Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

गोष्ट प्रेमाची भाग ३

Read Later
गोष्ट प्रेमाची भाग ३

कथेचे नाव- गोष्ट प्रेमाची-भाग 3

विषय- प्रेमकथा

कॅटेगिरी- राज्यस्तरीय करंडक कथामालिका 

आता गणेशोत्सवाला फक्त दहा दिवस बाकी होते आपली जोरदार तयारी सुरू झाली होती, गणपती बसवण्याचा एक ग्रुप तयार झाला होता त्या ग्रुपमध्ये राकेश, स्नेहा, सिद्धू,अनुज,अभिषेक,रोहन, हर्षद यांसारखे अनेक जण सहभागी झाले होते. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने नवनवीन कल्पना सुचवत होता अखेर अनेक कल्पनांमधून आपली एक संकल्पना उदयास आली, गणपती सजावटीला कमी खर्च करून आपण गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक मदतीचा हात म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना शिक्षणासाठी लागणारे गरजेचे साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आपल्या या उपक्रमामुळे कॉलेजमधील सर्व शिक्षक आणि गावातील सर्व लोकांनी आपले कौतुक केले. सिद्धू म्हणाला राकेश तुला आठवतंय त्यावर्षीच्या गणेशोत्सव मंडळाचा तू अध्यक्ष होतास. तुला आणि आपल्या सगळ्यांना बोलवून कॉलेजमध्ये आपला सत्कार करण्यात आला होता. आपल्या चांगल्या कामाचा प्रतिसाद आपल्याला कौतुकातून मिळत होता. गणेशोत्सवातले ते सात दिवस आपण लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल सुद्धा केले नाहीत. ते दिवस आठवले की असं वाटतं की मजा-मस्ती, गमती-जमती, एन्जॉय करण्याच्या वयात आपण लोकांना मदत करण्याचा विचार केला. गणपती बाप्पाच्या आगमनाने आपल्यामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार झाले होते सर्व जण जसा वेळ मिळेल तसे दर्शन घेण्यासाठी येत होते, असाच एक दिवस मला आठवतोय आपल्या गणपती बाप्पाची पूजेचा तो दिवस होता राकेश अध्यक्ष असल्यामुळे पूजेला बसण्यासाठी त्यांनी त्याच्या नवीन लग्न झालेल्या एका आत्याच्या मुलाला पूजेला बसण्याचा मान दिला होता निर्विघ्नपणे पूजा पार पडली सर्वजण प्रसाद घेण्यासाठी येऊ लागले होते आनंदाने आनंदाने हा दिवस पार पडला कॉलेजमधील सगळ्या मुला मुलींनी आपल्या आनंदात सहभाग दर्शवला होता अशीच एक मुलगी दर्शन घेण्यासाठी आली आणि फोटो काढण्याच्या नादात तिचा हात गणपती बाप्पाच्या सोंडेला लागला आणि सोंडेला चीर गेली. बापरे! अजूनही तोच दिवस आठवला की अंगावर शहारे येतात सोंडेला चीर गेली हे बघून आपण सर्वजण खूप घाबरलो होतो आणि पूजेचा दिवस असल्यामुळे सगळेजण आपापले लेक्चर्स प्रॅक्टिकल झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तिथे येत होते. आता काय करावं काहीच सुचत नव्हतं. स्नेहा तू तर रडायला लागली होतीस आठवताना स्नेहा म्हणाली हो तो दिवस मी कधीच विसरू शकत नव्हते गणपती बाप्पाच्या सोंडेला चीर तर गेलीच होती पण हळूहळू तिची वाढ वाढू लागली होती मी तर त्या मुलीला खूप रागावले होते म्हणजे फोटो काढण्यासाठी ती मुलगी गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ एवढी गेली होती की तिचा हात सोडलेला लागला होता.

तेवढ्यात राकेश म्हणाला, हो माझा मित्र ओळखीचा होता जो गणपतीच्या आकर्षक मूर्ती बनवायचा ज्याच्याकडूनच आपण आपल्या बाप्पांची मूर्ती आणली होती. त्याला आपण बोलवलं आणि तो देखील त्याची सगळी काम सोडून आपल्या कॉलेजमध्ये आला आणि त्याने ती मूर्ती ची सोंड ठीक केली त्यावेळी सगळ्यांच्या जीवात जीव आला आणि आपली मूर्ती आहे तशीच दिसू लागली. आपण सगळ्यांनी गणपती बाप्पाचे ते सात दिवस खूप एन्जॉय केले होते आणि असे वेगवेगळे अनुभव देखील आपल्याला आले होते. ते सात दिवस कसे गेले कळलंच नव्हतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपण सातव्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करणार होतो त्यासाठी आपण मिरवणुकीचे आयोजन देखील केले होते. आपल्या क्लास मधील सगळ्या मुला मुलींनी आपल्याला मदत केली आणि अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवशीचे विसर्जन होईपर्यंत सगळे आपल्या सोबत राहिले त्या मिरवणुकीत आपण सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घालून मिरवणुकीला जाण्याचे ठरवले होते. सगळ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला सगळे एकाच रंगाचे कपडे घालून आले होते. त्यातूनच आपल्या सर्वांची एकी दिसत होती.

अगदी शांततेत आपण कॉलेजची ती मूर्ती कॉलेज पासून ते विसर्जन करण्याच्या ठिकाणापर्यंत वाजत गाजत आपण आणली होती. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच की काय आपले ते सात दिवस आणि विसर्जन देखील खूप शांततेने झाले होते. दरवर्षी गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये कॉलेजच्या मुलांची खूप भांडण व्हायची त्यामुळे मुली त्यामध्ये सहभागी व्हायला थोड्या घाबरतच होत्या पण यावर्षीची आपले नियोजन बघून सगळेजण विसर्जनासाठी आले होते. आणि निर्विघ्नपणे आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती मूर्तीचे विसर्जन देखील केले. स्नेह म्हणाली त्यावेळी काढलेले आपले फोटो अजूनही माझ्या मोबाईल मध्ये आहेत. ते फोटोच पाहिले की आपल्या सगळ्या दिवसांची आठवण येऊन जाते खरंच आपण आपले कॉलेजचे दिवस किती एन्जॉय केले ना? राकेश म्हणाला हो.

गणेशोत्सवानंतर आपण संघर्ष सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यामध्ये सहभागी होऊन लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. आपला हा ग्रुप असाच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असे आणि या ग्रुप मध्ये फक्त आपल्या क्लासमधली मुलं होती तर कॉलेजमधल्या आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यात फॅकल्टी ची मुलं होती. आणि याच दरम्यान आपण तिघे एकमेकांच्या खूप क्लोज झालो एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिलो. आपलं खूप छान बॉण्डिंग तयार झालं. गणेशोत्सवामुळे आपण तिघे आणि आपला ग्रुप चांगलाच फेमस झाला होता कॉलेजमधली बऱ्यापैकी मुलं आणि शिक्षक आपल्याला ओळखायला लागले होती. राकेश म्हणाला स्नेहा तुला आठवते का याचवेळी आपण एकमेकांशी खूप बोलायला लागलो होतो. आपण नेहमीच सोबत असल्यामुळे कॉलेजमधल्या सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपलं काहीतरी चालू आहे पण आपल्यात फक्त तोपर्यंत निखळ मैत्रीच होती. ना तू मला प्रेमाची कबुली दिली होती ना मी तुला. पण आपण एकमेकांना आवडायला लागलो होतो हे मात्र नक्की खरं.

सगळ्याच लोकांच्या प्रेम कहानी मध्ये दोघांमधला एक जण तरी प्रेमाची कबुली देत असतो पण आपल्या मध्ये असं काहीच झालं नाही आपल्या मनाने हे समजून घेतलं होतं की आपल एकमेकांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. राकेश स्नेहाच्या डोळ्यांमध्ये बोलू लागला स्नेहा तूच माझं पहिलं प्रेम! तुझ्यावर असणाऱ्या या प्रेमाबद्दल मी तुला न सांगता सिद्धूला याची कबुली दिली होती आज तुझ्यासमोर आहे सिद्धू मनाला हो हे खरं आहे राकेशने तुझ्यासमोर कधीच काही न बोलता त्याच्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या. स्नेहा म्हणाली राकेशने त्याच्या भावना व्यक्त करण्याआधीच मी त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी असणारे प्रेम पाहिले होते त्यामुळेच तर काय आम्ही एकमेकांच्या अजूनच जवळ आलो. असेच कॉलेज सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर आम्ही मेसेजवर गप्पा मारत होतो मध्येच राकेश म्हणाला आय लव यू स्नेहा. आणि मीही काही विचार न करता राकेश ला आय लव यु टू असं म्हणाले आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं आमच्यामध्ये काय बोलणं चाललंय पण भावनेच्या भरामध्ये आम्ही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली होती. म्हणजे एकमेकांना प्रेमासाठी विचारण्यासाठी असं म्हणतात की तू माझ्याशी लग्न करशील का किंवा तू मला साथ देशील का असं काहीच न बोलता मी डायरेक्ट एकमेकांना आय लव यू म्हणून टाकलं होतं. तेव्हापासूनच आमची प्रेम कहानी ला सुरुवात झाली.

लेखिका- दामिनी नलावडे

जिल्हा- पुणेईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//