आ यूथ प्रोजेक्ट भाग २

A story of five young people who get caught in some crucial conditions.

मग सुरू झाली त्यांची अशी एक यात्रा,जिची सुरुवात तर सुंदर झाली होती पण अंत मात्र फार वेगळा होणार होता.
         रचना, राहुल आणि जय ह्यांना हायवे वर गाडी चालवायचा अनुभव होता,तर त्या तिघांनी पाळी पाळी नं ड्रायव्हिंग  करायचं ठरवलं. रस्त्यात थांबत थांबत ते लोक पुढे जात होते.
           सगळेच खुप खुष होते आणि गप्पा गोष्टी, जोक्स,गाणी, चेष्टा सगळं अगदी मजेत सुरू होतं.असंच छान गप्पा सुरू असताना, राहुल न सीमा ला विचारलं की तुझ्या घरात सगळे इतके शिकले सवरले आहेत,तुझे बाबा मोठे अॉफिसर आहे, भाऊ पण खुप शिकलेला आहे, मग घरात इतकं छान वातावरण असुन पण तुला का म्हणुन इतके बंधनं आहेत. तर तिच्या काही उत्तर देण्याआधीच रचना जोर्यात म्हणाली,
"अरे वेड्या, तुला इतकं ही नाही माहित की हिची एक आत्या, कोणातरी विजातीय मुला सोबत घरातून पळून गेली होती,जर हिला पण तशीच सुट मिळाली तर ही पण पळून जाईल अशी भीती असणार त्यांना." आणि आपण खूप छान जोक वगेरे मारला आहे असं तिला वाटलं आणि सगळे हसत का नाही आहे ह्याचं आश्चर्यही झालं. पण कोणालाच तिचं असं बोलणं आवडलं नव्हतं.सीमाच्या तर डोळ्यात चटकन पाणी आलं‌,पण कोणाचाच मूड नको जायला म्हणून तिनं ते लपवलं.पण रुपालीच्या ते लक्षात आलं होतं.
रचनाची सवयच आहे अशी हे समजून सगळ्यांनी फार लक्षं नाही दिलं त्या गोष्टी कडे. सीमा मात्र आता थोडीशी हिरमुसल्या सारखी झाली आणि थोडी गप्पच होती.
आर्धा रस्ता क्रास केल्यावर सगळ्यांना भूक लागायला सुरुवात झाली आणि एक छानशी होटेल पाहून तिथे ते जेवायला थांबले.
जेवताना ही त्यांच्या गप्पा सुरूच होत्या.
रुपाली ने रचनाला विचारलं कि तू घरात काय सांगून निघाली आहे तर त्यावर तीनं हसतच उत्तर दिलं.
" अगं मी पण तु जशी सीमाच्या घरच्यांना मारली न तशीच थाप मारुन आली आहे कि माझ्या मैत्रिणीच्या बहिणींचं लग्न आहे त्या करता तिच्या गावी जात आहे."
"आणि गावात जो केयर टेकर आहे घराचा,त्याला काय सांगितलं आहे मेडम,तो तर सांगेल ना घरी तुझ्या" .सहसा फार न बोलणार्या राहुल  न विचारलं.
"ते तिथले नविन केयर टेकर आहे, मागच्या वर्षी जुन्या काकांची मृत्यू झाली आणि त्यांच्या जागेवर हे आले.त्यांना फार काही माहिती नाही आहे. मी त्यांना आपल्या येण्याची सूचना देऊन सगळं समजावून सांगितले आहे. टेंशन चं काही कारण नाही आहे. बरं आता चला पटकन संध्याकाळच्या आधी आपल्याला पोहचायला पाहिजे तिथे."
सीमा आणि रुपाली फ्रेश व्हायला गेले तर रुपाली न सीमाला समजावलं की अपसेट नको होऊस आणि छान एंजॉय कर, रचनाची तर सवयच आहे मजाक करायची.त्यावर ती म्हणाली.
"हो रुपाली, मला ठाऊक आहे गं, मला थोडं वाईट पण वाटलं होतं,पण मी तिच्या गोष्टी कडे फार लक्षं नाही दिलं, मला तर वाईट ह्या गोष्टींचं वाटतय की मी पहिल्यांदा आपल्या घरच्यांशी खोटं बोलली आणि ते ही इतकं मोठं."
"हो गं खरंय तुझं, बरं आता आपण परत तर जाऊ शकत नाही ना तर  तू सगळं विसर आणि मज्जा कर.आपण परत मुंबईला गेल्या बरोबर दोघी त्यांची माफी मागुया,मी त्यांना समजावून सांगेल सगळं. झालं तर मग,आता उदास नको राहु आणि एंजॉय कर."
रुपालीच्या असं बोलण्यानं सीमाला थोडं छान वाटलं आणि ती पुन्हा नॉर्मल होऊन सगळ्यांच्या गप्पांमध्ये सामिल झाली.
असं च हसत खेळत सहा तास केंव्हा झाले आणि गाव केंव्हा आलं कळालच नाही.
          गावाची हद्द सुरू झाली आणि सगळ्यांचे डोळे बाहेर पाहण्यात मग्न झाले.गाव खुपच सुबक आणि सुंदर होतं,जून महिना सुरू होता, हल्का हल्का पाऊस पण सुरू होता, सगळीकडे नुसता हिरव्या रंग पसरलेला होता. एकूण खूपच मनोहर असं वातावरण होतं.सगळे एकदम खुश झाले.
            पत्ता विचारत मग ते रचनाच्या घरा समोर पोहचले.घर काय होतं प्रशस्त वाडाच होता, आणि वाडा बाहेरुनच दिसायला एखाद्या जुन्या हवेली सारखा होता आणि खूप छान मेन्टेन केलेला वाटत होता. वाड्याचा मोठ्ठा नक्षीदार दरवाजा आतल्या वास्तुचं वर्णन करत ठसक्यात उभा होता.
त्यांच्या गाडीचा आवाज आला आणि तो मोठ्ठा  दरवाजा उघडून जवळपास सत्तर वर्षांचा एक माणूस आणि त्यांच्या सोबत चाळीशीतला एक माणुस असे दोन जण पळत बाहेर आले. आणि त्यांचं सामान गाडीतून काढायला मदत करु लागले.
            आत गेल्यावर तर रचना सकट सगळे आ वासून पाहतच राहिले,इतकी सुंदर वास्तू असेल ही, असं तर त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.सगळ्यांच्या कल्पनेत एक वेगळाच वाडा होता.
     आत गेल्या बरोबर एक चौक होता आणि त्याच्या अवतीभवती खोल्या होत्या. वर एक मजला होता तिथे पण खोल्या होत्या. त्या चौकात एक तुळशी वृंदावन होतं आणि थोडं बाजूला एक छोटंसं पण अतिशय सुंदर मंदिर होतं.  सगळीकडे पसरलेली भव्यता,त्या वाड्याचं वैभव सांगायला पुरेशी होती. 
"चला मी तुम्हाला तुमच्या खोल्या दाखवून देतो, म्हणजे तुमचं सामान व्यवस्थित तिथं ठेवले जाईल." त्या दोघा माणसांपैकी  मोठा माणूस म्हणाला. त्यांचं नाव गोपाळ होतं आणि तो दुसरा माणूस म्हणजे त्यांचा मुलगा हरी.
             गोपाळ काकांच्या आवाजाने सगळे भानावर आले आणि एखाद्या यंत्रा प्रमाणे त्यांच्या मागे चालत गेले.खोल्या खूप प्रशस्त होत्या.
क्रमशः

          

🎭 Series Post

View all