संसाराची गाडी... भाग २

"काही नको गं. आता आपण आधी मस्त चहा घेऊ. सोबत वड्या आणि भजे खा. तुला आवडतात म्हणून मुद्दाम केल्यात. "किती काळजी करता हो आई तुम्ही. सगळ्यांना कसं नीट सांभाळून घेता." स्नेहल कौतुकाने कुसुमकडे बघून बोलली.


मागील भागात आपण बघितले …


"आईकडे सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे ती अशी न सांगता कधी जात नाही. म्हणून विचारलं." रविराजकडे प्रश्नार्थक नजरेने बघत कुसुम बोलली.


"सगळं ठीक आहे तिथे. ती परत न येण्यासाठी गेली आहे. जाऊदे जाते तर, मला पण गरज नाही तिची." केतन रागात बोलत होता.


आता पुढे…


"नीट सांगशील काय झालं आहे? जरा आम्हाला कळेल असं बोल." रविराज गंभीर आवाजात बोलले.


"तू आधी शांत हो बरं. चहा घे आणि मग बोल." कुसुम चहाचा कप केतन समोर धरत बोलली.

केतनने चहाचा कप हातात घेतला आणि कपाळावर आठया पाडत कसातरी संपवला. रविराजने देखील त्याचा चहा संपवला. परस्थिती गंभीर असल्याचा अंदाज कुसुमला आला होता. त्यामुळे काय झाले? हे, जो पर्यंत कळत नाही तोपर्यंत तिच्या घाशाखाली चहा काय, पाणी देखील जाणार नव्हते. ती अधिरतेने दोघांचा चहा संपण्याची वाट बघत होती.


"हम्म्म, आता बोल. पण एकदम शांततेत." रविराज तशाच गंभीर आवाजात बोलले.


"आई-बाबा, तिला माझ्यासोबत राहायचं नाहीये." केदार जरी शांततेत बोलत होता तरी, त्याच्या डोळ्यात राग होताच.


"पण का?" रविराज बोलला.


तितक्यात दाराची घंटी वाजली. \"आता कोण असेल?\" ह्या विचारात कुसुमने दार उघडले. समोर स्नेहल होती.


"अगं स्नेहल आलीस तू? तुझीच वाट बघत होतो आम्ही. जा फ्रेश होऊन ये." कुसुम जणू तिला काही माहीतच नाही, काही घडलेच नाही. अशा प्रकारे बोलली. अगदी रोजच्या सारखी.


"हो आई. येतेच मी फ्रेश होऊन." स्नेहल खोटं हसली आणि जातांना केतनकडे एक कटाक्ष टाकून आत निघून गेली.


"अर्धा तासातच डोकं ठिकाणावर आलं वाटतं हिचं." केतन कुष्चीत हसून पुटपुटला.


"केतन शांत बस. उगाच विषय वाढवू नकोस." रविराज डोळे मोठे करत बोलला.


थोड्यावेळात स्नेहल फ्रेश होऊन आली. दरम्यान कुसुमने तिच्यासाठी आणि स्वतः साठी चहा केला. स्नेहलला बघून कुसुमच्या चेहऱ्यावरील ताण जरा कमी झाला होता. चिंतेची रेष हलकीच कमी झाली होती. कुठेतरी मनात स्नेहल बद्दल तिचा असलेला विश्वास खरा ठरला होता.


"आई, काय मदत करू?" स्नेहल किचनमध्ये येत बोलली.


"काही नको गं. आता आपण आधी मस्त चहा घेऊ. सोबत वड्या आणि भजे खा. तुला आवडतात म्हणून मुद्दाम केल्यात.


"किती काळजी करता हो आई तुम्ही. सगळ्यांना कसं नीट सांभाळून घेता." स्नेहल कौतुकाने कुसुमकडे बघून बोलली.


कुसुम मात्र स्नेहलच्या डोळ्यात काहीतरी सल बघत होती. पण ती सल कसली होती? हे जोपर्यंत स्नेहल आणि केतन सांगणार नाही, तोपर्यंत कळणार नव्हते. पण काहीतरी नक्की झाले ह्याची ती खून होती.


स्नेहल आणि कुसुम चहाचे कप घेऊन बैठक खोलीत आले. केतन आणि रविराज तिथेच बसलेले होते.


"आली आयता चाह घ्यायला." केतन हलक्या पण स्नेहलला ऐकू जाईल असे बोलला.

"हम्म." म्हणत रविराजने केतनकडे बघत डोळे वटारले.

स्नेहल, केतनच्या बोलण्याने अधिकच दुखावली गेली होती. पण तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने कुसुम सोबत चहा घेतला. सोबत खमंग कोथिंबीरच्या वड्या आणि बटाट्याचे भजे खत विचारात हरवलेली होती. तरी देखील कुसुमच्या हातच्या वाड्यांचे आणि भज्यांचे कौतुक तिने न विसरता केले. खरं तर काहीही खाण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण कुसूमने इतक्या प्रेमाने तिच्यासाठी केलेल्या, तिच्या आवडीच्या पदार्थाला नकार देऊन तिला, कुसूमचा हिरमोड करायचा नव्हता.

दोघींचे खाऊन होईपर्यंत सगळे शांत बसले होते. चहा नाष्टा झाल्यावर स्नेहल सगळं आत घेऊन गेली. नंतर टेबल स्वच्छ केला आणि सॉफ्यात जाऊन बसली.


"आई-बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे." गंभीर आवाजात स्नेहल बोलली.


पुढील भागात बघू काय बोलायचे असेल स्नेहलला?तिच्या बोलण्यावर कुसुम आणि रविराजची काय प्रतिक्रिया असेल? वाचत राहा संसाराची गाडी.


क्रमशः
©वर्षाराज

🎭 Series Post

View all