एक अशीही...चौकट!

It's about a lady who break a stereotypes of being a daughter in law.

एक अशीही...चौकट!

धैरवी आज विचारांमध्ये घरी पोहोचली तेव्हा तिचा नवरा अनिशने ती कुठल्यातरी गहन विचारात हरवलेली दिसली. समोर ठेवलेली कॉफी सुद्धा तिला दिसली नाही. 

' धैरू, कॉफी गार होतेय. आल्यापासून बघतोय कुठल्या विचारात हरवली आहेस? बरी आहेस ना?' कपाळाला हात लावून विचारले. 

'मी ठीकच आहे रे. ती मागच्या महिन्यात नवीन सहकारी आली बघ 'धानी' ती जे काही सांगितले त्यावर मला काही प्रतिक्रिया द्याविशी नाही वाटली.' धैरवीने कॉफी मग हातात घेत बाल्कनी मध्ये गेली तसा अनिशही मागोमाग गेला. तिथे दोघांना तासनतास गप्पा मारत बसायला आवडे. 

' सांग पाहू असे काय बोलली ते?' असे म्हणताच धैरवीने सांगायला सुरुवात केली, 

' धानी चे लग्न होऊन 15 वर्षे झाली. त्यातला बराच वेळ तिने लग्ना आधी आणि लग्नानंतरही नवर्‍या पासून दूर जॉब केला. तिला एकच मुलगा. आत्ताच अलीकडे तिचे सासूसासरे रहायला आले तिच्याकडे कारण सासऱ्यांना पक्षाघात झाला. पण हिला काही त्रास नाही त्यांचा असा. कारण नवर्‍याचे आई वडील येऊन राहत आहेत. तोच त्यांचे सगळे बघतो. राहिली गोष्ट सासर्‍यांची तर सासुबाई आहेतच मग मी नाही बघत काही असे तिचे म्हणणे. म्हणजे की उद्या हिचे आई वडील आले तर फक्त हीच बघणार. म्हणजे कसे ना एकमेकांवर कुठल्याही गोष्टी थोपवण्यात नाही आले. मुलगा आता मोठा आहे. म्हणजे स्वतःच स्वतः सगळे करतो. लहान होता तेव्हा घरूनच काम केले होते तिने. मला तर काय बोलावे काही कळेच ना. ' तिने त्याच्याकडे पाहात बोलली 

' हे बघ, मुळातच ही चौकट आपल्या समाजाने घालून दिलीय त्याचाच परिणाम म्हणता येईल. तीने तीच चौकट तोडलीये. आपण वाचतो किंवा म्हणतो की नवर्‍याचे आईवडील त्याची जबाबदारी पण करायची वेळ येते तेव्हा सगळे हात झटकून मोकळे होतात. आपल्या बाबतीत म्हणशील तर जो तो ज्याच्या त्याच्या घरी सुखी आहे. गरजे लागेल तेव्हा आपण जाऊच. हो ना? आणि ही मानसिकता बदलणे अवघड आहे. सूनबाई आली म्हणून तिनेच सगळे करावे. हीच तर ती चौकट आहे जो मोडीत काढायची आहे.' अनिशने अगदी छान समजावून दिले. 

तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा कमेन्ट मध्ये. 

©पूजा आडेप.