नणंद भावजय.......... एक नात मैत्रीच्या जवळच भाग दोन

A Friendly Realationship Between Housewife And Her Sister-in-law


दुपारी सीमाने ( नणंदेला) जयाताईंना फोन लावला, जया एका मोठ्या महानगरातल्या ज्युनिअर कॉलेजला अर्थशास्त्र शिकवायची, एम. ए .बी. एड. झालेली. तर जया चा नवरा केमिकल इंजिनियर. जया एका सधन कुटुंबात सुखा-समाधानाने नांदत होती .सर्व भौतिक सुखं तिच्या समोर हात जोडून उभी होती.


जया - "सीमा मी तुला एका तासाने फोन करते, आता माझं लेक्चर सुरू आहे."

एका तासानंतर


जया -"हा सीमा काय म्हणत होतीस ग?"


सीमा- "ताई मला ना घरातल्या कामाचं काहीच कळत नाही! राधा वहिनींचा कामाचा झपाटा तर तुम्हाला माहितच आहे ,पण त्याचं सगळं करतात मला ओशाळल्यासारखं होतं."


जया - "अग सुरुवातील असं होतच"." राधा वहिनींच्या लग्नाला आता पंधरा वर्षे झालीत. चांगल्या मुरल्या त्या संसारात! आजीला तर आईशिवाय कोणी नकोच असतं. त्यामुळे आईलाच आजीचं सगळं करावं लागतं, सकाळी उठून तुझी खोली आवर. नितीनला पसारा ,अस्वच्छता अजिबात आवडत नाही. त्याचं पुस्तकांचा शेल्फ व्यवस्थित लावून ठेव, त्याच्या पुुस्तकांना हात नको लावू, नाहीतर सगळं घर डोक्यावर घ्यायचा तो". \"सकाळी पूजेसाठी बाबांना फुलं आणून दे ,देवाची तांब्या-पितळेची भांडी घासून लख्ख कर ,निमाचं गणित थोडं कच्च आहे, तू तर गणिताची चॅम्पियन आहेस, तिचा थोडासा गणिताचा अभ्यास घेऊ शकते ,वरूण ला इंग्रजी बोलण्यात मदतही करू शकते , बघ यातलं तुला काय काय जमतंय ते!"

दोघींचं बोलणं झाल्यावर सीमा विचार करायला लागली, \"आपलं इंग्रजी चांगलं आहे ,गणित विषय आपल्याला छान जमतो आणि आवडतो ही, हे त्यांना कसं माहित?\".

पण जया ताईंच्या त्या दोन वाक्यांनी सीमाच्या मनात ज्या ताईंचा आदर दुणावला, आणि भरल्या घरात मग सीमाने आपली जागा बनवली.


वेळे सोबत सगळं पुढे सरकत होतं. सीमाच्या पहिल्या बाळंतपणात तिच्या वडिलांना हार्ट अटक आल्याने सीमाची आई येऊ शकली नव्हती , पण म्हणून जया आणि राधा वहिनीने सीमाला एकटं सोडलं नाही. दुपारी गप्पा मारताना जया सीमाला सांगायची -"तुला माहितीये मी, राधा वहिनी आणि दिनू आमचं एक त्रिकुट होतं, वहिनी जेव्हा नवीन लग्न होऊन आली होती ना ,तेव्हा आम्ही खूप मज्जा करायचो". आमच्यातही कुरबुरी झाल्या, नाही असं नाही, पण मुळातच राधा वहिनी चा स्वभाव पड खाणारा आणि आई होतीच ना सांभाळायला.


सीमा मग नितीन विषयी विचारायची.

जया -"अगं विनुभाऊ आणि मी झाल्यावर जवळपास आठ दहा वर्ष आईला मूलबाळ नव्हतं . बाबा म्हणाले असू देत, पण तरीही आईनं अजून मुल हवं म्हणून खूप उपास-तापास , नवस सायास केले . आणि मग नितीन झाला. पण त्याची तब्येत ही अगदी तोळामासा होती . मग बाबांनी जातीने लक्ष घालून त्याच्या खाण्यापिण्याचं पाहिलं. तो बाबांच्या तालमीत तयार झालेला आहे. बाबांसारखाच अबोल , शिस्तप्रिय , पण खूप हळवा आहे. मनातलं कधी कोणाला काही सांगत नाही . आपल्यालाच सारं समजून घ्यावं लागतात."


©® राखी भावसार भांडेकर.

जय हिंद.


🎭 Series Post

View all