२०२० चा निरोप घेताना

पाहता पाहता वर्ष संपत पण आले.. आता तुम्ही म्हणाल हे आपण दरवर्षीच बोलतो. पण हे २०२० चे वर्ष जरा जास

पाहता पाहता वर्ष संपत पण आले.. आता तुम्ही म्हणाल हे आपण दरवर्षीच बोलतो. पण हे २०२० चे वर्ष जरा जास्तच special होते ना! का? अहो कोरोना ! त्याला विसरून कसा चालेल, नाही का? २०२० अक्षरशः गाजवले त्या पठ्याने ! भल्या भल्याना नाही जमले ते त्याने करून दाखवले. आमची मुंबई! जी महापूर असो कि बॉम्बस्फोट, कोणीच आजपर्यंत धावत्या मुंबई ला थांबवू शकला नव्हता. ते या कोरोना ने थांबवला. ठप्प केले सगळे कारभार! जवळची माणसे हिरावून नेली. एकाच घराने कितीतरी मृत्यू पहिले. आणि अगदी आपल्याच माणसाचा शेवटचा चेहरा देखील पाहायला ना मिळावा या पेक्षा भयावह काय असू शकेल, ते देखील अनुभवले. भारतीय संस्कृती मध्ये सण समारंभ जे आप्तेष्टांशिवाय कधी झालेच नव्हते, आज ते देखील २५- ५० माणसांत उरकले जात आहेत. ज्या सोशीअल मीडिया ला इतके दिवस नाव ठेवत होते, ते लोक पण आज त्याचाच उपयोग करून मित्र आणि नातेवाईकांशी संपर्कात राहू लागले आहेत. टेकनॉलॉजि ने माणसांना या कठीण काळात देखील जोडून ठेवले हे मात्र खरे!

          तर असे हे वर्ष २०२०! प्रत्येकाला काही ना काही शिकवले याने. नवीन नाती जोडली, नाती तोडली देखील. माणसं जवळ आणली आणि दुरावली पण तितकीच! असो! तर माझ्यासाठी हे वर्ष खूप छान होते. अगदी सुरुवाती पासूनच! एकदम मस्त! २०२० मध्ये जाताना मी ५ महिन्यांची प्रेग्नन्ट होते. जेव्हा मी प्रेग्नन्ट राहिले तेव्हा काही कॉम्प्लिकेशन्स मुळे मी बेडरेस्ट वर होते. पण २०२० चा सुरुवातीला म्हणजे ५व्या महिन्यापासून मला नॉर्मल फिरायला परवानगी मिळाली. मग काय मज्जाच! जवळच्या मित्राच्या लग्नाला जात आले. नंतर माझा ३०वा वाढदिवस खुपमस्त सेलेब्रेट केला माझ्या नवऱ्याने! जानेवारी महिना मला आवडतो कारण माझा वाढदिवस २८ जानेवारी!

        त्या नंतर ओटभरणी साठी तर मी खूपच excited होते. सगळे शॉपिंग! आणि तयारी! त्यातच माझ्या नवऱ्याची राजस्थान वारी पण झाली. त्यांना ऑफिस कडून चान्स मिळाला आणि मग काय वेगळाच आनंद असतो ना! ऑफिस कडून कुठे जायला मिळणं म्हणजे अगदी मेहनतीचं चीज असतं. आम्ही दोघेही खूप खुश होतो. येणाऱ्या बाळासाठी खूप आतुर झालो होतो. ५ मार्च ला माझी ओटभरणी केली. सगळे नातेवाईक मैत्रिणी. खुप सारे फोटो. नंतर होळी झाली. आणि मग मी सासरी परत आले. आणि सुरु झाला कोरोना.

        lockdown सुरु झाले आणि काय! हे घरीच! वर्क फ्रॉम होम पण नावाला अगदी! सेल्स मध्ये असल्यामुळे काय काम करणार घरून! माझा ७वा महिना संपून ८वा सुरु झालेला! आणि यांनी मला पूर्ण आराम दिला. किचन चा ताबा घेतला. मला जे हवं ते सगळं बनवून दिलं. डोसे, पाव भाजी, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटिस आणि वडा पाव पण! मला गोड खूप आवडते, त्यामुळे खीर, गुलाबजाम, रसगुल्ले पण होते दिमतीला! आणि डोहाळे होते आईस क्रीम चे! मग डेअरी मधून फॅमिली पॅक आणूनच ठेवायचे! न जाणो lockdown मुळे मिळाला नाही तर? लग्नाच्या ५ वर्षांत पण इतका वेळ कधी मिळाला नव्हता, तो वेळ आम्हाला मिळाला. खूप छान आणि मंतरलेले दिवस होते ते. तास माझा माहेर अगदी जवळच म्हणजे १० मिनिटाच्या अंतरावर. त्यामुले ९वा महिना लागल्यावर आई बोलावू लागली, पण हे माझी इतकी काळजी घेत होते, कि जायची इच्छाच झाली नाही. बाळाच्या हालचाली जाणवायला लागल्या कि दोघांनी मिळून त्या फील करायच्या! खूप छान वाटत होतं. youtube वर बाळाचे videos बघायचे, वेगवेगळे movies आणि खात राहायचं.

         संध्याकाळी टेरेस वर घरातले सगळे जमायचे, त्यांच्या बरोबर थोडा वेळ घालवायचा. नंतर परत आम्ही दोघे आणि आमचं बाळ! त्या २ महिन्यात हे बाळाशी खूप जास्त attach झाले. आणि आम्ही दोघेही working असल्यामुळे लव्ह marriage असून सुद्धा इतका वेळ आम्हाला कधीच मिळाला नव्हता. तो या कोरोना च्या lockdown ने आम्हाला दिला. जसजशी डिलिव्हरी ची तारीख जवळ येत होती तसतशी सगळ्यांना काळजी वाटत होती. आम्ही दोघेच कसा manage करणार. पण इतकं कुणीच करणार नाही तितकी काळजी हे घेत होते. दिवसभर सगळ्यांचे विडिओ कॉल्स असायचेच! त्यांनाही मी खुश दिसत होते त्यामुळे चिंता कमी झाली होती. भाऊ आणि बहीण येऊन जायचे. ते सांगायचेच जीजू किती काळजी घेतात.

         डिलिव्हरी साठी चे हॉस्पिटल माझ्या मामा मामी चे होते त्यामुळे त्यांनी खास माझ्या डिलिव्हरी साठी pregnancy चे सोडून एकही patient घेतला नाही. एकदम special ट्रीटमेंट सगळी! मुलगी झाली आणि आम्हाला दोघांनाही खूप आनंद झाला. आम्हाला मुलगीच हवी होती आणि ते हालचाली वरून नेहमी बोलायचे कि हि मुलगीच आहे. आई आणि हे दोघेच होते त्या वेळी. आई ने नंतर सांगितले, ह्यांनी रडण्याचा आवाज ऐकूनच म्हटले होते, मुलगी झाली. इतके attach झाले होते ते. lockdown मुळे कोणी येऊ शकले नाही बघायला. सगळे विडिओ कॉल वर बघायचे तिला.

        आणि मग मी आई कडे गेले. ह्यांचं ऑफिस सुरु झाले, पण ह्यांना कुठे राहवणार! घरी जाऊन अंघोळ करून मग यायचे रोज मुलीला भेटायला! ३ महिन्यांनी सासरी परत गेले, तेव्हा तर ह्यांनी सगळी मदत करायला सुरुवात केली मला. त्यामुळे काहीच टेंशन नाही राहिले. नाश्ता, जेवण सगळं सगळं. सीझर झाल्यामुळे आई कडे आराम केला होता आणि सासरी आल्यावर पण ह्यांनी आमची दोघींचीही खूप काळजी घेतली. ऑफिस आणि घर दोन्ही manage करत होते. सासूबाई खालच्या मजल्यावरच राहतात पण त्यांनी कधीच काही केला नाही. त्यांचा येणं जाणं अगदी पाहुण्यांसारखं. आणि त्यात मुलगा सगळं करतो आहे म्हटल्यावर आणखीनच त्रास त्यांना ! पण ह्यांनी कधीच लक्ष दिलं नाही.

        मुलगी साडेपाच महिन्यांची असताना मी ऑफिस जॉईन केले, वर्क फ्रॉम होम. खूप तारांबळ उडत होती दोघांची. पण त्यांनी मला पूर्ण मदत केली आणि करत आहेत. आता २ महिने होतील मी ऑफिस जॉईन करून पण मला कधीच काही प्रॉब्लेम झाला नाही. मुलगी झोपते. खेळते. मला सगळं काम करून देते. मिस्टर सगळी मदत करतात. एक miscarriage आणि खूप कॉम्प्लिकेशन्स नंतर प्रेग्नन्ट राहून मुलगी झाली, त्यामुळे तीची खूप काळजी घेतो आम्ही.

सुख म्हणजे काय ते नुसतं अनुभवलं नाही तर जगले आहे मी या २०२० मध्ये!!

       पुन्हा lockdown ची चर्चा होत असताना जेव्हा सगळ्यांना टेन्शन आले होते तेव्हा मी मात्र खुश होते. घरात lockdown होण्यात किती सुख आहे ते मी अनुभवले! २०२० ला मी खूप खूप धन्यवाद देईन, आयुष्यातले खूप मोलाचे क्षण मला दिले. खूप गोड आठवणी दिल्या. असं वाटत हे वर्ष संपूच नये.

         काही ओळी खास २०२० साठी......

निघालास तू..

थोडा आणखी थांबून जा...

जे गोड क्षण दिलेस ते आणखी गोड करून जा...

कोरोना चा कडवटपणा सोबत घेऊन जा...

२०२१ ला आणखी गोडवा देऊन जा ....

माझ्या आयुष्यात सुखाची भरभराट केलीस...

तशी सगळ्यांच्या आयुष्यात करून जा ....

कोणी तुला वाईट ना म्हणावे म्हणून प्रत्येकाला काहीतरी देऊन जा...

जाताजाता सगळ्यांना एक गोड आठवण देऊन जा...