अ यूथ प्रोजेक्ट भाग 10 (शेवटचा भाग)

A story of five young people who get caught in a abnormal situation.

गोविंदचा स्वभाव छान होता, सतत हसत खेळत राहणारा, पण धोका, बेइमानी आणि अन्याय होताना पाहिल्यावर तर त्याच्या तळपायाची आग मस्तकातच जायची, आणि स्वता वर त्याचा संयमच न्हवता रहायचा,मग तो एक घाव दोन तुकडे करायला बघायचा आणि रागाच्या भरात काहीही करुन बसायचा.

    मग पार्वती बाईंना आत्ताच सगळं सांगून टाकायचं हा विचार करुन तो तडकाफडकी त्यांच्या गावाला जायला निघाला. गाव फार जास्त लांब न्हवतं. त्यांच्या घरी गेल्या वर आधी त्यानी सगळ्यांशी मंत्रणा केली आणि मगच पार्वती बाई ला सगळं सांगून टाकलं.

पार्वती बाईंना फार दुःख आणि संताप झाला. राधा आणि दिनकर पेक्षा ही जास्त स्वताचाच राग आला की कसं काय त्यांनी दोघांवर डोळे झाकून विश्वास ठेवून घेतला. आपण स्वताला किती हुशार समजत होतो, आणि पहा,कशी माती खाऊन बसलो.

            त्यांनी मग गोविंद सोबत परत जायची जिद्दच पकडली. सगळ्यांनी खूप समजावून सांगितले की अश्या अवस्थेत नका कुठे जाऊ,पण त्यां कोणाचंच काही ऐकायला तैय्यार न्हवत्या. सगळ्यांना माहितच होतं की, पार्वती बाई आता जिद्दीला पेटल्या होत्या तर आता त्यांना सासरी परत जायला कोणीच अडवू शकत न्हवतं. मग फार काळजीपूर्वक त्यांना सासरी पाठवण्यात आलं.

        वाड्यात आल्या आल्या गोविंद ला कळलं की त्याची आजी अगदी शेवटचा श्वास घेत आहे,आणि त्याचीच वाट पाहत आहे,तर पार्वती बाईंना दारातच सोडून तो आपल्या घरी पळाला,पण जाता जाता मात्र त्याने पार्वती बाईंना बजावलं होतं की तो परत येईस्तोवर कोणाशी काहीही बोलू नका.

               वाड्यात सगळेच , त्यांना पाहून फार आश्चर्य चकित झाले.त्यांना असं अचानक, गोविंद बरोबर आलेलं पाहून राधा आणि दिनकर पण थोडं घाबरुन गेले होते, की गोविंद नी त्यांना सगळं सांगून टाकलं असेल.

      पार्वती बाईंना गोविंदचा सल्ला लक्षात होता.त्यांनी गोविंदची वाट पहायचं ठरवलं आणि त्याच्या येईस्तोवर गप्पच रहायचा विचार केला.

         पण मध्य रात्री पार्वती बाईंना कळा सुरू झाल्या आणि सुईणीला बोलवण्यात आलं.

आणि पहाटे पहाटे पार्वती बाईंनी एका सुंदर पण अशक्तं मुलीला जन्म दिला.तीचं वजन फारच कमी होतं.

        गोविंद ची आजी वारली होती,तर त्याला आता काही दिवस वाड्यात येणं शक्य नव्हतं. हे पार्वती बाईंना माहित न्हवतं.त्या त्याची वाट पाहत होत्या.

         सकाळी दिनकर आपल्या मुलीला पहायला जसाच खोलीत गेला, तर त्याला पाहून तर पार्वती बाईंचाचा स्वतावर ताबाच नाही राहिला आणि त्याला त्यांनी काही बाही बोलायला सुरुवात केली. शिव्या पण दिल्या आणि मुलीला हात सुद्धा न लावायची चेतावणी पण  देऊन टाकली. तिचा आवाज ऐकून सगळे तिच्या खोलीत जमा झाले.त्यांच्यात राधा पण होती.

           पार्वती बाईंनी मग सगळ्या गोष्टी आई बाबांना सांगून टाकल्या. आई बाबा आधीच ह्या सगळ्या प्रकरणाला कंटाळले होते, मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमचं पहा, म्हणून तिथून निघून गेले.

            आता खोलीत पार्वती, दिनकर, राधा, भाऊ आणि क्षमा वहिनी होते. अगदी आत्ता जसे होते अगदी तसेच, फक्त इथे विनायक होता, आणि तेव्हा तिथं गोविंद नन्हवता ऐवढच अंतर होतं.

           राधा नी दिनकर ला उकसवलं कि ही तुमचीच मुलगी आहे तर तुम्हाला तिला हात लावायला कोणीच अडवू नाही शकत. तुम्ही घ्या तिला जवळ, पार्वतीबाई काहीच करू नाही शकणार.

          मग दिनकर सुद्धा पुढे आला आणि पार्वती बाई च्या हातातुन मुलीला घेऊ लागला. पण पार्वती बाईंनी पण तीला अगदी घट्ट धरून ठेवलं होतं. मग दिनकरच्या मदतीला राधा पुढे आली, आणि दोघांनी मुलीला तिच्या हातातून हिसकावून घेतलं. क्षमा वहिनी आणि भाऊ नुसता तमाशा पाहत उभे होते. त्यांच्या कडून, पार्वतीबाईंना काही अपेक्षा ही न्हवती म्हणा,पण त्यांची नजर गोविंदलाच शोधत होती,त्या सतत त्याला आवाज देत होत्या,पण तो तर वाड्यात न्हवताच.

     पण मग एक अत्यंत दुर्देवी घटना घडली. ह्या सगळ्या छीना झपटीत त्या नाजुक कोवळ्या जीवाचे मात्र प्राण पखेरुच उडाले. सगळे अगदी स्तब्धं होऊन गेले. आपल्या जीवाच्या तुकड्याला निष्प्राण बघुन,पार्वती बाई,वेड्या सारख्या होऊन गेल्या. आपल्या मुलीचं मृत शरीर घेऊन त्यांनी वाड्याच्या मंदिरात धाव घेतली, आणि जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून सगळ्यांना शिव्या श्राप देऊ लागल्या. आई-बाबा पण धावत आले बाहेर.

" माझ्या निरपराध मुलीचा जीव घेतला ना तुम्ही सगळ्यांनी मिळून, मी तुम्हाला श्राप देते की,  ह्याच्या पुढे,ह्या घराण्यात एकही मुलगी जन्माला येणार नाहीं,आणि समजा जर झालीच तर ती मीच असेल.तुम्ही त्या मुलीला इथे येण्यापासून थांबवा आणि जर ती मुलगी इथे आलीच, तर ती ह्या घराण्याच वाटोळं कसं करते बघाच. तर देवाशी प्रार्थना करा की तुमच्या घरात पुन्हा मुलीचा जन्म नको होऊ देऊ."

आणि त्या मग मुलीच्या दुःखात वेड्याच होऊन गेल्या.लवकरच त्यांनी सुद्धा प्राण सोडले.
दुसरा भाग इथेच संपला.

      रचना,रूपाली,जय, राहुल, सीमा आणि विनायक हे सहा झण एका वेगळ्याच जगात होते. पूर्व जन्मीचं त्या सगळयांनाच आठवत होतं आणि ते त्याच विश्वात होते.रचनाचं शेवटचं वाक्य होतं, तुम्ही इथून आता माझ्या मर्जीनच बाहेर निघू शकतात. आता पुढे.

तिचं हे बोलणं ऐकून सीमा, म्हणजे क्षमा वहिनी उभी राहिली आणि तिला जवळ घेत म्हणाली

" तुमचं दुःख,तुमचा राग,तुमचा संताप, तुमच्या वेदना सगळं सगळं अगदी रास्त आहे पार्वती बाई, आपल्या पोटच्या मुलाला गमवणं काय असतं, मी चांगलच समजू शकते.तुम्ही तुमच्या जागेवर अगदी बरोबरआहात.जगातली कोणतीच आई आपल्या मुलाला आपल्या डोळ्यासमोर मरताना नाही पाहु शकत. आम्ही सगळेच कळत नकळत तुमचे आणि तुमच्या मुलीचे गुन्हेगार आहोत. पण तुम्हाला खरं सांगते पार्वती बाई तुमच्या मुलीला काहीही इजा व्हावी असा अघोरी विचार सुद्धा आमच्या मनात न्हवता.आणि तुम्हाला काय वाटतं, आम्हाला आमच्या केल्याची शिक्षा भोगावी नाही लागली आहे. तुमच्या गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आपल्या कर्मांची फळं भोगली आहेत.आई बाबा दोघं शेवटपर्यंत गंभीर आजाराने त्रस्तं राहिले.मी आणि तुमच्या भाऊसाहेबांनीही आपल्या पोटच्या पोराला,एका असाध्य आजारात गमावलं." आणि त्या हुमसून रडायला लागल्या.

" हो पार्वती बाई, कदाचित तुमचा गैरसमज दूर करायलाच आपण इथे एकत्रं आलो आहोत. मी आणि दिनकर राव सुद्धा कधीच सुखात नाही राहिलो त्या नंतर, मला तर काही असाध्य रोग होतेच,ते मग ह्यांना पण लागले आणि आमच्या दोघांचे पण हाल हाल झाले होते. तुमचं आणि दिनकर रावांच्या आयुष्याचं वाटोळं करायचं होतं मला, म्हणून मी इथे आली होती.तुम्ही माझा पदोपदी केलेला अपमान आणि ती घाणेरडी शिवी,मला सगळ्यांचा तुमच्या कडून हिशोब घ्यायचा होता. आणि दिनकरराव त्या दिवशी मला सोडून तुमचा हात धरून निघून गेले,त्याचा मला हिशोब घ्यायचा होता त्यांच्या कडून.पण मी कितीही वाईट असली तरी खरं सांगते पार्वती बाई, मलाही तुमच्या मुलीचं काहीही वाईट करायचं न्हवतं.तुम्ही विश्वास ठेवा माझ्या वर.तुम्ही तर कोणत्याही रुपात होत्या पण इथेच होत्यानं,मग आमचे झालेले हाल तुम्ही पाहिलें नाहीं का?

        "हे बघा पार्वती बाई, तुमच्या आणि तुमच्या मुलीबरोबर जे काही घडलं,ती खरोखरच एक दुर्देवी घटना होती, आणि कोणाच्याही मनात तिला त्रास द्यायचा साधा विचारही न्हवता.पण आम्ही सगळेच ह्याच्यात दोषी आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात मोठा दोष तर तुमचा आहे पार्वती बाई. तुम्ही वाड्यात आल्या तेंव्हा तुम्ही तुमच्याच विश्वात रमलेल्या होत्या, तुम्ही दिनकर भाऊ वर कधीच लक्षं दिलं न्हवतं. एक बायको म्हणून तुम्ही त्याला मार्गावर आणु शकत होत्या,पण तुम्ही साधा प्रयत्नं सुद्धा नाही केला होता. हे ही मान्य आहे की लहानपणापासून बिघडलेल्या माणसाला सुधारण्याची एकट्या तुमच्या कडून अपेक्षा करणंही बरोबर न्हवतं,पण थोडी अपेक्षा तर होतीच तुमच्या कडून.पण जेव्हा गोष्ट अगदी हाताबाहेर गेली, तेव्हा तुमचे डोळे उघडले पण त्याचा तेव्हा काहीच उपयोग नव्हता. तुम्ही तुमच्या कळत नकळत सगळ्यांचा अपमान करत होत्या, तसाच तुम्ही राधाबाई चा पण केला,हे मान्य आहे की त्यांनी तुमच्या नवर्याला तुमच्या पासून दूर केलं होतं,पण तुमचा नवरा काही लहान बाळ तर न्हवता,तो स्वताच तिच्या सोबत रहायचा.बरं ते सगळं सोडा आणि मुख्य गोष्ट आता तुम्ही लक्षात घ्या,चूक सगळ्यांचीच होती, आणि कोणालाच तुमच्या मुलीला काहीही करायचं न्हवतं हे तुम्ही मान्य करा आणि आता तुम्ही ठरवा की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे. सगळं फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे." खूप कमी बोलणार्या भाऊसाहेबांनी आपलं मत मांडलं.

थोड्या वेळ तर पार्वती बाई अगदींच चुपचाप होत्या. विचार केल्यावर मग त्यांना त्यांची चूकही कळली होती.जे काही झालं होतं,त्यात त्यांचं पण खूप काही चुकलच होतं हे त्यांना आता कळालं होतं.

"मला खरंच माझी चूक कळाली आहे, माझं जे फार मोठं नुकसान झालं होतं त्यात माझीही तेवढीच चूक होती जेवढी बाकी सगळ्यांची होती. गोविंदचे मनापासून आभार मानते,ज्याने माझे डोळे उघडले, नाही तर ह्या गोष्टीचा अंत कदाचित आणखीनच वाईट झाला असता."
     आता

सगळं काळोखं स्वच्छं झालं होतं. आणि सगळे गैर समज दूर झाले होते.

"पण ह्या जन्मी सुद्धा तू दिनकर ला माझ्या कडून हिसकावून घेतलं हं" राधाबाई म्हणाली.

" हो, आणि तो प्रत्येक जन्मी माझाच राहणार आहे. हे ही लक्षात ठेव." पार्वती बाई म्हणाल्या.

" तुम्ही , पुन्हा नका सुरू होऊ आता, मागचं सगळं विसरून जा." क्षमा वहिनी म्हणाल्या.

" आम्ही नाही बदलणार, आमचं नातं,हे असच चालत राहणार आहे. पार्वती बाई हसत म्हणाल्या.

तेवढ्यात खालून गोपाळ काकांचा आवाज आला आणि सगळे शुद्धीत आले, काका सगळ्यांना खाली बोलवत होते.

सगळ्यांनाच आता काहीही आठवत न्हवतं आपल्या बरोबर काय झालं होतं ते.
परदा आता पडला होता आणि नाटक एका सुंदर अंता बरोबर संपलं होतं.

" अरे बापरे खरंच किती धूळ आहे इथे, काका बरोबरच बोलत होते. चला आपण खालीच जाऊया, नंतर कधी पाहून घेऊ सगळं" सगळीकडे धूळ साचलेली पाहून रचना म्हणाली.

सगळे खाली गेले.


आता संध्याकाळ झाली होती, आकाश सुंदर रंगानी सजलेलं होतं.
मंदीरातल्या देवीचा चेहरा आता खूप प्रसन्न वाटत होता. त्या सगळ्यांना दुसर्या दिवशी सकाळी परत जायचं होतं. त्यांना माहीत न्हवतं,पण त्यांचं हे प्रोजेक्ट पण यशस्वी ठरलं होतं.
धन्यवाद ????

,

गोष्टी बद्दल सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे,त्याचं मनापासून आभार.मी इथे सांगू इच्छिते की ह्या गोष्टीचा अंअ

🎭 Series Post

View all