गोष्ट प्रेमाची भाग २

लोक म्हणतात की पहिलं प्रेम मिळत नाही!! यावर तुम्हाला काय वाटतं?? पण मला असं वाटतं की ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम करतो ते प्रेम आपल्याला मिळतच मिळतं.

कथेचे नाव- गोष्ट प्रेमाची भाग २

विषय- प्रेमकथा

फेरी- राज्यस्तरीय करंडक कथामालिका

जेवनाचा स्वाद आणि बोलण्यातला गोडवा अगदी एकत्र आला होता, जेवण आटोपल्यावर ते तिघे खोलीत गेले, आणि त्यांच्या पुन्हा गप्पा रंगू लागल्या, सिद्धेश म्हणाला खरंच मनापासून अभिनंदन तुमच्या दोघांचेही खरंच लोक म्हणतात पहील प्रेम मिळत नाही पण ते तुम्ही मिळवुन दाखवल... यावर ते दोघेही हसले.

स्नेहा म्हणाली एकमेकांवर खरं प्रेम केलं आणि ते मिळवलं. आणि मध्येच सिद्धेश म्हणाला की अरे तुम्हाला आठवतंय का तो दिवस एकदा आपण कॉलेजला असताना दुपारी जेवणासाठी गार्डनमध्ये बसलो होतो आणि तितक्यात स्नेहाचा भाऊ देखील तिथे आला आणि त्याने आपल्या तिघांना जेवताना बघितलं आणि तोही आपल्यामध्ये येऊन जेवायला बसला आता काय करावे हे कुणालाच समजत नव्हते, राकेश तू तर घाबरूनच गेला होता तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता पण तिचा भाऊ काहीच बोलला नाही असंच शांतपणे जेवला आणि तिथून निघून गेला. राकेश म्हणाला हो मग तो दिवस मला अजूनही आठवतोय मी खरंच खूप घाबरलो होतो काय बोलावं, की तिथून निघून जावं हे मलाही कळत नव्हतं पण मी शांतपणाने जेवून घेतलं तो तिथून निघून गेल्यावर मी निश्वास सोडला. स्नेहा म्हणाली मीही खूप घाबरले होते आता घरी जाऊन माझी काही खैर नव्हती हे मला माहिती होतं मी घाबरत घाबरतच घरी गेले घरात एकदम शांतता होती मला कळून चुकलं होतं की दादानी माझ्याबद्दल मम्मी पप्पांना सांगितले आहे. मला असं वाटत होतं की सगळ्यांची नजर माझ्याकडेच आहे मी कुणाच्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हते पण मला कोणी काहीच बोलले नाही ती रात्र तशीच गेली.

हळूहळू कॉलेजमध्ये सगळ्यांशी आपली ओळख होऊन गेली आपला एक ग्रुप बनुन गेला. तोपर्यंत आपण एकमेकांना प्रपोज देखील केलं नव्हतं एक निखळ मैत्री आपल्यामध्ये होती आपण एकत्र कॉलेजला जायचो, लेक्चर्स करायचो, एकत्र जर्नल्स कंप्लिट करायचो, एकत्र लेक्चर्स बंक करायचो, एकत्र जेवायचं पण दोघांकडूनही काही प्रेमाची कबुली आली नव्हती किंवा तस तोपर्यंत मनातही आलं नव्हतं. जवळजवळ सगळे शिक्षक आपल्याला ओळखायला लागले होते. आपलं झाड अजूनही मला आठवते ज्या झाडाखाली आपण लेक्चर बंक करायचो आणि एक्झाम च्या वेळीही स्टडी करत बसायचो त्या झाडावर आपण आपल्या दोघांची नावं कोरली होती. त्या झाडाचं नाव आपण "लव ट्री" असे ठेवलं होतं. आपल्या बसन्यामुळे त्या झाडाची ओळख एवढी झाली होती की आपले मित्र-मैत्रिणी त्या झाडाला आपल्या नावाने ओळखत होते. सिद्धू स्नेहाला म्हणाला स्नेहा तुझे जर्नल किंवा तुझ्या असाइनमेंट्स वगैरे सगळेच वेळच्यावेळी पूर्ण असायचे पण माझी आणि राकेश ची काम कधीच पूर्ण झालेली नसायची, ना कधी जर्नल वेळेवर कम्प्लीट, ना कोणत लेक्चर्स आम्ही कधी अटेंड करायचो पण तुझ्यामुळे आम्ही नेहमीच अपडेट होतो. क्लास मधील सगळ्या नोट्स तू आम्हाला वेळच्यावेळी पुरवत होतीस. आपला अजून एक किस्सा आठवतोय आपलं केमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल चालू होतं त्यावेळी सरांनी सर्वांना प्रॅक्टिकल साठी लागणारी चारकोल पावडर दिली होती. आणि ती चारकोल पावडर राकेश तू ती चारकोल पावडर प्रॅक्टिकल मधील सर्व मुलांच्या कपाळाला लावून त्यांना सत्यनारायणाच्या पूजेला या असे आमंत्रण दिले होते हे मुलांपर्यंतच ठीक होतं परंतु राकेश तू तर सरांच्याही कपाळाला लावून त्यांनाही पूजेला बोलवलं होतं ते पाहून कधी न हसणारे सर त्यादिवशी खळखळून हसले आणि म्हणाले की नक्कीच राकेश तू आयुष्यात कुणीतरी लोकांना हसवणारा आणि त्यांचे दुःख दूर करणारा चांगला माणूस होशील. हा किस्सा ऐकून तिघेही खूप हसले अगदीच रमून गेले होते ते आठवणी त्यांना सुखद आनंद देत होते.

राकेश म्हणाला या प्रॅक्टिकल च्या किस्यावरून मला अजून एक गोष्ट आठवली, ती अशी की मी त्या दिवशी प्रॅक्टिकल ला आलो नव्हतो आणि अटेंडन्स रजिस्टर वर स्नेहाने माझ्या नावापुढे माझी सही केली होती. अचानक सरांनी रजिस्टर चेक केलं आणि त्यात एक सहीकेली जास्त होती . त्यावर सर संतापले आणि त्यांनी विचारले राकेशची ही जास्त ची सही कोणी केली आहे? ही सही एकतर स्नेहा किंवा सिद्धू या दोघांपैकी एकानेच केली असावी असं प्रॅक्टिकल मधल्या सगळ्यांना माहिती होतं. त्यावर कोणीच काही बोलले नाही. खरंच तेव्हा असं जाणवलं की मित्र असावे तर असे या सगळ्यांना माहीत असूनही कुणी आपलं नाव घेतलं नव्हतं. स्नेहा म्हणाली, आपल्या तिघांच्याही एफ. वाय. च्या वर्षातील हे शेवटच प्रॅक्टिकल होतं त्यानंतर आपण एकही प्रॅक्टिकल अटेंड केलं नाही. खरंतर लेक्चर्स पेक्षा प्रॅक्टिकलमध्ये आपण खूप गमतीजमती केल्या आणि एक आठवण अशी की सर्वजण प्रॅक्टिकल ला गेले आणि राकेशने गॅसच्या सप्लायचा मेन स्विच ऑफ ठेवला पूर्ण प्रॅक्टिकल लॅब मधील सगळे गॅसचे बर्नर्स बंद झाले, नक्की काय झालं हे कुणालाच काही समजेना हे फक्त आपल्या तिघांनाच माहिती होते. मी राकेश ला ओरडले पण तरी त्याने काही स्विच ऑन केलं नाही. आणि सरांनी प्रॅक्टिकल होणार नाही असे सांगून सगळ्यांना जाण्यास सांगितले असेच छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आपण आनंद घेत आपले वर्ष पूर्ण करत होतो.

असेच सर्व मित्र मैत्रिणींनी एकत्र राहावे आणि हा ग्रुप टिकून राहावा म्हणून आपण गणेश-उत्सवाची जबाबदारी आपल्या क्लास कडे घेतली. कॉलेजमध्ये तसं तर गणेशोत्सव दरवर्षी साजरा होत होता. दरवर्षी एक-एका क्लासवर त्याची जबाबदारी होती परंतु यावर्षी ती जबाबदारी आपण घ्यावी असे सगळ्यांनाच वाटत होतं आणि तशी ती आपल्याकडे आली.

लेखिका- दामिनी नलावडे

जिल्हा- पुणे

🎭 Series Post

View all