दिनविशेष म्हटलं की अनेक गोष्टी येतात, त्यात सणवार, उपास अशा अनेक गोष्टी दिनविशेष वर अवलंबून असतात.
अनेक घडामोडी आपल्याला कॅलेंडर मार्फत, पंचांग मार्फत आपल्याला कळतात.
म्हणुनच मी आजचा मराठी दिनविशेष तुम्हाला ह्या लेखात मांडणार आहे.
मराठीत दिनविशेष ( special day ).
आजचा दिनविशेष ( today special day.).
अनेक घडामोडी आपल्याला कॅलेंडर मार्फत, पंचांग मार्फत आपल्याला कळतात.
म्हणुनच मी आजचा मराठी दिनविशेष तुम्हाला ह्या लेखात मांडणार आहे.
मराठीत दिनविशेष ( special day ).
आजचा दिनविशेष ( today special day.).
23 डिसेंबर दिनविशेष ( 23 december dinvishesh )
1893 हँसेल अँड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितीक परीकथेचा पहिला प्रयोग झाला.
1914 पहिले विश्वयुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यूझीलँडच्या सैन्याचे केरो इजीप्त येथे आगमन.
1940 वालचंद हिराचंद यांनी बंगळूरू येथे हिंदुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरु करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
1947 अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रांजिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.
1954 डॉ जे हार्टवेल हॅरीसन आणि डॉ जोसेफ इ मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढून पाहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
1954 बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
1970 धी गोवा हिंदू असोसिएशन निर्मित वि वा शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
2000 कलकत्ता शहराचे नाव कोलकत्ता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी.
2001 बिहारमधील चंपारण्य जिल्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची 104 फूट आहे.
2013 सलमान खान विरुद्ध 17 साक्षीदारांनी साक्ष नोंदवल्या नंतर सत्र न्यायलयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
जन्म..
1690 मणिपूर सम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.
1854 ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेंरी बी गुप्पी यांचा जन्म.
1897 ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटणाईक यांचा जन्म.
1902 भारताचे 5 वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म.
मृत्यू....
1834 प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्यस यांचे निधन.
1926 स्वामी दयानंदाचे शिष्य गुरुकुल विश्वविद्यालयचे संस्थापक, शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या.
1965 नट व गायक गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन.
1979 हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन.
1998 स्वातंत्र्यसैनिक रत्नाप्पा कुंभार यांचे निधन.
2000 मलिका ए तरणूम म्हणुन ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ उर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन.
2004 भारताचे 9 वे पंतप्रधान वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन.
2008 गीतकार व कवी लेखक गंगाधर महामबरे यांचे निधन.
2010 केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के करुनाकरण यांचे निधन.
2010 कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन.
2013 एके 47 रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन.
2013 भारतीय कवी आणि शिक्षक जी एस शिवरुद्रप्पा यांचे निधन.
-----------------------------------------------------------------------
सांस्कृतिक महत्व.
मार्गशीर्ष शु 11/12
भागवत एकादशी.
अयन करिदिन.
सांस्कृतिक महत्व.
मार्गशीर्ष शु 11/12
भागवत एकादशी.
अयन करिदिन.
( वरील माहिती इंटरनेट च्या आणि कालनिर्णय च्या साह्याने घेतली आहे.)