८(१)आयुष्य एक रंगमंच..

life is like a drama or u have to assume it and should have to enjoy the every play of this dramatical life ,its a roller coaster of emotions ,u have to go all through this nd after enjoying this journey stop at some point, at some where from where u

आयुष्य एक रंगमंच 
त्याचा एक भाग आपण कधी होतो
आपल्याला देखील कळत नाही 
मुखवटे लावलेले चेहरे आपल्यात च असतात 
आपल्याला मात्र ते उमगत नाही 
इथली ना एन्ट्री आपल्या हातात असते 
ना एक्सिट असते आपल्याला हवी तेव्हा 
दोर आपल्या पात्राचे असतात भलत्याच कुणाच्या हातात 
जोपरेंत खेळ सुरु आहे रंगमंच गाजवत राहायचं 
आपली वेळ आली कि गुंतून न पडता 
सहज इथून निघून जायचं 
दिल घेतलं साऱ्यांचा उगाच हिशोब लावत बसायचं नाही 
जे आपलं नव्हतं च कधी ते उगाच सांभाळून ठेवायचं नाही 
या क्षणाला जे पुढ्यात आहे ते आपलं म्हणून जगुन घ्यायचं 
पुढच्या क्षणाचं गणित आपल्याला कुठे ठाऊक असतं 
मिळालेला रोल मात्र खास बखुबीने निभवायचा 
रंगमंच सोडल्यावर 
उमदा कलाकार गमावला हे मागे राहिलेल्या वाटलं पाहिजे 
इतका जीव या रंगमंचावर ओतायचा 
एक क्षण असा येईल 
क्षणात काळजात कळ जाईल 
तेव्हा मात्र गुंतायचं नाही 
एक्सिट ची तिसरी घंटा वाजण्या अगोदरच 
आपला पाय काढता घ्यायचा 
आपला पाय काढता घ्यायचा...