एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-4

The story is all about a young girl & her understanding with the world. Thank you


एक उनाड वाट भाग पहिला इथं क्लिक करून वाचा



भाग -4



सकाळी सात वाजले, ठाणे जवळ आलं. तरीही इंदिरा गाढ झोपून होती. "काय झोपली ही? अजिबात भीती नाही कि काळजी नाही कि कोणी झोपीत उचलून नेलं, काही केलं तर? " मोठी काकू लहानीला म्हणाली.

"मग आजकालच्या पोरी अशाच असतात तायडे. सवय करून घे. तुझी होणारी सून यातीलच एक असणार."

"बारके तू येऊन जाऊन माझ्या सुनेवर का येते?" मोठी काकू लहानीवर जोरात ओरडली. इंदिराला जाग आली. मोबाईलमध्ये बघितलं, सात वाजले. तिनं पटपट अंथरून,  पांघरून आणि उशी आवरून सीटवर ठेवलं.

"कुठे उतरणार आहेस तू? ठाणे, दादर कि आणखी कोणत्या स्टेशनवर? "

इंदिरा काहीच बोलली नाही. ती सारखी मिनुला फोन लावत होती. पण मिनू तीचा कॉल उचलत नव्हती. 7-8 वेळा कॉल लावून झालं, मेसेज पाठवले. पण मिनूनं एकाही कॉलला कि मेसेजला उत्तर दिलं नाही. इंदिराचा चेहरा पडला.

"काय झालं?" मधल्या काकूंनी विचारलं.

"मैत्रिण फोन नाही उचलत आहे."

"मग आमच्यासोबत चल तायडीच्या मुलाकडे. तो आम्हाला मुंबई फिरवणार आहे. आपलं फिरून झालं कि त्याला सांगू तुला मैत्रिणीच्या पत्त्यावर सोडायला." मधलीचं म्हणणं ऐकताच मोठीनं तिला मान हलवून 'अजिबात नाही.' असा इशारा केला.

"नको काकू, तिनं पत्ता दिला आहे. जाते मी पत्त्यावर नीट." मोबाईलमध्ये बघत इंदिरा म्हणाली, "ज्युनियर ऍक्टरेस आहे ती. एखाद्या शूट मध्ये बिझी असेल."




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"बरं आम्ही ठाणेला उतरू. तू माझा नंबर सेव्ह करून घे. काही अडचण आली तर कॉल कर मला."

"हो, सांगा."

इंदिरानं त्यांचा नंबर सेव्ह केला. ठाणेला अर्धी रेल्वे खाली झाली. इंदिरानं त्यांना खूप मिस केलं. काही वेळातच दादर स्टेशन आलं.

"बापरे हे स्टेशन आहे कि काय?" रेल्वे स्टेशनला पाहुन तिच्या मनात आलं. आता अंधेरीला मिनूच्या पत्त्यावर कसं जायचं? रेल्वेनं कि टॅक्सीनं? इंदिरानं परत मिनुला कॉल केला.

"का उचलत नाहीये ही कॉल? जाऊनच पाहते तिच्या फ्लॅटवर. कदाचित तब्येत खराब झाली असेल तिची." असा विचार करून इंदिरा दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली. उबेर / ओला बुक करावी म्हणून तिनं मोबाईल काढला. तर तिला जाणवलं कि स्मार्ट फोन तर आईनं घेऊन घेतला होता आणि हा नोकियाचा सहा वर्ष जुना डब्बा दिला.



ती तरी काय करणार. आपण एकटं कुठे भरकटून जाऊ नये म्हणूनच तिनं सगळी उठाठेव केली. पण सॉरी आई, मला माझं हक्काचं आभाळ मिळवायचं आहे आणि बाबालाही मान मिळवून द्यायचा आहे. म्हणून मी ते घर सोडून आली.

आजूबाजूला खूप टॅक्सीज उभ्या होत्या. तिनं एका बाबाच्या वयाच्या टॅक्सीवाल्याला मिनूचा पत्ता दाखवला. त्यानं मिटरच्या हिशोबाने 250-300 लागतील असं सांगितलं. साधारण एक दीड तासानं ते मिनुच्या पत्त्यावर पोहोचले. तीन मजले चढून इंदिरा वर गेली तर बघते काय, मिनुच्या फ्लॅटला बाहेरून लॉक ! इंदिराला चक्कर आली. पाच दहा मिनिट ती खालीच बसली. शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवून त्यांना विचारलं मिनू बद्दल. तर ती बया उत्तरली.

"इथं फिल्म / टीव्ही इंडस्ट्रीत नाव कमवायला आलेलेच जास्त राहतात. जास्त करून खरी नाव न सांगता टोपण नावं वापरतात. येण्याची जाण्याची कोणाचीच ठरलेली वेळ नसते. त्यामुळे तुझी मैत्रिण मिनू कोण हे मी नाही सांगू शकत."

इंदिरानं चहा बिस्कीट शिवाय सकाळ पासून काहीच खाल्लेलं नाही. पोटात कावळे ओरडू लागले. कुठे गेली ही मिनू मला आशेवर ठेऊन? काय करु? कोणाला विचारू? कुठे जाऊ? तिला काहीच सुचत नव्हतं. दोन तास झाले वाट पाहुन. शेवटी एक वाजता ती बिल्डिंगच्या बाहेर आली.

"मुंबई नाहीच मुळी माझ्यासाठी," ती स्वतःशीच बडबडली. तिनं परत ठाणेला जाऊन काकू लोकांची मदत घेऊन पुण्याला एखाद्या रहिवासी स्पर्धा परीक्षा अभ्यास वर्गाला जायचं ठरवलं.




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



पण हे काय वातावरण एकाएकी ढगाळ झालेलं दिसलं. आता पाऊस कधीही येणार. म्हणून ती टॅक्सी, ऑटो शोधू लागली अन जोरात हवा, पाऊस सुरु झालं. रस्ता सुनसान. तिनं एका झाडाचा आडोसा घेतला.

"कहा जाना है मॅडमजी?" एक कार तिच्याजवळ येऊन उभी झाली. कारच्या ड्राइव्हरनं खालून वर तिला न्याहाळलं आणि विचारलं, "अरे बोलिये भी|"

"दिखाई नहीं देता तुझे, मॅडम थरथरा रही है थंड से |" ड्राइव्हरचा सोबती जीभ ओठांवर फिरवत म्हणाला, "पूछ मत | बिठाले सीधे|"

इंदिराला त्यांचं लक्षण ठीक नाही वाटलं. दोन्हीही हात छातीशी घट्ट लपेटून. ती झपाझप पावलं पुढे टाकू लागली. कार हळूहळू तिच्या मागे येत होती. ते दोघं तिच्या परिस्थितीची मजा लुटत होते.

"मी मुंबईत पाय ठेऊन सर्वात मोठी चूक केली." ती स्वतःला म्हणाली, "भूगत कर्माची फळं."

कार किती दूर आहे म्हणून तिनं मागे वळून पाहिलं. ड्राइव्हरच्या सोबत्यानं तिला फ्लाईंग किस दिला. तशी ती मागे पाहत जोरात धावत सुटली आणि एका कारवर जाऊन आदळली. कार मधून दोन माणसं बाहेर आली. एकानं तिला पलटवून बघितलं. तिच्या डोक्याला लागलेलं दिसलं. जखमेतून वाहणारं रक्त त्यानं आपला पांढराशुभ्र  रुमाल ठेऊन दाबून धरलं. इंदिराला कार मध्ये घेऊन ते निघून गेले.

इंदिरानं डोळे उघडले तेव्हा रात्र झाली होती. ति एका सुंदर, टापटीप रूम मध्ये बेडवर होती. तिला वाटलं त्या ड्राइव्हर आणि त्याच्या सोबत्यानं तर आपल्याला इथं आणलं नाही ना. ती एका कारला जाऊन धडकली होती इतकंच तिला आठवलं. तिचे कपडेही कोणीतरी बदलले होते. टी शर्ट जीन्सच्या जागी तिच्या अंगावर कॉटनचा प्रिंटेड पांढरा कुर्ता पायजमा होता. तिनं कपाळावर हात मारला.

"आह ! आई आई गं !" तीची जखम दुखली अन तिच्या तोंडातून किंचाळी बाहेर आली. ती ऐकून एक पंचवीस तिस वर्षाची पांढरा शर्ट आणि निळा ट्राऊझर घातलेली, केसांचा फ्रेंच बन आणि लाईट मेकअप केलेली नेपाळी मुलगी तिच्याजवळ धावतच आली.

"तुम्ही ठीक आहे?"

"नाही. म्हणजे हो आहे. माझा हात लागला कपाळावर आणि दुखलं खूप."

"हो, डॉक्टर म्हणाले काही दिवस लागतील जखम भरायला. तुम्ही काळजी करू नका. औषधी घ्या वेळेवर. माझं नाव ओशिन. काही लागलं तर मला आवाज द्या. मी शेजारच्या रूममध्ये आहे ."

"ते सर्व ठीक आहे. पण मी आहे कुठे आणि माझे कपडे, माझी बॅग??? माझे महत्वाचे कागदपत्र आहेत त्या बॅगमध्ये."

"आमच्या सरांच्या गाडीला धडकल्या होत्या तुम्ही. ते तुम्हाला घेऊन आले इथं सर्व्हंटरूम मध्ये आणि मग... "

"मग त्यांनी बदलले माझे कपडे. असं कसं करू शकतात ते?  त्यांना काही लाज ." इंदिरा अगदी फिल्मी स्टाईलमध्ये विचारात हरवली.

"मला सांगितलं तुमचे कपडे बदलवून घ्यायला आणि तुमची बॅग भिजली होती म्हणून सर्व सामान काढून वाळू घातलं हे इकडे." एका बाजूला टेबलवर इंदिराला तिचं सर्व सामान ठेवलेलं दिसलं आणि तिच्या जीवात जीव आला.

"खूप खूप धन्यवाद. मी आजन्म तुमची आभारी असेल."

"आभार मानायचे असतील तर आमच्या सरांचे माना. त्यांनी तुम्हाला वाचवलं. नाहीतर एखाद्यानं विचार केला असता  इतक्या पावसात कोण पाहणार काय झालं ते आणि सोडलं असतं तिथंच तुम्हाला. पण सर तसे नाहीत. ते सर्वांची खूप काळजी घेतात. म्हणून लोकं जरी त्यांच्या बद्दल उभं आडवं काहीही बोलत असतील तरीही माझ्यासाठी ते ग्रेट आहेत."

"बापरे ! असं दिसतं कि खूपच आवडतात तुमचे सर तुम्हाला. " ओशिनचं सर पुराण ऐकून इंदिराच्या तोंडातून निघून गेलं.

"मलाच नाही हो, सर्वांना आवडतात ते. तुम्ही भेटल्या कि बघा तुम्हालाही आवडतील. चला मी जेवण आणते. मग औषधं घेऊन झोपा तुम्ही."

"हो !"

.................




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




ओहो ! कहाणी मे ट्विस्ट ! कोण असेल हा ओशिनचा सर? आणि मिनूनं का बरं इंदिराचा फोन उचलला नाही, मेसेजला रिप्लाय दिला नाही? आता इंदिरा पुढे काय करेल?



या सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन येते मी अर्चना पुढल्या भागात. तेव्हा पर्यंत आपला हा उनाड प्रवास असाच सुरु ठेवा ही विनंती.



धन्यवाद !



©®अर्चना सोनाग्रे वसतकार


🎭 Series Post

View all