एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-8

Story of young fun loving, witty girl. Thank you

एक उनाड वाट भाग 8

सकाळी सकाळी मिनूला पाहुन इंदिराचा आनंद गगनात नाही मावला. दोघींनी छान गप्पा मारल्या. मिनुची आई काही दिवस बहिणीकडे राहायला गेली म्हणून तिच्यासोबत मुंबईला आली नाही. इंदिराच्या घरी सर्व ठीक होतं. आई तिच्याबद्दल बोलत नाहीत. पण बाबानी विचारपूस केली. हे ऐकून इंदिराला फार बरं वाटलं. जून मधे ठरलेल्या तारखेला प्रियाचं लग्न होईल. तिला गिफ्ट स्वतःच्या कमाईतून द्यावं असं इंदिराला वाटत होतं. पण जॉब तर गेला. आता साधा सिम्पल ऑफिस वर्क वाला जॉब करायचं तिनं मनाशी पक्क केलं.

"आली का मिनू?" ललितानं दारात उभं राहूनच विचारलं.

"हो, थोडा वेळ झाला. ये आत." मिनूनं तिला आत बोलावलं.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"कशी आहेस? "

"छान ! तु? आणि आज शूटिंग / ऑडिशन वगैरे नाही का? "

"मी पण छान आहे. आज जरा फ्लॅट स्वच्छ करतेय. म्हणूनच कचरा खाली ठेवायला जात होती तर दार उघडं दिसलं. "

"अरे वा !"

"इंदिरा कुठे गेली."

"अंघोळीला !"

"ती नक्कीच एक टॉपची हिरोईन बनेल बघ आणि मनावर घेतलं तर राजकारणातही काम करेल चांगलं."

"बापरे !" मिनूनं हसत विचारलं, "असं काय केलं इंदिरानं? ती आहे चांगली डेरिंगबाज. राजकारणात जाईलही. पण तिला हिरोईन बनण्यात मुळीच रस नाही."

"मग ती इथे काय करतेय? "

"तिला राहायला कुठे जागा नव्हती. खास म्हणजे मुंबईत ती कोणालाच ओळखत नाही म्हणून तिला म्हटलं राहा माझ्यासोबतच."

"तिनं तुला माझ्या बद्दल काही सांगितलं नाही वाटतं."

"का बरं? तु काही फालतुगिरी केली नाही ना तिच्याबाबतीत?" मिनूला शंका आली.

"ते झालं असं कि..... " ललितानं तिला झालेला पूर्ण किस्सा सांगितला.

"म्हणून मी ठरवलं, आता फक्त नवीन आलेल्या मुला मुलींना फिल्म इंडस्ट्रीत जॉब मिळवून द्यायची एजेंसी सुरु करायची. माझ्या ओळखीचा मला आणि त्यांनाही चांगला फायदा होईल. ऑडिशन देत राहायचं, छोटे मोठे रोल करत राहायचं. कमीत कमी मानसिक शांतता तरी राहणार डोक्याला आणि चार चौघात लोक इज्जतिनं बोलतील."

"दारूचं काय?"

"तिलाही सोडलं आता. बघ त्या कचऱ्यात दारूच्या बाटल्याच आहेत सर्व."

"अरे वा ललिता चेंज झाल्या एकदम." इंदिरा डोकं पुसत हॉलमधे आली. "आजपासून आमच्या तुम्ही ललिता मॅडम !"

"आणि तु आमची समुपदेशक!"

"काहीही मिनू !"

मी सायकोलॉजि हा विषय फक्त आईला जाणून घेण्यासाठी

घेतला अभ्यासाला आणि मला कळतेय तिनं केलेल्या खूप गोष्टी माझ्यासाठी योग्यच झाल्या. फक्त ज्या प्रकारे तिनं त्या केल्या तो प्रकार अयोग्य !"

मिनूचा फोन वाजला, "हॅल्लो ! हा सर येत आहे मी ऑडिशनला. हो पोहोचते एक तासात." फोन ठेऊन, "चला आपलं ऑडिशन आहे. बाकी बाते ऑडिशन के बाद!"

"हो जा, मी कचरा खाली नेते." ललिता गेली.

"मला जवळपास एखाद्या नेटकॅफेत सोडून दे!" इंदिरा मिनूला म्हणाली.

"कशाला?"

"मला मॉन्स्टर, नौकरी आणि इंडिड वर माझा रिझ्युम टाकायचा आहे. आणि ऑफिशियल जॉब सर्च करायचे आहेत."

"ते तु माझ्या मोबाईलवरही करू शकते."

"तुझं ऑडिशन आहे ना !"



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"हो, पण ऑडिशन असं गेलं आणि झालं, असं नसतं गं ! एकाच वेळी वेगवेगळ्या रोल साठी ऑडिशन असतात. भरपूर मुलं / मुली असतात. खूप वेळ जातो. तुही ऑडिशनला सोबत चल माझ्या."

"मी नाही देणार हं ऑडिशन बिडीशन." अंगावर पडलेली पाल झटकावी तसं इंदिरा म्हणाली, "इतरांसारखं तुलाही वाटतं का कि मला हिरोईन बनायचं आहे?"

"नाही माझी माय, मी तूझ्या बाबाला वचन दिलं कि तुझं लक्ष ठेवेल. तुला सुरक्षित ठेवेल. म्हणून म्हणतेय सोबत चल. मी ऑडिशनचं बघेल आणि तु एका जागी बसून माझ्या मोबाईलवर हवं ते कर. समजलं?"

"हो!"

"आटप मग लवकर. एका मोठया बजेटच्या मुव्ही साठी फिमेल/ मेल साईड रोलचं ऑडिशन आहे. हा रोल मिळाला ना तर बरं होईल म्हणाला ओम."

"मग तर नक्की मिळेल हा रोल तुला."

"बघू! तु तो पिंक वाला कुर्ता सलवार घाल. ऑडिशनला जातोय ना. मला रोल मिळाला ना तर पार्टी करू, बिचवर मस्ती करू आणि खूप सारे फोटो काढू."

"हो!"



अंधेरी वेस्ट च्या एका मोठया स्टुडिओत ऑडिशन सुरु होतं. स्टुडिओच्या आवारात 200 ते 250 मुलं मुली जमा होत्या. सर्वांनी खूप छान तयारी केलेली दिसत होती. काही एकमेकांसोबत प्रॅक्टिस करत होते, काही एकटेच प्रॅक्टिस करत होते, काहींची फिल्म कोणाची आहे, मेन लीड कोण आहेत याबद्दल चर्चा करत होते, तर काही शांत बसून होते आणि काही मोबाईलमधे गुंग होते. मिनूही ओमसोबत डायलॉग बोलायची प्रॅक्टिस करू लागली आणि इंदिरा एका कोपऱ्यात बसून मिनूच्या मोबाईलवर तिचं काम करू लागली. 

ती इतकी गुंग झाली मोबाईलवर जॉब शोधण्यात कि अनुभव सिन्हा ऑडिशन घ्यायला आला, याकडेही तिचं लक्ष नव्हतं. पण त्याला ही दिसली होती. या मुलीला अजिबात ऑडिशन देता कामा नये हे त्यानं त्याच्या असिस्टंटला सांगितलं. ओम आणि मिनू ऑडिशनसाठी एक एक फॉर्मॅलिटी पूर्ण करत होते. तेवढयात मिनुच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. इंदिरानं उचलला, "मिनू ऑडिशन देतेय." असं तिनं हळूच सांगितलं आणि फोन कट केला पण आईला ऐकू गेलं नाही. त्यांनी परत फोन केला.

"मिनू मी ना मरणार आहे आता. ना तूझ्या बापानं माझी कधी फिकर केली ना तुझ्याकडे माझ्याशी बोलायला वेळ आहे. मरते मी आताच." मिनूच्या आईचं बोलणं ऐकून इंदिराला काही सुचलं नाही. म्हणून ती फोन घेऊन मिनूजवळ जाऊ लागली. तोच स्पॉट बॉयने तिला थांबवलं.

"आत नाही जाऊ शकत."

"का?"

"ज्यांचं नाव घेतलं आहे त्यांनाच आत सोडायचं सांगितलं आहे. तुझं नाव घेऊ तेव्हाच तुला आत जाता येईल."

"माझं नाव येणारच नाही. मी रजिस्ट्रेशनचा फॉर्म नाही भरला."

"काय? फॉर्म नाही भरला. तु आधी रजिस्ट्रेशन कर मगच आत जाता येईल ऑडिशनला."

"मला ऑडिशन नाही द्यायचं."

"हो का? मग इथे वेळ कशाला वाया घालवत आहे स्वतःचा आणि माझा."

"अहो मला फक्त फोन....."

"सिक्योरिटी, या मॅडमला बाहेर काढ स्टुडिओच्या." इंदिराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यानं सिक्योरिटीला बोलावलं.

"मॅडम, चला बाहेर." सिक्योरिटी तिला बोलला, "नाहीतर मला जबरदस्तीनं तुम्हाला बाहेर न्यावं लागेल."

"नको, मी जाते." इंदिरा स्टुडिओच्या बाहेर जाऊन एका झाडाखाली बसली. हातातला मिनूचा मोबाईल परत वाजला.  अर्थात मिनू च्या आईचाच कॉल होता.

"हॅल्लो, काकू प्लीज समजून घ्या. मिनू ऑडिशन देतांना फोनवर नाही बोलु शकत. तुम्ही माझ्याशी बोला. प्लिज!"

"हा अगं मी मिनूची मावशी बोलतेय. इथे बायका आलेल्या भेटीला अन ते फिल्म इंडस्ट्री बद्दल नको ते बोलल्या ताईला. म्हणून टेन्शन आलं होतं तिला. बस आत्ताच्या आता मिनूला बोलावते म्हणाली मुंबई वरून. मी समजावलं ताईला. झाली शांत ती. तुम्ही आरामात द्यावा ऑडिशन."

"हो का ! धन्यवाद मावशी. मला तर खूप टेन्शन आलं होतं."

"हो ठेवते मग. रात्री करा फोन झोपायच्या आधी."

इंदिराचं डोकं हलकं झालं. पण ऊन चांगलं डोकयावर आलेलं. कधी एकदा मिनू ऑडिशन देऊन बाहेर येते आणि आपण बाहेर जाऊ. असं झालं तिला. बारा वाजून गेले. मुलं / मुली जातांना दिसु लागले. पण मिनू किंवा ओम, दोघांचाही काहीच पत्ता नाही. बसून बसून बोर झाली. आत जावं तर सिक्योरिटीची तिच्यावरच नजर होती. ती तिथल्या तिथंच शतपावली करू लागली. जवळपास एखादी पाईप लाईन फुटलेली असेल. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं. इंदिरा ते चुकवून जात होती. तोच स्टुडिओतुन निघालेली एक कार तिच्या जवळून गेली आणि जातांना रस्त्यावर जमलेलं पाणी तिच्या अंगावर उडवून गेली.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"आंधळा आहेस कि काय? इतकी मोठी पाच फूट दोन इंचची मुलगी दिसत नाही तुला."

कार ड्राइवरला साईड मिरर मधे इंदिरा दिसली. त्यानं कार मागे घेतली. काच खाली करून त्यानं इंदिराला विचारलं, "काही म्हटलं का?"

"हेच म्हटलं कि माझे कपडे खराब झाले पाण्याने." इंदिरा तिच्या कपड्यांना पाहत बोलत होती. तिचं कार ड्राइवरकडे लक्षच नव्हतं. "माझा इतका सुंदर ड्रेस खराब झाला. भरपाई कोण करणार?"

"नाईस, आधी स्वतःच रस्त्यावर, पाणी असेल तिथं उभं राहायचं, मग रस्त्यावरून जाणाऱ्या कारचं पाणी अंगावर घ्यायचं आणि भरपाई मागायची. हिरोईन नाही बनता येत आहे तर हे धंदे सुरु केले का?" अनुभव सिन्हाचा पारा चांगलाच चढला, " चांगला धंदा आहे. पण माझ्यावर हे असलं try नाही करायचं."

"......... " अनुभव सिन्हाला पाहुन इंदिरा ब्लँक झाली.

"आता काय झालं बोलायला? मला ना भारी शंका येतेय तुझ्यावर. तीन वेळा योगायोग होणं अशक्य. तुला कोणी माझ्या मागं लावलं का हिरोईन बनण्यासाठी ?"

"......... "

"हॅल्लो, तुला काहीतरी विचारतोय मी !"

"......... " इंदिरा त्याला फक्त पाहतच होती. त्याचा पारा अजूनच चढला.

"काय डफर मुलगी आहे. परत माझ्या नजरेत यायचं नाही. अजिबात नाही. नाहीतर मुंबईतुन बाहेर फेकून देईल." तो रागातच गाडीत बसून निघून गेला. इंदिरा फक्त त्याच्या गाडीला विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत उभी होती.



"इंदू !" मिनू धावतच तिच्याजवळ आली, "मला हिरोच्या बहिणीचा रोल मिळाला आणि हिरो कोण आहे माहितेय?"

"......... " इंदिराचे डोळे भरून आले मिनुला पाहताच. "काय झालं इंदिरा?"

इंदिरा मिनुच्या गळ्यात पडून रडू लागली. काहीच बोलतही नव्हती. फक्त हमसून हमसून रडत होती.

"काय करायचं?"ओमनं इशाऱ्यानं विचारलं.

"टॅक्सी बोलाव!"

"बरं !"

ओमनं टॅक्सी बोलावली आणि ते एका हॉटेलात जाऊन बसले. मिनूनं तिला प्यायला पाणी दिलं.

"आता सांगशील का काय झालं ते? माझा जीव धडधड करतोय तेव्हाचा."

"हो इंदिरा, असं रडून काय होणार. तुला कोणी त्रास देतंय का?" ओम आपल्या अस्सल मराठी ठसक्यात म्हणाला, "तु फक्त सांग, वाट लावतो त्याची. मुंबईचा दादा आपला मित्र आहे."

"ओम !" मिनूनं त्याच्यावर डोळे वटारले, "इंदू बस झालं बरं. सांग काय झालं ते नाहीतर एक देईल कानाखाली."

"तु माझ्या आईपेक्षा वाईट आहेस."

"इंदू, मला आणि ओमला छान ब्रेक मिळाला पण सेलिब्रेशन करायचं सोडून आम्ही तूझ्या जवळ डोकं धरून बसलोय."

"ए wow !" इंदिरा रडायचं सोडून एकदम मूडमधे आली, "खरंच, काय रोल मिळाला तुम्हाला?"

"मिनूला हिरोच्या बहिणीचा आणि मला व्हिलनच्या भावाचा." ओमनं सांगितलं.

"मस्त ! कोणाच्या सोबत आणि लीड हिरो हिरोईन कोण आहेत?" इंदिराला इतकं खुश पाहुन मिनूला वाटलं आई बाबाची आठवण आली असेल हिला.

"हिरोईन मायरा आणि हिरो अनुभव सिन्हा आहे."

"काय?  आं SSS उं UUUU " इंदिरा परत रडू लागली.

"आता काय झालं इंदू?"

"अनुभव सिन्हाच आहे तो ज्याच्यामुळे मी रडत होती. झालं असं कि...... " इंदिरानं त्यांना पूर्ण स्टोरी सांगितली.

"तु अनुभव सिन्हाच्या घरी रात्रभर होती, आतापर्यंत तीन वेळा त्याला भेटली, एकदा तु त्याला I love u पण म्हटलं." ओम शॉक झाला.

"हे तु आधी का नाही सांगितलं मला?" मिनूनं विचारलं.

"तुला काय त्रास द्यावं म्हटलं? तु आधीच पर्सनल इशूमधे अडकलेली."

"मग आता काय करायचं म्हणतेस?" मिनूला वाटलं अनुभव सिन्हा सोबत काम करू नको असं म्हणते कि काय इंदिरा.

"काही नाही. फक्त फिल्म इंडस्ट्री पासून, तिथल्या लोकांपासून दूर राहायचं."

"आमच्या पासूनही?"

"माहित नाही. तुला माहितेय ना सहा वर्षांपूर्वी, आपण दहावीत होतो तेव्हा, अनुभवची पहिली मुव्ही आली होती तेव्हाच मी प्रेमात पडली होती त्याच्या. त्याचे फोटो माझ्या वहीत, उशीखाली, भिंतीवर दहावीची परीक्षा डोक्यावर आणि पोरीच्या डोक्यावर नटाचं भूत पाहुन आईनं झाडुनी मार दिला होता. आता तो प्रत्यक्षात माझ्या समोर आला कि ब्लँक होते मी. काहीच कळत नाही. शब्द तोंडातून बाहेर पडत नाही आणि त्याला वाटतंय कि मी जाणून त्याच्या मागं पडली आहे हिरोईन बनायचं आहे म्हणून."

ओम आणि मिनू काय करायचं म्हणून एकमेकांना नजरेनंच विचारू लागले.

...........

क्रमश :



धन्यवाद



©®अर्चना सोनाग्रे वसतकार 


🎭 Series Post

View all