आता नाममात्र घरी येत होता. कधी कधी तर एक एक महिना यायचा नाही, आणि आला तरी नुसता पैसे घ्यायला. पार्वती बाई शी,सासू सासरे तर बोलत नव्हतेच, क्षमावहिनी पण आधीच दूर होती, दिनकर तर न्हवताच कुठे. आता एक वर्षं असाच गेला, आणि त्यांना कळालं की आपण अगदीच एकटे पडलो आहेत. कोणी बोलायला नाही,की साधी विचारणा सुद्धा करत नाही.

          एकटे पणा आता त्यांना अखरायला लागला होता.येऊन जाऊन फक्त गोविंद होता जो  त्यांची थोडीफार काळजी घेत होता.मग गोविंद मध्ये एका मित्र आणि लहान भावाची छवी पाहून त्यांना बरं वाटलं. गोविंद पण आता त्यांच्या अवतीभवती रहायचा, काही हवंय का नको पहायचा.आणि त्यांना ही त्याचा फार आधार वाटायचा.त्या आता गोविंद जवळ आपलं मन मोकळं करायच्या.

         असच एकदा दोघं बोलत बसले असताना, गोविंद म्हणाला,

"ताई, तुम्हाला एक गोष्ट सांगू तर तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ, पण तुमच्या चांगल्या  भविततव्या साठी हे सांगणं गरजेचं आहे, आणि तुम्ही मला भावाचा दर्जा दिला आहे तर तुम्हाला ह्या हक्कानं सांगतोय ते नीट ऐका.

      "तुम्हाला आता तुमच्या संसाराकडे लक्षं देणं आवश्यक आहे. दिनकर भाऊसाहेब ला तुम्हीच मार्गावर आणु शकता बघा. त्यांना असं सोडुन देणं बरं नाही, तुम्ही त्यांना त्या बाईच्या चंगुळातनं परत काढुन आणू शकतात. एका बाई मध्ये अपार शक्ती असते बघा, आपल्या नवर्याला यमराज कडुन खेचत आणु शकते तर ती तर एक सामान्य बाई आहे. तुम्ही आता मनावर घ्याच आणि दिनकर भाऊ ला ह्या वाड्यात परत आणा.आणि पत्नि म्हणुन हेच तुमचं कर्तव्य सुद्धा आहे."

आता पार्वती बाईंचे डोळे उघडले होते.त्यांना खरंच आपली चुक कळली होती आज. त्या गोविंद ला म्हणाल्या,
" तूला त्या बाईचं घर माहित आहे का, मला घेऊन चलतो का तिच्या घरी, आपण दोघं जाऊ आणि ह्यांना परत घेऊन येऊ."
"हो नक्कीच, मी चलतो तुम्हाला घेऊन, आजच जाऊ आपण"
"आजच नाही तर आत्ताच जाऊया, तू माझे खरे डोळे उघडले गोविंद, मला खरंच पश्च्याताप होतोय कि मी काहीच प्रयत्न नाही केले ह्यांच्या साठी, चल आताच निघू आपण, मला खूप घाई झाली आहे रे."
        आणि दुसर्याच क्षणाला ते बग्गीत होते, गोविंद पुढे बसून रस्ता सांगत होता आणि,पार्वती मागे बसुन क्षण मोजत होत्या.
        काही वेळानं ते लोक एका लहानशा घरासमोर येऊन पोहोचले. घरात जायच्या साठी दार वाजवलं आणि एक तिच्याच वयाच्या मुलीने दार उघडलं. परिचय न देताच दोघींनी एकमेकींना ओळखुन घेतलं. त्या मुलीला जवळ जवळ ढकलतच पार्वती बाई आता गेल्या. यांच्या मागे गोविंद पण गेला. राधा विस्मित होऊन सगळं पाहत होती.सगळंच अनपेक्षित होतं. आत सगळीकडे मरगळ पसरली होती. आणि त्यातच दिनकर बसला होता.
          " तुम्ही आता च्या आता माझ्या सोबत चला बघु. घरी सगळे तुमची वाट पाहत आहे. मी तुम्हाला घ्यायला आली आहे, चला उठा तुम्ही, आणि हे काय दिवसा ढवळ्या पीत बसले आहात, चला ह्या नरककातनं चला,इतका सुंदर वाडा सोडून ह्या घाणित पडला आहात" आणि ती दारु पीत बसलेल्या दिनकरचा हात धरुन उठवायला लागली.
" तुम्ही कश्या करता आल्या ईथे, आणि ते ही माला ना विचारताच. आणि धक्का मारत आत काय आलाय, कोणाच्या घरी जाऊन असं वागायचं नसतं एवढी साधी गोष्ट पण माहित नाही तुम्हाला. " राधाबाईनी रागाने म्हणतली.
" मला विचारताय तुम्ही, मी इथे कशाला आली ते, माझ्या नवर्याला परत न्यायला आली आहे मी.‌ आणि मला नियम शिकवायचा आधी स्वता कडे पहा. आज मी ह्यांना इथुन नेणारच,पहा तुम्ही.
" अच्छा, मी बरी नेऊ देणार आहे तुम्हाला ह्यांना, इतके दिवस मीच घेत होती ना ह्यांची काळजी, तेंव्हा कुठे होता तुम्ही, कुठेही नाही जाणार हे"
" हो ते तर दिसतंय कि किती छान काळजी घेतेय तू, आणि थकली पण असणार आता तू, तर आता मी घेणार आहे ह्यांची काळजी. चल बाजुला हट, मोठी आली काळजी घेणारी."
क्रमशः

 

         

                 

           

            

🎭 Series Post

View all