एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-14

Story of a young stubborn, witty & hardworking girl who is wandering to achieve her destination. Thank you

एक उनाड वाट भाग 14



इंदिरा तयार होऊन स्टडी रूममधून अनुभवची डेली शेड्युल डायरी घेऊन हॉलमधे गेली तेव्हा आजी, सुबोध आणि अनुभवचा नाश्ता सुरु होता.

"इंदिरा ये नाश्ता करायला." आजीनं इंदिराला नाश्ता करायला बोलावलं.

"इंदिरा आधी ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. आपल्याला मिस्टर निकम कडे जायचं आहे एका रियालिटी शो बद्दल चर्चा करायला." अनुभवने ती दिसताच हुकूम सोडला.

"हो !"

"काय हो, नाश्ता कर आधी." आजीनंही हुकूम सोडला. आता नक्की कोणाचं ऐकावं. इंदिरा पेचात पडली.

"आजी ती आता माझी असिस्टंट आहे. आणि मला वेळ होतोय."

"हो का. शोभा डबा भरून दे. इंदिरा गाडीत खाऊन घे."

"हो."

"जा आता, ड्रॉयव्हरला का मी रोडवर उभा झाल्यावर सांगशील गाडी काढायला?"

"मी जाते."

अनुभवनी मनातल्या मनात शप्पथ घेतली होती की इंदिराला आजी समोर इतका त्रास द्यायचा की आजी स्वतः तरी इंदिराला माझी असिस्टंट म्हणून काम करू देणार नाही किंवा इंदिरा तरी काम सोडून जाईल.




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




इंदिरा डबा घेऊन गाडीत बसली. भूक तर जोरात लागली तिला पण अनुभव परत सुरु झाला.

"डायरी, पेन घेतला?"

"हो !"

"आज काय शेड्युल आहे सांग."

"साडे दहाला मिस्टर निकम सोबत मिटिंग, एक वाजता फिल्म सिटीत शूटिंग....... "



बिचारी इंदिरा, शेड्युल सांगता सांगताच पूर्ण वेळ गेला आणि मिस्टर निकमचं ऑफिस आलं. एका डान्स रियालिटी शो मधे अनुभवला दहा एपिसोड जज म्हणून काम करायची ऑफर मिस्टर निकमनी देऊ केली. पण शेड्युलमधे बसत नसल्याने नेक्स्ट सिझनची डेट्स अनुभवने त्यांना दिली. मिस्टर निकमने ब्रेकफास्ट ऑफर केला पण अनुभवनं नाकारला. आता अनुभवनं नाकारल्यावर इंदिरा तरी कशी खाणार?



एक वाजता फिल्म सिटीत शूटिंगला पोहोचले. इंदिराच्या पोटात कावळ्यांनी तांडव सुरु केलं. डबा गाडीतच विसरली. जाऊन डबा घ्यावा गाडीतून तर गाडी पार्किंग एक दोन किलोमीटरच्या अंतरावर. त्यात अनुभवनं त्याचा मोबाईल तिच्या हातात देऊन तिथेच थांबायला सांगितलं आणि स्वतः व्हॅनिटीत रेडी व्हायला गेला. शूटिंग सुरु झाली. ओम आणि मिनू सोबत अनुभवचं पहिला शॉट छान पार पडला. मिनूला सांगणं झालंच नव्हतं की ती आता अनुभवची असिस्टंट म्हणून काम करतेय. तिला जाम टेंशन आलं की आता या दोघांनी आपल्याला ओळखलं तर. हा AYM (angry young man ) नक्कीच सिनेमा सोडेल मला त्रास देण्यासाठी. म्हणून ती लंच करायला जायची परमिशन घ्यायला समोर गेलीच नाही. शॉट पूर्ण करून मिनू आणि ओम नेक्स्ट शॉट साठी रेडी होण्यासाठी मेकअपरूममधे गेले.



अनुभवपन दुसऱ्या शॉट साठी रेडी व्हायला चेयर बसला आणि मेकअप मॅननं त्याचा मेकअप करणं सुरु केला. इंदिराच्या डोळ्यांपुढे तारे चमकू लागले. तिच्या हातात असलेला अनुभवचा फोन वाजला. सुबोधचा फोन आलेला. अनुभवनी तिला सांगितलं होतं की सुबोधचा फोन येताच द्यायचा. ती तो फोन अनुभवला द्यायला त्याच्याजवळ गेली. बोलणं संपल्यावर अनुभवनी फोन द्यायला इंदिराकडे बघितलं तर तिनं दोन्ही हाताने डोकं पकडलेलं.

"तु ठीक आहेस." अनुभवनी तिला विचारलं.

"..... " इंदिरा काहीच बोलली नाही.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"सर मला वाटतं मॅडमला चक्कर येत आहेत." मेकअपमॅन म्हणाला.

अनुभवनी उठून इंदिराला चेयरवर बसवलं. रनर मुलगा पाणी घेउन आला. शूटिंगवर डॉक्टरच्या रोलसाठी एक खरा डॉक्टर पण आला होता. त्यानं इंदिराला तपासलं. एव्हाना काही तिथे जमा झाले तर काही दुरून तिला काय झालं, काय होतंय पाहु लागले.

"हे चक्कर येणं ते तर नाही ना?"

"कोणतं?"

"ज्यात नऊ महिन्या नंतर नवीन पाहुणा घरात येतो."

"होऊ शकतं बाबा." अशी संभाषणं होऊ लागली.



इतकं तरी बरं की आजच्या शूटिंगला मायरा आली नव्हती. नाहीतर आणखी ड्रामा झाला असता. अनुभवच्या मनात आलं.



"काय झालं डॉक्टर?"

"काळजी करण्यासारखं काही नाही. मॅडमचा आज उपास आहे का?"

"मला माहित नाही."

"त्यांनी काहीच खाल्लेले नाही बहुतेक. म्हणून कमजोरी आली आहे. थोडा ज्यूस घेतलं की बरं वाटेल. मग जेवण करायला सांगा."

"ओके !" जमा झालेल्या सर्वांना अनुभव म्हणाला, "मला वाटतं आपण आपल्या नेक्स्ट शॉटची तयारी पाहावी."

सर्व काही सेकंदात तिथून गायब झाले.



इंदिराला ज्यूस पिल्यावर बरं वाटलं.

"मॅडम इंदिरा काय आहे हे?" अनुभव इंदिराला म्हणाला.

"काय आहे म्हणजे? स्वतः छान नाश्ता ठुसला आणि मला काहीच खाऊ पिऊ दिलं नाही."ती स्वतःशीच बडबडली. अनुभव बोलतच होता, "जेव्हा पर्यंत तु स्वतःला नीट बॅलन्स करणार नाही तोपर्यंत हे असं होत राहणार. देवही यात काहीच करू शकत नाही. तुला स्वतःचं लक्ष सुद्धा ठेवता येत नाही."

"ठेवता येतं."

"हो का? मग सांग सकाळी नाश्ता केला का?"

"नाही."

"लंच?"

"नाही."

"मग काय कोणीतरी येऊन तुला भरवेन याची वाट बघत होतीस?"

"नाही तसं नाही. वेळच नाही मिळाला खायला घरी. डब्बा गाडीत विसरली. नंतर तुम्हाला विचारून जाते म्हटलं इतरांसोबत लंच करायला तर तुमच्या भोवती सतत कोण ना कोणी होतं म्हणून मग लंच सुद्धा झालं नाही करनं. "

"काय बहाणा आहे स्वतःची चुकी लपवण्याचा. आज जे झालं ते पहिलं आणि शेवटचं. यापुढे बिझी शेड्युलमधेही स्वतःला सांभाळणं, नाश्ता, जेवण करणं शिकून घे. कारण आता तुला ही अशीच धावपळ करावी लागणार आहे. आता ड्रॉयव्हरला फोन करून डबा मागवून घे आणि रेस्ट रूममधे जाऊन जेवण करून घे."

"हो !"



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



अनुभव परत मेकअप करून घ्यायला बसला. इंदिराला हायसं झालं. एव्हाना अनुभव सिन्हाची नवीन असिस्टंट जॉबच्या पहिल्याच दिवशी चक्कर येऊन पडली, ही बातमी तिथे सर्वांच्या चर्चेचा विषय झाली. ती कोण, कशी, काय, नाव, गाव, वस्तू प्राणी असं विचारना झाली. मिनूच्याही कानावर आलं.

"इंदिरा!" मिनूनं तिच्या सोबतच्या ज्युनियर एक्टरेसला विचारलं, "खरंच इंदिरा नाव आहे का अनुभवच्या नवीन असिस्टंटचं?"

"हो, का बरं? तु का इतकी जोर देऊन विचारतेस?"

"काही नाही असंच. म्हटलं मैत्री करावी तिच्याशी. कामा येईल पुढे."

"हो हो, अगदी बरोबर."



मिनूचं डोकं चक्रावलं. ही आपली इंदिरा असेल तर ही आजीची असिस्टंट सोडून अनुभवची असिस्टंट कशी झाली? काल म्हणूनच इतक्या विश्वासाने म्हणत होती का, की अनुभव आज शूटिंगला नक्की येणार? या पोरीचं नक्की  काय सुरु आहे, काहीच कळत नाही. तिनं लगेच इंदिराला कॉल केला. इंदिरा जेवण करण्यात बिझी होती. तसंही ती फोनकडे दुर्लक्षच करायची. मिनूनं अनुभवच्या असिस्टंटला शूटिंग संपायच्या आधी काहीही करून भेटायचं ठरवलं.



सिनेमात हिरो आणि व्हिलनच्या बहीण भावाची लव्ह स्टोरी होती. जी मिनू आणि ओम साकारत होते. रियल लाईफ कपल ते त्यांनी त्यांचे शॉट एकदम रियल आणि दोन तीन टेक मधे दिले. अनुभवला त्यांचा जोश आवडला. त्यानं दोघांनाही शाबासकी दिली.

"थँक्यू सर ! तुम्हाला पाहूनच शिकलो सर्व." ओम म्हणाला.

"मला एक सेल्फी मिळेल तुमच्या सोबत." मिनूने अनुभवला विचारलं. ओमला समजलं नाही इतकी मोठी फिल्म शूट करतोय अनुभव सोबत मग सेल्फीची काय गरज? पण अनुभव समोर काय बोलणार तिला.

"हो मिळेल ना."

"पण माझ्या फोनचा कॅमेरा खराब झाला आहे." मिनू म्हणाली. ओमने चमकून तिच्याकडे बघितलं, "हे कधी झालं?" तिनं डोळे वटारून ओमला गप राहण्याचा इशारा केला.

"ओके माझ्या मोबाईलमधे काढू." इतकं बोलून अनुभवने

इंदिराला आवाज दिला, "इंदिरा मोबाईल दे."

इंदिरा जवळच दुसरीकडे तोंड करून उभी होती. 'अनुभवनं बोलावलं. आता मिनूच्या समोर जावंच लागेल. बस आशा करते की ती माझा इशारा समजून जाईल.' असा विचार करून इंदिरा मोबाईल घेऊन त्यांच्याजवळ गेली. मिनूनं रागातच तिच्याकडे बघितलं. तिनं तोंडातल्या तोंडात सॉरी म्हणून कान पकडले आणि अनुभव समोर काहीच बोलु नकोस असा इशारा केला. पण ओमच्या तोंडाशी आलंच,

"तु इथे?"

"हो त्या दिवशी तुमचं सिलेक्शन झालं. पण माझं नाही. आता आज पासूनच असिस्टंट म्हणून जॉईन झाली अनुभव सरांची."

ओमला ही अशी वेगळीच का बोलतोय असं वाटलं तो परत काहीतरी बोलणार तोच मिनूनं त्याच्या पायावर पाय मारला आणि शांत राहायचा इशारा केला.

"सगळं ठीक आहे?" त्यांचं विचित्र वागणं पाहुन अनुभवनं विचारलं.

"हो हो, एकदम ठीक आहे. शूट झालं. जातो आम्ही." मिनूला तिथून सटकण्यात भलाई वाटली.

"सेल्फी काढायची होती ना."

"हो हो मी विसरलीच."

त्यांची सेल्फी काढून झाली. अनुभवनी इंदिराला मिनूचा नंबर घेऊन सेल्फी तिला पाठवायला सांगितलं आणि तो डायरेक्टर, प्रोड्युसर सोबत ऑस्ट्रेलियाच्या शूटिंग शेड्युलबद्दल चर्चा करायला निघून गेला.

"तु इथे कशी?" मिनूने विचारलं.

"हो ना, तूझ्यापायी या मिनूने पाय तोडला माझा." ओम आपला पाय दाखवत म्हणाला.

"तुम्ही दोघं शांत राहा बरं. मी रात्री कॉल करून सांगते सर्व. आता माझ्यात काहीच बोलायला किंवा समजावून सांगायला  ऊर्जा वाचली नाही."

"बघ आज रात्री कॉल नाही आला तर. उद्या शूटिंगला अनुभव सिन्हा समोर विचारणार."

"मिनू असं मैत्रिणीला धमकी देत असतात का?"

"इंदिरा असं मैत्रिणी पासून गोष्टी लपवत असतात का?"

"झालं तुमच्या दोघींचं? शूटिंग पॅकअप झालं. आपल्यावर कोणी शंका घ्यायच्या आधी चला इथून." ओम त्यांना म्हणाला.



शूटिंग वरून परतल्यावर इंदिरा लगेच झोपली. तर अनुभव जिममधे वर्कआउट करायला गेला.

हे बघून शोभा आजीला म्हणाली,

"या दोघात लय फरक आहे आजी. एक झोपलं अन दुसरं वजन आदळतंय. यांच्यात काहीच होणं नाही."

"असं?" आजीनी तिचा कान पकडून विचारलं, "केस कोणाचे पिकलेत, माझे की तुझे?"

"तुमचे."

"मग ते असेच नाही पिकलेत. निंबाचं लोणचं खायला खूप आवडते ना?"

"हो." लोणच्याच्या नावानेच तिच्या तोंडाला पाणी सुटलं.

"एका दिवसात बनतं का ते."

"नाही, निंबाच्या फोडी, मसाला आणि साखर घालून उन्हात तापून छान मुरू द्यावं लागतं."

"यांचंही तसंच आहे. माणसं आहेत ही. एकमेकांत मुरायला वेळ लागणारच."

 आजीही तिला उठवायला गेली नाही. तिला माहित होतं इंदिरा थकली असेल. तिला वाटलं अनुभवला म्हणावं की इंदिराला काम समजून घ्यायला थोडा वेळ दे. पण तिला हेही माहित होतं की तिचं बोलणं त्याला आवडणार नाही आणि त्यांचं त्यांनीच सांभाळलेलं बरं म्हणजे त्यांच्यात अंडरस्टँडिंग वाढेल. असं आजीला वाटत होतं.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



रात्री सुबोधने इंदिरासाठी पुस्तकं आणून दिपकला तिला द्यायला सांगितलं. पुस्तकं पाहुन इंदिराला खूपच आनंद झाला.

"थँक्यू दिपक !"

"ओके मॅम !"

"शोभला भेटलास?"

"नाही, आजीची भीती वाटते."

"ओहो. लग्न कधीचं काढलं?"

"दिवाळी नंतरची तारीख पाहत आहेत घरचे."

"छान !'' इंदिराला पुस्तकांसोबत एक ट्रॅक सूट आणि स्पोर्ट्स शूज दिसले, "अरे हे चुकून आलं वाटतं पुस्तकांसोबत."

"नाही. सर म्हणाले हे तुमच्यासाठीच आहे. ते अनुभव सरांशी बोलायला गेले आहेत. तुम्ही फोन करून बोलून घ्या वाटलं तर त्यांच्याशी."

"हो, तेच करते." इंदिरानी सुबोधला फोन लावला.

"ते तुझ्यासाठीच आहेत. अनुभवनी आणायला सांगितलं होतं. try करून पाहा. साईझ कमी जास्त झाला तर दिपकला शॉप माहित आहे तो चेंज करून आणेल."

सकाळी इंदिराला चप्पल घालून रनिंग करायला आलेलं पाहताच अनुभवनी स्पोर्ट्स शूज आणि ट्रॅक सूट तिला द्यायचं ठरवलं होतं. तिनं ट्रॅक सूट, शूज try केले.

"अरे वा बरोबर आले. Angry young man इतका काही वाईट नाही म्हणजे." नागपूर सोडल्यावर तिनं पहिल्यांदा नवीन कपडे आणि शूज घातले. तिचा आंनद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं.

"बरं मी जाऊ." दिपकनी विचारलं.

"हो जा."

जाता जाता तो दारातच थबकला.

"काय झालं?"

"तुम्ही शोभाला हे देणार का?" त्यानी एक छोटं पाकिट दिलं.

"काय आहे यात?"

"दोन वर्ष आधी आजच्या दिवशीच आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो. तिला भेटू नाही शकत. म्हणून म्हटलं स्वतःच्या आवाजात मेसेज रिकॉर्ड करून द्यावा. पाकिटात ग्रीटिंग आहे, ते ओपन केलं की स्पीकर ऑन होईल आणि माझं रिकॉर्डिंग तिला ऐकायला मिळेल."

"किती रोमँटिक ! काश माझ्यावरही कोणी असं प्रेम करावं. आशा नवीन नवीन आयडियांनी मला चकित करून सोडावं अन मी धावत जाऊन त्याच्या मिठीत शिरावं......" इंदिरा तिच्या स्वप्नाळू जगात गेली.

"मी जातो."

"हो."

ती स्वप्नातून बाहेर आली. आमच्या नशिबात हेच आहेत, मिस्टर अनुभव सिन्हा, The angry young man! जाऊदे पुस्तकं पाहु आपण. दहावी, बारावीत मन लावून अभ्यास केला तर इतकं कठीण नाही हा सर्व अभ्यासक्रम समजून घेणं. पण मी तर केलाच नाही ना खोलवर अभ्यास कधी. म्हणून मला जास्त डोकं खर्च करावं लागेल." पुस्तकं पाहुन ती स्वतःला म्हणाली.



क्रमश :



एक उनाड वाट भाग 13 इथे वाचा



धन्यवाद !



©®अर्चना सोनाग्रे वसतकार 


🎭 Series Post

View all