Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

स्त्रीला समजुन घेताना...

Read Later
स्त्रीला समजुन घेताना...

स्त्रीला समजुन घेताना.....


आपल्या समाजात स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिलं जातं, पुरुषप्रधान संस्कृतीला स्त्रीने घेतलेले निर्णय, तिने स्वतःचा आधी विचार केलेला आवडत नाही...दरवेळी तिने का दुसऱ्यासाठी बदलायच. तिला स्वतः ला काय हवं तिच्या इच्छा, अपेक्षा असतात हेच आपण समजुन घेत नाही. ती दरवेळी स्वतः पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते, मग तिचा विचार कोण करणार??? आपल्याकडे स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण हे फक्तं बोलण्या पुरत तर मर्यादित नाही ना...
       कालचीच गोष्ट घ्या.. माझ्या मैत्रिणीने मला कॉल केला म्हणे अग घरात कोणी मला समजुन घेत नाही, मला हवं ते करू दिलं जात नाही. तिकडे आई- बाबांना सांगितले तर ते म्हणतात, तू आणि तुझ्या सासरचे बघून घ्या काय ते सासरचे म्हणतील तसें कर.... मला नीट समजेना ती नक्की कशाबद्दल बोलतीये, मग म्हंटले अगं नीट सांग काय झाले. तर म्हणाली लग्नाच्या आधीच मी मुलाला (नवऱ्याला) स्पष्टपणे सांगितले होते मला नोकरी करायची तेव्हां `तो` हो म्हणाला आणि आता लग्नाला वर्ष होत आले तरी घराबाहेर पडू दिलं जातं नाही. सासूबाई म्हणतात, घरात एवढं चांगल, तुला काही कमी पडत नाहिये हव ते मिळतंय ना मग काय गरज नोकरीची, नोकरीचा विषय डोक्यातून काढून टाक. नवऱ्याला बोले तर तो म्हणतो थांब थोडे बघू नंतर मी बोलतो आईशी.. शेवटी न राहून काल मीच जेवतांना विषय काढला तर सासूबाई म्हणे लग्नाला वर्ष होत आले गूड न्यूज दे आता लवकर... मला ना कळतच नाही लग्न झाल लगेच का यांना गूड न्यूज हवी असते, मला माझ्या आयुष्यात निर्णय घायचे स्वतंत्र आहे की नाही?? तसे मी त्यांना म्हंटले की मला नाही एवढ्यात आई व्हायचं ती जबाबदारी घेण्यास मी अजून तयार नाहिये. तर मला बोलल्या आमच्या काळी लहान वयात लग्न व्हायची आम्हाला काय कळत होत तरी दोन- दोन पोरं सांभाळली ना.. मी जरा रागातच बोली लग्न झाल्यापासून तुमचं सारखं चालू असत आमच्यावेळी हे, आमच्यावेळी ते. कधी कुठे बाहेर जाऊ देत नाही बाहेर जायचं म्हटले की तुमचं काही तरी निघत, एखाद्या मैत्रिणीचा फोन आला तर तूम्ही येता येता जाता ऐकवत असता तासन् तास फोन वर बोलते आमच्याकाळी नव्हते असले फोन वगैरे आणि त्यात मित्राचा कॉल असला तर घरचं डोक्यावर घेता...
तुच सांग काय करु आता???? एवढं बोलून तिने फोन कट केला.
   तिचे ही बरोबर आहे, आपल्याकडे तिने नोकरी केली तरी प्रॉब्लेम असतो अरे ती सांभाळू शकते ना घर आणि नोकरी पण काही लोकांना ते पटत नाही. आपणं आपली मानसिकता बदलायला हवी ना.. तिला ही वाटत जगावं कधी स्वतःच्या मनाप्रमाणे कायमच जगते की दुसऱ्याच्या मनानुसार, स्वतः च मन मारून... का तिने समाजाच्या भीतीने अन् आईबापाच्या मान सन्मानासाठी मन मारून जगायचं...
तिलाही कोणी कधीतरी समजुन घ्यावं एवढीच इच्छा असते तिची...
कायम तीला कोणत्या ना गोष्टीवरून बोललं जातं. नोकरी करत असली तरी येता जाता ऐकवलं जात एवढा वेळ बाहेर नको राहू जास्त मुलांशी नको बोलू हे नको करू ते नको करू.....
सगळी बंधन तिच्यावरच का म्हणून लादायची. तीने एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपल्यातले बरेच लोक तिला प्रोत्साहन द्यायचे किंवा सकारात्मक गोष्टी सांगण्या व्यतिरिक्त तू हे करु नको तुला जमणार नाही. कशाला करते नकारात्मक बोलत असतात. तिचे मानसिक खाच्चिकरण केले जाते. अरे तिला थोडा तरी सपोर्ट करून बघा. नाही कशी करू शकली तर अनुभव येईल. पण एकदा तिला हव ते करू द्या... एक चान्स तरी घेऊ द्या तिला हव तस जगु द्या.....

तिलाही वाटत कोणी तरी असावं तिला साथ देणार, समजुन घेणार...
©रुपाली (r.u.p.a.l.i.)

नाशिक टीम


राज्यस्तरीय करंडक लघु कथा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Rupali Korale

//