आयुष्य एक रंगमंच च आहे
रोज हजारो भेटतात जिथे मुखवटे
वेगवेगळ्या छटांनी रंगलेले
कुठले खरे कुठले खोटे
कायम गोंधळात पाडणारे
बरं गोंधळ कितीही पडू देत
इथे आपलं पात्र आपल्याला छान रंगवायचं आहे अन जगायचं ही आहे
या रंगमंचावरून एक्सिट होईस्तोवर
मनमुराद मजा लुटायची आहे
इतकं स्वतः शी एन्ट्री मारल्या मारल्या च घ्यायचं ठरवून
म्हणजे मुखवटे काय वागतात
कसलं सोंग घेतात
एक याचा त्रास होत नाही
अन आपल्या जगण्याच्या मजेला
उगाच कुणाची दृष्ट लागत नाही
बरंच अवघड असतं बाबा
या रंगमंचावर तग धरून राहणं
कोण कुठल्या भावनेशी खेळायला कुठल्या मुखवट्यात येईल हे कायम च असतं कोडं पडलेलं
या साऱ्या पासून वेगळं होऊन
तुम्हाला रंगमंच गाजवायचा असेल तर
इतकं जरूर करा
दिल घेतलं विसरून जा
अहंकारावरचे वार परतवून लावा
खेळ राहील जोवर रंगलेला इथं
तोवर हसऱ्या चेहऱ्याने जगण्याची मजा लुटत राहा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा