गोष्ट प्रेमाची भाग ४

लोक म्हणतात की पहिलं प्रेम मिळत नाही!! यावर तुम्हाला काय वाटतं?? पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ते प्रेम आपल्याला मिळतच मिळतं.

कथेचे नाव- गोष्ट प्रेमाची भाग ४

विषय- प्रेमकथा

कॅटेगिरी- राज्यस्तरीय करंडक कथामालिका

राकेश म्हणाला, अरे आम्ही एकमेकांना आय लव यू म्हणालो पण दुसऱ्या दिवशी स्नेहाला तोंड कसं दाखवावं मला खूप लाज वाटत होती... की अरे भावनेच्या भरात तर मी बोलून गेलो पण आता तिच्या डोळ्यात कसं पाहावं. पण कसेबसे आम्ही एकमेकांसमोर आलो आणि रोजच्यासारखे बोलू लागलो आय लव यू बोलल्यामुळे आमच्या एकमेकांच्या वागण्यावर काहीच परिणाम झाला नव्हता.

त्यानंतर रोज रात्री गुड नाईट करताना आम्ही एकमेकांना आय लव यु चा मेसेज करायचो. पण समोर आल्यावर आम्हाला आय लव यू बोलायची खूप लाज वाटायची कित्येक दिवस तर आम्ही एकमेकांसमोर आय लव यू देखील बोललो नव्हतो. अखेर एफवाय ची फायनल एक्झाम झाल्यानंतर आम्ही दोघांनी फिरायला जाण्याचा प्लॅन केला. दादाची भीती स्नेहाच्या मनात असल्यामुळे तिने बाहेर कुठेही फिरायला न जाण्याचा तिचा विचार सांगितला मीही ते मान्य केले आणि दुसरीकडे कुठेही न जाता सरळ आपण माझ्या एका ताईकडे जाऊया असं म्हणालो, आणि तीही तयार झाली मग आम्ही दोघे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ताईच्या घरी गेलो. पण ताईशी त्या दिवशी खोटं बोलावं लागलं. तुझ्या घराच्या जवळ असणाऱ्या केंद्रातच आमची एक्झाम आहे असं सांगावं लागलं पण प्रेमात सगळं काही माफ असतं ना खरंतर प्रेम नाही म्हणता येणार पण जे काही नातं आमच्याबद्दल होतं...

माझी ताई देखील फ्रेंडली आणि फ्रेंडली असल्यामुळे तिने जास्त काही प्रश्न विचारलेच नाही आणि तुम्ही स्टडी करा हे सांगून ती बाहेर निघून गेली खर तर त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही फक्त दोघेच होतो तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही त्यांच्या दिवशी पहिल्यांदाच मी स्नेहाच्या डोळ्यात पाहून तिला आय लव यू म्हटलं. स्नेहा म्हणाली, अरे तू काय बोलतोयस? त्यावर मी म्हणालो, अग मी तुला आय लव यू म्हणालो. यावर स्नेहाला विश्वासच बसत नव्हता मी तिला चिमटा घेतला आणि आपण स्वप्न बघत नाही आहोत तर हे खरोखरच आपल्याबरोबर घडत आहे याची स्नेहाला जाणीव झाली. ती देखील आय लव यु टू म्हणाली खरं तर या दिवशी प्रेमाला सुरुवात झाली.

जवळजवळ एफ वाय चा पूर्ण वर्ष आमच्या मध्ये मैत्रीच नातं होतं परंतु या दिवसापासून आमच्या दोघांच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होणार होती आम्ही वेगळ्या बंधनात अडकणार होतो. पण लगेचच लग्न वगैरे करणार अशी कमिटमेंट आम्ही दिली नव्हती. नंतर आम्ही आमच्या घरी परतलो.

एफ.वाय.झेड. एक्झाम नंतर कॉलेजला सुट्टी होती पण हे दिवस संपता संपत नव्हते कधी आम्ही एकमेकांना भेटेल याचा विचार करत होतो. आठ दिवस गेल्यानंतर आम्हाला एकमेकांशिवाय रहावेना...

स्नेहा म्हणाली मी माझ्या आयुष्यात कधीच एवढी मोठी रिस्क घेतली नाही तेवढी मोठी रिस्क राकेश ला भेटण्यासाठी मी घेतली होती. त्यावर सिद्धू म्हणाला, तुम्ही कधी भेटले स्नेहा म्हणाली, रात्रीचे दोन वाजले होते तोपर्यंत आम्ही एकमेकांशी मेसेज वरच चॅटिंग करत होतो मी असंच राकेश ला म्हणाले, की तुझं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तू आता मला भेटायला ये. अरे याला काय फक्त कारण जवळ होतो मी फक्त बोलवं आणि त्यांनी यावं. तो देखील त्याच्या एका मित्राला घेऊन माझ्या घराच्या त्या कॉर्नर पर्यंत आला. मला व्हिडिओ कॉल केला आणि म्हणाला बघ मी तुझ्या घराजवळ आलो आहे तुझं खरं प्रेम असेल तर तुम्ही मला भेटायला बाहेर येशील.

अरे देवा! मी हे काय म्हणाले? रात्रीचे दोन वाजले आहेत आणि हा मुलगा मला भेटायला बोलवतो आहे आणि तो खोटं बोलते असं म्हणावं तर त्याने व्हिडिओ कॉल करून तू कुठे उभा आहे हेही मला दाखवलं होतं.

रात्रीची तहान लागली तरीही मी न उठणारे आज रात्री दोन वाजता मी उठून त्याला भेटायला जाणार होते. माहित नाही कुठून बळ आलं मला. घरात मम्मी पप्पा आणि दादा तिघेही झोपले होते मी तर बेडरूम मध्ये झोपले होते. हॉलमध्ये मेन दरवाजाच्या बाजूला जो सोफा होता त्यावर दादा झोपला होता. आणि त्याच दरवाजातून मला बाहेर जायचं होतं.

बापरे! आता आठवलं तरी अंगावर काटा येतो. घाबरत घाबरत मी उठली, दरवाजाची कडी उघडली आणि बाहेर बघते तर काय खरंच राकेश एका गाडीवर त्याच्या मित्रासोबत उभा होता मी त्याच्यासमोर गेली. राकेशने मला घट्ट मिठी मारली. बस्.. एका मिठीसाठी आम्ही भेटलो होतो. तो निघून गेला मीही माझ्या घरा जवळ आले आणि हळूच दरवाजा उघडला आत मध्ये येऊन दरवाजाला आतून कडी लावली आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपले माझ्या हृदयाची ठोके एवढे वाढले होते की काय सांगू तुला.

सिद्धू म्हणाला अरे तुम्ही दोघे वेडे आहात का? रात्री दोन वाजता कोण भेटतं? सिद्धूच्या या प्रश्नावर राकेश म्हणाला अरे आम्ही एवढा रेस घेतला आहे एकमेकांना भेटण्यासाठी की कोणीतरी इमॅजिन पण करू शकत नाही कुणी स्वप्नातही विचार करू शकत नाही एवढ्या रिस्क आम्ही घेतल्या.

खरंच आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि अगदी पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत ते प्रेम वाढतच चालल आहे. सिद्धू मनाला, तुमच्या या प्रेमाला कुणाची नजर लागू नये. स्नेहा आणि राकेश एकमेकांकडे बघू लागले दोघांच्याही डोळ्यात डोळ्यांमध्ये एकमेकांविषयीचे प्रेम दिसत होते.

तिघेही मित्र एकमेकांशी गप्पा मारण्यात एवढे बिझी झाले होते की सायंकाळ झाली हे सुद्धा त्यांना माहिती नव्हते. आज राकेश आणि स्नेहाच्या लग्नाची पूजा होती.

आई सिद्धूला म्हणाली, आता पूजेचा कार्यक्रम झाल्यावरच तू तुझ्या घरी जा. तोपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. सिद्धू काही बोलणार तेवढ्यात राकेश म्हणाला हो मी कसं जाऊन देईल त्याला. खूप काम करायची आहेत त्याला. सगळेजण हसू लागले.

लेखिका- दामिनी नलावडे

जिल्हा- पुणे















🎭 Series Post

View all