एक उनाड वाट पर्व दुसरे #मराठी_कादंबरी भाग-2

The story is about Romance & comedy between a lovely couple. Thank you

एक उनाड वाट पर्व दुसरे - भाग 2

इंदिराने तिच्या सहकर्मीला कॉल करून कोरोनावर काही नोटीस / कार्यालयीन आदेश आला का म्हणून विचारपूस केली. पण कोणाला काहीच माहित नव्हतं. 22 मार्च म्हणजे रविवारी रात्री सरकार पुढे काय पाऊल उचलणार तो निर्णय देणार इतकंच समजलं. इंदिरा परत डोकं धरून बसली. खरंच बाबा म्हणतात तसं लॉकडाऊन लागलं तर मी दिवसभर घरी राहून काय करणार? खाली पिली घरात बसून अनुभवचे विचार शांती मिळू नाही देतील आणि आई... आई तर अनुभव सोबत माझं पॅचअप करण्यासाठी हात धुवून माझ्या मागे लागेल. व्हाट्सअप वरचे एक दिड महिन्यापासून अनरिड असलेले मॅसेजेस चेक करता करता रात्री दोन अडीचच्या दरम्यान तिला झोप लागली.

"आय लव्ह यु !" अनुभव इंदिराच्या कमरेत हात टाकून तिला जवळ घेऊन म्हणाला. 

"मी टू.. !" इंदिरा त्याच्या गालावर हात ठेऊन म्हणाली. तो इंदिराला किस करण्यासाठी तिच्यावर वाकला, तीने लाजून डोळे बंद केले आणि तो  गायब झाला.

"अनुभव...... " इंदिरा किंचाळून जागी झाली. आजूबाजूला बघते तर ती तिच्या खोलीत बेडवर होती. भिंतीवर घड्याळात आठ वाजून गेलेले. दोन वर्षांनी पहिल्यांदा ती इतक्या उशिरा उठलेली. अनुभव ठीक तर असेल ना? त्यालाच फोन करून विचारावं म्हणून तिने फोन हातात घेतला तर दार वाजलं. तिची किंचाळी ऐकून सुमनबाई तिला बघायला वर आल्या.

"काय झालं ग? किंचाळली का? काही वाईट स्वप्न बघितलं का तु?" सुमनबाईंनी मनात आले ते सर्व प्रश्न विचारले.

"हो आई. वाईट स्वप्न पडलं. पण आता ठीक आहे मी." इंदिरा आईला म्हणाली.

"अं..  काय स्वप्न पडलं?"

"आई असंच ग. मी अंघोळ करून येते खाली मग सांगते तुला. प्लीज... " इंदिराला  सुमनबाईंना तिचं स्वप्न अजिबात सांगायचं नव्हतं. उगाच जावयाच्या काळजीत पडायच्या. 

"बरं ये. बाबा मॉर्निंग वॉक वरून येतीलच. बसून नाश्ता करू. " इतकं बोलून त्या खाली गेल्या. 

"हो आई." इंदिराने हातात घेतलेला मोबाईल बेडवर ठेवला आणि ती अंघोळीला बाथरूमात शिरली. अंघोळ वगैरे आटोपून खोलीत येऊन आरशासमोर जाऊन बसली. पण तिला केस करायचाही कंटाळा आला होता. केसं करून, वेणी घालून, क्रीम चोपडुन जायचं तरी कुठे आहे? घरीच पडून राहायचं आहे. म्हणून ती काहीच न करता तशीच उठली. मोबाईल घेऊन खाली नाश्ता करायला पायऱ्या उतरू लागली तोच तिचा मोबाईल वाजला.

"सुबोध कशाला कॉल करतोय?" तिच्या मनात आलं. तिला एकदम सकाळी पडलेलं स्वप्न आठवलं.

तिने पटकन कॉल रिसिव्ह केला.
"इंदिरा तु ठीक तर आहेस ना. किती वेळचा कॉल लावतोय तुला." तो इरिटेट होऊन बोलला. 

"वॉशरूममधे होती. काय झालं? ओशिन आणि बाळ ठीक आहेत?" इंदिरानं अनुभव ठीकच असो अशी मनोमन प्रार्थना करत त्याला विचारलं.

"ते दोघेही छान आहेत. मी अनुभवसाठी फोन केला तुला." त्याचा आवाज गंभीर झाला. 

"त्यांना काय झालं? ते तर सकाळीच फ्लाईटने निघाले असतील मुंबईसाठी." इंदिरा सोफ्यावर बसून म्हणाली.

"नाही, तो नाही आला. ड्रायवर एअरपोर्टवरून एकटाच परत आला. हॉटेलचा फोन बिझी येतोय आणि अनुभवचा मोबाईल स्विच ऑफ येतोय."

"मग मी काय करू त्यात?" इंदिराला आतून काळजी वाटली पण तसं न दाखवता ती सुबोधला म्हणाली, " फ्लाईट कॅन्सल झाली असेल.  नाहीतर साहेबांचा मूड बदलला असेल. गेले असतील आणखी कुठे भटकंती करायला."

"फ्लाईट वेळेवर आली मुंबईला आणि तो असा नाही न सांगता कुठे जाणारा. प्लीज तु एकदा जा ना हॉटेलात."

"ही नाही गेली तर मी जातो." त्यांचं बोलणं ऐकणाऱ्या इनामदारांनी इंदिराच्या हातातून मोबाईल घेऊन सुबोधला सांगितलं, "तुम्ही काळजी नका करु."

"थँक्यू काका." सुबोधचे काम झाले. त्यानं फोन ठेवला.

"काय हे इंदिरा?" इनामदार इंदिरावर चिडले, "मानतो तुम्ही डिवोर्स फाईल केला आहे पण झाला तर नाही ना अजून. आणि झाला तरीही माणुसकीच्या नात्यानं तु जायला नको त्याला पाहायला. होऊ शकतं तब्येत बिघडली असेल त्याची. इथे नागपुरात त्याचं काळजी घेणारं कोणीच नाही. सध्याचे माहौल माहित आहे ना."

"हूँ जाते." इंदिरा खाली मान घालून म्हणाली. तिच्या मनासारखं झालं. तिची परिस्थिती 'तुझं माझं जमेना अन तूझ्या वाचून करमेना ' अशी झाली होती.

"अगं काय विचार करत बसली. नाश्ता कर आणि जा लवकर जावई बापूंना पाहायला. जास्त तब्येत खराब असली तर घरीच घेऊन ये." सुमनबाई तिला डोळे मिचकावून म्हणाल्या.

"आई !" इंदिरा लटका राग दाखवत खाऊ लागली.

 ती रॅडिसन ब्लू हॉटेलात गेली. तिने रिसेप्शनवर अनुभव सिन्हा कोणत्या नंबरच्या खोलीत आहे विचारलं.

"सॉरी मॅडम इथे कोणीच अनुभव सिन्हा नाही आहेत." रिसेप्शनिस्ट तिला म्हणाली.

"सुपरस्टार हिरो अनुभव सिन्हा बद्दल विचारतेय मी."

"तुम्ही कोणाबद्दलही विचारलं तर मी नाही सांगणार. कारण ते आमच्या प्रायव्हसीच्या विरुद्ध आहे." रिसेप्शनीस्ट ठामपणे म्हणाली. अनुभव सिन्हा एक फिल्मस्टार असल्याने आणि तो काही खाजगी कामानिमित्त नागपूरला आलेला म्हणून तो त्या हॉटेलात आहे हे कोणालाही माहित होता कामा नये अशी मॅनेजमेंटची ऑर्डर होती. त्यानं न सांगता कोणीही त्याच्या बद्दल विचारलं तर इथे कोणी त्या नावाची व्यक्ती नाहीच असंच सांगायचं.

"तुम्ही त्यांना फोन करून सांगा इंदिरा आली आहे भेटायला."

"असं कोणी नाहीच इथे तर कोणाला फोन करू?"

"मी अनुभव सिन्हाची बायको आहे." इंदिरा म्हणाली.

"तुम्ही... काहीही." रिसेप्शनीस्ट हसून तिला खालून वर बघत म्हणाली, "मॅडम झेपेल इतकंच खोटं बोलावं माणसानं."
इंदिराला रिसेप्शनिस्टचा राग आला पण तिला वाद करून मॅटर बिघडवायचं नव्हतं. त्यात रिसेप्शनिस्टचा काही दोषही नव्हता, कोण विश्वास ठेवेल की एका फिल्मस्टारची बायको अशी कंगवा न केलेल्या केसांचा जुडा पाडून साधं पावडरही तोंडाला न लावता टी शर्ट आणि पायजामा घालून फिरत असेल म्हणून.

"मी फोटो दाखवला लग्नाचा तर विश्वास  ठेवणार ना?"

"मन तर होत नाही पण दाखवा फोटो."

इंदिरा मोबाईलमधे फोटो सर्च करु लागली. तिच्या लक्षात आलं की तिने रागात अनुभव सोबतचे सर्व फोटो डिलीट करून टाकले होते. रिसेप्शनिस्ट तिच्याकडे बघत होती.

"काय झालं? नाही आहे ना फोटो." आता रिसेप्शनिस्ट तिच्यावर रागावली, "हे बघा एक न्यूज मिळवण्यासाठी तुम्ही माझा किती वेळ वाया घालवत आहे. आमचे सर येतील इन्स्पेक्शन साठी. तुम्ही प्लीज जा." इंदिराच्या ध्यानात आलं रिसेप्शनिस्ट तेव्हाची इंदिराला पत्रकार समजली.

आपण एक BDO ऑफिसर आहे पत्रकार नाही हे सांगण्यासाठी ति तिचं आयकार्ड शोधू लागली पण तिच्या पर्समधे फक्त लग्नाच्या आधीच्या नावाचं आधारकार्ड आणि पॅनकार्ड होतं. घाई घाईत ती काल कोर्टात नेलेल्या मोठया शोल्डर बॅग मधून आयकार्ड घ्यायला विसरली. रिसेप्शनिस्ट फोनवर बोलत होती,

"काय? सर इकडे येत आहेत? बरं थँक्यू हा. मी रेडी राहते.."

इंदिराच्या मनात आलं हिच संधी आहे आत गपचूप जायची. ती हळूहळू आत जातच होती की रिसेप्शनिस्टचे तिच्यावर लक्ष गेलं.

"मॅडम थांबा. तुम्ही असं आत नाही जाऊ शकत." रिसेप्शनिस्ट आपल्यामागे येतेय हे पाहून इंदिरा तिच्या सवयी प्रमाणे मागे रिसेप्शनिस्टला बघत पुढे धावली अन एका उंच पुऱ्या ब्लॅक अरमानी सूट घातलेल्या तरुणाला जाऊन धडकली. दोघेही तोल जाऊन खाली पडले. तो खाली आणि इंदिरा त्याच्यावर.

"आय एम व्हेरी सॉरी. मला काही समजलं नाही ... " इंदिरा उठून उभी होत बोलु लागली. तो मात्र इंदिराला एक सारखा बघु लागला. जसा काही कितीतरी दिवसांपासून तिलाच शोधत होता.

"सर तुम्ही ठीक आहे?" रिसेप्शनिस्ट तिथे आली तसा तो उठून उभा झाला,

"मी ठीक आहे."

"मी या मॅडमला थांबवलं पण मी फोन अटेंड करत होती तेव्हा या धावत इकडे आल्या." रिसेप्शनिस्ट बोलू लागली, "मॅडम जा तुम्ही की सिक्युरिटीला बोलवू?"

"एक मिनिट." तो रिसेप्शनिस्टला म्हणाला, "मी काही ऑर्डर दिली का?"

"नाही." रिसेप्शनिस्ट खाली मान करून उत्तरली.

"तु जा रिसेप्शनवर. मी बोलतो यांच्याशी." त्याची ऑर्डर ऐकून रिसेप्शनिस्ट एक नजर इंदिरावर टाकून चुपचाप आपल्या जागी गेली. हिच्यात सरांना काय दिसलं कि सर स्वतः बोलतो म्हणाले?  तिच्या मनात आलं.

"हा love at first साईट म्हणतात तसं माझ्या प्रेमात तर नाही पडला? म्हणून तर माझ्याबद्दल काहीच इन्क्वायरी न करता रिसेप्शनिस्टला जा म्हटलं नाही ना याने?" इंदिरा स्वतःशीच तोंडातल्या तोंडात बोलू लागली.

"तुझी स्वतःशीच बडबडण्याची सवय अजून सुटली नाही." तो हसून इंदिराला म्हणाला.

"याला कसं माहित?" तिच्या मनात आलं. "तुम्ही ओळखता मला?" तिने विचारलं.

"अजूनही तशीच आहेस. चवळीची कवळी शेंग." तो परत  हसून बोलला.

"असं तर मला शाळेत सर्व चिडवत होते." तिने त्याला जवळ जाऊन निरखून बघितलं, "नमन !"

"हो मॅडम इंदिरा द ट्रबल मेकर."

"Wow ! तु तर एकदम जेम्स बॉण्ड दिसतोय मेन इन ब्लॅक च्या ब्लॅक सूटमधे."

"थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट."

"वेलकम ! पण तु तर बारावी नंतर कॅनडाला गेला होतास हॉटेल मॅनेजमेंट करायला. मग इथे कधी आलास?" तिने विचारलं.

"सहा महिन्या आधीच भारतात परतलो मी. रॅडिसन ब्ल्यू च्या दिल्ली शाखेत सिनियर मॅनेजर आहे. दोन दिवस आधीच मॅनेजमेंटने मला इथे इन्स्पेक्शनसाठी पाठवलं आणि तु?  तु कुठे भटकत आहेस? स्कूल व्हाट्सअप ग्रुपमधेही नाहीस. फेसबुकवर काही अपडेट नाही, ट्विटर काहीच युज नाही करत का? ना शाळेच्या कोणाजवळ तुझा नंबर आहे. सुरु काय आहे तुझं? का अशी धावत आत घुसलीस?" त्याचा प्रश्न ऐकून इंदिराला अनुभवची आठवण झाली.

"OMG! अनुभवला विसरलीच मी. मला अनुभव सिन्हाला भेटायचं आहे." ती त्याला म्हणाली. 

"तु पत्रकार आहेस? त्याचा इंटरव्यू घ्यायला आली असशील तर सॉरी तो द्यायच्या परिस्थितीत नाही."

"काय? काय झालं अनुभवला?" इंदिरानं घाबरून विचारलं.

"तु तर त्याची बायको असल्यासारखी विचारत आहेस?"

"आहेच मी बायको त्याची, मिसेस इंदिरा अनुभव सिन्हा आहे मी." इंदिरानी त्याला गांभीर्याने सांगितलं. 

"काय?" त्यानं आश्चर्यानं तिला विचारलं. त्याच्या डोळ्यात तिला खूप प्रश्न दिसले.

"नमन मला माहितेय काहीही प्रूफ नसताना माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. त्यात तूझ्या मनात खूप प्रश्नही  असतील. मी सांगते नंतर सर्व. प्लीज मला अनुभवला भेटू दे." इंदिरा त्याला हात जोडून म्हणाली.

"ते हात कर खाली." नमन तिला रागावला, " वेडी कुठली. माझा विश्वास आहे तुझ्यावर. चल माझ्या सोबत." 

नमन आणि इंदिरा दोघेही शाळेत बालवाडी पासुन सोबतच होते. नमन आणि इंदिराचं छान जमायचं. त्यांची गँग मिळून सगळ्यांच्या खोड्या काढायची. दहावीत ती पास झाली ते नमनमुळेच. त्यानंच तिला एका जागी बसवून अभ्यास करायची सवय लावली. आयुष्यात सफल होण्यासाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितलं. नाहीतर आपल्या हिरोईनचं तर अजिबात अभ्यासात मन लागत नसे. बारावी पास झाल्यावर तो हॉटेल मॅनेजमेंट करायला कॅनडात गेला. तेव्हा त्याला इतकं काही वाटलं नाही. पण इंदिराची आठवण यायची. काही दिवस ते फेसबुकवर कॉन्टॅक्टमधे होते. पण घर सोडल्यावर सुमन बाईंनी इंदिरा कडून स्मार्ट फोन घेऊन घेतला आणि इंदिराने सोशल मीडियाला राम राम ठोकला. आज सात आठ वर्षांनी तिला परत बघितल्या बरोबर त्याच्या मनात तिच्या विषयी दडलेल्या भावना जागृत झाल्या.

ते दोघेही खोली नंबर 201 मधे ( त्यांच्या हॉटेलचा VIP सूट ) गेले. त्यांना बघताच नर्सने त्यांना शांत राहायचा इशारा केला. अनुभवला सलाईन लावलेली होती आणि तो शांत झोपलेला होता. इंदिरा त्याच्याजवळ जाऊन बसली. नमनचा मोबाईल वाजला. तो खोलीच्या बाहेर गेला.

"काय झालं यांना?" इंदिराने नर्सला खोली बाहेर नेऊन विचारलं.

"फूड पॉईझन झाल्या सारखं दिसून येतेय. डॉक्टर अर्ध्या तासा आधीच बघून गेले. ते म्हणाले दोन तीन दिवस लागतील ठीक व्हायला."

"ओके !"

"झोपले कधी?"

"डॉक्टर गेले आणि हे झोपले म्हणून तुम्हाला शांत राहा म्हटलं."

"अर्धा तास आधी म्हणजे साडे दहाला झोपला." इंदिरा घड्याळात बघून म्हणाली, "अजून दोन तीन तास साहेब नाहीच उठणार म्हणजे."

"हो, रात्रभर जागीच होते असं सांगत होते ते डॉक्टरला."

"ओके ! यांच्या घरी कळवलं कोणाला?"

"ते तर तुमच्या सोबत आलेल्या सरांना माहित. मी तर हॉस्पिटल कडून नर्सिंगच्या ड्युटी साठी आली आहे."

"ओह. सॉरी !"

"इट्स ओके."

इंदिरानी सुबोधला फोन करायला मोबाईल काढला तर त्याचाच ऑलरेडी व्हाट्सअपवर मॅसेज आलेला.

"मला माहित आहे अनुभवला फूड पॉईझन झालं म्हणून. त्यानं पहाटेच सांगितलं मला. पण तो तुला सांगणार नाही याची खात्री होती मला म्हणून मी फोन करून तसं बोललो. सॉरी म्हणणार नाही कारण मला माहित आहे तुझं त्याच्यावर प्रेमही आहे आणि तुला त्याची काळजीही आहे पण सरळ सांगितलं असतं तर तु इगोपायी त्यानं बोलावलं नाही म्हणून तिथे गेली नसतीस. तुझाच सखा !"
मॅसेज वाचून इंदिरा स्वतःशीच हसली. किती बरोबर ओळखतो हा आम्हा दोघांनाही.

दुपारचे बारा वाजले. अनुभव गाढ झोपीत होता. सलाईन पूर्ण झाली. नर्सने ती काढून ठेवली. एक वेटर इंदिरासाठी नमनची चिट्ठी घेऊन आला. चिठ्ठीत लिहीलं होतं,

"अनुभवची झोप डिस्टरब होईल म्हणून लँडलाईनवर फोन केला नाही आणि तुझा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. तूझ्यासाठी जेवण पाठवलं आहे. प्लीज जेवून घे उपाशी राहून तुझीही तब्येत खराब झाली तर अनुभवच्या शेजारीच तुलाही सलाईन लावावी लागेल आणि नाव खराब आमच्या हॉटेलचं होईल."

आधी तर अनुभवला असं बघून तिला जेवण करणं काही रुचलं नाही. पण नमन म्हणतो तशी विकनेसमुळे तिचीही तब्येत खराब झाली तर खरंच सर्वांना टेंशनदायक होईल. 

तिने कसं तरी थोडंसं खाऊन घेतलं आणि नर्सला जेवायला पाठवून परत अनुभव जवळ जाऊन बसली. त्याला असं शांत पडलेलं पाहून तिला आठवलं, ती त्याला मुंबईला भेटायला जायची तेव्हा तो असाच तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायचा आणि ती कितीतरी वेळ त्याच्या केसांमधून हात फिरवत बसायची. कुठे गेला तो काळ, ती वेळ? आम्ही कुठे कमी पडलो एकमेकांसाठी? विचार करतच तिचे डोळे लागले आणि अनुभवची झोप उघडली. 

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

🎭 Series Post

View all