कष्टाची बाहुली

This is a story of sisters love which any sister in the world can relate! Elder sisters love towards her siblings is something extra-ordinary ❤️

              यावर्षी सगळे कोरोना मुळे घरी असल्यामुळे आता पोळा गणपती सगळे सण घरच्यांसोबत साजरे करता येणार होते. त्यासाठी मी  खूप उत्साही होते. तान्हा पोळा झाला आणि दुसऱ्याच दिवशी मी गणपतीच्या तयारीला लागले आणि सामान खरेदी साठी बाजारात  गेले. बाजारातल्या गणपतीच्या सुंदर साहित्यांनी बाजार अगदी नवीन नवरी सारखं सजून असलेलं दिसत होतं. 
                          तिथल्या काकांना मी एक एक साहित्य मागू लागले. गणपतीसाठी हार, मुकुट आणि बराच काही. तेवढ्यात एका छोट्या मुलीचा आवाज आला, साधारण 6 वर्ष्याची, दोन वेण्या,गोल चेहरा,त्यावर सुबक नाक, फ्रॉक घातलेली वयाच्या मानाने समझदार  दिसणारी आणि सोबत छोटीशी पर्स हातात असलेली होती ती.
 ती बोलली, "काका ही बाहुली कितीला आहे? "
काका : 60 रुपयाला  आहे !
त्या मुलीने मग ती बाहुली हळूच नाईलाजाने खाली ठेवली, तिला आवडली असेल बहुतेक; पण पैसे नसतील आणि लगेच तीने छोटी बाहुली कडे बोट  दाखवत विचारलं, 
"ही वाली कितीला आहे? "
काका : 50 ला आहे बेटा !
आता तिचा खूप फार हिरमोड झाला होता. येताना ती फारच उत्साही दिसली होती. तिने परत थोडी कमी नाजूक दिसणाऱ्या बाहुलीकडे बोट दाखवून नाराजीच्या सुरात विचारले, 
"ही पण तेवढ्याच पैश्याची आहे का? "
आता काकांना कळून चुकले होते की हिला घ्यायची तर आहेच पण पैसे तेवढे नाहीत आणि त्यांना तिला नाराज करायचे नव्हते म्हणून ते उत्तरले 

काका : "तशी आहे तर ती 45ची पण तुला 40 ला लावून देतो !"
मुलगी : "काका 39 ला दया ना माझ्याकडे 40 नाहीं आहेत!"  
काका  हसले आणि लगेच ठीक आहे बोलले. त्यांनी फक्त एक रुपया कमी केला होता पण तिच्या चेहऱ्यावर चक्क 10-20 रुपये  कमी केल्याचा आनंद होता.तिच्यासाठी 1 रुपया  तेव्हा10-20च्या  बरोबरीचा होता !             

लगेच तिने ती बाहुली घेतली आणि काकांच्या हातावर पैसे ठेवले पण पैसे बघून काका चकित झाले,
आणि बोलले, " अगं एवढे चिल्लर?  " 
ती बोलली, " काका काल तान्हा पोळ्यात इतकेच जमले !हवं तर तुम्ही मोजून घ्या ! "
काकाच्या लक्षात आले की कालचे पैसे जमवून ती बाहुली घेत होती, काका हसून बोलले,  " राहूदे, घे ती बाहुली "
( काकांना बहुतेक कुणाची आठवण झाली असेल ) 
बाहुली घेऊन ती जाणार असे मला वाटले पण ती बाहुली तिने तिच्या पाठीमागे तिचा हाथ धरून लपून असलेल्या छोट्या बहिणीला दिली. काळे बॉयकट असलेले केस,  गोबरे गोबरे गाल,त्यावर बटनासारखा छोटासा नाक,नाक कमी पण दोन छिद्रच दिसत होते,  डोळे पाण्याने भरलेले नुकतेच रडून झालेले असेल असे , फ्रॉक घातलेली  साधारण 3 वर्ष्याची असेल. 
आणि तिला देताना बोलली, 
" घे मा तुझ्यासाठी मोठ्या ताईकडून , आता रडू नाहीं  "

ती बाहुली बघताच छोट्या मुलीचा रडका चेहरा लगेच बदलला, डोळ्यातलं पाणी जाणू आनंदाश्रूच झाले होते. ती बाहुली एका हाताने तिने धरली पण दुसऱ्या हाताने बहिणीचं धरलेलं बोट काही तिने सोडलं नाहीं. आणि बघता बघता त्या निघून गेल्या. 

        तिचं हे बहिणीसाठी स्वतःहून जमवलेल्या पैश्यातून बाहुली देणं बघून मला डोळ्यात पाणी आलं. किती प्रेम होतं तिचं बहिणीवर ! त्या जमवलेल्या पैश्यातून ती स्वतःसाठी पण बराच काही घेऊ शकली असती पण तिने बहिणीसाठी घेतलं. मोठी बहीण होती ती, मोठी बहीण म्हटलं की  लहानपणापासूनच त्यांच्यात समर्पणाची भावना असतेच !

त्यांचं प्रेम बघून मला माझी मोठी बहीण आठवली ती पण अगदी असच करायची. मी 6 महिन्याची असताना माझी आज्जी ( आईची आई ) आम्हाला सांभाळत असे कारण आई नागपूरला M.A. करून  B.ed करत होती.शिक्षण आणि आम्ही दोन्ही एकावेळेस  सांभाळणं तेव्हा (90's मध्ये )तारेवरची कसरत होती .कसंतरी मनावर दगड ठेवून ती आमचं नंतर चांगलं भवितव्य घडवण्यासाठी तेव्हा तिकडे एकटी राहत असे आणि सुट्टी मिळेल तशी आई आणि बाबा भेटायला येतं असे. माझी बहीण त्यावेळेस 1:50 वर्ष्याची असेल तरीही ती माझा तेव्हा सांभाळ करायची, मला रडू द्यायची नाहीं असं आजी सांगते. कदाचित तिने सांभाळल्या मुळे आज माझी आई शिक्षिका आहे.
                    अगदी तेव्हापासून आत्ता पर्यंत माझी बहीण  मला समझून घेते, हवं नको ते बघते. चुकीचं करत असेल तर समझवून सांगते.त्या मुलीएवढी असताना सुद्धा तशीच माझ्या वाढदिवसाला गिफ्ट साठी पैशे वाचवून ठेवायची.त्या मुलीसारखंच मला आत्ता तिच्या पैश्यातुन गिफ्ट देते, आणि म्हणते की स्वतःसाठी घेण्यापेक्षा तुझ्यासाठी घेण्यात वेगळाच आनंद मिळतो. खरंच मोठी बहीण असली की खूप छान वाटतं ????भाग्यवान असतात ते लोकं ज्यांना मोठी बहीण असते. राखी न बांधता पण मोठी बहीण सगळ्या गरजा आणि संरक्षण करत असते.
                    माझी ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच share आणि like करा,माझी ही गोष्टी खरंच घडलेली आहे. ज्याप्रकारे घडली त्याप्रमाणेच मी तुमच्या समोर सादर केली आहे.तुम्ही तुमच्या बहिणीला ही पाठवा आणि अजून अश्याच गोष्टींसाठी मला follow करा, धन्यवाद ????