10 मार्च दिनविशेष - Dinvishesh In Marathi

माहितीपूर्ण
10 मार्च दिनविशेष - 10 march dinvishesh
आजचा दिनविशेष - today dinvishesh.
Dinvishesh in marathi - मराठीत दिनविशेष.
दिनविशेष - dinvishesh
महत्वाच्या घटना - mahtvachya घटना

1862 अमेरिकेत कागदी चलन नोटांची सुरवात झाली...

1873 अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांच्या सहकारी थॉमस वॅटसन यांच्याशी दूरधवानी वरून पहिल्यांदा संवाद साधला.

1922 प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधीना 6 वर्षांची शिक्षा झाली.

1952 केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अ‍ॅंटिबायोटिक्स या पेनीसिलीन कारखान्याच्या पायाभरणी समारंभ झाला.

1972 वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.

1977 युरेनस ग्राहला शनि ग्रहासारखी कडी असल्याच शोध लागला.

1985 भारताने पाकिस्तानाला पराभूत करून मेलबॉर्न येथे बेन्सन अँड हेजेस चॅम्पियनशिप ही क्रिकेट स्पर्धा जिंकली.

1985 भारतीय क्रिकेट संघाने रवी शास्त्री यांना चॅम्पियन्स हा 'किताब मिळाला.

1998 भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लीनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.

जन्म....

1628 इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पीघी लादेन यांचा जन्म.

1918 गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे उर्फ छोटा गंधर्व यांचा जन्म...

1929 कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म.

1945 केंद्रीय रेल्वे मंत्री माधवराव शिवाजीराव शिंदे यांचा जन्म.

1957 अल कायदा या आतंकी संस्थेचे संस्थापक ओसामा बिन लादेन यांचा जन्म..

1974 द्विटर चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म.

मृत्यू...

1872 इटालियन स्वातंत्र्यवीर जोसेफ मॅझिनी यांचे निधन.

1897 पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सवित्रीबाई फुले यांचे निधन...

1940 रशियन कथा, कादंबरिकार आणि नाटककार बुल गाकोव्हा मिखाईल यांचे निधन.

1959 पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद जयकर यांचे निधन.

1971 कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन.

1985 सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टंटिन चेरेनेन्को यांचे निधन..

1999 प्रसिद्ध कवी वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन.

टीप - सदर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेण्यात आली आहे..