अ सोलो ट्रीप टू महाबळेश्वर - भाग ९

सोलो ट्रीपला भेटलेल्या त्याची अन् तिची एक अलवार प्रेमकहाणी
घरी पोहोचताच ती आपल्या बेडरूममध्ये गेली अन् तिने धाडकन दार लावून घेतले.

श्रद्धाच्या घरच्यांना हिला अचानक असे काय झाले म्हणून टेन्शन आले. त्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती काही बोलतच नव्हती. मग सर्वांनी थोडा वेळ वाट बघण्याचे ठरवले.


इकडे मनोजच्या घरीदेखील हीच परिस्थिती होती. मनोज दोन दिवसांपासून आपल्या रूममध्येच होता. तो हॉटेलवर देखील गेला नव्हता.

श्याम मनोजला भेटायला आला. आतापर्यंत घडलेला घटनाक्रम मनोजच्या आईने श्यामला सांगितला. श्याम मनोजच्या हॉटेलवर गेला.तिथून त्याने श्रद्धाच्या घरचा ऍड्रेस मिळवला. तो थेट श्रद्धाच्या घरीच पोहोचला.

डोअर बेल वाजली. श्रद्धाच्या वडिलांनी( सुजयराव
)दार उघडले.

" आपण कोण?" सुजयराव

" मी श्याम. महाबळेश्वरवरून आलोय."श्याम

" काय काम आहे आपले श्रद्धाकडे? तिचे काही विसरले होते का तिकडे?" सुजयराव


" हो. तेच द्यायला आलो होतो." श्याम काहीसा गोंधळत म्हणाला.

" श्रद्धा, ए श्रद्धा..महाबळेश्वरpवरून श्याम नावाचा एक मुलगा तुला भेटायला आलेला आहे. लवकर ये."सुजयराव

श्रद्धा विचार करू लागली.
'श्याम म्हणजे कोण? ओह, येस.आम्ही दोघे एकदा फोटो काढताना, नवरा बायको म्हणून तो आम्हाला फसला होता अन् त्याने मनोजला याबाबत विचारले होते.'

श्रद्धा उठली अन् बेडरूममधून हॉलमध्ये गेली.

" आली बघा श्रद्धा." सुजयराव

" अम्म.. नाही म्हणजे तिच्यासोबत बोलायचे पण होते.एकांतात.." श्याम

श्याम आणि श्रद्धा एकमेकांकडे बघू लागले.

श्रद्धाचे आई -वडील जरा घाबरले.

" जे काही असेल ते इथेच बोललात तर चालेल." सुजयराव

श्याम आता चांगलाच घाबरला.तरीही आज ना उद्या माहित होणारच म्हणून त्याने सगळ्यांसमोर सांगायला सुरुवात केली.

" श्रद्धा, मनोजचे तुझ्यावर खूप प्रेम आहे,तुझ्याशिवाय तो कासावीस झाला आहे." श्याम

" श्रद्धा,काय ऐकतोय मी हे? " सुजयराव

श्रद्धाने सगळा धीर एकवटून सोलो ट्रीपमध्ये घडलेल्या साऱ्या गोष्टींचा घटनाक्रम घरातील सगळ्यांसमोर सांगितला.

" यासाठी गेली होतीस का तू सोलो ट्रिपला?"श्रद्धाची आई(सुलभाताई)

" आई, माझ खरंच प्रेम आहे गं त्याच्यावर.." श्रद्धा


आता मात्र सुजयराव चांगलेच भडकले.

" श्रद्धा,आत जा." सुजयराव

" बाबा, प्लीज माझ ऐकून घ्या." श्रद्धा

सुजयरावांनी रागातच एक कठोर कटाक्ष तिच्याकडे टाकला.ती घाबरली अन् आत गेली.

" हिला सोलो ट्रीपला काय पाठवलं अन् ही तिथे असले थेरं करून आली." सुजयराव

तेवढ्यात श्रद्धाचा भाऊ दीपक म्हणाला,

" बाबा,तिने आपल्या सर्वांना तिचा लव्ह मॅरेजचा विचार आधीच सांगितला होता.श्रद्धा एक सरळमार्गी आणि समजूतदार मुलगी आहे.तिच्या निवडीवर मला पूर्णपणे खात्री आहे.मला वाटतं की तुम्ही एकदा त्या मुलाला अन् त्याच्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटावं.म्हणजे हे प्रकरण एकदाचे मार्गी लागेल.उगाच आरडा-ओरडा करून,वादावादी करून काहीही निष्पन्न होणार नाही." दीपक

" अहो,मला वाटतं दीपक योग्य बोलतोय.आपण एकदा तो मुलगा ,त्याचे घरदार कसे आहे,हे बघुया ना!मग ठरवता येईल काय करायचे ते!"सुलभाताई

" काकू,मी त्याच्या कुटुंबाला खूप चांगले ओळखतो. मनोज एक पदवीधर मुलगा आहे. त्याचा भाऊ एक मतिमंद व्यक्ती आहे, जी घरात सतत ओरडत असते, वस्तूंची फेक-झोक करत असते.खरं तर त्याला योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही ,म्हणून त्याची ही अवस्था झाली आहे.घरातील या परिस्थितीमुळे मनोजने शहरातील चांगली नोकरी सोडून हॉटेलवर काम करायचे ठरवले कारण त्याचाच आधार त्या कुटुंबाला आहे. मनोजचे आई- वडील म्हणजे उत्साह आणि आनंदाचा जणू एक खळाळता झरा आहेत.श्रद्धाने मनोजला आपल्या प्रेमाबद्दल विचारले तेव्हा मनोजने तिला काहीही प्रतिक्रिया दिली नाही.तिला त्याच्या घरातील परिस्थिती सहन होणार नाही,म्हणून त्याने तिला त्या दिवशी त्याच्या प्रेमाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही." श्याम

" बाबा, आपल्या घरातही अशीच काहीशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती. माझा योग्य उपचार मला नीट करू शकला आणि त्यामुळे मी आज व्यवस्थित आहे.त्यामुळे आपण मनोज आणि त्याच्या घरातील परिस्थिती समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा असे मला वाटते."दीपक

एव्हाना श्रद्धाच्या वडिलांना या सर्व प्रकरणाची आता चांगलीच कल्पना आली होती. एकीकडे त्यांचे मन मनोज विषयी कळवळले होते तर दुसरीकडे श्रद्धा अशा घरात गेली तर तिचे काय होईल हा विचार त्यांच्या डोक्यात सलत होता.

सुलभाताईदेखील आता मनोजच्या कुटुंबीयांबद्दल भावुक झाल्या.एकीकडे हीचे कॅम्पस सिलेक्शनचे जॉइनिंग तर दुसरीकडे आयुष्याचा एवढा मोठा निर्णय ..काय करावे या द्विधा मनस्थितीत त्या उदास बसल्या होत्या.

" तुम्ही काही घ्याल का? चहा , कॉफी?" सुलभाताई

" मला काहीही नकोय काकू.फक्त हे असे का घडले याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही फक्त एकदा मनोज अन् त्याच्या कुटुंबाला भेटा.मग तुमचा जो निर्णय असेल तो सर्वांना मान्य असेल." श्याम

श्रद्धाचे मन हे भावगीत गात होते,

" कशी सावरू स्वतःला
अघटीत वेळ असे ही,
भावनांचा माझा हलकल्लोळ
कळतोय का तुला ही ?"

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all