एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-12

Story of a young, wild & witty girl. Thank you

एक उनाड वाट भाग 12



आजी सकाळी जरा उशिराच उठल्या. पण रोज त्यांच्या जागी होण्याच्या आधीच त्यांच्याजवळ येऊन बसलेली इंदिरा आज त्यांना दिसली नाही. नर्स उषानं त्यांना व्हिल चेयरवर बसवलं.

"काय होत आहे आज उषा? सगळे गायब कुठे झाले? इंदिराही आली नाही माझ्याशी बोलायला अजून. तब्येत बरोबर आहे ना तिची? काल तु नको म्हटलं तरी भिजली पाण्यात कार्टी. काकाही चहा घेऊन आले नाही."

"आपण जाऊनच पाहु काय सुरु आहे ते." इतकं म्हणून उषा आजीला खोलीच्या बाहेर घेऊन आली. हॉल फुग्यांनी, पताकांनी, रंगींबेरंगी फुलांनी, पानांनी सजून तयार. आजीचं आगमन होताच म्युझिक सिस्टीमवर (शोभाचा मोबाईल कनेक्ट करून) जोरात ब्रेकअप सॉंग सुरु झालं. काका आणि माळी दादा साडी घालून, डोकयावरून घेतलेला पदर तोंडात पकडून, बाई बनून नाचू लागले. इंदिरा आणि शोभा नकली मिशी दाढी लावून, टी शर्ट खाली काकांची लुंगी घालून माणूस बनून आल्या. ते चौघे अगदीच वेड्यागत नाचू लागले.



"ब्रेकअप सॉंग, ब्रेकअप सॉंग !

दिलपे पथ्थर रख के

मुह पे मेकअप कर लिया,

मेरे सैय्याजिसे आज मैने,

ब्रेकअप कर लिया!




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




सुबह सवेरे उठके 

मैने ये सब कर लिया !



हमको बिन बतायें तुने 

ये कब कर लिया? 

तेरे सैयाजिसे काहे 

तुने ब्रेकअप कर लिया?"



त्यांचा तो अवतार, त्या गाण्याचे बोल आणि ते गंमतीशीर नाचणं पाहुन आजी राग, संताप सगळं विसरून खदाखदा हसू लागली. इंदिरानं पहाटे पहाटे उठून शोभा, काका, उषा आणि माळी दादाच्या सोबत मिळून ही सर्व तयारी केली. माज घरात असलेलं जुनं सामान काढून त्यातून इंदिरानं सर्वांच्या मदतीनं हॉल सजवला. त्यांचा डान्स अगदी जोरावर आला. इंदिरानं शोभाचे हात पकडून फुगडी खेळनं सुरु केलं. तेव्हाच तिथे कोणीतरी आलं. त्यांना पाहुन माळी दादा आणि काका बाजूला झाले. शोभाची नजर त्यांच्यावर पडली अन तिनं घाबरून इंदिराचे हात सोडले. फुगडी जोरात सुरु असल्यामुळे शोभा तर खाली पडलीच, तिला काकांनी सावरलं. पण अचानक हात सुटल्याने काहीच न समजलेली इंदिरा बाजूला असलेल्या दगडी जात्यावर जाऊन पडणार होती, आता कसं होणार म्हणून सर्वांनी डोळे विस्फारले. तोच अनुभवनं तिचा हात पकडून तिला थांबवलं. इंदिरानंही घाबरून त्याचा हात घट्ट पकडला. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अनुभव सिन्हा तिच्या समोर, तिचा हात पकडून आणि तीही त्याचा हात पकडून. हा इथे कसा? का? अशा अनेक प्रश्नांनी तिला घेरलं.



इंदिराला काही सुचत नव्हतं. अनुभव एकटक तिलाच बघत होता.



झालं असं की इंदिरानं आजीची असिस्टंट म्हणून काम सांभाळलं तेव्हापासून आजीनं अनुभवला स्वतः फोन करणं बंद केलं. फोन आला तरी ती उषालाच बोलायला लावायची. अनुभवला काहीच कळत नव्हतं की आजीला काय झालं? आधी माझ्याशी बोल मला वेळ दे, भेटायला ये म्हणणारी आजी, सतत रागावणारी आजी आता स्वतः फोन करतच नाही, आपण केला तर बोलतही नाही. शेड्युल व्यस्त असल्यामुळे त्याला आजीकडे जाता आलं नाही. पण एक महिना झाल्यावर त्यानं आजीला कर्जतला येऊन सोबत घेऊन जायचं ठरवलं. तेच आजीला सांगायला त्यानं काल संध्याकाळी फोन केला आणि 'इंदिरा'चं नाव ऐकलं. ते ऐकताच त्याला शॉक बसला. ही इंदिरा तीच आहे का जी हिरोईन बनण्यासाठी मुंबईला पळून आली? ती आजीकडे काय करते? आजी जवळ असलेल्या सगळ्यांना तो भेटला होता. त्यांची नावं त्याला माहित होती. फक्त नवीन असिस्टंटला तो भेटला नव्हता. ते काम सुबोधवर त्याच्या बाबांनी सोपवलं होतं. सुबोधनं इंदिराच्या डॉक्यूमेंटची सॉफ्ट कॉपी अमन सिन्हाला पाठवली होती आणि ओरिजिनल तो अनुभवला दाखवायला घेऊन आला होता. पण कुठेतरी जायच्या घाईत त्यानं ती फाईल नंतर बघतो असा विचार करून कपाटात ठेऊन दिली. फाईल कुठे ठेवली कपाटात त्याला आठवेना. त्यात कपाटात तर खूप वेगवेगळ्या स्क्रिप्ट आणि इतर डॉक्यूमेंट फाईल ठेवल्या होत्या. पण त्यानं अर्धी रात्र जागून इंदिराची फाईल त्यात शोधून काढली.

"आता कळलं ती कुठे गायब झाली ते !" बायोडाटावर इंदिराचा पासपोर्ट फोटो पाहुन अनुभव स्वतःला म्हणाला." आजीजवळ नक्की कशाला गेली ती याचा पत्ता लावावाच लागेल आणि महत्वाचं, तिला माहित आहे का की ती ज्यांची असिस्टंट आहे ती माझी आजी आहे?"



इंदिरानं त्याचा हात सोडला. परत तिचा तोल जाऊ लागला. तसा अनुभव तिचा दुसरा हात पकडून तिला म्हणाला, "आधी नीट उभी हो, मग हात सोडायची घाई कर."

"........ " इंदिरा नेहमी सारखीच गप कशी तरी तोल सावरून उभी झाली.



"काय इंदिरा बघतच बसली ना माझ्या नातवाला?" आजी इंदिराला चिडवत हसून बोलली, "मी म्हटलं होतं ना माझा नातू एक प्रसिद्ध नट, सुपरस्टार आहे."




style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">




"कधी म्हटलं होतं? आजी सांगणार त्या आधीच तर पाऊस आला होता." इंदिरा काल संध्याकाळचं तिचं आजी सोबतचं संभाषण आठवून स्वतःशीच बोलली. एव्हाना अनुभवला पाहुन माळी दादा, काका, शोभा तिघेही तिथून गायब झाले. इंदिराला नीट उभं राहायला मदत करून अनुभव आजी जवळ गेला. इंदिरा त्यांना पाहत तिथंच उभी झाली.

"आजी मला बोलायचं आहे तुझ्याशी."

"बोल!"

"आजी...." अनुभव पुढे बोलणार तोच " उच्च आऊच उच्च " इंदिराला जोरात उचक्या येऊ लागल्या.

"इंदिरा जा पाणी पी !" अनुभव तिला म्हणाला. त्यानं मुद्दाम आजीला कळू नाही दिलं की तो इंदिराला आधीही भेटला आहे. तिच्याशी बोलला आहे. इतकंच काय ती एक रात्र त्याच्या बंगल्यावर होती. हे जर आजीला कळलं तर आजी नक्कीच भलतंच काहीतरी समजेल यात काही शंका नाही. इंदिरानंही ते लपवलं हे पाहुन त्याला बरं वाटलं. 



इंदिरा धावतच स्वयंपाक घरात गेली. रांजणातलं गडवाभर पाणी गटगट पिलं तरीही तिचं उचकी देणं थांबलं नाही. हे पाहुन स्वयंपाकात काकांना मदत करत असलेली शोभा तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली.

"तुम्ही ठीक आहे ना? अनुभव सर आले तेव्हापासून तुमचा चेहरा उतरला आहे."

"अनुभव, तुम्ही कोणीच मला सांगितलं का नाही की सुपरस्टार अनुभव सिन्हा आजीचा नातू आहे म्हणून." इंदिरानं चिडून शोभा आणि काकांना विचारलं.

"यात इतकं चिडण्यासारखं काय आहे?" काकाही आवज वाढवून म्हणाले, "आम्हाला वाटलं तुम्ही शिकल्या सवरलेल्या मॅडम. सगळं माहित करूनच आल्या असणार."

"हो ना आणि कधी विषय निघाला नाही त्यामुळे आम्हीही बोललो नाही." शोभा इंदिराच्या पाठीवर हात फिरवत बोलली, "त्यात आजीला हे सिनेमा वगैरे अजिबात पटत नाही. म्हणून आम्ही त्याबद्दल कधी बोलतच नाही बघा."

"पण मला एक कळत नाही, तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे तुम्ही एका मोठया हिरोच्या आजीच्या असिस्टंट आहे. पण तुमच्या चेहऱ्यावर तर टेंशन दिसतंय. अनुभवला तुम्ही आधीपासून ओळखता का?" काकांनी बरोबर हेरलं.

"नाही अजिबात नाही." इंदिरानं लगेच स्वतःला सावरलं, "ते काय ना, मलाही आजी सारखंच हे सिनेमा बिनेमा अजिबात पटत नाही. काय उघडी नागडी होऊन नाचत बसतात हे हिरो हिरोईन आणि आमच्या वयाची मुलं मुली अभ्यास, करियर विसरून त्यांना बघण्यात आपला वेळ गमावतो."

"अच्छा !"

"मग काय काका....." इंदिरा आपलं गुपित लपवन्यासाठी इकडे मस्त बाता हाकत होती. तिकडे आजी अनुभववर चांगलीच रागावली.

"मला अजिबात नाही यायचं तूझ्यासोबत तुझ्या त्या फिल्मी दुनियेत. तुला राहायचं राहा त्या आभासी जगात. मी नाही येणार म्हणजे नाही."



"आजी का जिद्द करतेय? प्लिज समजून घे. पावसाळा सुरु होतोय. तुला इथे या जंगलात खूप त्रास होईल पावसात. आधी सारखं नाही राहिलं आता काहीच."

"सरळ म्हण की तु आता अधू, अपंग झाली आहेस." आजीनं अनुभवला चांगलं फणकारलं.

"आजी !'' तो कणवळुन म्हणाला, "असं नको म्हणू."

"मग काय म्हणू? आजोबाला म्हणायचास हा वाडा कधीच सोडणार नाही. ऍग्रिकल्चर शिकेल. शेतीसाठी संशोधन करेल. नवीन तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना मदत करेल. आपली जमीन कधीच पडीक ठेवणार नाही. त्यात सोनं पिकवीन. आजोबा गेले पण तु एक तरी केलं का यातलं?" आजीनं त्याला प्रश्नांकित नजरेनं बघितलं, "जाऊदे हे सगळं. ती दिव्या काय गेली तुझा फायदा घेऊन, तुला सोडून जगणं ही मशिनी सारखं करून टाकलं. किती काय काय आरोप केले तिनं तुझ्यावर, तिनं लावलेल्या त्या आरोपांचं खंडणही केलं नाहीस तु! ना इतर कोणाला आयुष्यात जागा देतोय. ती मात्र टॉप ची हिरोईन बनून, लग्न करून एक आनंदी आयुष्य जगतेय आणि तु एकटाच फिरतोय. मग कशाला येऊ तुझ्या त्या बंगल्यात मी. भिंतींसोबत बोलायला आणि नोकरांसोबत जेवायला. मला नाही जमायचं."

थोडावेळ शांतता पसरली.



style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-1833083458777660"
data-ad-slot="1434809209">



"जेवणाची वेळ झाली आहे. जेवण कर आणि जा."

"आजी !"

"इंदिराला माझी असिस्टंट म्हणून निवडलं त्याबद्दल खूप खूप आभार. मन लागतं तिच्या संगतीत."

"........ " अनुभव काहीतरी विचार करत शांतच होता.

"जेवण लावलं आहे. चला जेवायला." शोभाने आजी आणि अनुभवला सांगितलं.



जेवण करतांना इंदिरानं काहीच गडबड होऊ नये याची शाश्वती घेतली. आजीला औषधं घेतल्यावर झोप लागली तेव्हा इंदिरा तिथेच होती आजीसाठी पुस्तक वाचत. आजीला झोप लागल्यावर ती पुस्तक ठेऊन खोली बाहेर निघणार तोच अनुभव तिथे आला.

"इंदिरा मला तूझ्याशी काही बोलायचं आहे."

"हा बोला." डोळ्यांच्या कडेने चोरून त्याला पाहत ती म्हणाली.

"आजी तुला खूप पसंत करतेय. कमी दिवसात छान इम्प्रेशन जमवलंय तु आजीवर." अनुभव बोलत होता.

"तु माझ्या नातवासोबत लग्न कर."हे आजीचं वाक्य इंदिराला आठवलं. "हा आपल्याला लग्नासाठी प्रपोज करतोय का? सिनेमात तर असंच होतं. हिरो त्याच्या आई, आजी किंवा आजोबासाठी त्याला आवडत नसलेल्या हिरोईन सोबत लग्न करतो आणि मग त्यांच्यात आधी वाद होतात मग प्रेम होतं. सो स्वीट. पण मला नाही करायचं याच्याशी लग्न." ती स्वतःशीच तोंडातल्या तोंडात बडबडत आहे हे पाहुन त्यानं तिला हलवलं.

"आर यु ओके !"

"आय एम ओके. बोला तुम्ही." ती भानावर आली.

"हे बघ पावसाळा सुरु होतोय. आधी खूप धावपळ करायची आजी पावसात. पण लखव्यामुळे आता तिला ते शक्य नाही. त्यात आजीला शुगर, ब्लडप्रेशर दोन्ही आहे. पावसात डास खूप होतात इथे. त्यामुळे मलेरिया, डेंगू व्हायची भीती आहे. काही झालं तर मुंबईला येता येता खूप वेळ जाईल. आधीच या रूटवर ट्राफिक असतं. त्यात पावसाळ्यात पाण्यामुळे रूट जाम होऊन जातो."

"मग मी काय करू त्यात?" इंदिरानी अगदी भाबडा चेहरा करून विचारलं.

"तु एकच कर तु आजीला मुंबईला माझ्या सोबत यायला तयार कर. मी आधीचं सगळं विसरून जाईल आणि तुला चांगल्या सिनेमात रोल मिळवून द्यायचा प्रयत्न करेल.''

इंदिरानं डोक्यावर हात मारला. "याचा, 'मला हिरोईन बनायचं आहे ' हा गैरसमज कसा दूर करू मी?"

"तु परत स्वतःशीच बडबडतेय." तिचं असं स्वतःशीच बडबडणं त्याला इरिटेट करत होतं.

"मी आजी उठल्या की बोलते त्यांच्याशी."

"थँक्यू ! मी बसतो आजी जवळ."

"हूँ, मी आहे अंगणात. आजी उठली की आवाज द्या."

"हो."

इंदिरा परत आली. अनुभव मोबाईलवर काही काम करत होता.

"चहा घेणार का? मी माझ्यासाठी करत आहे म्हणून विचारलं."

"ठीक आहे. साखर..."

"कमी टाकू हेच ना !"

"नेहमी समोरचा काय म्हणतो ते ऐकून मग आपलं तोंड उघडावं." अनुभव तिला समजावत म्हणाला, "हिरो आहे म्हणून जरुरी नाही की मी फिक्काच चहा घेईल. मला चहा गोडच आवडतो."

"बरं !" इंदिरा गेली.

"आजीनं जर इंदिराला मुंबईला सोबतच ठेवायचा आग्रह केला तर?" त्याच्या मनात आलं.



क्रमश :



इंदिरा जाईल का परत मुंबईला? आजीचा निर्णय काय असेल? इंदिराला हिरोईन बनायचं आहे हा अनुभवचा भ्रम कधी तुटेल का? भेटू पुढल्या भागात. 



माझं पूर्ण लिखाण वाचण्यासाठी क्लिक करा



धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 





​​​​​​


🎭 Series Post

View all