एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-9

Its a story of a young, witty, amazing, funny & stubborn girl, her hardwork to get her dreams. Thank you

भाग 9



"काय गं मिनू सकाळी सकाळी काय काम काढलंस?" ललिताला मिनूनं काही बोलायला बोलावलं होतं. ती आली.

"इंदिराला मी पुण्यात एका MPSC ची तयारी करून घेणाऱ्या निवासी अभ्यास वर्गाला पाठवत आहे. सहा महिन्या साठी साठ हजार फि आहे. दोन इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचं म्हटलं तरी तिस हजार भरायचे आहेत ऍडमिशनच्यावेळी. पण माझ्याकडे फक्त विस हजारच आहेत. ओमची सेव्हिंग आमच्या खर्चांसाठी पाहिजे. आईजवळ जमा केले आहेत काही पैसे पण तिला फोन करताच ती परत  कधी येतेय, लग्न कधी करतेय? बापरे खूप इमोशनल ब्लॅकमेल करेल ती. तु मला दहा हजार उधार दे ना प्लीज !"

"मी देऊन देईल काही प्रॉब्लेम नाही. पण इतका ताम झाम का करताय तुम्ही? मला काही कळत नाही."

"अगं ती नाही राहू शकत मुंबईत."

"मग मुंबईच्या बाहेर एखादा असा जॉब शोधून देऊ तिला."

"मीही तेच म्हणतेय." इंदिरा गरम गरम पोह्यांची प्लेट घेऊन आली, "मला स्वतःला काही करु दे. मला आपल्या पायांवर उभं होऊ दे. आधीच मला सुनावलं गेलं आहे कि मला कवळी कमवायचीही अक्कल नाही. तु असं आयतं मला सगळं देशील तर तेच खरं होईल ना !"

"पण तुला एकटं सोडायला मन नाही मानत माझं." मिनू जोर देऊन म्हणाली.

"हा म्हणजे तुझा विश्वास नाही माझ्यावर?"

"अगं आहे. पण... "

"पण बिन काही नाही." इंदिरा ललिताकडे वळून म्हणाली, "तु असिस्टंटचा वगैरे जॉब शोध माझ्यासाठी. फक्त मुंबईच्या बाहेर."

"हो नक्कीच !"




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




मिटिंग बरखास्त झाली. इंदिरासाठी जॉब शोध जोरा शोरात सुरु झाला. ओम आणि मिनूचा वेळ शूटिंगच्या तयारीत जाऊ लागला. आधी डायलॉग पाठांतर करा, आरशात पाहुन हावभाव नीट आहेत कि नाही ते पाहा. मग कोणत्या सीनसाठी कोणते कपडे घालायचे, शूज, चप्पल, मेकअप आणि इतर एसेसरीज, मग स्वतःला फिट ठेवण्यासाठी हे नका खाऊ, ते नका करू, चेहऱ्याचे वेगळे व्यायाम, पोटाचे वेगळे व्यायाम, प्रत्येक अवयवाचा व्यायाम, बापरे किती ताम झाम ! त्यांना पाहुन इंदिराला वाटायचं, बरं झालं हे ऍक्टिन्ग करायचं माझ्या मनात आलं नाही. आता कळलं अनुभव सिन्हा इतका रूड, खडूस आणि टेन्शन दायक का आहे. हिट मुव्हीज देता देता आणि सगळं मॅनेज करता करता त्याच्या अंगातही खूप हिट जमा झाली आहे. त्यात एकही गर्लफ्रेंड टिकत नाही. म्हणून कि काय डोक्यात लाव्हारस जमा झाला आहे साहेबांच्या. जाऊदे आपल्याला काय ! आपण परत त्याला कधीच पाहणार नाही आता प्रत्यक्षात. 



"इंदिरासाठी एक खूप छान जॉब मिळाला आहे." ललिता चार दिवसांनी खुशखबर घेऊन आली, "एका HR फ्रेंड् कडून माहित झालं."

"काय? जॉब प्रोफाइल तर सांग." मिनूनं क्युरीअसली विचारलं.

"एक मोठा NRI आहे. त्याची 80 वर्षाची दोन्ही पाय लखवा मारून गेलेली, आई एकटीच कर्जतला फार्म हाऊसमधे राहते. तिला पाहायला, तिच्याशी बोलायला, तिच्या सोबत राहायला त्यांना एक चोवीस पंचवीस वर्षाची, ग्रॅज्युएशन तरी शिकलेली, इंग्रजी, हिंदी आणि मराठी तीनही भाषा बोलता, लिहिता व वाचता येणारी असिस्टंट हवी आहे."

"अगं पण मग इंदू अभ्यास कधी करेल?"

"इंदू आधी जॉब करेल, तिच्या पोट पाण्याची सोय करेल. मग अभ्यास करून परीक्षा देईल." इंदिरा मधेच येऊन म्हणाली.

"शांती ठेवा मुलींनो. 80 वर्षाच्या आजीला पाहायला चोवीस तास एक नर्स आहे, एक माळी, एक धोबी, एक स्वयंपाकी आहे. आजी दिवसाला 10 प्रकारच्या गोळ्या घेतात. दुपारी जेवल्यावर दोन तीन तास झोपतात आणि रात्रीही लवकर झोपतात. त्यामुळे इंदिराला भरपूर वेळ मिळेल अभ्यास करायला. कारण तिला फक्त आजीला तिचं एकटेपण जाणवू नाही द्यायचं. हे तर इंदिराला खूप चांगल्यानं जमेल बघ."

"हो का नाही. माझी आजी माझी बेस्ट फ्रेंड आहे. बस लग्न नाही केलं म्हणून नाराज आहे."

"हम्म !"

"पेमेंट किती देतील?"

"महिन्याला पंधरा विस हजार. खायचं, राहायचं, काहीच टेन्शन नाही." ललितानं सांगितलं.

"पण इंदिराला एकटं कसं पाठवायचं असं?" मिनूनं आपली शंका बोलून दाखवली.

"अरे आपण इंटरव्यू दिला नाही अजून !"

"हो मिनू, तु आताच टेन्शन नको घेऊ. तु हिरोची बहीण आहेस. टेन्शननं तूझ्या चेहऱ्यावर पिंपल आले तर हिरो ओळखायचा नाही तुला."

"इंदू.." मिनूनं तिला उशी फेकून मारली.




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




दुसऱ्याच दिवशी इंदिराचा इंटरव्यू त्या NRI च्या मॅनेजर सोबत फिक्स झाला. इंटरव्यू ताज हॉटेलमधे होता. मंडळ खुश झालं कारण या निमित्ताने इंदिरा, मिनू, ललिता आणि ओमला 'गेट वे ऑफ इंडिया'ला भेट देता येईल. मिनूनं इंदिराला कितीही टिप्स दिल्या तरीही ती आपली नेहमी सारखीच साधा पेहराव, हायनेक व्हाईट कुर्ता आणि जीन्स घालून गेली. पाहते तर तिथं आणखी चार मुली बसलेल्या. एकदम टकाटक तयार होऊन आलेल्या. त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव होता जसं त्या इंग्लिश फक्त बोलत नाहीत तर खातात, पितात आणि राहतातही इंग्लिश.

"तुला म्हटलं होतं मी. थोडी लिपस्टिक तरी लाव. पण तु आहेस की... " मिनू इतर मुलींचा नखरा पाहुन इंदिराला म्हणाली.

"मिनू तु असं मला डिमोटिव्हेट करायला आली माझ्यासोबत आत?" इंदिरानं तिला विचारलं.

"नाही गं, मी फक्त.... "

"इंटरव्यू होऊन रिजल्ट येऊ दे मग. आणि जास्त टेन्शन नको घेऊ."

"ओके !"

सर्व मुलींना एम्प्लॉयी फॉर्म देण्यात आले. ते भरून झाल्यावर इंटरव्यूला सुरवात झाली. पहिली मुलगी हसतच, छान आत्मविश्वासाने आत गेली. बाहेर आली ते रागातच. तन फन करत निघून गेली. दुसरीही जातांना अगदी उत्साहात गेली पण आली ती बडबडत, "हा असला इंटरव्यू असतो, घरात टिव्ही असून बघायचा नाही, स्मार्टफोन असून फेसबुक, इंस्टाग्राम वापरायचं नाही, फिल्म इंडस्ट्री बद्दल तर शब्दही काढायचा नाही. गजब !"

तिसऱ्या क्रमांकावर इंदिराला बोलावण्यात आलं.

"मे आय कम इन सर?"

"यस, कम इन." हँडसम तरुण इंटरव्यूवर आत सोफ्यावर बसलेला होता. 

"मे आय सीट?"

"यस ! मी सुबोध जाधव." त्यानं आपली ओळख करून दिली, "मिसेस आशा, म्हणजेच आजी, यांच्यासाठी असिस्टंट निवडायची जबाबदारी मला माझ्या सरांनी दिली आहे. तुझा पूर्ण बायोडाटा मी वाचला. तेव्हा नाव, शिक्षण यात वेळ वाया न घालवता, मुद्द्याचं बोलु."

"हो सर!"

"फिल्म इंडस्ट्री, हिरो हिरोईन बद्दल काय वाटतं?"

"काहीच नाही. "

"म्हणजे?"



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"म्हणजे तीही इतर रोजगार देणाऱ्या इंडस्ट्री सारखीच आहे. हिरोईन हिरो त्यांचं काम करतात आणि आपलं पोट भरतात. इतकंच वाटतं मला."

"म्हणजे तुला इंडस्ट्रीबद्दल काहीच क्रेज नाही. जसं तरुण पिढीला नेहमीच असतं."

"नाही." इंदिरानं सिम्पली नाही असं उत्तर दिलं.

"गुड ! आता दुसरा प्रश्न असा की जर तुला सांगितलं की कोणत्याही टेकनॉलॉजिचा म्हणजे, टीव्ही, स्मार्ट फोन, लॅपटॉप, कम्प्युटर यांचा उपयोग न करता तुला आजीचं मनोरंजन करायचं आहे तर तु ते कसं करणार?"

"एकदम सोपं आहे सर. मी आजीसोबत वेगवेगळे इनडुअर गेम खेळू शकते. जसं 'चोर, पोलीस, शिपाई ' 'नाव गाव वस्तू प्राणी' 'चिमणी उड, कावळा उड, कार्ड्स, कॅरम, चेस चंमफूल, चंगाष्टा, लिस्ट खूप मोठी आहे."

"अच्छा ! लहानपणी खेळलो आम्हीही हे सर्व भरपूर. पण आता स्मार्टफोन शिवाय एकही काम करावं वाटत नाही. तु स्मार्ट फोन शिवाय राहू शकणार का? आजीला स्मार्ट फोन वापरणारी व्यक्ती तिच्या आसपासही नको. फार्म हाऊस वर जो स्टाफ आहे तो आशा मॅम समोर अजिबात स्मार्ट फोन वापरत नाही. किंवा असं म्हटलं तरी चालेल की ते आपला फोन फक्त आपल्याच रूममध्ये वापरतात."

"काही प्रॉब्लेमच नाही हो सर. कारण माझ्याकडे स्मार्ट फोन आहेच नाही. माझ्याकडे हा फोन आहे." इंदिरानं तिचा नोकियाचा साधा मोबाईल त्यांना दाखवला.

"व्हेरी गुड ! पण आमच्या आशा मॅम थोडया खडूस आहेत. कारण नसतांना रागवतात, बोलतात, त्यांना मुलींचं जास्त नट्टा पट्टा करणं आवडत नाही. म्हणजे त्यांना काय नाही आवडणार काहीच सांगता येत नाही. एक असिस्टंट म्हणून तुला चोवीस तास त्यांच्या सोबत राहावं लागेल. तेव्हा तु त्यांना कसं हॅन्डल करशील?"

"सुबोध सर, असं म्हणतात माणसाचं जसं जसं म्हातारपण येतं त्याचं लहानपण परत येतं. आशा आजीचंही तसंच होत आहे कदाचित. एकतर पाय गेल्यानं त्यांना उरलेलं आयुष्य व्हीलचेयरवर काढावं लागत आहे. सोबतीला मुलं तर नाहीतच मग नातवंडही नाहीत. नाती असूनही एकट्या आहेत. अशात चिडचिड होणारच सर. मी प्रयत्न करेल की त्यांना माझ्या कंपनीत बोर होऊ नये. मी सोबतीला असतांना कोणाची आठवण येऊ नये आणि त्यांनी रागावलंच मला तर मी सफाई न देता तेवढयापुरतं शांत बसणार, त्यांचं ऐकून घेणार आणि त्यांचा मूड पाहुन मग त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करेल."

"नाईस, पण बोलण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात खूप फरक असतो बरं इंदिराजी." सुबोध मिश्किलपने म्हणाला.

"हो, पण विश्वास ठेवा. मी तुम्हाला निराश करणार नाही."

"आम्हाला तुमच्या सारखीच मुलगी हवी आहे. पण बाहेर बसलेल्या मुलींना असंच पाठवणं बरोबर नाही. तेव्हा एक फॉर्मॅलिटी म्हणून मी त्यांचे इंटरव्यू घेऊन घेतो. तु बाहेर वाट पाहा. आणि हो आणखी एक गोष्ट आम्ही तुमच्याकडून एक वर्षाचा बॉण्ड लिहून घेऊ. या एक वर्षात आपण जॉब सोडून जाऊ शकणार नाही. बॉण्ड तोडला तर पाच लाख भरावे लागतील. तेव्हा विचार करून घ्या नीट काय करायचं ते."

"ओके सर !"

इंदिरा हसतच रूमच्या बाहेर आली. तिचा चेहराच सांगत होता की तिला हा जॉब मिळाला. पण ती तिथं रिसेप्शन एरियात काहीच न बोलता मिनूला हात पकडून वॉशरूममध्ये घेऊन गेली.

"अगं कुठे नेतेय. मला नाही जायचं वॉशरूमला."

"मिनू मी सिलेक्ट झाली." इंदिरा तिला मिठीत घेऊन म्हणाली.

"अगं मग वॉशरूममध्ये येऊन का सांगतेय?"

"कारण सर म्हणाले की सर्व मुलींचे इंटरव्यू घेतल्यावरच तुझं नाव जाहीर करु."

"अच्छा, असं होय."



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"हो, पण मला राहवलंच नाही तुला सांगितल्या शिवाय म्हणून तुला इकडे घेऊन आली. चल आता जाऊन बसू तिकडे."

दुपारी दोन वाजता इंटरव्यू संपले. सुबोधनं इंदिराला परत बोलावलं.

"यस सर !"

"मग काय ठरवलं? बॉण्ड साइन करणार ना !"

"हो सर, मला हा जॉब हवा आहे. माझ्या बहिणीचं लग्न आहे पुढल्या महिन्यात आणि मला माझ्या मिळकतीतून तिला गिफ्ट घेऊन द्यायचं आहे."

"ओके ! हे पेपर्स वाचून साइन करून दे." सुबोध जागेवरून उठून म्हणाला, "मी फ्रेश होऊन येतो. मग जेवण करु."

"ओके सर!"

इतका मोठा बॉण्ड कोण वाचणार? इंदिरानं काही पेजेस वाचले आणि फटाफट साइन करून टाकल्या.

"ओके झालं तुझं?"

"हो !"

"चला मग लंचला. इथला बुफे लंच खूप छान असतो."

"सर तुम्ही जा ! मी नाही येऊ शकणार."

"का? आता तर थोडया वेळा पूर्वी हो म्हणाली होतीस. आता काय झालं? काही प्रॉब्लेम?"

"माझी मैत्रीण आली आहे सोबत."

"तिलाही घे सोबत."

"नको, मी ऐकलं की इथे एक साधी चहा दोनशे रुपयाला मिळते. मग जेवण कितीचं होत असेल? उगाच दोघींचा खर्च येईल तुमच्यावर."

"अच्छा ! खूप प्रगती करशील तु. काही प्रॉब्लेम नाही. घे मैत्रिणीला सोबत." सुबोध स्मित करून तिला म्हणाला. तो हसतांना खूपच गोड दिसत होता.

'मला मोठा भाऊ असता तर त्यानं मला असंच ट्रीट केलं असतं',  इंदिराच्या मनात आलं.

मिनूनं खूप नको नको म्हटलं पण इंदिरा बळजबरीनं तिला लंच करायला घेऊन गेली. तिथं इतक्या प्रकारचे पदार्थ की काय खावं आणि काय राहू द्यावं?  यातच कितीतरी वेळ गेला. इतकं सगळं त्यांनी कधीच बघितलंही नव्हतं. मग सुरवात गोड पदार्थापासून झाली. पेस्ट्रीज वर ताव मारल्यावर  पनीर टिक्का, सिजलऱ, चिकन तंदुरी थोडं थोडं पोटात गेलं आणि मेन कोर्स यायच्या आधीच पोट भरलं. असं वाटत होतं डब्यात भरून घेऊन जावं रात्री जेवायला. आपल्या केविलवान्या परिस्थितीवर हसावं की रडावं असं झालं त्यांना. 

सुबोधला बाय करून दोघीही ताज हॉटेलच्या बाहेर आल्या आणि स्वतःच्या परिस्थितीवर खूप हसल्या. ओम त्यांना गेट वे ऑफ इंडियावर न्यायला आला. तिघेही सेलिब्रेशन साठी गेट वे ऑफ इंडियावर गेले. आजचा दिवस त्यांचा होता. उद्यापासून तिघांनाही आपापल्या कामाला लागायचं होतं.



ओम आणि मिनूची शूटिंग सुरु होणार होती अनुभव सिन्हा सोबत तर इंदिरा सुबोध सोबत कर्जतला आशा आजीला भेटायला आणि मग तिथंच राहायला जाणार होती.



आजीसोबत तिची भेट कशी राहणार? तिला हा नवीन जॉब मनाजोगे फळ देईल का? अनुभव सिन्हा चा तिच्या जीवनातील चाप्टर इथेच संपणार का? नक्कीच वाचा पुढल्या भागात.



एक उनाड वाट भाग 8 इथे वाचा



धन्यवाद !



©®अर्चना सोनाग्रे वसतकार 


🎭 Series Post

View all