गोष्ट प्रेमाची अंतिम भाग ५

लोक म्हणतात की पहिलं प्रेम मिळत नाही!! यावर तुम्हाला काय वाटतं?? पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ते प्रेम आपल्याला मिळतच मिळतं. अशीच एक गोष्ट प्रेमाची...

कथेचे नाव- गोष्ट प्रेमाची भाग ५

विषय- प्रेमकथा

कॅटेगरी- राज्यस्तरीय करंडक कथामालिका

 राकेश आणि स्नेहा पूजेला बसले होते. सिद्धू त्यांचे फोटोज काढत होता खरंतर त्यांनी त्यांच्या या पाच वर्षांच्या काळात खूप सारे फोटोज काढलेले होते आणि आता तर ते एकमेकांचे नवरा बायको झाले असल्यामुळे फोटो काढायला त्यांना कुणालाही घाबरावे लागत नव्हतं.

पूजा वगैरे आटोपल्यानंतर सगळ्या पाहुण्यांचे त्यांनी दोघांनी आशीर्वाद घेतले. सगळे पाहुणे त्या दिवशी आपापल्या घरी गेले. आता घरामध्ये फक्त राकेश चे आई-बाबा स्नेहा एवढेच होते. खरंतर हे तिघे मित्र खूप दिवसांपासून एकमेकांना भेटले होते कॉलेज लाईफ नंतर आपले एक रुटीन वेगळंच होऊन जातं त्या रुटीनमध्ये आपल्या मित्रांना भेटणं शक्य होत नाही.

एकमेकांशी ऑनलाईन गप्पा गोष्टी होत असल्यामुळे एवढा काही फरक पडत नाही पण कितीही ऑनलाईन गप्पा मारल्या तरी एकमेकांना भेटण्यात जो आनंद आहे तो ऑनलाइन मध्ये आनंद नाही त्यामुळे ह्या तिघा मित्रांना एकमेकांशी आपण पुन्हा कधी गप्पा मारू असं झालं होतं एकमेकांना पहिल्यापासून ते त्यांना त्यांची पूर्ण जर्नी आठवत होती. 

आई म्हणाली, आज तुम्ही तिघेही बाहेर जेवायला जा आणि तुम्हाला हव्या तेवढ्या गप्पा तुम्ही मारा, तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. तिथे मी देखील नसेल तुम्हाला आवाज द्यायला, की हे पाहुणे आले आहे- ते पाहुणे आले आहेत, जेवून घ्या तुम्ही बाहेर जा आणि मनसोक्त गप्पा एकमेकांसोबत मारून घ्या. हे ऐकून स्नेहा आईकडे आश्चर्याने बघू लागली. आपली सासुबाई असं बोललं असं स्नेहांनी विचार देखील केला नव्हता. किती समजून घेतात त्या आपल्याला हे बघून स्नेहा देखील खूप खूप खुश झाली. मी देखील त्यांना माझ्या आईप्रमाणे जीव लावेल आणि राकेशच्या पप्पांना देखील माझ्या पप्पांप्रमाणे जीव लावेल हे स्नेहाने तेव्हाच ठरवले होते.

स्नेहाचे डोळे भरून आले हे पाहून राकेश आईने तिला मिठीत घेतले आणि देखील घट्ट मिठी तिला मारली राकेश आणि सिद्धू हे कौतुकाने बघत होते. आपली आई आणि आपली बायको दोघी एकमेकांशी खूप छान वागत आहेत, हे बघून राकेश देखील खूप खुश झाला. राकेशचे बाबा देखील जरी पेपर वाचत असले तरी त्यांचे पूर्ण लक्ष आपल्या घरात काय घडतंय ह्याच्यावरच होतं त्यांना देखील मनातून खूप आनंद झाला. आपली बायको आणि आपली सून यांच्यातला हे आई आणि मुलीसारखं नातं ते सांग आणि सासू असं न राहता आई मुली सारखाच राहावं अशी त्यांनी मनोमनी प्रार्थना केली. 

आता राकेशचं लग्न झालं आहे त्याला एवढी सुंदर, सुशील, सुसंस्कृत बायको भेटली आहे, ती जरी त्याची चॉईस असली तरीही ती आपल्या घराला शोभणारी आहे हे राकेशच्या पप्पांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनात देखील काही रूसवे फुगवे किंवा वाईट विचार नव्हते, त्यांनी देखील तिला खूप चांगल्या मनाने स्वीकारलं होतं. 

हे सगळं झाल्यानंतर स्नेहा सिद्धू बाहेर जेवायला गेले त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. तिकडून घरी आल्यानंतर खूप उशीर झाला होता. तिघेही झोपून गेले. सिद्धू सकाळीच उठून आपल्या घरी निघून गेला. 

राकेश आणि स्नेहाचे दैनंदिन जीवन सुरू झाले एकमेकांवर खूप प्रेम करून आणि घरच्यांना विश्वासात घेऊन त्यांनी आपल्या प्रेमाला लग्नाचं नाव दिलं होतं. म्हणूनच आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला मिळतेच मिळते या गोष्टीवर स्नेहा आणि राकेश या दोघांचाही विश्वास बसला होता.

दोघांनी एकमेकांसोबत सुखी संसार करण्याचा वसा घेतला दोघेही एकमेकांचा खूप आदर करत होते, एकमेकांची मन समजून घेत होते . काही घरात तर प्रेम प्रकरणातून झालेला लग्नांमध्ये खूप ताणतणाव, अडीअडचणी असतात किंवा काही ठिकाणी तर घरच्यांचा विरोध देखील असतो हे सगळं असुनही मुलं लग्न करतात आणि एकमेकांशी पटत नाही. या कारणामुळे ज्याच्यावर प्रेम केले त्याला ही सोडून देतात. परंतु स्नेहांनी राकेश या गोष्टीसाठी अपवाद होते. त्यांनी एकमेकांवर निस्वार्थी भावनेने प्रेम केले. एकमेकांसाठी खूपच रिस्क घेतल्या आणि अखेर त्या दोघांचं लग्न झालं.

स्नेहाने आमचं लग्न झालं की आम्ही जेजुरीला येऊ असा खंडोबा केला होता आणि आज अखेर लग्न झालं म्हणून स्नेहाने आपल्या मनातील हा नवस राकेश ला बोलून दाखवला. राकेश मनामध्ये विचार करू लागला, आपल्याशी लग्न व्हावं म्हणून स्नेहाने देवाला नवस केला होता हे मला अजूनही या पाच वर्षांनी आणि सांगितलं नव्हतं. मला कधीच वाटलं नव्हतं की तिचा एवढा देवावर विश्वास असेल आणि ती मला मिळवण्यासाठी देवाला नवस करेल.

खरंच स्नेहा राकेश स्नेहाची आई वडील आणि राकेशची आई वडील या दोन्ही कुटुंब खुश होते. आपल्या मुलीला तिचं प्रेम मिळालं आणि ती देखील तिच्या संसारात सुखी आहे, तिलाही तिच्या सन्मान आणि प्रेम भेटतं हे बघून स्नेहाच्या आई वडील देखील खुश होते. आपली मुलगी खुश तर आपण खुश असे स्नेहाच्या बाबांचा पहिल्यापासूनच होतं. 

जर सगळ्याच आई-वडिलांनी आपल्या मुला मुलींची मनं समजून घेऊन त्यांच्याशी आई वडील म्हणून न वागता मित्र-मैत्रिणी समजून वागले तर सगळेच खुश राहतील. प्रेमाचा आदर करतील खरंतर प्रेम म्हणजे लफडं किंवा वाईट भावना, वाईट व्यक्ती विषयी असणारी संगत, असं लगेच म्हणत येतं. पण प्रेम हे प्रेम असतं! जेव्हा ते खरं असतं तेव्हा असे मिळतं आणि मनापासून असेल तर ते मिळतच मिळतं. 

स्नेहा आणि राकेश यांच्या लग्नाची गोष्ट जेव्हा त्यांच्या कॉलेजच्या मित्रांना सिद्धने सांगितली, त्यादिवशी त्यांच्या मित्रांसाठी प्रेमावर खूप विश्वास बसला. कॉलेजमधल्या त्यांच्या ग्रुपमध्ये असे खूप कपल्स होते पण त्यातील कुणाचेही लग्न झालं नाही त्यात फक्त स्नेहा आणि राकेश च लग्न झालं होतं. कदाचित ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांचा प्रेमावर विश्वास होता म्हणूनच की काय ते आज सोबत होते. अशी ही गोष्ट प्रेमाची....

कथा समाप्त

लेखिका- दामिनी नलावडे

जिल्हा- पुणे 

🎭 Series Post

View all