एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-16

Story of a wandering young girl in search of her destination

आधीचा भाग खाली दिलेल्या लिंकवर वाचा



http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-15_6198



एक उनाड वाट भाग 16



जुलै एन्ड पर्यंत भारतातली शूटिंग संपली. आउट डूअर शूटिंगची तयारी सुरु झाली. मधे काही काळ फ्री मिळाला.

अशातच एका सकाळी सुबोध आणि अनुभव स्टडीरूममधे बसले असतांना,

"डायरेक्टर मेहताच्या पार्टीत जात आहेस का?" सुबोधने अनुभवला विचारलं.

"तुला काय वाटतं?"

"मला वाटतं जायला हवं. बिजनेसमन मिस्टर सोळंकी तिथे येणार असं ऐकलं आहे. त्यानं मेहताच्या येणाऱ्या सिनेमासाठी फंडिंग केलं आहे. आपल्या कर्जतच्या फार्महाऊसला लागूनच त्याचं शेत आहे दोन एकर. जे तुझ्या बाबांनी त्याला विकलं होतं. त्यानं विकायला काढलं आहे ते."

"असं आहे ! मग तर जावंच लागेल. मला काहीही करून ती जमीन परत मिळवायची आहे."

"मिळून जाईल. मी प्रयत्न केला सोळंकी सोबत बोलायचा पण थोडा इगो मॅटर आहे त्याचा असं दिसतं. म्हणून म्हटलं एकदा तु स्वतःच बोल."

"हो, त्यालाही तेच हवं असेल." थोडा विचार करून अनुभवनी सुबोधला विचारलं, "इंदिराला घेऊ सोबत?"

"तिलाच विचारलेलं बरं."



अनुभवनी फोन करून इंदिराला पार्टी बद्दल सांगितलं.

"मी नाही येऊ शकत."

"का?"

"माझ्याकडे पार्टीवेयर ड्रेस नाही. तेव्हा राहू द्या. अशा पार्टीज तर सुरूच राहतील. जाईल नंतर कधी."

"ठीक आहे. ड्रायवर सोबत जाऊन घेऊन ये तुला हवा तसा ड्रेस. काही इतर कपडेही घेऊन घे. मी ड्रायवरला क्रेडिट कार्ड देतो तुला द्यायला."

"अरे मला नको." ती बोलायच्या आधीच त्याने फोन कट केला.

इंदिरानं फोन ठेऊन दिला. तिला पार्टीत जायचं नव्हतं. खूप दिवसांनी मिळालेला वेळ तिला अभ्यास करायला हवा होता. पण अनुभवच्या आतला Angry young man जागी होऊ नये म्हणून ती ड्रायवर सोबत जायला तयार झाली. तिला वाटलं घेऊन घेऊ एखादा दीड दोन हजाराचा साधा सलवार सूट. इंदिरा शॉपिंगला जाणार हे माहित होताच, आजीनेही तिच्यासोबत शॉपिंगला जायचा ऐलान केला. आजीची व्हिलचेयर पकडायला उषा आणि शॉपिंग बॅग्ज घ्यायला शोभा असं सगळं महिला मंडळ मॉलमधे शिरलं.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




आजीनी जबरदस्तीने इंदिराला एक विस हजाराचा पिस्ता कलरचा अनारकली सूट घालून बघायला सांगितलं. इंदिरा अनारकली घालून चेंजिंगरूमच्या बाहेर आली.

"खूपच छान !"

"एखाद्या हिरोईन सारखीच दिसतेय."

"हाच घे !"

तिघींनी एका मागे एक कमेंट दिल्या.

"आजी विस हजारचा आहे हा. माझी एक महिण्याची सॅलरी आहे विस हजार."

"तुला कोणी सांगितलं विकत घ्यायला. माझ्याकडून गिफ्ट देतेय मी. अनुभवचं क्रेडिट कार्ड आहे ना."



"आजी असं नाही चालणार. हा रंग छान दिसतोय ना माझ्यावर. अशाच रंगाचा स्वस्त ड्रेस बघते मी."

एवढं बोलून इंदिरा तो अनारकली ड्रेस चेंज करायला परत ट्रायलरूमच्या आत गेली. पण इंदिराचे आधीचे कपडे गायब. तिचं स्वतःचं ATM आणि अनुभवने दिलेलं क्रेडिट कार्डही तिने तिच्या जीन्सच्या खिशात ठेवलं होतं. इंदिराचे हातपाय थंडे पडले. मॉलच्या एसीत तिला घाम फुटला. तिने तिथे हजर असलेल्या सर्व सेल्स गर्ल्सला विचारलं. नाही बघितलं, हे एकच उत्तर मिळालं. तिचा चिंताग्रस्त चेहरा पाहुन आजीनं विचारलंही काय झालं? पण इंदिरा बोलायच्या परिस्थितीत नव्हती. सेल्स गर्ल तिला मॅनेजरकडे घेऊन गेली. त्याला तिचे आधीचे कपडे ट्रायलरूम मधून गायब झाल्याचं सांगितलं. स्टोर मॅनेजरनं इंदिराला डोक्यापासून ते पायापर्यंत न्याहाळलं. इंदिराचा नो मेकअप चेहरा. मागे बांधलेले केस. कानात,  गळ्यात, हातात कुठेच ब्रँडेड वस्तूचा लवलेश नाही. आणि अंगावर मात्र ब्रँडेड विस हजाराचा अनारकली.

"मला प्लीज बाहेर जाऊ द्या. मी एक 10-15 मिनिटात पैसे घेऊन येते. माझं क्रेडिट कार्ड माझ्या जीन्सच्या खिशात होतं. तो नाही दिसत आहे."

"मॅडम तुम्ही स्वतःच तर तुमचे कपडे गायब नाही केले ना? कारण तुमच्या अवतारा वरून दिसतंय की तुम्ही काहीतरी चिंधीच घालून आल्या असनार इथे."

"माईंड युवर लँग्वेज सर. मी खरंच बोलत आहे."

"तुम्ही अनारकली खाली तर जीन्स घालून फिरत नाहीये ना. अनारकली जरा वर करून दाखवा बरं." तो डोळा मारून म्हणाला.

इंदिराला ते चांगलंच टुचलं. आजी, उषा, शोभा तिघीही होत्या सोबत. त्यांच्याकडे द्यायला हवं कार्ड तर खिशात ठेवलं,

 "इंदिरा तु कुऱ्हाड पायावर मारून नाही घेत तर कुऱ्हाडीवर पाय मारतेस." ती स्वतःला म्हणाली.

"हे बघा एकतर पेमेंट करा किंवा आमचा ड्रेस आम्हाला परत करा." मॅनेजर इंदिराला बेशरम होऊन म्हणाला.

"तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलत आहे ते? मी केस करू शकते तुमच्यावर यासाठी."

"आधी पेमेंट तर करा." त्यानं परत इंदिराला डोळा मारला. त्याच्या कानाखाली द्यायची इच्छा झाली तिला. अनारकलीचं पेमेंट केल्याशिवाय जाऊ देणार नाही हे तिला समजलं. अनुभवला सांगावं तर तो नक्कीच भयंकर रागवणार. तिने आजीकडून फोन घेऊन सुबोधला कॉल केला. त्यानं उचलला नाही. मिनू, ओम....  सगळे बिझी !



आजूबाजूला गर्दी जमा झाली. काहींना तिची कीव येत होती तर काहींना तिच्यावर हसू येत होतं.

"काय झालं? फोन नाही लागत आहे कोणाचाच?"

"हे बघा मी खरंच पैसे पे करते. हा ड्रेस नाही एखादा स्वस्तातला घालून घेते. पण मला जाऊ द्या. माझी म्हातारी आजी आहे सोबत. हे असं सगळं पाहुन त्यांची तब्येत खराब होऊ शकते."



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"अरे वा ! पूर्ण टोळीच आहे म्हणावी आणि तु काय माझी गर्लफ्रेंड आहेस का, कि तुला मी असंच जाऊ देऊ? हा पण बनायला तयार असणार तर, हाच काय पूर्ण स्टोर तुझंच." तो तिच्या खांद्यावर हात ठेऊन हळूच बोलला. तशी त्याच्या कानाखाली फाडकन बसली.

मिस्टर AYM ने त्याला चांगलं चोपलं. इंदिराच्यानं परिस्थिती हाताळणं होत नाहीये हे जाणून आजीनं अनुभवला फोन करून बोलावलं होतं. मंकी वॉश स्काय ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टी शर्टमधे तो एकदम हँडसम दिसत होता.

"सॉरी सॉरी सर. चुकलो मी. मी फक्त गंम्मत करत होतो मॅडमची. हवा तो ड्रेस घेऊन जा. सर्व कपडे तुमचेच आहे."

"मला फक्त माझे घालून आलेले कपडे हवेत."

"हे आहेत का?"एक सेल्सगर्ल इंदिराचा जीन्स टी शर्ट घेऊन आली.

"हो हेच आहेत. कुठे मिळाले?"

"ट्रायलरूम जवळचे कपडे आवरताना स्टोरच्या कपडयात मिक्स झाले असतील. आता घड्या मारून ठेवतांना दिसलं कि हे स्टोरचे नाहीत. म्हणून इकडे घेऊन आली."

इंदिराला रडू आलं. तिने मॅनेजरच्या गालात जोरात एक थापड हाणली.

"नीट डोळे उघडून बघून घ्या."

"सॉरी सॉरी !" तो कान पकडून म्हणाला, "मॅम तुम्ही आधीच का नाही सांगितलं कि तुम्ही अनुभव सिन्हाच्या गर्लफ्रेंड आहे म्हणून."

"तुला लात खायची आहे का आता?" अनुभव त्याची कॉलर पकडून म्हणाला.

"नाही, सॉरी सॉरी !"

इंदिरा तिचा जीन्स टी शर्ट घेऊन ट्रायलरूमच्या आत चेंज करायला जाणार तोच,



"एक ऑटोग्राफ प्लिज !"

"ऑटोग्राफ प्लिज!" करत मुली अनुभवभोवती ऑटोग्राफसाठी गर्दी करू लागल्या. इंदिराच्या लक्षात आलं कि अनुभव का बरं सार्वजनिक ठिकाणी बॉडीगार्ड शिवाय जाणं टाळतो. तिला  समजलं मीडियातले कोणी इथे यायच्या आधी इथून पळ काढणं गरजेचे आहे. इंदिरा अनुभवचा हात पकडून त्याला धावतच ती पार्किंगकडे घेऊन गेली.



"इंदिरा आजी तिथेच आहे."

"तुम्ही कार काढा आणि जा. मी उषाला कॉल करून पार्किंगला बोलवते. आम्ही येतो ड्रायवरसोबत घरी."




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




घरी आल्यावर अनुभवने इंदिराला गुगलवर स्टोरचा नंबर शोधून तिचा जीन्स टि शर्ट आणि इतर निवडलेले कपडे घरच्या पत्त्यावर मागवून घ्यायला लावले व ऑनलाईन पेमेंट केलं. आता परत कधीच मॉलमधे जाणार नाही शॉपिंग करायला. ऑनलाईनच ऑर्डर करेल. इंदिरानी ठरवलं.



रात्री पार्टीला जाणं तिच्या जीवावर आलं पण इतका ताम झाम करून आता येणार नाही म्हटलं तर वाईट वाटेल म्हणून ती तयार झाली. इंदिरानं हळदी कलरचा प्लेन, जॉर्जेट मटेरियल असलेला अनारकली, ज्याला गळ्याजवळ, घेराच्या काठाला सुदंर असं सोनेरी मण्यांचं जरदोजी वर्क केलेलं, त्यावर प्रिंटेड शिफॉन दुपट्टा घेतला. अर्धे केस क्लच लावून बाकी मोकळे सोडले, कानात छोटे डूल, कपाळावर छोटीशी टिकली. ओठांवर हलकी लाली.

"मैने प्यार कियाची भाग्यश्रीच दिसतेय." आजी हातांनी तिची नजर काढून म्हणाली, "सुबोध तुझा मित्र तिथे जाऊन बिझी झाला तर होऊ दे. तु इंदिराला एकटं सोडू नको."

"हो आजी."



तिघे रात्री नऊच्या सुमारास पार्टीत पोहोचले. ओळखी अनोळखी चेहऱ्यांना हाय हॅल्लो झालं. सिद्धी आली. तिने इंदिराला ओळखलं. कसं, काय, कधीपासून या प्रश्नांची उत्तर देण्यात सिद्धीसोबत ती बिझी झाली हे पाहुन अनुभव आणि सुबोध मिस्टर सोळंकी सोबत जमिनीबद्दल बोलायला गेले.

सोळंकी जणू याच दिवसाची वाट बघत होता.

"मी काय म्हणतो अनुभव तु त्या जंगलाचं काय करणार? ते फार्महाऊसही विकून टाक मला. मी त्यावर मस्त रिसॉर्ट बांधतो. पैसे तर देईलच पण तूझ्यासाठी रिसॉर्टचा एक लॅव्हिश सूट आजन्म बुक ठेवीन आणि तु म्हणशील तर बाकी बंदोबस्त पण करेल."

"म्हणजे तु ती जमीन विकणार आहे असं खोटं पसरवलं." अनुभव दोन्ही हातांच्या मुठा आवळून म्हणाला.

"हो, मला माहित होतं कि ही बातमी ऐकताच तु माझ्याकडे जमीन विकत घ्यायला येणार. मग मी तुला माझा सौदा सांगणार. बघ तुलाही माहित आहे हे हिरोगिरी, सिनेमे फक्त तरुणपन आहे तोपर्यंत, नंतरची सोय काय? फार्महाऊस विक  मला फायद्यात राहशील." सोळंकी अनुभवला म्हणाला.

"सोळंकी !" अनुभवनी त्याची कॉलर पकडली. पार्टीतले सर्व त्यांनाच पाहु लागले. बुफे जवळ उभी राहून, चिकन तंदुरी, चिकन कबाब, चिली चिकन, फिश फ्राय, पनीर टिक्का, मन्चुरिअन, आईस क्रीम, पेस्ट्रीज, कि सिजलऱ... सर्वात आधी काय टेस्ट करायचं या विचारात असलेल्या इंदिराला काय होत आहे ते लक्षात आलं. ती लगेच त्यांच्याजवळ गेली.

"अनुभव! आपण पार्टीत आहोत." सुबोध त्याला समजावत म्हणाला.

"हो अनुभव सोड त्याला. उगाच मीडियाला तुझ्याबद्दल नकारात्मक बातमी देऊ नको." मेहताने अनुभवला सल्ला दिला.

"सर आजीला असलं काही ऐकून टेंशन येईल. प्लीज चला इथून." इंदिरा त्याला म्हणाली. त्यानं सोळंकीला सोडून दिलं.



क्रमश :



©®अर्चना सोनाग्रे वसतकार 


🎭 Series Post

View all