Oct 28, 2020
Romantic

7.ऋचा- बेधुंद मनाची लहर

Read Later
7.ऋचा- बेधुंद मनाची लहर

 

Hospital मधील त्यांची ती गप्पाची रात्र,किंवा त्यांची पहिली तोंडओळख च म्हणा ना ती आठवत दोघेही दररोज दिवसातून एकदा तरी मनूच्याच निमित्ताने हॉस्पिटलमध्ये भेटत होते किंवा कधीतरी त्याच तिला घरी सोडणं होत होतं..संजू अधूनमधून सत्याला लग्नाविषयी विचारत होती.ऋचा फक्त अल्लड आहे ,हि त्याची समजूत कशी चुकीची आहे हे त्याला पटवून देत होती..सत्याला ते सगळं पटत होत पण म्हणून "लग्न",हे त्याला तेव्हाही मान्य नव्हते आणि आताही नाही...ऋचाच त्याच्यावर असलेलं प्रेम सगळ्यांना तर दिसतंच होते पण सत्यालाही ते आता दिसत  होते..स्वतःच्या तिच्याविषयी असलेल्या भावनांविषयी तो confirm नव्हता..तर ऋचा मात्र लग्नाचा मनापासून विचार करायला लागली होती...

मनू ला हॉस्पिटलमधून घरी आणायची वेळ झाली होती..सत्य,संजू,ऋचा तिघेही तिला घ्यायला आले होते..मनू खूप आनंदित होती कारण हॉस्पिटलचे अळणी जेवण खाऊन तिला कंटाळा आला होता।।ऋचा तिची बॅग भरत होती,मनू सत्याच्या गळ्यात हात घालून मस्त पैकी गप्पा मारत होती..

मनू- बघा ना पप्पा मला जर आई असती तर तीने असेच माझं सगळं केलं असतं ना??

सत्या-हो नक्की..

मनू-मग करा ना विचार..

सत्या-या सगळ्या गोष्टी खरंच तुझ्या कळण्यापलिकडे आहे.

मनू-ते मला काय माहित नाही पण मला ती सोडून दुसरं कोणीही नको आहे..

सत्या-अगं आई मी दुसरीचा पण विचार करणार नाहीये गं.तू खूप लहान आहेस आपण नंतर बोलू..

मनू-तुम्ही नेहमीच असं बोलता(गाल फुगवत),तेवढ्यात तिला एक idea सुचते..
"मला तुमच्या दोघांचाही किस पाहिजे "असे तिने म्हणताच हे दोघे आश्चर्याने तिच्याकडे बघतात