एक उनाड वाट पर्व दुसरे #मराठी_कादंबरी भाग-5

Thank you

एक उनाड वाट पर्व दुसरे भाग 5

नमनने बुटीक मधून मागवलेल्या ड्रेसेस पैकी एक साधा पिंक गाऊन इंदिराने चूज केला. दोघेही डिनर साठी बुफे हॉलमधे गेले. त्यांना जातांना अनुभवनी बघितलं. इंदिरा पिंक गाऊन घालून क्युट दिसत होती. तो ही जेवायला बुफे हॉलमधे गेला.

"इंदिरा नमन सोबत जशी वागतेय त्यावरून तीला त्याच्यात मित्रापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे असं अजिबात दिसत नाही. मी उगाच तिच्यावर शंका घेतोय का?" अनुभव विचार करत होता.

जेवण झालं. नमननी इंदिराला त्याच्या खोलीत निश्चिन्त झोपायला सांगितलं आणि स्वतःसाठी दुसरी एखादी खोली तयार करायला हाऊस किपींगला सांगितलं. त्याच्या साठी खोली रेडी झाली असा फोन आल्यावर तिला गुड नाईट म्हणून तो बाहेर पडला. तोच त्याला कोणीतरी एका खोलीत ओढलं.

"अनुभव, मी त्या कॅटेगरीतला नाही हं !" नमन त्याच्या छातीशी हात लपेटून अनुभवला म्हणाला, "एक मिनिट तुझी आवड बदलली म्हणून तर तु इंदिराला डिवोर्स द्यायला तयार झाला नाही ना?"

"ये. बसून बोलू." अनुभव खुर्चीत बसून त्याला म्हणाला, "मी इंदिराला डिवोर्स द्यायला कधीच तयार झालो नाही. मी अजूनही रस्ता शोधतोय डिवोर्स न होण्यासाठी."

"मग तिच्याशी भांडतो कशाला?"

"ती लग्न झाल्यावर खूप चेंज झालीय. तिचं वागणं इरिटेट करते. स्वतःचच खरं करण्याच्या खूप मागे लागते. मग मला काही सुचत नाही आणि भांडण होतं."

"ओहो ! पण मला का असं इथे ओढून घेतलं?" नमनने  स्वतःचे कपडे ठीक करून त्याला विचारलं.

"मी इंदिराचं आणि तुझं बुफे हॉलमधे निरीक्षण केलं तेव्हा मला असं जाणवलं की तुला तिच्यात मित्रापेक्षा जास्त इंटरेस्ट आहे. म्हणून समजवून सांगायला तुला ओढलं कि इंदिरा पासुन दूर राहा."

"गजब आहे राव तुमची रबने मिला दि जोडी." नमन हसून त्याला म्हणाला, "डिवोर्स केस कोर्टात टाकून ती तिकडे तुझ्यासाठी आसू गाळतेय आणि तु इकडे मला तिच्यापासून दूर राहायला सांगतोय."

"तुला तिच्या विषयी काय वाटतं?" अनुभवनी त्याला सरळ विचारलं. 

"इंदिरा आणि मी स्कुल फ्रेंड्स आहोत. कालच भेटलो आठ नऊ वर्षा नंतर. कॅनडात शिक्षण घेऊन जॉब केला आणि सहा महिन्या आधीच भरतात परतलो. आवडते मला ती. तिचं लग्न झालेलं नसतं तर सरळ प्रपोज केलं असतं लग्नासाठी."

"मग आता काय विचार आहे?"

"आधी डिवोर्स घेतेय हे ऐकून खूप बरं वाटलं होतं." नमन म्हणाला तसं अनुभवनी डोळे वटारून त्याच्याकडे बघितलं.

"टेंशन नको घेऊ. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. इतक्या वेळ माझ्यासोबत होती पण तूझ्या विषयीच बोलत होती. तूझ्या तब्येतीची काळजी वाटतेय तिला. ती होती माझ्या सोबत पण तिचा जीव तूझ्यात अटकलेला. इतकं सगळं माहित असतांना मी तिच्या मागे लागण्याचा मूर्खपणा अजिबात करणार नाही."

"गुड !"

"फक्त गुड म्हणून चालणार नाही. तु तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ज्यानं लवकरात लवकर तुमच्यातील वाद मिटेल."

"मी तोच विचार करत आहे."

" खास म्हणजे तिच्याशी प्रेमाने वाग."

"नक्कीच !"

"चला मग मिटिंग बरखास्त करूयात. काय तुम्ही गेस्ट आहात पण मी तर जॉबवर आहे."

"होहो गुड नाईट आणि थँक्यू."

22 मार्च 2020 रविवारी सकाळी संचारबंदी लागली. इंदिराच्या मनात आलं, " आता घरीच जाणं काय पण हॉटेलच्या बाहेरही दिवसभर पडणं नाही. नमनही त्याच्या कामात बिझी होता आणि अनुभव अकरा वाजले तरी कुठेच दिसत नव्हता.

खरंच गेला का परत मुंबईला खडुस? पण आज संचार बंदी आहे. कसा जाईल? कसं माहित करायचं त्याचं काय सुरु आहे ते?" इंदिरा खिडकीतुन बाहेरचे सुनसान रस्ते न्याहाळत  विचार करत होती. तिचा मोबाईल वाजला.

"गुड मॉर्निंग इंदिरा."

"गुड मॉर्निंग मिस्टर नमन. आता वेळ मिळाला होय तुम्हाला?"

"अगं कामात होतो. सॉरी !"

"इट्स ओके ! मी गंम्मत करतेय."

"बरं ऐक ना तुझा एक्स हजबंडला ताप आलाय म्हणतात फणफण. काय नाजूक माणूस आहे. नावाचाच हिरो आहे वाटतं?"

"नमन तु मला हे आधी का नाही सांगितलं? मी बघते त्याला आणि हो आमचा डिवोर्स नाही झाला अजून. तो खडूस असला तरी नवरा आहे माझा."

"बरं मॅडम. बघा मग साहेबांना. नाहीतर नाईलाजाने हॉस्पिटलमधे भर्ती करावं लागेल."

"नाही अजिबात नाही. हॉस्पिटलमधे कोरोना आहे. मी जाते त्यांच्या खोलीत. जमलं तर ये तुही."

"हो."

"ती येत आहे. तु अंगावर घे." नमन अनुभवला म्हणाला. इंदिराच्या मनातलं प्रेम जागृत व्हावं, तिला समजावं कि अनुभव तिच्या शिवाय नाही राहू शकत आणि तिने अनुभवला एक चान्स द्यावा म्हणून नमन आणि अनुभवनी ही सगळी उठाठेव केली. 

तो हॉट बॅग बगलेत दाबून पांघरून गुंडाळून बेडवर आडवा झाला. काल रात्री त्याला बरं वाटलं म्हणून नर्सला परत हॉस्पिटलला पाठवून देण्यात आलं होतं.

"खूप आहे का रे ताप?" इंदिरानी नमनला विचारलं.

"हो एकशे चार आहे." नमन बोलून गेला. 'मेलो मी ' या अर्थाने अनुभवनी नमन कडे बघून त्याची मान हलवली.

"काय?  मी चेक करते." इंदिरा नमनच्या हातातलं थर्मामीटर घेऊन म्हणाली.

"अगं एकशे एक म्हणायचं होतं मला. डॉक्टर बारा एक वाजता त्याला तपासायला येणार आहेत. त्यांनी तेव्हापर्यंत अनुभवच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायला सांगितलं." नमननी परिस्थिती सांभाळून घेतली.

"ओके ! मी बसते मग इथेच. तु जा तुझी कामे कर. तसही यांना पाहायलाच आली होती मी इथे."

"ते ठीक आहे. पण मी म्हणतो तु कशाला तुझा वेळ वाया घालवते या माणसावर? उठला कि अजून तुला खोली बाहेर काढून द्यायचा." नमन तिला निर्विकारपने म्हणाला.

"हा जाऊदे ते. साहेब असेच आहेत खडूस, अँग्री यंग मॅन ! सवय आहे मला यांच्या अशा वागण्याची." इंदिरा हसून डोळे मिटून निपचित पडलेल्या अनुभवचं डोकं पुसत म्हणाली.

"असं दिसतंय तु अजूनही अनुभववर खूप प्रेम करतेस!"

"हा मग, प्रेम हे मनाशी मना सोबत बांधल्या गेलेला एक अदृश्य धागा असतो. ही दिसणारी नाती तुटली तरी प्रेमाचा तो धागा तसाच असतो. तु एखादी वर प्रेम करायला लागशील ना तेव्हा समजेल तुला."

"हुम्म्म !" नमन स्वतःशीच हसला. 'प्रेम तर समोरच आहे बसलेलं. पण हक्क माझा नाही.' तो स्वतःशीच पुटपुटला.

"ए तुझी गर्लफ्रेंड आहे का?" इंदिरानी त्याला उत्साहाने विचारलं.

"नाही. म्हणजे भरपुर येऊन गेल्या पण सध्या नाही कोणी आणि आता नकोही."

"का? लग्न करणार आहेस?"

"हो, तुझा डिवोर्स झाला कि तुझाच हात मागायचा विचार  आहे माझा."

"काय?" इंदिराला चांगलंच हसू आलं. पण अनुभवला डिस्टरब होऊ नये म्हणून दबक्या आवाजात ती नमनला म्हणाली, "चालु आहेस तु. माझ्या नवऱ्यासमोर माझ्याशी फ्लर्ट करतोय."

"हा मग तो झोपला आहे. ही संधी कशी सोडू."

"गुड गुड. पण खरं खरं सांगते अजूनही वाटतं कोणीतरी चिमटा घ्यावं अन मला जाग यावी. अन समजून यावं कि
हे डिवोर्स मॅटर फक्त एक वाईट स्वप्न होतं दुसरं काही नाही."

"खरंच?" अनुभव उठून बसला झाला, "इंदिरा मलाही असंच वाटतं." त्याच्या बगलेतली हॉट बॅग इंदिराला दिसली.

"म्हणजे अनुभव आणि तु, तुम्ही दोघं नाटक करत होते. मी दोघांसोबतही बोलणार नाही." इंदिरा बाहेर जाण्यासाठी दार उघडायला जात म्हणाली.

नमननी डोक्याला हात लावला. त्याच्या मनात आलं, "हा तर गेला. सोबत मलाही घेतलं."


"इंदिरा प्लीज एकदा, हे शेवटचं माफ कर." अनुभव कान पकडून म्हणाला, "मी तुझं सगळं ऐकणार आणि तुझं मन दुखेल असं कधीच बोलणार नाही, करणार नाही."

इंदिरानी दार उघडलं.

"थांब इंदिरा" नमननी तिला थांबवलं, "का स्वतःला त्रास करून घेतेय? मला वाटतं त्याला एक चान्स द्यायला हवा तूझ्या स्वतः साठी. नवरा बायको एकमेकांना बोलून जातात खूप काही पण ते फक्त त्या वेळे पुरतंच ठेवावं. नंतर विसरून जावं. नाहीतर वैवाहिक आयुष्य टिकवून ठेवणं कठीण."

"पण म्हणून तो काहीही बोललेलं मी ऐकून घ्यावं का?"

"नाही अजिबात नाही." अनुभव म्हणाला, "पण ही माझी पहिली आणि शेवटची चूक समजून मला माफ कर. खरं तर कोणतंही नातं टिकवून ठेवणं हे दोघांच्या हातात असतं. बोलतांना, सामोच्याला उत्तर देतांना आपण एकदा विचार करायला हवा कि आपल्या या बोलण्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल? हे असं बोलणं जरुरी आहे का?"

"इतकं समजतं तर मग तसं का बोललास तेव्हा?" इंदिरानी अनुभवची कॉलर पकडून विचारलं.

"माझं डोकं खराब झालं होतं. सॉरी. वाटलंस तर मी बॉलिवूड सोडून देतो आणि तुझा सेक्रेटरी बनून काम करतो. सॅलरी म्हणून दोन वेळेसच जेवण पुरे मला." अनुभव मोट्ठी स्माईल करून म्हणाला.

"काही गरज नाही इंदिरा. तू देऊन टाक डिवोर्स याला आणि माझ्याशी लग्न कर. तुला पूर्ण जग फिरवणार." नमन शाहरुख स्टाईलमधे म्हणाला.

"अजिबात नाही." इंदिरा अनुभवला आलिंगन देऊन म्हणाली.

"मग मी इथून जाणंच बरं !" नमन गंम्मतच आसू पुसायची ऍक्टिंग करत खोलीच्या बाहेर पडला, "बाय बाय."

"बाय बाय !" अनुभव आणि इंदिरानी हसतच त्याला बाय केलं.

समाप्त.

धन्यवाद !

काही वैयक्तिक कारणांमुळे मी पुढील 15-20 दिवस लिहू नाही शकणार आहे. उगाच वाचकांना लटकून ठेवल्या पेक्षा कथा संपवून टाकणं बरं वाटलं. म्हणून कथा इथेच समाप्त केली आहे. तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. आनंद उरी भरला.

खूप खूप आभारी.

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all